चिउ आणि काऊ
एक होती चिउ आणि एक होता काऊ.दोघांच प्रेम हे जगासाठी एक विजातिय जोडीच होती पण दोघांचही एकमेकांवर खुप प्रगाढ प्रेम होत.काउ दिवसभर काव काव करत गावभर फ़िरायचा.आणि चिउ त्याची घरी वाट पहात बसायची.चिउ काऊवर खुप प्रेम करत असे पण काऊला मात्र वेळच पुरत नसे तो दिवसभर पोटाच्या मागे लागलेला असे.तशी चिउ ची भुक फ़ार न्हवती तिला अगदी थोडसच लागायच पण काउला मात्र सगळ गोळा करुन ठेवायची हौस जडलेली होती.
त्याच्या कामात तो एवढा व्यस्त असे की चिउचे प्रेम घेण्याएवढाही वेळ शिल्लक नसे.काउ पहाटेच उडुन जाई आणि संध्याकाळी घरट्यात परतत असे.घरी आल्यावर तो चिउला एकेक हुकुम सोडे माझ डोक दाब,पाय दाब.चिऊ त्याच सर्व काही प्रेमाने करत असे.चिउ म्हणायची "काऊ तुझे जेवुन झाले की संग मग आपण गप्पा मारु" काऊ म्हणायच दिवसभर दगदग करुन वैताग आलाय त्यामुळे मला झोप आलिय आपण उद्या बोलु नक्की"
मग चिउ म्हणायची "ठिक आहे ,उद्या नक्की बोल हं माझ्याशी"काऊचे पण चिऊवर जिवापाड प्रेम होतेच पण परत दुसरा दिवस उजाडला की काऊ परत कामात व्यस्त होई.काऊ मनात ठरवायचा की आपण उद्या नक्की चिऊ शी बोलु ,चिऊला सांगु की त्याच किती प्रेम आहे तिच्यावर ! पण काऊ एवढा व्यस्त राही की त्याला जेवायलाही वेळ पुरत नसे,आपलं प्रेम व्यक्त करायच असे काऊने ठरवुन कित्येक दिवस,महिने,वर्ष निघुन गेली.
चिऊ मात्र क्षणाक्षणाला तीच प्रेम व्यक्त करी ,चिऊ ला माहित होत की या व्यवहारी दुनियेत प्रेमाच्या शब्दांना काहीच किंमत नसते तरीही ती ते व्यक्त करत राही तिच्या कृतीतुन,बोलण्यातुन.काऊ म्हणे "काय बोलतेस रोज रोज आय लव यु! मला माहित आहे तुझ माझ्यावरिल प्रेम" चिऊ म्हणे "अरे राजा मी फ़क्त ते व्यक्त करत असते रे जरी तुला माहित असेल तरीही"
पण एक दिवस आला काउने ठरवल बस झाली बेगमी आज काहीही होवो आज चिऊ वरिल प्रेम व्यक्त करायचच.त्यासाठी त्याने पट्कन काम उरकल आणि तो लवकर घरी आला.चिऊ त्याची वाटच पहात होती.
तो चिऊला म्हटला"अग चिऊ मल तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे" चीउ म्हटली "सगळ सांग राजा पण आधी बस,जेवुन घे,आरम कर आणि मग सांग"काउ मनात म्हटला आज चिऊला दुखवायच नाही ती म्हणेल तसच करुयात आणि मग आपल्या मनातिल प्रेम व्यक्त करुयात.जेवत असताना काऊने चिऊकडे पाहिले त्याला ती आज वेगळीच भासत होती.तिच्या हालचाली मंदावल्या होत्या,तिचा रंग उडुन गेलेला होता,तिच्या डोळ्यातिल तेज कमी झालेल होत.
काऊ मनात म्हटला अरे गेली कित्येक वर्ष आपण चिउकडे निट पाहिलच नाही,की तिला कधी "तु कशी आहेस "हे ही विचारल नाही ! तो चिऊ ला म्हटला "राणी कशी आहेस ग तु?" चिऊ म्हटली " मी एकदम छान आहे रे राजा,तु माझ्याबरोबर आहेस यातच मला खुप आनंद मिळतो रे "
जेवण वगैरे झाल्यावर चिऊ काउला म्हटली "काऊ आज मला कुशित घेऊन झोप,मग उठल्यावर तुला काय सांगायचे ते सांग" काऊ मनात म्हटला किती वर्षांनी आज ही काहीतरी मागिते आहे,आपण हिला कधी काय हवय म्हणुनही विचारल नही,आज नकीए हिची ही छोटीशी अपेक्षा पुर्ण करुयात.
काऊने चिऊला मिठित घेतल आणि दोघेही शांत एकमेकांच्या कुशीत पडुन राहिले.चिऊला झोप लागली काऊला मात्र झरझर डोळ्यापुढुन निघुन गेलेली वर्शः आठवायला लागली.वेळोवेळी चिऊने घेतलेली काऊची काळजी,काऊ आजरी असताना तेला वाटनारी चिंता,तो बरा व्हावा म्हणुन केलेले उपवास.त्याला त्या गोष्टींच त्यावेळेस हसु येत असे त्यावरुन तो तीची चेष्टाही करी.आज मात्र त्या मिठीत त्याला तीच त्या मागच प्रेम दिसत होत.
बराच वेळ झाला तरी चिऊ काही उठेना म्हणुन काऊने तिला हळुच उठवायचा प्रयत्न केला पण चिऊ काही उठेना ,मग तिला गदागदा हलवुन पहिल तरीही चिऊ काही हालचाल करेना.काऊने सगळ बळ एकवटुन तिला उठवायचा प्रयत्न केला तरीही चिऊ चा प्रतिसाद शुन्यच.
काऊने निट पाहिल तर चिऊच शरीर एकदम थंड पडलेल होत.काऊच्या कुशीतच ती देवाघरी निघुन गेलेली होती पण तिच्या चेहऱ्यावर एकप्रकारच समाधान दिसत होत.
काऊला पुढच सगळ दृश्य अंधुक दिसायला लागल होत कारण त्याचे डोळे अश्रुने दबडबलेले होते आणि त्याच हृद्य कधीही न व्यक्त केलेल्या प्रेमाने भरुन आलेल होत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अरेच्चा!
@प्रास
हो शक्तिमान! चुकलंच
अगदी अगदी
बरं झाल जाहीर चुक कबुल केलीत
श्रीयुत मानव,
केविलवाणा प्रयत्न.
केविलवाणा प्रयत्न.बोर्डावर
बोर्ड आमचं,बिल आम्ही देणार
आता
अर्रे देवा, ष्टोरीनं तर यु टर्न घेतला.
हा घ्या सल्ला.गवि काकांनी
प्रतिक्षेत
ओ काकू
मानवानं मानवाची गोष्ट बिचा-या
खिक्!
+१
वॉव्व्व्व्व
ठ्ठो
_/\__/\__/\_
मानवराव
(No subject)
उठ रे ए मन्या
ए अश काय ले पला दादा एवढ मम्म
दांबिश मुग्गा आहेस तू. फटके
हम्म्म
दंतवैद्यीण मिळत्ये का बघा.
चिऊताई चिऊताई.....
छे छे !
ठ्ठो..
चिव चिव..
तात्पर्य
कल्पना ;)
काही खास, वेगळे आगळे, असेल
प्रासभौंच्या या कॉमेंटची
एक बेसीक प्रश्न मला नेहमी
मला समजलेले चिऊ आणि काऊ
हैला...असं आहे होय हे, मला
थोडेफार बरोबर आहे.