Skip to main content

पौराणिक विमाने

लेखक आनन्दा यांनी शनिवार, 14/04/2012 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
सहज जालावर फिरता फिरता काही दुवे मिळाले, त्यावरुन अधिक खोलात जाता पुढील गोष्टी समजल्या. "पेरु" (खायचा नव्हे :) ) देशाच्या पश्चिम किनर्‍यावर म्हणे एक त्रिशूळ कोरलेला आहे, आणि त्या त्रिशूळबद्दल एक असा मतप्रवाह आहे कि तो त्रिशूळ हा विमानांसाठी दिशादर्शक होता त्या काळी... http://blog.travelpod.com/travel-photo/richardandsusie/2007_adventures/… अधिक संशोधन करता असे कळले कि त्याच प्रदेशात विमानांच्या काही प्रतिकृती सापडल्या आहेत म्हणे. प. वि. वर्तकानी या सर्वांचा परामर्ष "वास्तव रामयण" या पुस्तकात घेतला आहे... https://sites.google.com/site/vvmpune/other-works/about-trident-peru म्हणजे ख्रिस्तपूर्व काळात खरेच विमाने होती की काय? http://www.2atoms.com/weird/ancient/plane.htm ही म्हणे धावपट्टी असावी http://www.billandcori.com/peru/nazcalines.htm आश्चर्य म्हणजे मी गूगल नकाशात पाहिले असता खरेच काहीतरी अगम्य रेषा दिसतात की!

वाचने 79628
प्रतिक्रिया 216

प्रतिक्रिया

द्विशतकाबद्दल सर्वांचे अभिनंदन. पण एक प्रश्नः या उत्कंठावर्धक चर्चेची सुरवात करणारे "आनन्दा" कुठे गायब झाले? की ते पुराणकालीन विमानात बसून पसार झाले?

http://www.world-mysteries.com/sar_11.htm व अशा अनेक उदाहरणांची ( http://www.world-mysteries.com/ ) उत्तरे नसतात ... कदाचित ९० % उदाहरणे ताणलेली असतील..पण जी १०% उदाहरणे असतात ती नीट तपासली तर बरेच काही गवसते ... पण जसे सनातनी डोल्यावर पुराणांचा पडदा टाकतात आणि सर्व होते म्हणतात तसेच विज्ञान वादी सुद्धा त्यांच्या उदाहरणांची टींगल करतात ..पण पुराव्यानिशी खोडत नाही... उदा :http://www.world-mysteries.com/sar_1.htm हा नकाशा आणि विमाने http://www.world-mysteries.com/sar_7.htm फक्त भारत च नाही तर इतर देशामध्ये सुद्धा

या धाग्यावरील चर्चा आज वाचली आणि केवळ आश्चर्य वाटले. एखाद्या सामाजिक स्थित्यंतरासाठी दहा वर्षाचा काळ हा प्रगती अथवा अधोगती मोजण्यासाठी फार कमी आहे. म्हणजे या काळात आपण अधोगतीने जात असल्यास हि अधोगती समाजाला पेलवणार नाही इतक्या वेगाने होत आहे असे खेदाने म्हणावे लागेल. या धाग्यात प्रगतिशील, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणाऱ्यांची फुरोगामी, लिब्रान्डु अशी संभावना झाली नाही किंवा हिंदू असण्याची लाज वाटते का असा मुजोरपणाचा प्रश्न विचारला गेला नाही. सद्य काळात येता जाता द्वेषाच्या पिंक टाकणारे अथवा गरळ ओकणारे प्रसिध्ध आइडी देखील त्या दिवसांमध्ये बरेच सभ्य प्रतिसाद देत होते असे दिसते. जाता जाता: माशेलकरांच्या हळद विषयक बौद्धिक स्वामित्वाविषयी देवदत्त दाभोलकर, जे स्वतः एक संशोधक आहेत, खिल्ली उडवित असत. अंटार्क्टिकावर संशोधन करण्यासाठी उभारलेल्या लाकडी इमारतींना तेथील तीव्र सूर्यप्रकाशामुळे आग लागू नये असे वार्निश तयार करण्याची जबाबदारी सोडून तुलनेने निरुपयोगी (हळदीचा त्वचेवरील उपचारात जंतुनाशक म्हणून उपयोग सिध्ध्द करणे, ज्या साठी पर्यायी उपचार अगोदरच ज्ञात आहेत) संशोधन करण्याचं काम माशेलकरांनी केले असा गंभीर आक्षेप त्यांनी घेतला होता.