Skip to main content

ए सुमनांचे राणी

लेखक नरेंद्र गोळे यांनी शुक्रवार, 06/04/2012 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
ए सुमनांचे राणी, बहर स्वामिनी तू तुझे स्मितहास्य, कहर जाहले न मन शुद्धीवर अन्, नसे शुद्धीवर मी कटाक्षांचे मिलन, कहर जाहले तुझे ओठ की, पद्म कोमल गुलाबी ह्या दो पाकळ्या, प्रेमकविता जणू की त्या पाकळ्यांनी, तव स्नेहार्द्र गूज मला ऐकविणे, कहर जाहले कधी मुक्त मिलन, कधी संकोचणे ते कधी चालतांना, बिथरणे, उसळणे हे भुवयांची महिरप, चढवून उतरणे उतरून चढविणे, कहर जाहले ही थंडी हवेतील, वयातील ही रात्र तुझ्या कुंतलांची, कृपा केवढी ही ही प्रत्येक बट जणू, शत गंधकोशी तुझे धुंद होणे, कहर जाहले ह्या गाण्यातली बहार अनुभवलेल्यांना गीतकार ओळखता यावा नाही का!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2109
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

गेल्या वेळचं गाणं पटकन ओळखता आलं नव्हतं.... पण हे शीर्षक वाचूनच ओळखलं. खरंच गजब हो गया...

यावेळेला धागा उघडायच्या आधीच गाणं कळलं. पण रूपांतर झक्कास!

:-)

बिरूटे सर, मस्त कलंदर, गणपा, शुचि, पैसा, श्रुचि, अतृप्त आत्मा आणि वल्ली, सगळ्यांना प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद. मात्र, गीत जरी सगळ्यांनीच ओळखले असले तरी कुणालाच गीतकार ओळखू आलेला दिसत नाही आहे.

सायबा छान शृंगार जमलाय