Skip to main content

विडंबन करुक अक्खो दिवस जाय...

लेखक निश
शनिवार, 31/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबन करुक पडत्याती कष्ट, दुसर्‍यांच्या जीवावर बांडगुळा होती धष्टपुष्ट. विडंबन करुन थकुन जाय चांगली कविता ह्यांच्या डोक्यावरुन जाय. ह्यांका घरात नसा मान विडंबना करुन नवकवीक म्हणतत, ह्यांची कविता असता घाण. घरचो राग कवितेत काढतत नवकवींच्या जीवावर आपलो धंदो चालवतत. चोरलेल्या कोंबड्या अन उधारीचो मसालो म्हणुन ह्यांच्या कवितेत असता टमरेल चाळो. जाउन जाउन हे लोका जाती खय स्वताक झाकायचा सोडुन दुसर्‍यांक उघडो बघुची सवय. ऑफीसातला काम ह्यांका येणा नाय एक विडंबन करुक ह्यांचो आक्खो दिवस जाय. एक विडंबन करुक ह्यांचो आक्खो दिवस जाय
लेखनविषय:

वाचने 4638
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

आता समोरच्या पार्टीकडून काय उत्तर मिळते याच्या प्रतिक्षेत. त्यांनी तुम्हालाही टमरेल उचलायला नाही लावलं म्हणजे झालं. ;)

जबरी रे! चोरलेल्या कोंबड्या अन उधारीचो मसालो म्हणुन ह्यांच्या कवितेत असता टमरेल चाळो. हे तर आमच्या सारख्या उधारी कवींनाही लागू निश!

मजेशीर रचना आहे. मालवणी का कोणती बोली कवितेमध्ये छान जमलीय. तरीही काही बाबी नमूद करतो. कोणत्याही कवितेचं विडंबन झालं तर मूळ कविता घाण आहे असं कोणी म्हंटलंय? उलट विडंबन झालेली कविता प्रसिद्ध झाल्याची ती एक निशाणी मानली जाते. दुसर्‍या एखाद्या धाग्यामध्ये याचा स्पष्ट प्रत्यय येतोय. मर्ढेकरांच्या 'पिपात मेले...' कवितेची इतकी विडंबनं झाली आहेत की मूळ कवितेच्या प्रसिद्धीचीच ती द्योतकं होतात. आपल्या स्वतःच्या कवितांची विडंबनं झाली असल्यास निशरावांनी ती फार मनाला लाऊन घेऊ नयेत अशी मी विनंती करत आहे. त्यांचं काव्य छान आहे. पुढे प्रयत्नाने ते अधिकाधिक सुधारित होईल. निशरावांनी आपला काव्यप्रपंच असाच सुरू ठेवावा आणि कोणत्याही गमतीचा राग डोक्यात घालून घेऊ नये ही विनंती. निशरावांच्या कवितांना शुभेच्छा!

In reply to by प्रास

प्रास सर , मी रागात नाही तर विडंबन कारांच्या पावलावर पाउल टाकायवा प्रयत्न करत आहे. मुळात जर कोणि कविता केली आणि त्याच विडंबन झाल तर कविता प्रसिध्द पावलि अस खरच नसत. दुसर मला तुमचे लेक आवडतात व आज लिहिलेला लेख खुप आवडला आहे. निवळ्ळ लाजवाब

In reply to by निश

छान झालाय हो प्रयत्न... :-) म्हराटी पेक्षा मालवणीत तु जोरदार आहेस हां...! @मी रागात नाही तर विडंबन कारांच्या पावलावर पाउल टाकायवा प्रयत्न करत आहे. >>> :-D या...या...या...! पक्षात आपले स्वागत असो... तरुणांचा उत्साह हाच आमचा आत्मविश्वास ;-)

In reply to by निश

प्रास सर , मी रागात नाही तर विडंबन कारांच्या पावलावर पाउल टाकायवा प्रयत्न करत आहे. मुळात जर कोणि कविता केली आणि त्याच विडंबन झाल तर कविता प्रसिध्द पावलि अस खरच नसत. दुसर मला तुमचे लेक आवडतात व आज लिहिलेला लेख खुप आवडला आहे. निवळ्ळ लाजवाब
तुम्ही मिपावरती आधी 'सतिश' ह्या सदस्यनामाने कार्यरत होतात का हो ? अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं मनापासून स्वागत आहे. मला तरा आजकाल त्या पल्याडच्या कुठल्याश्या संस्थळाच्या गजालीच्या धाग्यावर आल्यासारखेच वाटते मिपावरती आल्यावर. बाकी प्रास शेठ अभिनंदन हो. किती लेक आहेत म्हणे तुम्हाला ? बोलला नाहीत कधी. ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्रास सर , तुमचे लेख आवडतात हो.. पण कौतुक केल तर काहि लोक जळतात. कधिहि न दुसर्‍यांच्या लेखावर जळणारा, तुमच्या लेखांचा पंखा .... निश

In reply to by परिकथेतील राजकुमार

बाकी प्रास शेठ अभिनंदन हो. किती लेक आहेत म्हणे तुम्हाला ? बोलला नाहीत कधी. ______________________ मला पण सांगा हं प्रास .. किती ' लेक ' आहेत ? ;) अभिनंदन :P

In reply to by परिकथेतील राजकुमार

मिपावर शुद्धलेखनाच्या चुका, आणि त्याही प्रत्यक्ष पराच्या हातून... अहाहाहा माझ्या डोळ्यांचं पारणं फिटलं. आज मी धन्य झालो....

मस्त! निश आता मालवणी शिकवच लेका, मजा येतेय ह्या भाषेत वाचायला. आमचा एक ब्रिटीश दादूस होता त्याने अशीच आगरी भाषेची गोडी लावली होती, आता कुठे गायबलाय कोण जाणे? - (मालवणी शिकावी असे वाटणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

त्याचबरोबर पैसामावशी नि प्रीमोकाकू आपल्याला कोंकणी शिकवत होत्या त्या शिकवणी अर्धवट टाकून पळाल्या आहेत त्यांनाही तो सिलॅबस पूर्ण करावा म्हणून दबावगट स्थापन करायला हवा. कसं म्हंता?

In reply to by रमताराम

पोरं पळाली आणि होमवर्क करेनात म्हणून आमची शाळा बंद पडली. हजेरीची ग्यारंटी असेल तर रविवारपासून परत सुरू करूयात!

In reply to by पैसा

टैमावर अब्यास करतोय आमी. आणि सरकारी फर्मानानुसार दहावी पर्यंत गृहपाठ नि परीक्षेची सक्ती करू शकत नाही तुम्ही. पहिल्या यत्तेतच घुरपाठ? काय मंडली, बरोबर बोलताव ना मी? जरा थोडे नमस्कार, चमत्कार जमू द्यात मग डायरेक कविताच करू कोंकणीत हाकानाका.

निशा, आज एक नवीन धडा , क म्हंजे उन हून ( पंचमी विभक्ती ) काय रे ? झिलग्या, तू गुरुदक्षिणेचो काळजी करूचा नको .ब्यांकत खातो असा ना ? बाकी हे काय लिहिला ते भन्नाट आसा . शिष्य- चाउ- रा

In reply to by चौकटराजा

चौकटराजा साहेब , कशाला मला गुरु करता ? उलट तुमच्या सारख्या विद्वान व गुणी लोकांचे शिष्य व्हायला आवडेल मला. मला तुम्हि झिलग्योच म्हणा , कानाक ऐकुक ता गोड वाटता. जसो साजुक तुपातलो शिरो. "क म्हंजे उन हून ( पंचमी विभक्ती ) काय रे ?" साहेब बरोबर आहे तुमच.

In reply to by निश

म्येल्या निशा, गूगल ट्रान्सलेटरात मालवणी दिसता नाय म्हनोक तुला गुरू करू आसा नायतर ये मालवणी झिल्ग्याच्या नादी लागतो कोण ?

In reply to by चौकटराजा

गूगल ट्रान्सलेटरात मालवणी दिसणा नाय, म्हणुन तुका गुरू केला आसा (किंवा गुरु केल्यानी ) नायतर तुझ्यासारख्या मालवणी झिलाच्या नादी कोण लागतलो ? हे बरोबर आहे.

विडंबन करुक पडत्याती कष्ट, दुसर्‍यांच्या जीवावर बांडगुळा होती धष्टपुष्ट.
ह्यां मालवणी नाय!

नीश मस्त मस्त मस्त ...मजा आली वाचताना :) रुस्तुम-ए-मिपा---विडंबन सेनेला आवाहन आहे हे ..:P आत्मोजिपंतांकडुन भन्नाट प्रतिउत्तराची अपेक्शा आहे :D

In reply to by जेनी...

@रुस्तुम-ए-मिपा---विडंबन सेनेला आवाहन आहे हे ..Tongue आत्मोजिपंतांकडुन भन्नाट प्रतिउत्तराची अपेक्शा आहे Laughing out loud >>> शांत... नटखट बालिके...शांत....! :-)

हाण्ण , हाण्ण !! निश्या , मस्त , आवडल्या !! स्साल , ते आमच ममो , आंजावर रुसल्यापासन, आमची खानदेशी कमी पडली, पण तरी बी मालवणी चा फॅन आहे ...अजुन येवु दे ... ब्रिटीश च्या आगरी चा पंखा