चार तुपात भिजलेल्या पुरणपोळ्या आणि चार कटाच्या आमटीच्या वाट्या रिचवून पलंगावर पडलो होतो.
गुंगीची चादर हळू हळू चढत खिडकीतून येणार्या प्रकाशाला मंद करत चालली होती.
सुस्तीच्या वजनाने जबडा उघडाच राहून लाळ गळायला आली असताना आणि बंद डोळ्यांसमोर लाल प्रकाशाचा एकच शेवटचा बिंदू उरला असताना खिडकीबाहेर कलकलाट झाला.
पाण्याने भरलेला चंबू खळ्ळकन् फुटावा तसा सगळ्या झोपेचा चकणाचूर झाला.
कोणाची माय व्याली, तिच्यायला.. स्वतः झोपतात मस्त आणि पोरं सोडतात दुसर्याच्या झोपा मोडायला ***चे.
चडफडत तणतणत उठलो आणि खिडकीच्या तापलेल्या गजाला कपाळ लावून खाली पाहिलं.
झाडूवालीला दिलेल्या पुरणपोळीवरून तिची दोन पोरं खिडकीखाली बसून भांडत होती.
चटका बसल्यासारखं डोकं मागं घेतलं आणि गपगुमान परत फिरलो.
उशीखाली डोकं घालून पडलो, पोटातला अपराध पचवण्याचा प्रयत्न करत....
(प्रेरणा: गवि)
वाचने
7945
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
सेन्सिबल
विडंबन म्हणून वाचायला घेतलं
जशास तसे.
In reply to विडंबन म्हणून वाचायला घेतलं by गवि
एक अर्थपुर्ण आणि वास्तव लेखन,
नगरी.. एव्हढ हलवलच पाहिजे का?
होय . चुकल माझ . भावनेच्या
In reply to ___/\___ ओ तै, वाक्यरचना जरा by प्यारे१
चष्मा बदला राव...! हलवणे
In reply to ___/\___ ओ तै, वाक्यरचना जरा by प्यारे१
प्रकाटाआ
In reply to चष्मा बदला राव...! हलवणे by मृत्युन्जय
हे विडंबन सर्वात जास्त आवडल.
+१
In reply to हे विडंबन सर्वात जास्त आवडल. by प्रीत-मोहर
भावस्पर्शी !!!!
हे बेष्ट आहे.
जे कहि लिहिलय ते मनाला
+१
In reply to जे कहि लिहिलय ते मनाला by जेनी...
उशीखाली डोकं घालून पडलो,
काहिहि बरका, येवढच जर वाईट
अगदी खरं. आणखी दोन पुरणपोळ्या
In reply to काहिहि बरका, येवढच जर वाईट by पुरणपोळी
:)
In reply to अगदी खरं. आणखी दोन पुरणपोळ्या by सस्नेह
(No subject)
In reply to :) by नगरीनिरंजन
डोळे पाणावले हो हि हकिकत
In reply to अगदी खरं. आणखी दोन पुरणपोळ्या by सस्नेह
ह्म्म....
सहमत.
In reply to ह्म्म.... by कवितानागेश
खळ्ळकन्
हे विडंबन सर्वात जास्त आवडलं.
+१
In reply to हे विडंबन सर्वात जास्त आवडलं. by किसन शिंदे
गविंचं लिखाण त्यांच्या
स्वारी अवांतर करतोय.. पण
In reply to गविंचं लिखाण त्यांच्या by मेघवेडा
उदाहरण चांगलं आहे पण याठिकाणी
In reply to स्वारी अवांतर करतोय.. पण by गणपा
आवडलं
खास निरंजनी स्टाईल
गविंचं मूळ स्फुट आणि त्यावरची
चाबूक..
>>कोणाची माय व्याली,
In reply to चाबूक.. by Pearl
काय आहे ना विश्वनाथ
In reply to >>कोणाची माय व्याली, by विश्वनाथ मेहेंदळे
पण 'माय व्याली' हे वाक्य
In reply to काय आहे ना विश्वनाथ by Pearl
नचिकेतच म्हणुन वाचायल घेतल
अंतर्मुख करणारे मनाला चटका