✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अस्तंगत होणार्‍या अंधश्रद्धा

य
यनावाला यांनी
Sun, 04/15/2012 - 14:40  ·  लेख
लेख
अस्तंगत होणार्‍या अंधश्रद्धा "प्लॅंचेटवर मृताच्या आत्म्याशी संवाद" हा भ्रम पूर्वी सर्वत्र बोकाळला होता.कालान्तराने त्याची निरर्थकता लोकांच्या ध्यानीं आली.ती अंधश्रद्धा नामशेष झाली.एकेकाळी रामबाण म्हणून गाजलेले अनेक औषधोपचार नंतर निरुपयोगी ठरून विस्मृतीत गेले."रेकी " या प्रकाराला अनेक श्रद्धाळू काही काळ फसले. आता ती अंधश्रद्धा अस्तंगत झाली आहे. प्राणिक हीलिंग आणि भाग्यरत्‍ने हे फसवणूकप्रकार सध्या त्या मार्गावर आहेत.काही वर्षांपूर्वी वास्तुदिशाभूलशास्त्र या भ्रमाची देशात सर्वत्र साथीच्या रोगासारखी लागण झाली. अनेकजण बळी पडले.वास्तुशकुनींनी पैसे कमावले. आता या दिशाभुलीचा हास्यास्पदपणा लोकांच्या ध्यानीं येत आहे.साथ आटोक्यात आली आहे.लौकरच हा रोगाणू नामशेष होईल.याप्रमाणे अनेक अंधश्रद्धा अस्तंगत होतात.पण फसवणूक करणे हाच ज्यांच्या उपजीविकेचा आधार असतो असे लबाड लोक नवनव्या अंधश्रद्धा पसरवतात. श्रद्धाळूंच्या भोळसटपणाला सीमा नसते. या संदर्भात एक सुवचन आहे:" दोन गोष्टी अमर्याद आहेत. हे अनंत विश्व आणि श्रद्धाळूंचा भोळसटपणा (खरेतर अडाणीपणा). पैकी विश्व अमर्याद आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकत नाही."
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
23529 वाचन

💬 प्रतिसाद (65)

प्रतिक्रिया

सर्वप्रथम, बर्‍याच दिवसांनी

अन्या दातार
Sun, 04/15/2012 - 14:49 नवीन
सर्वप्रथम, बर्‍याच दिवसांनी पुनरागमन केल्याबद्दल अभिनंदन करतो. :) खरंतर प्रत्येक गोष्टीचे एक जीवनचक्र (लाईफसायकल) असते. आज ज्या गोष्टी अस्तंगत पावल्या आहेत, त्या उद्या पुन्हा डोके वर काढतील. कारण लोकांना एकाच तंत्राने भुलवून चालत नाही, किंबहुना ते शक्यच होत नाही. या काही दिवसांतच पेपरमध्ये वाचले की मल्टीलेव्हल मार्केटींग, अल्प कालावधीत दामदुप्पट वगैरे अश्या आर्थिक गुन्ह्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. या सर्वाचे कारण एकच ते म्हणजे पब्लिक मेमरी इज टू शॉर्ट!
  • Log in or register to post comments

सहमत

प्रकाश घाटपांडे
Sun, 04/15/2012 - 21:12 नवीन
अन्या शी सहमत. भामटेपणा तोच असला तरी 'बकरे' बदलत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

उलट

मन१
Sun, 04/15/2012 - 21:23 नवीन
भामटेपणा तोच असला तरी 'बकरे' बदलत असतात. ह्याच्या उलटही म्हणता येइलच की बकरे तेच असले तरी नवा भामटे ते शोधत असतात . दरवेळी नवीन प्राण्याकडे "हा तरी आपली संकटातून सहिसलामत सुटका करेल" अशा आशेनं पाहणारी अगतिक मंडळी आहेतच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

-१

अन्या दातार
Sun, 04/15/2012 - 21:36 नवीन
बकरे तेच असले तरी नवा भामटे ते शोधत असतात .
कैच्या कै! तसं असतं तर बसेस, रेल्वे इ. ठिकाणी जाहिराती लागल्या नसत्या. अन अमका-तमका एखाद्या संकटातून सुटका करेल हे कळावे कसे? खरंतर भामटेही बदलत असतात तसेच बकरेही. घाटपांडे काकांचे वाक्य नीट वाच.
भामटेपणा तोच असला तरी 'बकरे' बदलत असतात.
भामटेपणा वेगळा व भामटा वेगळा. गुडगावला गेल्याबरोब्बर इतका फरक पडेल असं वाटत नव्हतं रे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

"अविश्वास हेच जीवन, श्रद्धा

कवितानागेश
Sun, 04/15/2012 - 15:00 नवीन
"अविश्वास हेच जीवन, श्रद्धा हा मृत्यु" :)
  • Log in or register to post comments

लेटेस्ट

तिमा
Sun, 04/15/2012 - 15:09 नवीन
लेटेस्ट फॅड 'व्हिगेन' (की व्हिजेन?) या कोरियन कंपनीच्या हिटिंग व मसाजिंग यंत्राचे आहे. या लोकांनी अनेक ठिकाणी विनामूल्य सेवा केंद्रे उभारली आहेत. या मशीनवर झोपल्यावर म्हणे, रक्तप्रवाह वाढतो आणि कॅन्सरपासून या जगातील यच्चयावत रोग बरे होतात. या केंद्रांवर पद्धतशीर ब्रेनवॉशिंग केले जाते आणि रु. ६६०००/ वा रु. १०००००/ चे मशीन थोडे लोक तरी विकत घेतात. दुनिया झुकती है .....
  • Log in or register to post comments

मूर्खपणा आहे सगळा ...

amit_m
Sun, 04/15/2012 - 15:32 नवीन
आजकाल टिव्हीवर असल्या जाहिरातींचा सुकाळ आहे. लोक देखील कसे काय ह्या भूलथापांना बळी पडतात कोण जाणे? मध्यंतरी मल्टी लेवल मार्केटींगचा जमाना होता. सुटबुट आणि टाय घातलेली पोरं जगाला शहाणपणा शिकवत फिरायची. ह्यात कोणत्यातरी फडतूस ई - लर्निंग कोर्सची सीडी वगैरे मिळायची म्हणे. तात्पर्य म्हणजे आपणच प्रत्येक वेळी आपली विवेकबुद्धी वापरून निर्णय घ्यावेत.
  • Log in or register to post comments

उजाळा

प्रभाकर पेठकर
Sun, 04/15/2012 - 16:21 नवीन
अंधश्रद्धा अस्तंगत होत असतील तर ती चांगली बातमी आहे नं? त्यावर धागा काढून पुन्हा त्याला उजाळा का द्यायचा??
  • Log in or register to post comments

सहमत

मराठी_माणूस
Sun, 04/15/2012 - 17:39 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

वास्तुदिशाभूलशास्त्र हा हा. :)

दादा कोंडके
Sun, 04/15/2012 - 17:15 नवीन
आज सुद्धा बिल्डर वास्तुशास्त्रानुसार बांधकाम वगैरे जाहिरात देतात. या (सो कॉल्ड) शास्त्राइतकं भंपक शास्त्र कुठलं नसेल. स्वयंपाक घर अमुक दिशेला, संडास इथं, पाण्याचा साठा त्या दिशेला. मग भलेही ती बिल्डींग डिझास्टर मॅनेजमेंट नुसार कुचकामी असेल. मला वाटतं आपल्या लोंकांच्या मनात पिढ्या न पिढ्या थोतांड बिंबवलेलं गेलंय. पुलंच्या गुरुदेवासारखं 'ब्लिस', 'सुप्राकॉन्शस', 'एटर्नल', 'कॉस्मीक एनर्जी' असले शब्द वापरले की लोकं फसतात.
  • Log in or register to post comments

सहमत

आबा
Sun, 04/15/2012 - 18:14 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

उदाहरणार्थ

अमृत
Sun, 04/15/2012 - 17:16 नवीन
चेहेरापुस्तकावर असण्यानेच मित्रांच्या संपर्कात राहाता येते, तुम्ही जर चेपू वर नसाल तर तुमचं काही खरं नाही किंवा आपल्या लाईक वा डिसलाईक केल्याने त्या गोष्टीचे मूल्य वाढते. काही काळापूर्वी असेच ऑर्कूट विषयी झाले होते. आता ऑर्कूट नामशेष झालेलं आहे. अमृत
  • Log in or register to post comments

सुप्परलाईक

स्वानन्द
Sun, 04/15/2012 - 20:38 नवीन
सुप्परलाईक :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृत

=))

मूकवाचक
Mon, 04/16/2012 - 11:53 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृत

जबरा

रमताराम
Mon, 04/16/2012 - 12:52 नवीन
+१ (आपल्या 'LOL' आणि 'हम्म' एवढ्याच प्रतिसादांना 'लाईक' मारणारे पाहून हैराण झालेला) रमताराम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृत

दखल

गणपा
Mon, 04/16/2012 - 12:58 नवीन
पोस्ट वाचल्याची दखल म्हणुन 'LOL' आणि 'हम्म' एवढ्याच प्रतिसादांना 'लाईक' मारल्या जाते हे तुम्हा म्हातार्‍यांना काय कळावे. ;) पळा तेज्यायला येतत ररा काठी घेउन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

आरं पन

रमताराम
Mon, 04/16/2012 - 22:47 नवीन
पयले छूट लोल आन् हम्मं वाचल्यालं न्हाई समाजलं लिवनार्‍याला तर काय आबाळ कोसळतंया व्हय. जो आसली पर्तिक्रिया द्येतोय त्यो कशापायी बगाय येतू परतून, का आपन लिवल्यालं वाचलं का न्हाई या बेन्यानं, आं? (ए घ्या रे याला कोपच्यात. लै टिव टिव.... आपलं लाईक लाईक करू र्‍हायलंय. ऐशा लंबे करा की सम्दे 'डिसलाईक' चं बटन का न्हाई चेपुवर म्हनून धरनं धरत्याल त्या मार्कबाबाकडं)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

सहि वरुन भविष्य सांगणारे पण

अविनाशकुलकर्णी
Sun, 04/15/2012 - 18:08 नवीन
सहि वरुन भविष्य सांगणारे पण आहेत..
  • Log in or register to post comments

बरं झालं, दूध पिणारा बाप्पा

रेवती
Mon, 04/16/2012 - 07:16 नवीन
बरं झालं, दूध पिणारा बाप्पा यातून सुटला.;)
  • Log in or register to post comments

ज्योतिष पण राहिले की. आणि

कवितानागेश
Mon, 04/16/2012 - 16:28 नवीन
ज्योतिष पण राहिले की. आणि नाडी पण! ;) अरेरे. कसे काय व्हायचे या देशाचे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हा सगळा बाजार माणसाच्या

अत्रुप्त आत्मा
Mon, 04/16/2012 - 07:17 नवीन
हा सगळा बाजार माणसाच्या दुर्बल मनोवृत्तीचं द्योतक आहे. आपण हे बंद झालं ते बंद झालं (मागे पडलं)असं निरिक्षण नोंदवत असलो,तरी जोपर्यंत ही दुर्बल मनोवृत्ती जिवंत आहे,तो पर्यंत या बाजाराची हि भरती ओहोटी चालुच रहाणार. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दुर्बल मन असलेली व्यक्ति हे कधिही मान्य करुन स्विकारायला तयार होत नाही की,'' मी दुबळ्या मनाचा आहे.'' अट्टल व्यसनी माणुस जसा शेवटपर्यंत स्वतःला मनापासुन अ‍ॅडिक्ट म्हणायला कचरतो,तसेच हे आहे. हा बदल घडविणारी एखादी संस्था जो पर्यंत (याच दुर्बल घटकांमधुन) निघत नाही.तो पर्यंत या बाजारावर इलाज सापडणे मुष्किल आहे... :-)
  • Log in or register to post comments

काही दिवसानी तुम्ही मराठी

५० फक्त
Mon, 04/16/2012 - 07:28 नवीन
काही दिवसानी तुम्ही मराठी संस्थळावर काढलेल्या धाग्याला मिळालेल्या वाचनांची संख्या आणि प्रतिसाद यांची सांगड घालुन तुमचं भविष्य सांगण्याची एक 'धागा' पद्धत रुढ होईल असे दिसते.
  • Log in or register to post comments

अहो अंधश्रद्धा पसरवणारे देखिल

बाळ सप्रे
Mon, 04/16/2012 - 11:34 नवीन
अहो अंधश्रद्धा पसरवणारे देखिल काळाप्रमाणे बदलतात. स्वामींचा, बाबांचा (ओरि़जिनल ?) फोटो १०० जणांना फॉरवर्ड करा, १००० लाइक करा, १०० एस एम एस करा, केल तर लॉटरी लागेल, नाही केल तर काही तरी वाईट घडेल :-) ऑनलाईन दर्शन, टि. व्हि वर अ‍ॅक्टिव्ह दर्शन, अ‍ॅक्टिव्ह हॉरोस्कोप असे कितितरी नवीन मार्ग येतच रहाणार अंधश्रद्धांचे समूळ उच्चाटन हे हिन्दू मुस्लिम एकोप्याएतकेच अशक्य आहे..
  • Log in or register to post comments

अचूक विश्लेषण

यनावाला
Mon, 04/16/2012 - 13:37 नवीन
श्री.अत्रुप्त आत्मा यांनी श्रद्धाळूंच्या मनोवृत्तीचे अगदी नेमके विश्लेषण केले आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे दुर्बल मन असलेली व्यक्ति हे कधिही मान्य करुन स्विकारायला तयार होत नाही की,'' मी दुबळ्या मनाचा आहे.'' अट्टल व्यसनी माणुस जसा शेवटपर्यंत स्वतःला मनापासुन अ‍ॅडिक्ट म्हणायला कचरतो,तसेच हे आहे.
हे पटण्यासारखे आहे."आपण फसलो. वेळ,ऊर्जा आणि पैसे यांचा निष्कारण अपव्यय झाला.पदरी काहीच पडले नाही"हे सत्य स्वीकारायला श्रद्धाळू माणूस कधीच तयार नसतो. २/मिपाचे बहुसंख्य सदस्य असल्या अंधश्रद्धांच्या विरुद्ध आहेत हे समजून आले.मनापासून आनंद झाला.
  • Log in or register to post comments

>>>> या संदर्भात एक सुवचन

यकु
Mon, 04/16/2012 - 14:02 नवीन
>>>> या संदर्भात एक सुवचन आहे:" दोन गोष्टी अमर्याद आहेत. हे अनंत विश्व आणि श्रद्धाळूंचा भोळसटपणा (खरेतर अडाणीपणा). पैकी विश्व अमर्याद आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकत नाही." ----- अहो विश्व अमर्याद आहे की कसे हेच नव्हे तर इतर काहीही तुम्ही किंवा इतर कुणीच निश्चित सांगू शकत नाही! म्हणजे आपण कितीही जीव तोडून फडफड केली तरी हा पसारा आपल्या आवाक्यात येणारा नाही हे एक बाजूला मान्य करायचं आणि आपला अनुभव तोकडा पडतोय‍ तिथे मात्र बुद्धीवादी मुखवटे घालून अगदी यादी करकरुन, एकेका गोष्‍टीचा निषेध करत सुटायचं हे मनोरंजक आहे. तुम्ही अद्याप जीवंत आहात तर एक्सप्लोर करा ना तुमचा जीवंतपणा जरा पूर्णपणे (फक्त तर्काने एक्सप्लोर करुन फायदा नाही - जीवंत आहात, त्या जीवंततेमध्‍ये जरा पूर्णपणे आत घुसा, तरच तुमचा असा जनरलाज्ड सूर सार्थकी ठरेल ) - आणि मग एका बिंदूवर पोचून सगळ्या बुद्धीवादाने दम तोडला की तुम्ही काय करु शकता ते असंच आम्हाला सांगा. कदाचित मला व्यवस्थित मांडता येत नाहीय, पण असोच.
  • Log in or register to post comments

आणि बर्‍याच गोष्टी आवाक्यात

बाळ सप्रे
Mon, 04/16/2012 - 14:38 नवीन
आणि बर्‍याच गोष्टी आवाक्यात येणार्‍या नाहीत म्हणून कोणीही केलेले बकवास दावे मान्य करायचे की काय तुमच्या मते?? सगळ्याच गोष्टींचा अनुभव घ्यावा लागत नाही. सारासारविवेक बुद्धीने काही दाव्यांचा फोलपणा सिद्ध करता येतो. आपला तो अनुभव आणि दुसर्‍याचा तो बुद्धीवादी मुखवटा हा डोळ्यावरचा पडदा बाजूला करा मग या अमर्याद विश्वात बुद्धी कुठे वापरयची आणि कुठे आपले तोकडेपण मान्य करायच ते समजेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

>>>>आणि बर्‍याच गोष्टी

यकु
Mon, 04/16/2012 - 15:06 नवीन
>>>>आणि बर्‍याच गोष्टी आवाक्यात येणार्‍या नाहीत म्हणून कोणीही केलेले बकवास दावे मान्य करायचे की काय तुमच्या मते?? --- बकवास दाव्यांचं काय करायचं हे मी सांगत बसत नाही. आणि माझी प्रतिक्रिया तथाकथित अंधश्रद्धांना वर लिहिलेल्या चार ओळीत झोडपून काढल्यामुळेही चिडून दिलेली आहे असं नाही. || या संदर्भात एक सुवचन आहे:" दोन गोष्टी अमर्याद आहेत. हे अनंत विश्व आणि श्रद्धाळूंचा भोळसटपणा (खरेतर अडाणीपणा). पैकी विश्व अमर्याद आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकत नाही."|| जगाच्या अंतापर्यंत जाणार्‍या अशा वचनाचा आधार घेतलाय म्हणजे जे कुणी हे सांगत असेल त्याला श्रद्धाळूंचा अमर्याद भोळसटपणा आणि विश्व अमर्याद आहे की कसे हे दोन प्रश्न पडले आहेत. पैकी श्रद्धाळूंच्या भोळसटपणाबद्दल नेहमीच विचार होताना दिसतो. विश्व नेमके कसे त्याबद्दल काय सांगणार? आणि ते जसे कसे असेल त्या विश्वात तुम्ही कसे आहात? कोण-कोणती साधने वापरुन तुम्ही विश्वाचा (त्यातल्या अंधश्रद्धांसकट) विचार करता? तुम्ही स्वत: पुरतं तरी स्वत:चा जीवंतपणा म्हणजे काय हे नेमके कुठे शोधले आहे? तर्क, बुद्धी वगैरे मामुली गोष्‍टींचा वापर केला आहे, ते वगळता? म्हणूनच मी जीवंतपणा एक्सप्लोर करा आणि नंतर सांगा म्हणालो. >>>>सगळ्याच गोष्टींचा अनुभव घ्यावा लागत नाही. सारासारविवेक बुद्धीने काही दाव्यांचा फोलपणा सिद्ध करता येतो. ------- नक्कीच! तो माझा मुद्दाच नाही. >>>>आपला तो अनुभव आणि दुसर्‍याचा तो बुद्धीवादी मुखवटा हा डोळ्यावरचा पडदा बाजूला करा मग या अमर्याद विश्वात बुद्धी कुठे वापरयची आणि कुठे आपले तोकडेपण मान्य करायच ते समजेल. ------- डोळ्यावर पडदा वगैरे नाही. चर्चा ज्यांनी सुरु केलीय त्यांनी (आणि तुम्ही ही मत मांडलीत म्हणून तुम्हीही) आधी स्वत:चा जीवंतपणाचे आणि त्याच्या मर्यादीत/अमर्यादीत असण्यात असे नेमके काय करुन पाहिले आहे हे सांगावे. जेणेकरुन रेकी, प्राणीक हिलींग वगैरे अगदी निखालस फसवणुकीचेच प्रकार आहेत हे वर मांडलंय ते समजून घेता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

तुम्हाला रेकी, प्राणिक हीलिंग

बाळ सप्रे
Mon, 04/16/2012 - 15:17 नवीन
तुम्हाला रेकी, प्राणिक हीलिंग वरील टीका मान्य नाही असे सरळ सांगा ना.. त्यासाठी लेखकाने जीवन्तपणा सिद्ध करावा यात काहीच लॉजिक नाही.. तुम्ही रेकी ई सिद्ध करणारे मुद्दे मांडा मग समजून घेता येइल काय ते. लेखकाने समजा श्वास घेतोय, हालचाल करतोय वगैरे जीवन्तपणाचे मुद्दे मांडले आणि सांगितले कि यापुढे सगळं बुद्धीपलिकडले आहे तर तुमचि रेकी कशी सिद्ध होणार आहे???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

>>>>तुम्हाला रेकी, प्राणिक

यकु
Mon, 04/16/2012 - 15:28 नवीन
>>>>तुम्हाला रेकी, प्राणिक हीलिंग वरील टीका मान्य नाही असे सरळ सांगा ना.. त्यासाठी लेखकाने जीवन्तपणा सिद्ध करावा यात काहीच लॉजिक नाही.. ---- मला काय पडली आहे टीका मान्य न करायला? माझी काही रेकी, प्राणिक हिलींगची दुकाने नाहीत. तुमचा जीवंतपणा सिद्ध करा मी म्हणालो नाही. तुम्ही एका बाजूला एक प्रकारचा अमर्यादपणाही मंजूर करताय आणि दुसर्‍या बाजूला दुसर्‍या प्रकारच्या अमर्यादपणावर टीकाही करताय हे बात कुछ हजम नहीं हुयी. हे चुकीचेच आहे! असा जो सूर आहे, त्यामागे स्वत:चा काही अनुभव आहे का एवढं विचारतोय - माझा म्हणाल तर प्राणिक हिलींगबाबतीत जबरदस्त अनुभव आहे. विश्वाचा म/अमर्यादितपणा आणि प्राणिक हिलींग वरुन जीवंतपणाविषयीच्या अनुभवाबद्दल (लेखकाच्या, याला काही हरकत नसावी) मी विचारतोय. >>>>तुम्ही रेकी ई सिद्ध करणारे मुद्दे मांडा मग समजून घेता येइल काय ते. लेखकाने समजा श्वास घेतोय, हालचाल करतोय वगैरे जीवन्तपणाचे मुद्दे मांडले आणि सांगितले कि यापुढे सगळं बुद्धीपलिकडले आहे तर तुमचि रेकी कशी सिद्ध होणार आहे??? ---- हा माझा मुद्दा नाहीय. रेकी खरी की खोटी ते ज्यांना त्याबद्दल कुतुहल आहे त्यांनी पहावं असंही मी म्हणणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

अमर्यादपणाच्या नावाखाली काही

बाळ सप्रे
Mon, 04/16/2012 - 15:40 नवीन
अमर्यादपणाच्या नावाखाली काही वाट्टेल ते खपवलं जातं, पण त्यातले बरेच प्रकार विवेकबुद्धीने काही प्रश्न विचरताच उघडे पडतात. ठीक आहे रेकी, प्राणिक हीलिंग नाही तर तुम्हाला "दुसर्‍या प्रकारच्या" अमर्यादपणामध्ये नक्की काय सिद्ध करायचय ते सांगा उगाच ताकाला जाउन भांड का लपवताय??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

माझा म्हणाल तर प्राणिक

बाळ सप्रे
Mon, 04/16/2012 - 15:49 नवीन
माझा म्हणाल तर प्राणिक हिलींगबाबतीत जबरदस्त अनुभव आहे.
अच्छा म्हणजे इथे मिरची झोंबली तर.. :-) मग काढा ना एक धागा प्राणिक हीलिंगवर. असेल तथ्य तर करु मान्य. सध्यातरी नाडीच्याच कॅटॅगरीतला विषय वाटतोय :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

>>>अच्छा म्हणजे इथे मिरची

यकु
Mon, 04/16/2012 - 15:59 नवीन
>>>अच्छा म्हणजे इथे मिरची झोंबली तर.. --- छे हो! हे विश्व माझ्या बापजाद्यांनी मिळून निर्माण केलेलं नाही. त्यामुळे त्यात काहीही चुकीचं बोललं जात असलं तर मला मिर्च्या झोंबण्याचा प्रश्न नाही. मी माझ्या वैयक्तिक अनुभवाशी किंचीत प्रामाणिक रहाण्याचा प्रयत्न करतो, एवढंच. आणि मी स्वत:ला हिरीरीने इतरांना काही पटवून देणारा प्रचारकही नाही. :) >>>मग काढा ना एक धागा प्राणिक हीलिंगवर. असेल तथ्य तर करु मान्य. सध्यातरी नाडीच्याच कॅटॅगरीतला विषय वाटतोय --- धागे काढून लोक काही गोष्‍टी मान्य करतात यावर माझा तरी विश्वास नाही. हा धागा काढून ज्याने मते मांडली आहेत त्याने ती पूर्ण अनुभवांती मांडली आहेत का एवढं फक्त पहातोय. श्रीयुत यनावाला यांचे काय म्हणणे आहे ते आधी कळू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

मुद्द्यात काही तथ्य असेल तर

बाळ सप्रे
Mon, 04/16/2012 - 16:06 नवीन
मुद्द्यात काही तथ्य असेल तर मान्य करायला काहीच हरकत नाही.. आता तुम्हाला मांडायचाच नाही तर काय करणार?? मग उगाच लेखकाने जीवंतपणा सिद्ध करावा वगैरे बडबड कशासाठी :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

>>>मग उगाच लेखकाने जीवंतपणा

यकु
Mon, 04/16/2012 - 16:12 नवीन
>>>मग उगाच लेखकाने जीवंतपणा सिद्ध करावा वगैरे बडबड कशासाठी ---- आता मात्र बासच! जे म्हणण्यातच आलेले नाही ते म्हटले गेले आहे असे मानून तुमचे हे साद प्रतिसाद सुरु दिसत आहेत. [अहो विश्व अमर्याद आहे की कसे हेच नव्हे तर इतर काहीही तुम्ही किंवा इतर कुणीच निश्चित सांगू शकत नाही! म्हणजे आपण कितीही जीव तोडून फडफड केली तरी हा पसारा आपल्या आवाक्यात येणारा नाही हे एक बाजूला मान्य करायचं आणि आपला अनुभव तोकडा पडतोय‍ तिथे मात्र बुद्धीवादी मुखवटे घालून अगदी यादी करकरुन, एकेका गोष्‍टीचा निषेध करत सुटायचं हे मनोरंजक आहे. तुम्ही अद्याप जीवंत आहात तर एक्सप्लोर करा ना तुमचा जीवंतपणा जरा पूर्णपणे (फक्त तर्काने एक्सप्लोर करुन फायदा नाही - जीवंत आहात, त्या जीवंततेमध्‍ये जरा पूर्णपणे आत घुसा, तरच तुमचा असा जनरलाज्ड सूर सार्थकी ठरेल ) - आणि मग एका बिंदूवर पोचून सगळ्या बुद्धीवादाने दम तोडला की तुम्ही काय करु शकता ते असंच आम्हाला सांगा.] यातल्या कुठल्या वाक्याचा अर्थ जीवंतपणा सिद्ध करा असा होतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

जीवंतपणा सिद्ध नव्हे.. तर

बाळ सप्रे
Mon, 04/16/2012 - 16:20 नवीन
जीवंतपणा सिद्ध नव्हे.. तर एक्स्प्लोअर करा, आत घुसा एकन्दरीत काय तर माझा अनुभव ग्रेट आहे त्यावर तुम्ही बोलायच नाही कारण तुम्हाला तो अनुभव नाही.. आणि मुद्दे पण द्यायचे नाहीत .. का तर मला काहीच सिद्ध करायचं नाहिये.. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

>>>जीवंतपणा सिद्ध नव्हे.. तर

यकु
Mon, 04/16/2012 - 16:24 नवीन
>>>जीवंतपणा सिद्ध नव्हे.. तर एक्स्प्लोअर करा, आत घुसा एकन्दरीत काय तर माझा अनुभव ग्रेट आहे त्यावर तुम्ही बोलायच नाही कारण तुम्हाला तो अनुभव नाही..आणि मुद्दे पण द्यायचे नाहीत .. का तर मला काहीच सिद्ध करायचं नाहिये.. ---- म्हणजे तुम्ही उगाच बडबड करता आणि ती तुम्हाला सप्रमाण दाखवून द्यावी लागते मग तुम्ही तुमच्या समजून घेण्‍यात किंचीतशी सुधारणा करता हे आपोआपच सिद्ध झाले! आणि माझा अनुभव(च) ग्रेट आहे असं माझं म्हणणं असतं तर इथे चर्चेत पडलो नसतो. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

रेकी तुमचा मुद्दा नव्हे.. तो

बाळ सप्रे
Mon, 04/16/2012 - 16:35 नवीन
रेकी तुमचा मुद्दा नव्हे.. तो मुद्दा सोडला.. मगाशी प्राणिक हीलिंग पकडलत.. एकदम ग्रेट अनुभव .. तो पण सोडून नुसत्याच "अनुभवावर" आलात आता तो पण नको म्हणताय.. आता मात्र ऑल आउट.. काहीच बाकी ठेवल नाहीत.. तरी पण अजून जोष खूप आहे.. चालू द्या.. बुद्धीवादी "मुखवटे" वाल्याना मात्र मुद्दे लागतात :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

(No subject)

कवितानागेश
Mon, 04/16/2012 - 19:52 नवीन
तुला तुझ्याच शब्दात पकडता येइल आणि तुझ्याच तंगड्या तुझ्याच गळ्यात घालता येतील अशी सरळ साधी (भोळसट्पणाची) विधाने कर बरे यक्कु. आणि जिवंतपणा एक्स्प्लोर करायला वगरै सांगू नकोस उगीच. ही चिटींग झाली. मराठीच्या पेप्राला कबड्डीची म्याच नाय खेळायची! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

ही पूर्ण चर्चा आवडल्या गेली आहे :)

रामपुरी
Tue, 04/17/2012 - 04:36 नवीन
पहिलाच मुद्दा ( जिवंतपणा एक्सप्लोर करण्याचा) न कळल्यामुळे पुढचं सगळं मस्त वाटलं. :) :) :) जिवंतपणा नक्की कसा "एक्सप्लोर" करायचा हे कळालं तर आणखी मज्जा येईल. रेकी, प्राणिक हिलींग इत्यादींनी जिवंतपणा एक्सप्लोर होतो की ओशो, सत्यसाईबाबा सारखा एखादा गुरु केल्याने?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

गर्भितार्थ

यनावाला
Mon, 04/16/2012 - 21:37 नवीन
:" दोन गोष्टी अमर्याद आहेत. हे अनंत विश्व आणि श्रद्धाळूंचा भोळसटपणा (खरेतर अडाणीपणा). पैकी विश्व अमर्याद आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकत नाही."
मूळ वचन बहुधा विनोदी लेखक मार्क ट्वेन यांचे आहे. निश्चित ठाऊक नसल्याने नाव देण्याचे टाळले. ते तसे महत्त्वाचे नाही असे मला वाटते.पण त्या वचनाचा गर्भित अर्थ लक्षात घ्यायला हवा."पैकी विश्व अमर्याद आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकत नाही" यावरून समजायचे की श्रद्धाळूंचा भोळसटपणा अमर्याद आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकतो असे सुचवायचे आहे. थोडक्यात म्हणजे श्रद्धाळूंच्या भोळसटपणाला सीमा नाही हे ठसवायचे आहे.विश्व अमर्याद आहे की नाही याविषयींच्या ज्ञानाचा/अज्ञानाचा इथे काही संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

यकु, फोर्गीव्ह देम!!

अर्धवटराव
Tue, 04/17/2012 - 05:45 नवीन
त्यांना नाहि कळणार तुम्ही काय म्हणताय ते... कळलं तरी ते मान्य करणार नाहि. *इथे "ते" म्हणजे कोणि विवीक्षीत व्यक्ती नाहि. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

ऐन्स्टैन बाबा की जय!! "Two

बॅटमॅन
Mon, 04/16/2012 - 18:25 नवीन
ऐन्स्टैन बाबा की जय!! "Two things are infinite: the universe and human stupidity; and I'm not sure about the the universe." http://rescomp.stanford.edu/~cheshire/EinsteinQuotes.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

म्यांव !! चुपक्रमावर आलो की

सुहास..
Mon, 04/16/2012 - 15:55 नवीन
म्यांव !! चुपक्रमावर आलो की काय ;)
  • Log in or register to post comments

+१

प्यारे१
Mon, 04/16/2012 - 16:43 नवीन
ज्युस पिवानु मज्जा करानु! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

चूप!

पैसा
Mon, 04/16/2012 - 19:39 नवीन
चूप!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ओक्के

परिकथेतील राजकुमार
Mon, 04/16/2012 - 16:10 नवीन
अस्तंगत होणार्‍या अंधश्रद्धा
नोंद घेतल्या गेली आहे. बाकी अंधश्रद्धा कोणती आणि डोळस श्रद्धा कोणती हे कोण ठरवणार आणि काय ज्ञानावरती ठरवणार ? (अर्थात प्राण्यांचा बळी, भूत बाधा इ. इ. प्रकार ह्यात पकडलेले नाहीत.) स्वेटर घालणार्‍या बाप्पाच भक्त परा
  • Log in or register to post comments

सोप्पय .. आपली ती डोळस

बाळ सप्रे
Mon, 04/16/2012 - 16:13 नवीन
सोप्पय .. आपली ती डोळस दुसर्‍याची तो अंधश्रद्धा ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

पर्‍या

रमताराम
Mon, 04/16/2012 - 22:53 नवीन
स्वेटर कोणत्या कंपनीचा घ्यावा हे कुंडली मांडून ठरवलं होतं कारे तुझ्या बाप्पानं. (दूध पिणार्‍या बाप्पाचा भक्त*) रमताराम * त्या निमित्ताने डेअरीवाल्यांचा चांगला खप झाला, च्यानेल्सना टीआरपी मिळाला, एसेमेसेस मुळे मोबाईल कुंपण्यांना फायदा झाला. आजच्या पैसा मिळवून देईल ते सारे पावन च्या जमान्यात यवडा फायदा कुटं व्हतोय हो. बगा बाप्पाच पावला की न्हाई?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हं

Nile
Tue, 04/17/2012 - 04:44 नवीन
बाकी अंधश्रद्धा कोणती आणि डोळस श्रद्धा कोणती हे कोण ठरवणार आणि काय ज्ञानावरती ठरवणार ?
जेव्हा असले प्रश्न पडणार नाहीत तेव्हा आपोआप उत्तर मिळेल. तोपर्यंत गाढवांपासून* दुर रहा. *गाढवं कोण असे गाढवपणे विचारू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

जग आहे तो पर्यत

चौकटराजा
Mon, 04/16/2012 - 19:04 नवीन
जग आहे .त्यात मानव ही आहे तो पर्यंत कधीही न संपणार्‍या गोष्टी पैशाची सत्तेची हाव, भष्टाचार ,सर्व प्रकारचे लैंगिक आकर्षण, मतभेद जीवदया, समाधानी वृती, देवभक्ती, साम्यवाद, राषट्रीय स्वयंसेवक संघ. आणि ..........................अंधश्रद्धा .
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा