✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चिउ आणि काऊ

म
मानव यांनी
Tue, 04/10/2012 - 21:19  ·  लेख
लेख
एक होती चिउ आणि एक होता काऊ.दोघांच प्रेम हे जगासाठी एक विजातिय जोडीच होती पण दोघांचही एकमेकांवर खुप प्रगाढ प्रेम होत.काउ दिवसभर काव काव करत गावभर फ़िरायचा.आणि चिउ त्याची घरी वाट पहात बसायची.चिउ काऊवर खुप प्रेम करत असे पण काऊला मात्र वेळच पुरत नसे तो दिवसभर पोटाच्या मागे लागलेला असे.तशी चिउ ची भुक फ़ार न्हवती तिला अगदी थोडसच लागायच पण काउला मात्र सगळ गोळा करुन ठेवायची हौस जडलेली होती. त्याच्या कामात तो एवढा व्यस्त असे की चिउचे प्रेम घेण्याएवढाही वेळ शिल्लक नसे.काउ पहाटेच उडुन जाई आणि संध्याकाळी घरट्यात परतत असे.घरी आल्यावर तो चिउला एकेक हुकुम सोडे माझ डोक दाब,पाय दाब.चिऊ त्याच सर्व काही प्रेमाने करत असे.चिउ म्हणायची "काऊ तुझे जेवुन झाले की संग मग आपण गप्पा मारु" काऊ म्हणायच दिवसभर दगदग करुन वैताग आलाय त्यामुळे मला झोप आलिय आपण उद्या बोलु नक्की" मग चिउ म्हणायची "ठिक आहे ,उद्या नक्की बोल हं माझ्याशी"काऊचे पण चिऊवर जिवापाड प्रेम होतेच पण परत दुसरा दिवस उजाडला की काऊ परत कामात व्यस्त होई.काऊ मनात ठरवायचा की आपण उद्या नक्की चिऊ शी बोलु ,चिऊला सांगु की त्याच किती प्रेम आहे तिच्यावर ! पण काऊ एवढा व्यस्त राही की त्याला जेवायलाही वेळ पुरत नसे,आपलं प्रेम व्यक्त करायच असे काऊने ठरवुन कित्येक दिवस,महिने,वर्ष निघुन गेली. चिऊ मात्र क्षणाक्षणाला तीच प्रेम व्यक्त करी ,चिऊ ला माहित होत की या व्यवहारी दुनियेत प्रेमाच्या शब्दांना काहीच किंमत नसते तरीही ती ते व्यक्त करत राही तिच्या कृतीतुन,बोलण्यातुन.काऊ म्हणे "काय बोलतेस रोज रोज आय लव यु! मला माहित आहे तुझ माझ्यावरिल प्रेम" चिऊ म्हणे "अरे राजा मी फ़क्त ते व्यक्त करत असते रे जरी तुला माहित असेल तरीही" पण एक दिवस आला काउने ठरवल बस झाली बेगमी आज काहीही होवो आज चिऊ वरिल प्रेम व्यक्त करायचच.त्यासाठी त्याने पट्कन काम उरकल आणि तो लवकर घरी आला.चिऊ त्याची वाटच पहात होती. तो चिऊला म्हटला"अग चिऊ मल तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे" चीउ म्हटली "सगळ सांग राजा पण आधी बस,जेवुन घे,आरम कर आणि मग सांग"काउ मनात म्हटला आज चिऊला दुखवायच नाही ती म्हणेल तसच करुयात आणि मग आपल्या मनातिल प्रेम व्यक्त करुयात.जेवत असताना काऊने चिऊकडे पाहिले त्याला ती आज वेगळीच भासत होती.तिच्या हालचाली मंदावल्या होत्या,तिचा रंग उडुन गेलेला होता,तिच्या डोळ्यातिल तेज कमी झालेल होत. काऊ मनात म्हटला अरे गेली कित्येक वर्ष आपण चिउकडे निट पाहिलच नाही,की तिला कधी "तु कशी आहेस "हे ही विचारल नाही ! तो चिऊ ला म्हटला "राणी कशी आहेस ग तु?" चिऊ म्हटली " मी एकदम छान आहे रे राजा,तु माझ्याबरोबर आहेस यातच मला खुप आनंद मिळतो रे " जेवण वगैरे झाल्यावर चिऊ काउला म्हटली "काऊ आज मला कुशित घेऊन झोप,मग उठल्यावर तुला काय सांगायचे ते सांग" काऊ मनात म्हटला किती वर्षांनी आज ही काहीतरी मागिते आहे,आपण हिला कधी काय हवय म्हणुनही विचारल नही,आज नकीए हिची ही छोटीशी अपेक्षा पुर्ण करुयात. काऊने चिऊला मिठित घेतल आणि दोघेही शांत एकमेकांच्या कुशीत पडुन राहिले.चिऊला झोप लागली काऊला मात्र झरझर डोळ्यापुढुन निघुन गेलेली वर्शः आठवायला लागली.वेळोवेळी चिऊने घेतलेली काऊची काळजी,काऊ आजरी असताना तेला वाटनारी चिंता,तो बरा व्हावा म्हणुन केलेले उपवास.त्याला त्या गोष्टींच त्यावेळेस हसु येत असे त्यावरुन तो तीची चेष्टाही करी.आज मात्र त्या मिठीत त्याला तीच त्या मागच प्रेम दिसत होत. बराच वेळ झाला तरी चिऊ काही उठेना म्हणुन काऊने तिला हळुच उठवायचा प्रयत्न केला पण चिऊ काही उठेना ,मग तिला गदागदा हलवुन पहिल तरीही चिऊ काही हालचाल करेना.काऊने सगळ बळ एकवटुन तिला उठवायचा प्रयत्न केला तरीही चिऊ चा प्रतिसाद शुन्यच. काऊने निट पाहिल तर चिऊच शरीर एकदम थंड पडलेल होत.काऊच्या कुशीतच ती देवाघरी निघुन गेलेली होती पण तिच्या चेहऱ्यावर एकप्रकारच समाधान दिसत होत. काऊला पुढच सगळ दृश्य अंधुक दिसायला लागल होत कारण त्याचे डोळे अश्रुने दबडबलेले होते आणि त्याच हृद्य कधीही न व्यक्त केलेल्या प्रेमाने भरुन आलेल होत.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
10388 वाचन

💬 प्रतिसाद (39)

प्रतिक्रिया

अरेच्चा!

प्रास
Tue, 04/10/2012 - 21:27 नवीन
हे भगवान्! या मानवाला कुणीतरी समजवा.... इतका काय तो सतत बोर्डावर रहायचा अट्टाहास? कृपया लेखन प्रकाशित करताना २-३ दिवसांचा संयम पाळा, मानव मेघपुष्पे....!
  • Log in or register to post comments

@प्रास

मानव
Tue, 04/10/2012 - 21:34 नवीन
अहो प्रत्येक पोस्ट वाचलीच पाहिजे असाही काही कायदा नाही आहे. तुमचे प्रास,अनुप्रास दुसरीकडेही देऊ शकता की !
  • Log in or register to post comments

हो शक्तिमान! चुकलंच

प्रास
Tue, 04/10/2012 - 21:35 नवीन
हो शक्तिमान! चुकलंच माझं..... चालू द्या....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मानव

अगदी अगदी

सानिकास्वप्निल
Tue, 04/10/2012 - 21:35 नवीन
हेच म्हणायचे होते....
  • Log in or register to post comments

बरं झाल जाहीर चुक कबुल केलीत

मानव
Tue, 04/10/2012 - 21:38 नवीन
बरं झाल जाहीर चुक कबुल केलीत ते !
  • Log in or register to post comments

श्रीयुत मानव,

प्रास
Tue, 04/10/2012 - 21:44 नवीन
तुम्हाला उपहास कळत नाही हे जाहिरपणे मान्य केल्याबद्दल आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मानव

केविलवाणा प्रयत्न.

मानव
Tue, 04/10/2012 - 21:49 नवीन
केविलवाणा प्रयत्न.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

केविलवाणा प्रयत्न.बोर्डावर

प्रास
Tue, 04/10/2012 - 21:51 नवीन
केविलवाणा प्रयत्न.
बोर्डावर रहायचा, कुणाचा चाललाय ते स्पष्ट दिसतंय, नै? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मानव

बोर्ड आमचं,बिल आम्ही देणार

मानव
Tue, 04/10/2012 - 21:53 नवीन
बोर्ड आमचं,बिल आम्ही देणार आणि पोटदुखी इतरांना,हे लक्षण ठीक न्हवे.हाजमोला घ्या. इती अध्याय समाप्तम...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

आता

प्रास
Wed, 04/11/2012 - 10:58 नवीन
भांडंच जर Image removed. असं असेल तर पाणी भरावं कसं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मानव

अर्रे देवा, ष्टोरीनं तर यु टर्न घेतला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 04/10/2012 - 21:43 नवीन
आयुष्यात हे केलं नाही, ते केलं नाही. हे करता आलं नाही, ते करायचं राहून गेलं. प्रत्येक क्षण आनंदात घालवला पाहिजे. गेल्या क्षणाबद्दल तर अजिबात कुरकुर नको. न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाये. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हा घ्या सल्ला.गवि काकांनी

गणामास्तर
Tue, 04/10/2012 - 21:59 नवीन
हा घ्या सल्ला. गवि काकांनी दिलेले सल्ले कुठे कुठे उपयोगी पडतात नै. ;) "गविकाकांचा सल्ला" हे सदर लवकरच चालू करा बुवा आता, किती दिवस रखडवणार अजून? :)
  • Log in or register to post comments

प्रतिक्षेत

निवेदिता-ताई
Tue, 04/10/2012 - 22:34 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

ओ काकू

अन्या दातार
Tue, 04/10/2012 - 23:32 नवीन
आता तुम्हाला कसले सल्ले पाहिजेत? का सल्लागार समितीच्या सदस्य होण्याची प्रतिक्षा करताय??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवेदिता-ताई

मानवानं मानवाची गोष्ट बिचा-या

५० फक्त
Wed, 04/11/2012 - 07:19 नवीन
मानवानं मानवाची गोष्ट बिचा-या चिउ काउच्या गळ्यात मारावी हे फार वाईट झालं, एक चिउ आणि काउ एकत्र झोपलेत हे कल्पुनच माझं हात पाय गार पडत होते, ऑनर किलिंग वगैरे प्रकार आहेत का नाही ?
  • Log in or register to post comments

खिक्!

प्रास
Wed, 04/11/2012 - 14:56 नवीन
मानवानं मानवाची गोष्ट बिचा-या चिउ काउच्या गळ्यात मारावी हे फार वाईट झालं, एक चिउ आणि काउ एकत्र झोपलेत हे कल्पुनच माझं हात पाय गार पडत होते, ऑनर किलिंग वगैरे प्रकार आहेत का नाही ?
हा अल्टिमेट प्रतिसाद आहे. कसा काय नजरेतून सुटला ब्वॉ, कळ्ळंच नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

+१

प्यारे१
Wed, 04/11/2012 - 15:30 नवीन
>>>>एक चिउ आणि काउ एकत्र झोपलेत हे कल्पुनच माझं हात पाय गार पडत होते, ऑनर किलिंग वगैरे प्रकार आहेत का नाही ? धन्य हो लेखकराव....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

वॉव्व्व्व्व

परिकथेतील राजकुमार
Wed, 04/11/2012 - 12:03 नवीन
कित्ती गोग्गोल गोश्त आहे. मला खुप अव्द्ली. अजुन शंगा ना... दानव इयत्ता दुशली, तुकली ब
  • Log in or register to post comments

ठ्ठो

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 04/11/2012 - 12:35 नवीन
पराभाऊंचा विजय असो!! :D :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

_/\__/\__/\_

मृत्युन्जय
Wed, 04/11/2012 - 15:08 नवीन
_/\_ _/\_ _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मानवराव

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 04/11/2012 - 12:14 नवीन
गोष्ट ठिक आहे.
  • Log in or register to post comments

(No subject)

स्पा
Wed, 04/11/2012 - 13:34 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

उठ रे ए मन्या

परिकथेतील राजकुमार
Wed, 04/11/2012 - 14:38 नवीन
नाहीतर उद्या आम्हाला 'मन्या आणि डान्या' अशी कथा वाचायला लागायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

ए अश काय ले पला दादा एवढ मम्म

स्पा
Wed, 04/11/2012 - 14:43 नवीन
ए अश काय ले पला दादा एवढ मम्म कलून चिऊ काऊ ची गोष्ट ऐकून गाई गाई कलत होतो ना मी नाही उठ्नाल जा Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

दांबिश मुग्गा आहेस तू. फटके

प्रचेतस
Wed, 04/11/2012 - 14:50 नवीन
दांबिश मुग्गा आहेस तू. Image removed. फटके द्यायला हवे तुला. Image removed. ०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===० संत्रस्त आत्मा सांसारिक जग हेच मिथ्या आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

हम्म्म

परिकथेतील राजकुमार
Wed, 04/11/2012 - 14:53 नवीन
बागुलबुवाला बोलवा रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

दंतवैद्यीण मिळत्ये का बघा.

सूड
Wed, 04/11/2012 - 15:26 नवीन
अगदीच तसं नाही, एखादी दंतवैद्यीण मिळत्ये का बघा. खाडकन झोप उडेल. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

चिऊताई चिऊताई.....

स्वातीविशु
Wed, 04/11/2012 - 14:56 नवीन
चिऊताई चिऊताई..... दार......उघड....ह्या गोष्टीचा वरील लेख भाग दुसरा आहे का ? ;) भाग २ आवडला. :)
  • Log in or register to post comments

छे छे !

परिकथेतील राजकुमार
Wed, 04/11/2012 - 16:36 नवीन
दुसरा भाग आम्ही ऐकलेला काहीसा असा आहे :- कावळा :- चिऊतै चिऊतै दार उघड.. चिऊतै :- थांब माझ्या बाळाला आंघोळ घालते. कावळा :- चिऊतै चिऊतै दार उघड.. चिऊतै :- थांब माझ्या बाळाचा भांग पाडते. कावळा :- चिऊतै चिऊतै दार उघड, माझ्या बरोबर माझी मुलगी पण आहे. चिऊतैचे बाळ :- आई पावडर माझी मी लावतो. तू आधी जाऊन दार उघड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वातीविशु

ठ्ठो..

चिगो
Wed, 04/11/2012 - 22:25 नवीन
कावळा :- चिऊतै चिऊतै दार उघड, माझ्या बरोबर माझी मुलगी पण आहे. चिऊतैचे बाळ :- आई पावडर माझी मी लावतो. तू आधी जाऊन दार उघड.
च्यायला, "इयत्ता दुशली, तुकडी ब" मधेच पंख फुटले की राव तुम्हाला.. ;-) लगे रहो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

चिव चिव..

इनिगोय
Wed, 04/11/2012 - 15:17 नवीन
एवढे प्रतिसाद देऊन या धाग्यावरचे 'प्लेम' व्यक्त करतायत मंडळी! ...पाहून माझे डोळे अश्रुने दबडबलेले आहेत आणि हृद्य कधीही न व्यक्त केलेल्या प्रेमाने भरुन आलेल आहे.
  • Log in or register to post comments

तात्पर्य

तिमा
Wed, 04/11/2012 - 20:52 नवीन
गोष्ट वाचून हे समजले की त्या काऊ-चिऊला मूलबाळ नव्हते. त्यामुळेच इतके दिवस चिऊ जिवंत राहिली होती. अवांतर : काऊ-चिऊचे हायब्रीड मूल कसे दिसेल त्याची कल्पना येत नाही.
  • Log in or register to post comments

कल्पना ;)

गणपा
Sun, 04/15/2012 - 15:33 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

काही खास, वेगळे आगळे, असेल

जयंत कुलकर्णी
Wed, 04/11/2012 - 23:06 नवीन
काही खास, वेगळे आगळे, असेल तरच मिपावर टाकावे हा अलिखित नियम आहे मित्रा. तो पाळावास हा सल्ला.
  • Log in or register to post comments

प्रासभौंच्या या कॉमेंटची

अन्या दातार
Wed, 04/11/2012 - 23:25 नवीन
प्रासभौंच्या या कॉमेंटची प्रकर्षाने आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

एक बेसीक प्रश्न मला नेहमी

चाफा
Wed, 04/11/2012 - 23:13 नवीन
एक बेसीक प्रश्न मला नेहमी पडतो चिमणी आणि कावळ्याची जोडी कशी हो जमेल ??? आणि जमली तर चिमणा काय कावळीच्या मागे जिव घालवेल का ?
  • Log in or register to post comments

मला समजलेले चिऊ आणि काऊ

संजय क्षीरसागर
गुरुवार, 04/12/2012 - 00:48 नवीन
प्रथम हे लक्षात घ्यायला हवे की ही कथा केवळ चिऊ आणि काऊची नाही, ती आदीम `मानवप्रेमाची ' प्रतिकात्मक करूण कहाणी आहे. काऊचा अर्थ चिऊचा पती इतकाच नसून `कावलेला' किंवा मनातून कावलेला पण बाहेरून काऊ (इथे इंग्रजीतील `काऊ' म्हणजे `गायीसारखा गरीब' असा अर्थ आहे,.... लेखकाचं भाषाप्रभुत्व लक्षात घ्या) >तशी चिउ ची भुक फ़ार न्हवती तिला अगदी थोडसच लागायच पण काउला मात्र सगळ गोळा करुन ठेवायची हौस जडलेली होती. ही कथेची मध्यवर्ती संकल्पना आहे, `स्री थोडक्यात तृप्त असते पण पुरूष कायम सेटींगच्या मागे' हा अनादीक्रम लेखकानं सुरूवातीला मांडला आहे. >काऊ तुझे जेवुन झाले की संग मग आपण गप्पा मारु" काऊ म्हणायच दिवसभर दगदग करुन वैताग आलाय त्यामुळे मला झोप आलिय आपण उद्या बोलु नक्की" झोप हाच खरा मानवी शत्रू आहे आणि तो पुरूषाला अवेळी घेरतो (नेहमीचा अनुभव म्हणजे `पुरूष कायम जागा आणि स्त्री लगेच झोपेच्या स्वाधिन होते' या वाचकांच्या मूळ धारणांनाच लेखकानं शह दिलायं हे इथे लक्षात घेण्यासारखं आहे) >काऊ म्हणे "काय बोलतेस रोज रोज आय लव यु! मला माहित आहे तुझ माझ्यावरिल प्रेम" चिऊ म्हणे "अरे राजा मी फ़क्त ते व्यक्त करत असते रे जरी तुला माहित असेल तरीही" इथे लेखकानं स्त्री सुलभ लज्जेचं बेमालूम वर्णन केलंय पण ते वाचकांच्या सहज लक्षात येण्यासारखं नाही. जर चिऊ `आय लव यु!' च्या ऐवजी नुसती `काऊ लव मी' म्हणाली असती तर गोष्ट तिथेच संपली असती हे लेखकानं हेरलंय. >तो चिऊला म्हटला"अग चिऊ मल तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे" चीउ म्हटली "सगळ सांग राजा पण आधी बस,जेवुन घे,आरम कर आणि मग सांग" इथे लेखकानी संयमाची परिसिमा काय असते ते दाखवलंय, काहीही झालं तरी आधी जेवण! काय आधी आणि काय नंतर याचं तारतम्य हवं. >जेवत असताना काऊने चिऊकडे पाहिले त्याला ती आज वेगळीच भासत होती.तिच्या हालचाली मंदावल्या होत्या,तिचा रंग उडुन गेलेला होता,तिच्या डोळ्यातिल तेज कमी झालेल होत. इथे लेखकानं पुरूषी संयमाची परिसिमा गाठलीये! `ती आज वेगळीच भासत होती' असं म्हटल्यावर वाचकांना वाटतं `आ गया काऊ लाईनमे' पण तसं नाहीये प्रथम चिऊची तब्येत महत्वाची (वाचक हो शिका, आधी जेवण मग तब्येतीची विचारपूस) >जेवण वगैरे झाल्यावर चिऊ काउला म्हटली "काऊ आज मला कुशित घेऊन झोप,मग उठल्यावर तुला काय सांगायचे ते सांग" सामान्य वाचक समजेल की जेवण झालं, तब्येतीची विचारपूस झाली आता नक्की काही तरी होणार! पण नाही, लेखकाला कथा एका वेगळ्याच उंचीवर न्यायची आहे. काऊ आता फारसं काही करू शकत नाही हे चिऊला माहितीये पण लेखक अशी वाक्य चिऊच्या तोंडी घालत नाही, मोठ्या खुबीनं तो वाचकाला (आणि त्यांच्या जोडीनं काऊला) सकाळपर्यंत वाट पहायला लावतो. इथे पुन्हा लेखकाच्या विद्वत्तेला दाद द्यावी लागते कारण काऊनं जंगजंग पछाडले तरी त्याला इतक्या पहाटे जाग येणार नाही आणि चुकून आलीच तर चिऊ त्याला `ही काय वेळ आहे का?' असं विचारणार याची लेखकाला कल्पना आहे पण त्याला कथा लांबवून वाचकांच्या मनावरची पकड अजीबात सुटू द्यायची नाहीये. >काऊने सगळ बळ एकवटुन तिला उठवायचा प्रयत्न केला तरीही चिऊ चा प्रतिसाद शुन्यच. इथे वाचकाला (जरी हा त्याचा नित्याचा अनुभव वाटला) तरी तो एकदम त्या अनुभवातून बाहेर येतो, त्याला वाटतं आता काऊ नक्कीच काही तरी करणार! >काऊने निट पाहिल तर चिऊच शरीर एकदम थंड पडलेल होत.काऊच्या कुशीतच ती देवाघरी निघुन गेलेली होती पण तिच्या चेहऱ्यावर एकप्रकारच समाधान दिसत होत. इथे देवाघरीचा अर्थ `देवघरात' असा आहे, म्हणजे मनानी ती देवपूजेत मग्न झाली होती. लेखकानं हा अर्थ मोठ्या खुबीनं मांडलायं `तिच्या चेहर्‍यावर एकप्रकारच समाधान दिसत होत.' जे सांगायला संतमहंतांना ग्रंथ लिहायला लागतात ते लेखक एका छोट्या कथेत सांगून जातो. `चिऊ आणि काऊ काही तरी करतील' या सामान्य जनकामनेला `ईश्वर प्रेम हेच सर्व श्रेष्ठ' असं लेखक हळूवारपणे सुचवतो आणि त्याचं `तिच्या चेहर्‍यावरचं एकप्रकारचं समाधान' असं वर्णन करतो. >काऊला पुढच सगळ दृश्य अंधुक दिसायला लागल होत कारण त्याचे डोळे अश्रुने दबडबलेले होते आणि त्याच हृद्य कधीही न व्यक्त केलेल्या प्रेमाने भरुन आलेल होत. इथे लेखकानं जाताजाता कथेला पुन्हा कलटणी दिलीये. `काऊला पुढचं सगळं दृष्य अंधुक दिसायला लागल होतं' काय करणार बिचारा? `काऊ पहाटेच उडुन जाई आणि संध्याकाळी घरट्यात परतत असे' हे लेखकानं सुरूवातीलाच क्लिअर केलंय. यातून लेखकाला काऊला पुन्हा कामाची (इथे कार्यालयीन कामकाज असा अर्थ आहे) काळजी लागली आणि ....`त्याच हृद्य कधीही न व्यक्त केलेल्या प्रेमाने भरुन आलेल होतं' (इथे `कधीही न व्यक्त केलेल्या प्रेमाने' म्हणजे इंग्रजीतील `लव' आहे) हे लेखक इतक्या बेमालूमपणे सुचवतो की वाचकाला, `लेखक पुढचा भाग कधी टाकतो 'याची प्रतिक्षा लागून राहते.
  • Log in or register to post comments

हैला...असं आहे होय हे, मला

पुष्करिणी
गुरुवार, 04/12/2012 - 02:41 नवीन
हैला...असं आहे होय हे, मला वाटलं आत्मा -परमात्मा आहेत काउ-चिउ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

थोडेफार बरोबर आहे.

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 04/12/2012 - 10:44 नवीन
मला वाटलं आत्मा -परमात्मा आहेत काउ-चिउ
ही मानवाने लिहिलेली आत्म्यांची कथा आहे, जी वाचून वाचक परमात्म्यात लिन होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा