एक पद्धत..
लेखनविषय (Tags)
म्हणे मरणाची बातमी देणार्या पोस्टकार्डाचा कोपरा कापून पाठवतात..
पोस्टकार्डंच कुठे राहिली आता..
सगळीकडे ईमेल..
अर्थात मी कधी कोपरा कापलेलं पोस्टकार्ड पाहिलं नाही..
पण असेल.. आपली एक पद्धत..
म्हणे मोटरमन रिटायर व्हायच्या लास्टच्या दिवशी त्याला डेक्कनक्वीनवर पाठवतात..
आणि एकही लाल सिग्नल देत नाहीत..
खरं खोटं कोणास ठाऊक.. सगळ्या मोटरमन्सना मिळत असेल हा मान..?
मी कधीच डेक्कनक्वीनने गेलो नाही...
अर्थात तिचा मोटरमन कधी पाहिला नाही ..
पण असेल.. आपली एक पद्धत..
म्हणे फाशी सुनावताच जज निब तोडतात ..
सिनेमात पाहिलंय.. .. अर्थ माहीत नाही.. पण भीषण वाटतं..
निबसोबत जजचं आतडंही तुटत असेल का?
बाकी मी कोर्टात कधीच गेलो नाही.. खुनाच्या खटल्यात तर नाहीच नाही..
अर्थात मी जजचं तुटणारं निब किंवा आतडं पाहिलं नाही..
पण असेल.. आपली एक पद्धत..
म्हणे जट आली की लहानशा पोरीला देवाला सोडतात..
मग ती सगळ्यांचीच.. पण तिचं कोणीच नाही..
तिचा फक्त देव..
म्हणजे कोणीच नाही ना...?
गावाचे जास्तीचे स्त्राव पुसून घ्यायला वापरलं जाणारं फडकं बनतं म्हणे तिचं..
पण आमच्याकडे पोरींसुद्धा सर्वजण ई व्हिटॅमिनवालं बदाम तेल आणि पँटीन शांपू लावतात.. हायजेनिक..
जटबिट येण्याचा प्रश्नच नाही..
अर्थात मी जटबिट आलेली कधी पाहिलीच नाही..आणि त्यामुळे पोरगी सोडलेलीही पाहिली नाही..
..पण असेल.. आपली एक पद्धत..
..
प्रतिक्रिया
_/\_
अप्रतिम
कमी शब्दांत मोठा आशय सांगून
मस्त
गवि , सुंदर मांडणी . सगळ्याच
आई गं. वाचताना चढत्या
गवि साहेब, तुम्हाला हात जोडुन नमस्कार.
खाली
_/\_
मुक्तक / काव्य आवडले. शेवटचा
गविंच्या लिखाणाला
गविचच्छान्चान.. गवि छान
खतरनाक
Pagination