झक मारली नी जन्म घेतला असं म्हणायची वेळ आणली ह्या १०५ जणांनी. चांगला खाऊन पिऊन सुखी होतो तर ते ह्यांना बघवलं नाही. खायला अन्न नाही, रपेटीला घोडे नाहीत, शेतात राबायला मजूरही नाहीत. सगळ्यांना धरून नेलं. म्हणे युद्ध आहे. महायुद्ध. वर त वर युद्धानंतर दिवसाअखेरी सैनीकांना लागेल म्हणून दारूवरही रेशनींग सुरू केलं.
टिआरपी खेचण्यासाठी काय काय नाही केलं ह्यांनी? पोपटाचे डोळेच काय फोडले, झाडंच काय उपटली, एकमेकांना विष काय घातलं, हत्तींना सोंडेला धरून फेकूनच काय दिलं... बाण मारून जमीनीतून पाणी काढणे, आगीतून चालत बाहेर येणे, जमीनीसारखं दिसणारं पाणी असणारं घर बांधणे, पुरुषाची बाई करणे असे शेकडो जादूचे प्रयोगही केले. सांगावं तितकं कमी आहे. आणि ह्या सगळ्याचा त्रास आम्हाला. आता तर युद्धच होणार म्हटल्यावर बघायलाच नको.
तुमचे १० लाख सैनीक तर आमचे १५ लाख सैनीक, तुमचे १ लाख घोडे तर आमचे २ लाख घोडे असा एकावर एक चॅलेंजचा डाव सुरू आहे सद्ध्या. १० लाखातले खरे सैनीक किती आणि शेतकरी, मजूर किती ह्यांची मोजणी केली तर खरे काय ते कळेल. राहता राहिले १०५ बैल. ते सुद्धा बिनकामाचे.
बरं, ज्या राज्यासाठी हे लढतायत त्या राज्यात किती जमीन आहेत हे नुस्तं मोजायला घेतलं तरी आयुष्य पुरणार नाही. दोन टोकांना दोघे रहा की सुखानी. एकमेकांची तोंडंही पहावी लागणारा नाहीत कधी. हाय काय अन नाय काय.
पण इथे सगळेच डोकं बाजूला ठेऊन वागणारे. तो दुर्योधन, त्याचे नावंही न ऐकलेले शेकडो भाऊ, तो आडदांड भीम, नेमबाज अर्जून, धर्माने जुगार खेळणारा धर्म आणी शेवटचे २ भाऊ. सगळे एकसारखेच मठ्ठ. कर्ण दुर्योधनाचा मित्र झाल्यापासून त्याची पोटापाण्याची भ्रांत मिटल्याने त्याला नाही दुसरे उद्योग. तेव्हढाच चेंज म्हणून तोही बसलाय बाणांना धार काढत.
लढणार्या सैनीकांची तर गोष्टच वेगळी. आपण कुणासाठी लढतोय, का लढतोय, युद्ध कुठे होणार आहे, कधी होणार आहे ह्याची अर्ध्याहून अधीक जणांना कल्पनाच नाही. माणसं कमी म्हणून ह्यांनी वारा, पाऊस, जमीन, सूर्य ह्यांनाही वेठीशी धरलं.
तुमच्या भांडणाशी आमचा काय संबंध? आम्हाला का हा त्रास? तुम्ही लेको दारू ढोसता, जुगार खेळता, बायका पैजेला लावता आणि वाट कुणाची लागते? अर्थातच आमची. विनाकारण कित्येक मिसरूडही न फुटलेली पोरं भरती केली सैन्यात संख्या वाढवण्यासाठी. आमच्या हस्तीनापूरमधे जागेचे भाव किती वाढले कल्पना तरी आहे का ह्यांना. छोट्या छोट्या गावातले सैनीक गाड्या भरभरून इथे आले. कशी पुरणार घरं? मग झोपड्याही वाढल्या. ऐनवेळी ते सैनीक कामाला येतील म्हणून झोपड्यांकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि एक सुंदर नगराची बजबजपुरी झाली पार.
दोन वेळची भाकरी, अंगाला पुरेसा कपडा आणि थोडी चैन म्हणून घोटभर दारू ह्यापेक्षा जास्त अपेक्षा नाही आमची. पण त्याचीही वानवा झालेय आजकाल.
वैताग वैताग झालाय नुसता. साला झक मारली नी जन्म घेतला असं म्हणायची वेळ आणली ह्या १०५ जणांनी.
वाचने
3191
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
_/\_ _/\_ _/\_
सहमत रे आड्या
हा हा हा हा लईच !! आवरा !!!
In reply to सहमत रे आड्या by परिकथेतील राजकुमार
एक बेंगलारुचा मित्र तर दरवेळी
अंमळ गल्लत होते आहे का ?
In reply to एक बेंगलारुचा मित्र तर दरवेळी by विजुभाऊ
हु का चु क
In reply to अंमळ गल्लत होते आहे का ? by परिकथेतील राजकुमार
हाहाहाहा! हा आहे अदि स्पेशल
-
रिटर्न गिफ्ट आवडली बर्का.
+१
In reply to रिटर्न गिफ्ट आवडली बर्का. by गणपा
हा हा हा! अॅडीभौ
शेवटी कशात ना कशात 'रत'
In reply to हा हा हा! अॅडीभौ by प्यारे१
चष्मा बदला
In reply to शेवटी कशात ना कशात 'रत' by धन्या
(No subject)
आत्ताच एका धाग्यावर तुमची ही
हाहाहा!
हा हा हा