Skip to main content

कुलरची खरेदी

Published on शनीवार, 14/04/2012
एअर कुलर ची खरेदीच नियोजन घरात बर्‍याच दिवसापासुन चालल होत, होता येइल तेव्हड मी खरेदि टाळण्याचा प्रयत्न करत होतो,कारण एकच मार्च अखेर मात्र जसजस उन्हाची काहीली वाढु लागली तसं घरातल तपमान आणी अबोला दोन्हीही एकदमच वाढु लागलं नाइलाजाने दोन चार मित्रांकडुन उसन वारी करुन आर्थिक गणित कसबस जमवल आणी मध्यम वर्गीय प्रथांनुसार दुकानांमधे कुलरची माहीति काढायला सुरुवात केली . लवकरच जाणवल हे प्रकरण वाटत तेव्हढ सोप नाही . मित्रांकडुन माहीती काढायला प्रारंभ केला,एकानं सांगीतल कुलर घेताय ना?मग लोकल कंपनीचाच घ्या,ते ब्रँडेड कंपनी वाले फार लुटतात हो? दुसर्‍याने एकदम प्रतीकुल मत दिलं,तर एकानं "अहो कुलर कशाला?ए.सी. च घ्या"असा सल्ला दिला,कुलर घेतानाच मला किती यातायात करावी लागणार होती याची त्याला कल्पना न देता मी काढता पाय घेतला.आणी नेट वरुन माहीती काढु लागलो,मला कुलर घ्यायला लागणारा वेळ घरची आघाडी अस्वस्थ करत होता,संध्याकाळी घरी येताच प्रथम माझ्या मागे पाहीलं जात होतं,तीथे काही दिसलं नाही तर मे महीन्यातला उकाडा आणखी वाढ्तच होता. अखेर मी माझा परममित्र गण्याकडे गेलो,गण्या ही एक अफलातून वल्ली होता,त्याला सगळ्या विषयातली सगळी माहीती आहे असा निदान माझा तरी समज होता (अर्थात त्याची बायको माझ्या या मताशी सहमत नव्हती )त्याच्या समोर मी माझी अड्चण मांडली त्यावरतो एकदम उसळ्ला "बस्स एवढच ,चल आता जाऊ"मग किचन कडे पाहुन अंमळ मोठ्याने म्हणाला "तुच रे बाबा माझ्यातले व्यवहार गुण ओळ्खतोस इथे कुणाला माझी किंमतच नाही"यावर आतुन वहीनींचा आवाज आला "फोडणी टाकुन आलेच थांबा" मी परत खाली बसणार तोच गण्या घाबरलेल्या चेहर्‍याने म्हणला चल चल आपल्याला उशीर होइल मी हि पुढ्चा त्याचा वरचा प्रसंग टाळण्यासाठी चपला घातल्या. गण्याने माझ्या स्कुटरचा ताबा घेतला आणी मी मुकाट पणे मागे बसल,मग त्याने मला पुण्याच्या मी पुर्वी कधीही न पाहिलेल्या गल्लीबोळा मला दाखवत एका दुकाना समोर आनलं ,मी थोडा साशंक होउन त्याला विचारल अरे बाबा इथे कुठ आणलस ? पण माझ्या प्रश्नाचा कात्रज करुन त्याने "हॅल्लो मनीभाय केम छे ? " अशी आरोळी ठोकली आणि तो दुकानात शिरला,मी निमुटपणे त्याच्यामागे आत शिरलो. मग पुढची खरेदि ची सुत्रे गण्याच्याच हातात होती,मनीभाइने अगड्बंब कुलर दाखवायला सुरुवात केली,हे नागपुर चे डेझर्ट कुलर आहेत आणी ते कसे चांगले आहेत हे तो पटवुन देत होता,गण्या त्याच्याशी बोलत होता मी त्या दोघांकडे बघत कुलर वर कुठे किमतीचं लेबल आहे का ते तपासु लागलो .अखेर गण्याने माझ्याकडे पाहुन सांगीतलं ६००० रु. काढ,मी चमकलो तरी मी त्याला निघतानाच सांगीतले होतं की माझ बजेट ५००० च्या आत आहे ,पण गण्या बोलण्याच्या नादात साफ विसरला होता बहुदा नाइलाजाने एटीएम जाउन अकाउंट पार खरडुन काढ्ल आणी ६००० ची बेगमी करुन विजयी अविर्भावात गण्या आणी मी महीन्याच्या पुढच्या दिवसांच्या विवंचनेत कुलर घेउन (आणी घरचे वातावरण थंड होइल या अपेक्षेत घरी परतलो .दार उघड्ताच त्रासिक असणारा बायकोचा चेहरा लिट्मस पेपर सारखा बदलला आणि बर्‍याच दिवसातुन अस्मादिकांच हसुन स्वागत झाल, म्हणलं चला कुलर एव्हढा महाग नाही पड्ला.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3323
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

नविन कुलर बद्दल तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे हार्दीक अभिनंदन. कुलरचा पाण्याचा टँक दर आठवड्याला कोरडाकरून स्वच्छ करावा लागतो. लक्षात असू द्यावे.

उघड्ताच त्रासिक असणारा बायकोचा चेहरा लिट्मस पेपर सारखा बदलला आणि बर्‍याच दिवसातुन अस्मादिकांच हसुन स्वागत झाल, म्हणलं चला कुलर एव्हढा महाग नाही पड्ला. >>> ही ही ही ;)

प्राध्यापक साहेब, सहा हजारात आनंद मिळाला ना बस्स....! पैशाचं काय आणि माणसाचं काय ! आज आहे आणि उद्या नाही. तेव्हा आपण सामान्य माणसांनी एक घास चिऊ चा एक घास काऊचा करत आयुष्य आनंदात घालवावं असं माझं मत आहे. बाय द वे, सर आम्ही तर मिपावर वाया गेलो म्हणजे आमच्याकडून आता काही लिहिणं होत नाही. ''व्वा. छान. मस्त, आवडले '' यातच बराच वेळ जातो. आपण इतिहास विषयाचे गुर्जी आहात असं कळतं. तेव्हा जरा इतिहासावर लेखन केलं तर आम्हा जिज्ञासू आणि हौशी वाचकांची सोय होईल, असेही या निमित्ताने सांगावे वाटते. :) -दिलीप बिरुटे

चला, झाली ना कुलर खरेदी, आता त्या गार वा-यात बसुन थंड पन्हं प्यायला कधी येउ तुमच्याक्डे प्रोफेसर ते सांगा.

लोकहो सिम्फनीचे कुलर शक्यतो घेऊ नका. रात्री कुलर चालु ठेऊन झोपलो असता माझ्या कुलरची मोटर ज ळाली. वेळिच जाग आल्याने अनर्थ टळला. कंपनी ने कोणतीही सर्व्हीस दिली नाही.

In reply to by युयुत्सु

कंपनी ने कोणतीही सर्व्हीस दिली नाही.
टाटा ब्रॉडबँड, सिंफनी सारख्या कंपन्यांचा तुमच्यावरती इतका राग का आहे हो ?

मला कुलर घ्यायला लागणारा वेळ घरची आघाडी अस्वस्थ करत होता,संध्याकाळी घरी येताच प्रथम माझ्या मागे पाहीलं जात होतं,तीथे काही दिसलं नाही तर मे महीन्यातला उकाडा आणखी वाढ्तच होता. तुमचं क्यालेन्डर एक महिना पुढे आहे की हा किस्सा मागल्या वर्षीचा आहे. :) (माजी प्राध्यापक) रमताराम