✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सांजवात..

स — सांजसंध्या, Fri, 03/23/2012 - 20:18
सांजवात.. शीळ तुझी दरीतली खूण तुझी सरीतली.. ओढ तुझी अंतरात रोज मुकी चांदरात.. ओल तुझी काळजात बोल तिचे आसवात साद तुझी वादळात याद तुझी काजळात आजही तू आठवात तेवते मी सांजवात.. - संध्या

प्रतिक्रिया द्या
4074 वाचन

💬 प्रतिसाद (24)

तुझे येणे..

सांजसंध्या
Fri, 03/23/2012 - 20:22 नवीन
तुझे असे झणी येणे तुझे असे झणी जाणे खेळ तुझा गुण गुणा वेड लावी माझ्या मना.. थांब जरा दोन क्षण खोल ना रे तुझे मन वाट पाहे कधीची रे पुन्हा तुझ्या वाटेची रे तुझे येणे हवे मना तुझे जाणे साहवेना.. - संध्या
  • Log in or register to post comments

व्वा...! १+१ एकास एक कविता

अत्रुप्त आत्मा
Sat, 03/31/2012 - 21:46 नवीन
व्वा...! १+१ एकास एक कविता अवडली... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या

वा!

पैसा
Fri, 03/23/2012 - 20:26 नवीन
दोन्ही छान रचना!
  • Log in or register to post comments

कातील ! आवडली.

यकु
Fri, 03/23/2012 - 20:46 नवीन
कातील ! आवडली.
  • Log in or register to post comments

कविता आवडली

जाई.
Fri, 03/23/2012 - 21:48 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments

तुमची कविता

अमृत
Fri, 03/23/2012 - 21:54 नवीन
तुमची कविता मनभावन अमृत
  • Log in or register to post comments

कविता आवडली. शेवटच्या कडव्यात

प्रचेतस
Fri, 03/23/2012 - 22:20 नवीन
कविता आवडली. शेवटच्या कडव्यात फसलीय का? आठवात म्हणजे आठवणीमध्येच ना? मग शब्दप्रयोग ओढून ताणून केल्यासारखा वाटतो. -- किल्वरएक्का
  • Log in or register to post comments

आता यानंतर

चौकटराजा
Sat, 03/24/2012 - 08:44 नवीन
आता यानंतर "वल्ली" ही आय डी दुसर्‍याच एका खडूसाने घेतली आहे. वल्ल्ली यानी आग्यावेताळ अशी काहीतरी आयडी घेतल्याचे कळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आठवात म्हणजे आठवणीमध्येच

सांजसंध्या
Sat, 03/24/2012 - 09:10 नवीन
आठवात म्हणजे आठवणीमध्येच ना. हो. त्याच अर्थी. यमकारी शब्दकळा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

प्रतिसादकांचे आभार...

सांजसंध्या
Sat, 03/24/2012 - 06:48 नवीन
प्रतिसादकांचे आभार...
  • Log in or register to post comments

सुरेख....... आवडलीच

जयवी
Sat, 03/24/2012 - 13:14 नवीन
सुरेख....... आवडलीच :)
  • Log in or register to post comments

मस्त मस्त

अविनाशकुलकर्णी
Sat, 03/24/2012 - 13:26 नवीन
मस्त मस्त
  • Log in or register to post comments

अविकाका, जयवी... थँक्स

सांजसंध्या
Sat, 03/24/2012 - 14:09 नवीन
अविकाका, जयवी... थँक्स ! चौराकाका वल्लींचा प्रतिसाद नेहमी नेमका आणि प्रामाणिक असतो. तसाच आताही आहे. चुका दाखवल्या तर त्यात फायदा माझाच आहे...
  • Log in or register to post comments

मी जिंकलो मी हरलो . रसग्रन या

चौकटराजा
Sat, 03/24/2012 - 14:25 नवीन
मी जिंकलो मी हरलो . रसग्रन या प्रकाराचा वसा वल्लीने घेत्ला व तो कुनीतरी मान्ये क्येला याबद्द्द्ल मी वल्लीचे व करनार्‍यांचे आबार मान्तो. च्चो रा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या

चौराकाका _____________/\_____

सांजसंध्या
Sat, 03/24/2012 - 15:26 नवीन
चौराकाका _____________/\_____________
  • Log in or register to post comments

छान!आवडली

रुमानी
Mon, 03/26/2012 - 10:42 नवीन
दोन्ही कविता छान ! आवडली.
  • Log in or register to post comments

मस्तच .. लिहित रहा... वाचत

गणेशा
Mon, 03/26/2012 - 17:03 नवीन
मस्तच .. लिहित रहा... वाचत आहे...
  • Log in or register to post comments

एक

निनाद
Sat, 03/31/2012 - 14:28 नवीन
एक-द्वि शब्दी कविता आवडली.
  • Log in or register to post comments

संध्याजी,

प्रास
Sat, 03/31/2012 - 15:11 नवीन
मी काही फार मोठा काव्य रसिक नाही पण कोणतंही साहित्य वाचायला आवडणारा एक साहित्य प्रेमी जरूर आहे. फारसा काव्याच्या वाटेला जात नाही पण तुमच्या कविता हीच तुमची ओळख असल्याने तुमची आं. जालिय ओळख व्हावी या हेतूने कविता वाचली. शैली आवडली. पण
साद तुझी वादळात याद तुझी काजळात
हा अधोरेखित शब्द काही कळला नाही. इथे काजळ काय करायचंय? मला वाट्टं 'काळजात' हा शब्द योग्य व्हावा. कदाचित 'कातळात' हा शब्दही योग्य होऊ शकेल. माहित नाही. मी कवी नाही. आपल्याच कवितेला आपणच दुसर्‍या कवितेचा प्रतिसाद देणं काही कळलं नाही, हा मिपावर काहीसा नवाच प्रकार वाटला. असो. दुसर्‍या कवितेमध्येही -
वाट पाहे कधीची रे पुन्हा तुझ्या वाटेची रे
इथेही अधोरेखित शब्द खटकला. वाट कुठे जात नाही, येत नाही, ती त्याच जागी असते. तेव्हा दुसरी ओळ, पुन्हा तुझ्या येण्याची रे अशी असती तर शेवटच्या कडव्याशी सुसंगत वाटली असती. हे आपले माझे मत. कवयित्रीला तिचं मत बदलण्याचा आग्रह अजिबात नाही. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

डोळ्यातून ओघळणारा थेंब काजळात

सांजसंध्या
Sat, 03/31/2012 - 15:57 नवीन
डोळ्यातून ओघळणारा थेंब काजळात थांबून राहतो या अर्थाने.. धन्यवाद प्रास.
  • Log in or register to post comments

हं......

प्रास
Sat, 03/31/2012 - 16:11 नवीन
याद --> अश्रू --> डोळा --> काजळ --> अडकणं फार लांबचा विचार आहे हो.... ('बडी दूर की सोचते हो'च्या चालीवर ;-)) धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या

मस्त

एक एकटा एकटाच
Fri, 03/13/2015 - 21:04 नवीन
आवडली नेहमीसारखीच कडक!!!!!!!!
  • Log in or register to post comments

प्रत्येक ओळीत दोनपेक्षा जास्त

पॉइंट ब्लँक
Fri, 03/13/2015 - 21:33 नवीन
प्रत्येक ओळीत दोनपेक्षा जास्त शब्द न वापरता यमक जुळवणे कसे काय जमले.
  • Log in or register to post comments

खूपच सुंदर कविता. नेमक्या

ज्योति अळवणी
Sat, 03/14/2015 - 00:49 नवीन
खूपच सुंदर कविता. नेमक्या शब्दात आपण भावना व्यक्त केल्या आहात. खूप आवडली
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा