✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

खळ्ळकन्

न
नगरीनिरंजन यांनी
Fri, 04/13/2012 - 11:17  ·  लेख
लेख
चार तुपात भिजलेल्या पुरणपोळ्या आणि चार कटाच्या आमटीच्या वाट्या रिचवून पलंगावर पडलो होतो. गुंगीची चादर हळू हळू चढत खिडकीतून येणार्‍या प्रकाशाला मंद करत चालली होती. सुस्तीच्या वजनाने जबडा उघडाच राहून लाळ गळायला आली असताना आणि बंद डोळ्यांसमोर लाल प्रकाशाचा एकच शेवटचा बिंदू उरला असताना खिडकीबाहेर कलकलाट झाला. पाण्याने भरलेला चंबू खळ्ळकन् फुटावा तसा सगळ्या झोपेचा चकणाचूर झाला. कोणाची माय व्याली, तिच्यायला.. स्वतः झोपतात मस्त आणि पोरं सोडतात दुसर्‍याच्या झोपा मोडायला ***चे. चडफडत तणतणत उठलो आणि खिडकीच्या तापलेल्या गजाला कपाळ लावून खाली पाहिलं. झाडूवालीला दिलेल्या पुरणपोळीवरून तिची दोन पोरं खिडकीखाली बसून भांडत होती. चटका बसल्यासारखं डोकं मागं घेतलं आणि गपगुमान परत फिरलो. उशीखाली डोकं घालून पडलो, पोटातला अपराध पचवण्याचा प्रयत्न करत.... (प्रेरणा: गवि)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
7910 वाचन

💬 प्रतिसाद (37)

प्रतिक्रिया

सेन्सिबल

जाई.
Fri, 04/13/2012 - 11:25 नवीन
सेन्सिबल
  • Log in or register to post comments

विडंबन म्हणून वाचायला घेतलं

गवि
Fri, 04/13/2012 - 11:40 नवीन
विडंबन म्हणून वाचायला घेतलं आणि झडझडून हलवून सोडलंस रे एकदम.. :(
  • Log in or register to post comments

जशास तसे.

नगरीनिरंजन
Fri, 04/13/2012 - 15:39 नवीन
जशास तसे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

एक अर्थपुर्ण आणि वास्तव लेखन,

५० फक्त
Fri, 04/13/2012 - 11:43 नवीन
एक अर्थपुर्ण आणि वास्तव लेखन, धन्यवाद.
  • Log in or register to post comments

नगरी.. एव्हढ हलवलच पाहिजे का?

स्पंदना
Fri, 04/13/2012 - 11:46 नवीन
नगरी.. एव्हढ हलवलच पाहिजे का?
  • Log in or register to post comments

होय . चुकल माझ . भावनेच्या

स्पंदना
Fri, 04/13/2012 - 12:18 नवीन
होय . चुकल माझ . भावनेच्या भरात लिहुन गेले , पण हल्ली संपादन करता येत नाही ना इथे. बाकि प्यारे १ लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद, कधी वाईट विचार केलाच नाही त्यामुळे अर्थ वाईट निघेल हे जाणवलच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

चष्मा बदला राव...! हलवणे

मृत्युन्जय
Fri, 04/13/2012 - 12:24 नवीन
चष्मा बदला राव...! हलवणे म्हणजे हेलावुन टाकणे. पण तुमच्या डोक्यात काय आलंय???? असे बरेच शब्द एका विशिष्ट क्रियेशीच निगडीत झालेत दुर्दैवानं. उदाहरणार्थ बलात्कार म्हणजे बळाचा उपयोग्/दुरुपयोग. याचा उल्लेख आता नेहमीच बलात्कारी संभोग म्हणून केला गेला तरी मूळ अर्थ निव्वळ तेवढाच नाही ना? रत होणे म्हणजे रमणे. नेहमीच त्यांचा अर्थ संभोगात मग्न होणे असा नसतो. असंच 'वासना' शब्दाबद्दल आहे बरं. सांगून ठेवलेलं बरं. नाहीतर याल लगेच धावत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

प्रकाटाआ

प्यारे१
Fri, 04/13/2012 - 13:01 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

हे विडंबन सर्वात जास्त आवडल.

प्रीत-मोहर
Fri, 04/13/2012 - 12:23 नवीन
:( हे विडंबन सर्वात जास्त आवडल.
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
Fri, 04/13/2012 - 17:35 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

भावस्पर्शी !!!!

पियुशा
Fri, 04/13/2012 - 12:38 नवीन
भावस्पर्शी !!!!
  • Log in or register to post comments

हे बेष्ट आहे.

गणपा
Fri, 04/13/2012 - 12:58 नवीन
हे बेष्ट आहे.
  • Log in or register to post comments

जे कहि लिहिलय ते मनाला

जेनी...
Fri, 04/13/2012 - 13:01 नवीन
जे कहि लिहिलय ते मनाला भिडनारं आहे .. हल्लि विडंबन वाचायलाहि एक उत्सुकता असते,प्रत्येकवेळी विडंबन हे विडंबनच असेल अस नाही ,त्यातुन एक सुंदर लेखन मिळतय .... एकन्दरित विडंबन ह्या प्रकाराला माझा दंडवत ____/\_______
  • Log in or register to post comments

+१

मी_आहे_ना
Fri, 04/13/2012 - 15:38 नवीन
विडम्बन ते ही गविन्च्या लेखाच असल्यावर, इतक्या उच्च दर्जाचे नसेल तरच नवल. ननि - खरोखर मनाला भिडणारे लेखन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

उशीखाली डोकं घालून पडलो,

पांथस्थ
Fri, 04/13/2012 - 13:14 नवीन
उशीखाली डोकं घालून पडलो, पोटातला अपराध पचवण्याचा प्रयत्न करत....
असं काहि खणखणीत वाचलं की एकदम निगरगट्टं/बोथट झाल्याची जाणीव जागी होते!! वास्तवाचा झटका आवडला.
  • Log in or register to post comments

काहिहि बरका, येवढच जर वाईट

पुरणपोळी
Fri, 04/13/2012 - 13:27 नवीन
काहिहि बरका, येवढच जर वाईट वाटत होत, तर द्यायच्या अजुन दोन पोळ्या, पोळ्या संपल्या तर पैसे द्यायचे. आणि आजकाल कोणा झाडुवालीचि मुल पुरणपोळी वरुन भान्डत असतिल असा वाटत नाहि..
  • Log in or register to post comments

अगदी खरं. आणखी दोन पुरणपोळ्या

सस्नेह
Fri, 04/13/2012 - 15:35 नवीन
अगदी खरं. आणखी दोन पुरणपोळ्या दिल्या असत्या तर अपराधही गेला असता अन पचनही झालं असतं. वर मूठभर मांसही चढलं असतं. ४ दिवसापूर्वीची गोष्ट. मोलकरीण म्हणाली, 'ताई, तुमच्या शिळ्या चपातीची वाट बघत नातू माझा जेवायचा थांबतो. आमची भाकरी न्हाई खात त्यो. ' काल १ चपती जादा केली अन दिली तिला. बरं वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुरणपोळी

:)

नगरीनिरंजन
Fri, 04/13/2012 - 15:41 नवीन
:) पण (गोष्टीतला) सिंह बोलेलच कसा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

(No subject)

गवि
Fri, 04/13/2012 - 15:43 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

डोळे पाणावले हो हि हकिकत

पुरणपोळी
Fri, 04/13/2012 - 16:08 नवीन
डोळे पाणावले हो हि हकिकत ऐकुन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

ह्म्म....

कवितानागेश
Fri, 04/13/2012 - 13:32 नवीन
ह्म्म.... :(
  • Log in or register to post comments

सहमत.

रेवती
Fri, 04/13/2012 - 21:51 नवीन
सहमत. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

खळ्ळकन्

स्मिता.
Fri, 04/13/2012 - 16:06 नवीन
आधीची विडंबनं वाचून तसंच हलकं-फुलकं, विनोदी असेल असं गृहीत धरून वाचायला घेतलं आणि वाचून खरंच काहितरी खळ्ळकन् फुटल्यासारखं झालं :(
  • Log in or register to post comments

हे विडंबन सर्वात जास्त आवडलं.

किसन शिंदे
Fri, 04/13/2012 - 16:07 नवीन
हे विडंबन सर्वात जास्त आवडलं.
  • Log in or register to post comments

+१

सुहास झेले
Sun, 04/15/2012 - 00:39 नवीन
ह्येच म्हणतो.... विडंबनाच्या गर्दीत एकदम सुन्न करणारं लेखन !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

गविंचं लिखाण त्यांच्या

मेघवेडा
Fri, 04/13/2012 - 17:02 नवीन
गविंचं लिखाण त्यांच्या ताकदीचं नव्हतं पण हे मात्र टिपिकल ननि! आवडलं. विडंबन वगैरे म्हणणार नाही. उत्तम आहे.
  • Log in or register to post comments

स्वारी अवांतर करतोय.. पण

गणपा
Fri, 04/13/2012 - 19:41 नवीन
स्वारी अवांतर करतोय.. पण गविंच्या त्या धाग्यावर बरेच जण हेच म्हणाले म्हणुन
गविंचं लिखाण त्यांच्या ताकदीचं नव्हतं
पटल नाही. सचिनकडुन शंभरच हवेत दर वेळी. ८०-९० म्हणजे एकदम 'झ' दर्जा? काहीस अस वाटल पुर्वार्ध वाचुन. :) बाकी उतारार्धाशी सहमत. :) (किरकेटचा जाणकार आहेस म्हनुन तिथल उदाहरण दिल.) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

उदाहरण चांगलं आहे पण याठिकाणी

मेघवेडा
Fri, 04/13/2012 - 20:14 नवीन
उदाहरण चांगलं आहे पण याठिकाणी चपखल नाही. सचिनला एकदा आऊट झाल्यावर पुन्हा ती इनिंग्स सुधारण्याची संधी नसते. इथं तसं नसतं. :) पुन्हा तिथं काढलेल्या धावा हे स्वतःतच एक परिमाण आहे. इथं लिखाणाचा दर्जा प्रत्येक वाचकाला वेगळा भासू शकतो. तो मोजण्यासाठी कुठलं सेट परिमाण नाही, असलंच तर त्या लेखकाचं पूर्वीचं लिखाण - त्याच्या सापेक्ष तुलना करता हे लिखाण मला नाही आवडलं. मात्र अशी तुलना करू नये असं म्हणत असलास तर ते नॅचरली अवघड आहे. ते होतंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

आवडलं

इरसाल
Fri, 04/13/2012 - 17:59 नवीन
!
  • Log in or register to post comments

खास निरंजनी स्टाईल

पैसा
Fri, 04/13/2012 - 19:21 नवीन
खास निरंजनी स्टाईल लिखाण खूप आवडलं.
  • Log in or register to post comments

गविंचं मूळ स्फुट आणि त्यावरची

मराठे
Fri, 04/13/2012 - 19:47 नवीन
गविंचं मूळ स्फुट आणि त्यावरची सगळी विडंबनं वाचली. विडंबन म्हणजे विनोदीच असलं पाहिजे असं नाही... याची आठवण करून दिल्याबद्धल धन्यवाद. (अर्थात विनोदी विडंबनामधेही काही वावगं नाही).
  • Log in or register to post comments

चाबूक..

Pearl
Fri, 04/13/2012 - 20:15 नवीन
एकदम ननि स्टाइल लिखाण आवडलं. नेहमीप्रमाणे चाबूक... :-) >>कोणाची माय व्याली, तिच्यायला.. >> फक्त हे आवडलं नाही... :-/ संताप व्यक्त करायला अशा शिव्या लिखाणात आल्याच पाहिजेत असं वाटतं नाही. असो.
  • Log in or register to post comments

>>कोणाची माय व्याली,

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 04/14/2012 - 01:27 नवीन
>>कोणाची माय व्याली, तिच्यायला.. >> फक्त हे आवडलं नाही... :-/ संताप व्यक्त करायला अशा शिव्या लिखाणात आल्याच पाहिजेत असं वाटतं नाही. असो.
अण्णा हजारेंनी सरकारबद्दल बोलताना मागे (९० च्या दशकात) "वांझेच्या वेदना" शब्द वापरला म्हणून काही स्त्रीमुक्ती वाल्या संघटना तापल्या होत्या. तुम्ही होता का हो त्यात ?? :-) स्वगत :- माय व्याली ही शिवी आहे ?? च्यामारी ...बसवला टेम्पोत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pearl

काय आहे ना विश्वनाथ

Pearl
Sat, 04/14/2012 - 03:48 नवीन
काय आहे ना विश्वनाथ जी, आतापर्यंत इतक्या जणांकडून 'बाळ' झाल्याच्या वार्ता ऐकल्या. पण 'माय व्याली' हे वाक्य मनुष्यासंदर्भात तरी ऐकले नाहिये. ... त्यामुळे (माझ्या शिव्यांसंदर्भातल्या अतिशय लिमिटेड ज्ञानानुसार ) मला तरी ते अपशब्द वाटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

पण 'माय व्याली' हे वाक्य

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 04/17/2012 - 10:45 नवीन
पण 'माय व्याली' हे वाक्य मनुष्यासंदर्भात तरी ऐकले नाहिये. ...
माय विण्याचे काय घेऊन बसलात, आत्या गाभण राहिल्याचे किस्से पण आहेत मिपावर. थोडे खोदकाम करा, काही रत्ने मिळून जातील.
त्यामुळे (माझ्या शिव्यांसंदर्भातल्या अतिशय लिमिटेड ज्ञानानुसार ) मला तरी ते अपशब्द वाटतात.
ही तशी रूढार्थाने शिवी नाही आहे हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pearl

नचिकेतच म्हणुन वाचायल घेतल

सोनल कर्णिक वायकुळ
Fri, 04/13/2012 - 22:12 नवीन
नचिकेतच म्हणुन वाचायल घेतल चटकन. पण हे विडम्बन 'क्लास'. चटका.
  • Log in or register to post comments

अंतर्मुख करणारे मनाला चटका

निनाद मुक्काम …
Sat, 04/14/2012 - 01:50 नवीन
अंतर्मुख करणारे मनाला चटका लावणारे लेखन
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा