Skip to main content

आमचं पण महाभारत

लेखक आदिजोशी यांनी गुरुवार, 12/04/2012 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
झक मारली नी जन्म घेतला असं म्हणायची वेळ आणली ह्या १०५ जणांनी. चांगला खाऊन पिऊन सुखी होतो तर ते ह्यांना बघवलं नाही. खायला अन्न नाही, रपेटीला घोडे नाहीत, शेतात राबायला मजूरही नाहीत. सगळ्यांना धरून नेलं. म्हणे युद्ध आहे. महायुद्ध. वर त वर युद्धानंतर दिवसाअखेरी सैनीकांना लागेल म्हणून दारूवरही रेशनींग सुरू केलं. टिआरपी खेचण्यासाठी काय काय नाही केलं ह्यांनी? पोपटाचे डोळेच काय फोडले, झाडंच काय उपटली, एकमेकांना विष काय घातलं, हत्तींना सोंडेला धरून फेकूनच काय दिलं... बाण मारून जमीनीतून पाणी काढणे, आगीतून चालत बाहेर येणे, जमीनीसारखं दिसणारं पाणी असणारं घर बांधणे, पुरुषाची बाई करणे असे शेकडो जादूचे प्रयोगही केले. सांगावं तितकं कमी आहे. आणि ह्या सगळ्याचा त्रास आम्हाला. आता तर युद्धच होणार म्हटल्यावर बघायलाच नको. तुमचे १० लाख सैनीक तर आमचे १५ लाख सैनीक, तुमचे १ लाख घोडे तर आमचे २ लाख घोडे असा एकावर एक चॅलेंजचा डाव सुरू आहे सद्ध्या. १० लाखातले खरे सैनीक किती आणि शेतकरी, मजूर किती ह्यांची मोजणी केली तर खरे काय ते कळेल. राहता राहिले १०५ बैल. ते सुद्धा बिनकामाचे. बरं, ज्या राज्यासाठी हे लढतायत त्या राज्यात किती जमीन आहेत हे नुस्तं मोजायला घेतलं तरी आयुष्य पुरणार नाही. दोन टोकांना दोघे रहा की सुखानी. एकमेकांची तोंडंही पहावी लागणारा नाहीत कधी. हाय काय अन नाय काय. पण इथे सगळेच डोकं बाजूला ठेऊन वागणारे. तो दुर्योधन, त्याचे नावंही न ऐकलेले शेकडो भाऊ, तो आडदांड भीम, नेमबाज अर्जून, धर्माने जुगार खेळणारा धर्म आणी शेवटचे २ भाऊ. सगळे एकसारखेच मठ्ठ. कर्ण दुर्योधनाचा मित्र झाल्यापासून त्याची पोटापाण्याची भ्रांत मिटल्याने त्याला नाही दुसरे उद्योग. तेव्हढाच चेंज म्हणून तोही बसलाय बाणांना धार काढत. लढणार्‍या सैनीकांची तर गोष्टच वेगळी. आपण कुणासाठी लढतोय, का लढतोय, युद्ध कुठे होणार आहे, कधी होणार आहे ह्याची अर्ध्याहून अधीक जणांना कल्पनाच नाही. माणसं कमी म्हणून ह्यांनी वारा, पाऊस, जमीन, सूर्य ह्यांनाही वेठीशी धरलं. तुमच्या भांडणाशी आमचा काय संबंध? आम्हाला का हा त्रास? तुम्ही लेको दारू ढोसता, जुगार खेळता, बायका पैजेला लावता आणि वाट कुणाची लागते? अर्थातच आमची. विनाकारण कित्येक मिसरूडही न फुटलेली पोरं भरती केली सैन्यात संख्या वाढवण्यासाठी. आमच्या हस्तीनापूरमधे जागेचे भाव किती वाढले कल्पना तरी आहे का ह्यांना. छोट्या छोट्या गावातले सैनीक गाड्या भरभरून इथे आले. कशी पुरणार घरं? मग झोपड्याही वाढल्या. ऐनवेळी ते सैनीक कामाला येतील म्हणून झोपड्यांकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि एक सुंदर नगराची बजबजपुरी झाली पार. दोन वेळची भाकरी, अंगाला पुरेसा कपडा आणि थोडी चैन म्हणून घोटभर दारू ह्यापेक्षा जास्त अपेक्षा नाही आमची. पण त्याचीही वानवा झालेय आजकाल. वैताग वैताग झालाय नुसता. साला झक मारली नी जन्म घेतला असं म्हणायची वेळ आणली ह्या १०५ जणांनी.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3191
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

दोन वेळची भाकरी, अंगाला पुरेसा कपडा आणि थोडी चैन म्हणून घोटभर दारू ह्यापेक्षा जास्त अपेक्षा नाही आमची. पण त्याचीही वानवा झालेय आजकाल.
अगदी अगदी. एक बेंगलारुचा मित्र तर दरवेळी सिंगल मॉल्ट आणण्याचे आणि पाजण्याचे आश्वासन देत असतो. पण पुढे विसरुन जातो. असो.. आता भेटला की त्याला शापच देतो. ऐन दारुपानाच्या प्रसंगी तुझा ग्लास फुटेल म्हणून.

एक बेंगलारुचा मित्र तर दरवेळी सिंगल मॉल्ट आणण्याचे आणि पाजण्याचे आश्वासन देत असतो. पण पुढे विसरुन जातो. त्य अबंगलुरच्या मित्राने बरेच जणाना बरेच वायदे केले आहेत.. ज्याना केले आहेत त्यांच्याच ते आठवणीत आहेत. प्रत्येक वेळेस हा मित्र नामानिराळा रहातो

In reply to by विजुभाऊ

आम्ही डान्या विषयी बोलत नाहीय हो इजुभौ. वरती 'मित्र' असे स्पष्ट लिहिले आहे ना ? डान्या आमचा हितचिंतक आहे. तरी दोन्हीमध्ये गल्लत करू नये. धन्यवाद. गोळवलकर गुर्जी तुम्हाला सुबुद्धी देवोत.

हा हा हा मस्तच . बजबजपुरी हे नाव ही महा (न) भारतापासूनच आले आहे वाटतं :) अमोल केळकर

हा हा हा! अ‍ॅडीभौ झिंदाबाद महाआआआभाआआआ.... रत! (शेवटी कशात ना कशात 'रत' होण्यासाठी काहीही चालतं लोकांना ;) )

In reply to by प्यारे१

शेवटी कशात ना कशात 'रत' होण्यासाठी काहीही चालतं लोकांना
आपल्यासारख्या मार्गातल्या साधकाकडून अशा खालच्या पातळीवरच्या प्रतिसादाची अपेक्षा नव्हती. आपल्याबद्दल "आधी होता पाग्या, जन्मयोगे झाला वाघ्या. त्याचा येळकोट राहीना, मुळ स्वभाव जाईना" असे खेदाने म्हणावेसे वाटते.

In reply to by धन्या

चष्मा बदला धनाजीराव...! अवांतरः रत होणे म्हणजे रमणे. पण तुमच्या डोक्यात काय आलंय???? असे बरेच शब्द एका विशिष्ट क्रियेशीच निगडीत झालेत दुर्दैवानं. उदाहरणार्थ बलात्कार म्हणजे बळाचा उपयोग्/दुरुपयोग. याचा उल्लेख आता नेहमीच बलात्कारी संभोग म्हणून केला गेला तरी मूळ अर्थ निव्वळ तेवढाच नाही ना? असंच 'वासना' शब्दाबद्दल आहे बरं. सांगून ठेवलेलं बरं. नाहीतर याल लगेच धावत. :)

:-)

आत्ताच एका धाग्यावर तुमची ही प्रतिज्ञा वाचली: >>>>तेव्हड्यात एका कोपर्‍यात "झेंड्याची धोतरे नेसणार्‍या प्रत्येकाला मी या युद्धात वधणार" अशी अ‍ॅडी जोशीनी प्रतिज्ञा केली आहे अशी कुजबुज कानावर पडली. आम्ही ताडकन उठलो आणी धोतर बदलायला धावलो. [ http://www.misalpav.com/node/8438 ] आणि लगेच तुमचं हे महाभारत! ____/\____!! धोतरें बदला लोको नायतर मरताय ;-)

आदि स्पेश्शल! आणि त्या मेल्या कळलाव्या गवळ्याच्या पोराला काय म्हणतायत तुमचे इंद्रप्रस्थातले नागरिक?

हा हा हा! मजा आली वाचायला! :)