एक पद्धत..
लेखनविषय (Tags)
म्हणे मरणाची बातमी देणार्या पोस्टकार्डाचा कोपरा कापून पाठवतात..
पोस्टकार्डंच कुठे राहिली आता..
सगळीकडे ईमेल..
अर्थात मी कधी कोपरा कापलेलं पोस्टकार्ड पाहिलं नाही..
पण असेल.. आपली एक पद्धत..
म्हणे मोटरमन रिटायर व्हायच्या लास्टच्या दिवशी त्याला डेक्कनक्वीनवर पाठवतात..
आणि एकही लाल सिग्नल देत नाहीत..
खरं खोटं कोणास ठाऊक.. सगळ्या मोटरमन्सना मिळत असेल हा मान..?
मी कधीच डेक्कनक्वीनने गेलो नाही...
अर्थात तिचा मोटरमन कधी पाहिला नाही ..
पण असेल.. आपली एक पद्धत..
म्हणे फाशी सुनावताच जज निब तोडतात ..
सिनेमात पाहिलंय.. .. अर्थ माहीत नाही.. पण भीषण वाटतं..
निबसोबत जजचं आतडंही तुटत असेल का?
बाकी मी कोर्टात कधीच गेलो नाही.. खुनाच्या खटल्यात तर नाहीच नाही..
अर्थात मी जजचं तुटणारं निब किंवा आतडं पाहिलं नाही..
पण असेल.. आपली एक पद्धत..
म्हणे जट आली की लहानशा पोरीला देवाला सोडतात..
मग ती सगळ्यांचीच.. पण तिचं कोणीच नाही..
तिचा फक्त देव..
म्हणजे कोणीच नाही ना...?
गावाचे जास्तीचे स्त्राव पुसून घ्यायला वापरलं जाणारं फडकं बनतं म्हणे तिचं..
पण आमच्याकडे पोरींसुद्धा सर्वजण ई व्हिटॅमिनवालं बदाम तेल आणि पँटीन शांपू लावतात.. हायजेनिक..
जटबिट येण्याचा प्रश्नच नाही..
अर्थात मी जटबिट आलेली कधी पाहिलीच नाही..आणि त्यामुळे पोरगी सोडलेलीही पाहिली नाही..
..पण असेल.. आपली एक पद्धत..
..
प्रतिक्रिया
ही बिलकूल चांगली पद्धत
अफाट
हा माणूस
@गावाचे जास्तीचे स्त्राव
तुम्ही आणि साने गुरुजी माझे
त्रास देणार लिहिताय
हम्म्म...
कोपरे कापण्याचं पहिल्यांदाच
अर्थात मी जटबिट आलेली कधी
बरचं पुनर्वसन झालय आता,वा..
एक आपली पद्धत.. >> यात
पलीकडच्या संस्थंळावर आहे (इथल
+१
दोन गोष्टी माझ्याकडून
इथे माझ्या डिपार्टमेंटमधे एक
ओ.....
फारच सुंदर मुक्तक गवि!
मुक्तक खिन्न करणारे
शेवटची वाक्ये अंगावर येतात.
+१
:(
मुक्तक आवडले.
गविभौ, अल्टिमेट
छान
क्लास !
+१
ओ गवि... ही डोक्याला शॉट
_/\_
लेखणीला सलाम........
सलाम..
सर्वच नवीन
नेहमीप्रमाणेच...
आवडले
छानच
गवि स्टाईल !!
+१
चरचरीत!
_/\_ _/\_ _/\_
_/\_ शेवटचा परिच्छेद डोक्यात
दुसर्याच्या दु:खाचा एवढा उडत
दुसर्याच्या दु:खाचा एवढा उडत
>>>पण उलट बाजूने. --- म्हणजे
पण आमच्याकडे पोरींसुद्धा
बाजू
परिणामकारक!
नीब तोडतात ते खरे असते
_/\_ - पिंगू
नेहमीप्रमाणेच, अप्रतीम!!
आवडलं, या आणि अशा पद्धतीमुळं
जबरदस्त!!
Pagination