✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बंद बनियन बरं-का...!

अ — अत्रुप्त आत्मा, Wed, 03/28/2012 - 11:15
आमची प्रेरणा:- http://www.misalpav.com/node/21151 बंद बनियन आटलेला भायेर येती बेंबी चुन्याची निवळी जणू पिचपिचीत घामाचा हा वास कोंडे आत श्वास फाडावा तो बनियन जीवं-घेणा ढेरं जणू सागर बेंबी उपडी घागर प्यांटही सैलू घालीतसे तिची माझी साथ बनियन मधे प्यांट भायेर येई खास डोकाऊनी (न घातलेली)-टिपः-घट्ट बनियन घालायचा पहिलाच प्रयत्न आहे... उसवले तर शिऊन घ्यावे

प्रतिक्रिया द्या
13318 वाचन

💬 प्रतिसाद (54)

हा हा हा हा.... प्रचंड भारी

सुहास झेले
Wed, 03/28/2012 - 11:38 नवीन
हा हा हा हा.... प्रचंड भारी ;)
  • Log in or register to post comments

मेलो मेलो..ठार मेलो..!!! हसून

गणामास्तर
Wed, 03/28/2012 - 11:46 नवीन
मेलो मेलो..ठार मेलो..!!! हसून हसून जीव जायचा बाकी राहिलाय आता फक्त.. भटजी बुवा कुठे फेडाल हि पापे...?
  • Log in or register to post comments

@भटजी बुवा कुठे फेडाल हि

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/28/2012 - 12:22 नवीन
@भटजी बुवा कुठे फेडाल हि पापे...? >>> इथेच... :-p .............................................तुम्हाला हसवुन हसवुन ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

तुमच्याच नुकत्याच पंख

प्रचेतस
Wed, 03/28/2012 - 11:47 नवीन
तुमच्याच नुकत्याच पंख लागलेल्या विडंबनाची आठवण झाली. हे विडंबन तरी राहू दे अशी त्या भोळ्या सांबाकडे प्रार्थना. :P
  • Log in or register to post comments

@तुमच्याच नुकत्याच पंख

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/28/2012 - 12:17 नवीन
@तुमच्याच नुकत्याच पंख लागलेल्या विडंबनाची आठवण झाली. >>> ती कशी विसराल आपण... दु दु दु... अ***** :-p @हे विडंबन तरी राहू दे अशी त्या भोळ्या सांबाकडे प्रार्थना.>>> काहितरी Image removed. वास येतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कोणाला अग्यावेताळ म्हणताय हो

अग्यावेताळ
Fri, 03/30/2012 - 09:10 नवीन
कोणाला अग्यावेताळ म्हणताय हो तुम्ही ? इथे एक आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@कोणाला अग्यावेताळ म्हणताय हो

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/30/2012 - 10:24 नवीन
@कोणाला अग्यावेताळ म्हणताय हो तुम्ही ? >>> ते आपण नाही,हे आपल्याला कळुन चुकलच असेल,नसेल तर आज अवतरलात तसेच अधुन/मधुन येत रहा...एक दिवस चुकुन-कळेल...की आपण ते नाही... ;-) ह्ही: ह्ही: ह्ही: @इथे एक आहेच. >>> तुंम्ही उघड/उघड आहात..छुपे किती आहेत ठाऊक आहे का..? नसेल तर वरचाच सल्ला... येत रहा.... Image removed. अवांतरः- आपण नावावरुन तरी सजातीय,एकधर्मी ;-) आहोत... हे आपणास मान्य आहे का..? असेल, तर मग धिंगाण्याला अविट गोडी येणार... Image removed. अग्यावेताळ-अत्रुप्त आत्माImage removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्यावेताळ

आज अवतरलात तसेच अधुन/मधुन येत

अग्यावेताळ
Fri, 03/30/2012 - 10:32 नवीन
आज अवतरलात तसेच अधुन/मधुन येत रहा...
नक्कीच येत राहू हो आता. पण उगा दुसर्‍याला आमच्या नावाची उपाधी देऊ नका. त्याचे हक्क्त आमच्याकडेच आहेत.
येत रहा....
तो ब्लॉग अपडेट करा की किती वेळा जाऊन आलो पण त्याच त्या पोस्ट्स.
आपण नावावरुन तरी सजातीय,एकधर्मी आहोत... हे आपणास मान्य आहे का..?
मान्य आहे की. धिंगाणा घालूच. फक्त जिलबीपाडू विडंबनं जरा कमी करा आणि स्मायल्यांचा अतिरेक टाळा. -------- (अनेक त्रुप्त अत्रुप्त आत्म्यांना गणामध्ये समाविष्ट केलेला) अग्यावेताळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आवरा. जाम मजा येणार आता.

प्रचेतस
Fri, 03/30/2012 - 10:35 नवीन
आवरा. Image removed.Image removed.Image removed. जाम मजा येणार आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्यावेताळ

अग्यावेताळ...

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/30/2012 - 15:43 नवीन
प्रतिक्रीया व्यनीमधे पाठवलेली आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्यावेताळ

एक सल्ला...

वपाडाव
Fri, 03/30/2012 - 15:52 नवीन
जिंदगीभर मै,यही भूल करता रहा,,,धूल चेहेरे पे थी,और आईना पोछता रहा...।
मालक, ही स्वाक्षरी अशी लिहा... बस यहीं भुल हर बार करता रहा, धुल चेहरे पर थी और आइना साफ करता रहा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

उत्तराचा व्यनी केला आहे.

अग्यावेताळ
Fri, 03/30/2012 - 18:44 नवीन
उत्तराचा व्यनी केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अआ, त्या कवितेतल्या स्माईली

५० फक्त
Wed, 03/28/2012 - 11:54 नवीन
अआ, त्या कवितेतल्या स्माईली नको होत्या, उगा कॉमेडी सर्कसच्या प्रेक्षकांना बटण दाबुन हसायला लावल्यासारखं होतंय ते, जिथं आणि जसं हसायचं तसं पब्लिक हसतंच आहे. बाकी विडंबन छान झालंय, जरा ओढुन ताणुन आणलंय एक दोन ठिकाणी पण ठिक.
  • Log in or register to post comments

वोक्के... अत्तच डिलिव्हरी

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/28/2012 - 11:58 नवीन
वोक्के... अत्तच डिलिव्हरी झालीये... बघू जगत का ते.. ;-) पण जगलं वाचलं तर फक्त आम्ची नाळ म्हणजे स्मायल्या कापयची इनंती करितो ...डॉ.संपादकांना ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

नवकवींना प्रोत्साहीत करा जरा

प्रचेतस
Wed, 03/28/2012 - 12:16 नवीन
नवकवींना प्रोत्साहीत करा जरा भटजी, नायतर तुम्हासही आता जिलब्या मिळत जातील. :P
  • Log in or register to post comments

@नवकवींना प्रोत्साहीत करा जरा

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/28/2012 - 12:20 नवीन
@नवकवींना प्रोत्साहीत करा जरा भटजी, नायतर तुम्हासही आता जिलब्या मिळत जातील.>>> Image removed. :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तोंड गोड कराच्च आता भटजी ब्वा

स्पा
Wed, 03/28/2012 - 12:40 नवीन
तोंड गोड कराच्च आता भटजी ब्वा Image removed.
  • Log in or register to post comments

दगा.... दगा.... दगा.... हे

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/28/2012 - 12:46 नवीन
दगा.... दगा.... दगा.... ;-) हे घे तुला>>> ;-) अ.आ.==== मन्नू ;-) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

ही पहा, मिळालीच लगेच. ती पण

प्रचेतस
Wed, 03/28/2012 - 12:47 नवीन
ही पहा, मिळालीच लगेच. ती पण एका बोक्याकडून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

हात् मेल्या , येवढ्याने का

सूड
Wed, 03/28/2012 - 13:53 नवीन
हात् मेल्या , येवढ्याने का भागणार गुर्जींचं ? गुरजी ह्या घ्या हो आणखीन, लागल्या तर बरीक मागा हो. संकोच करु नका. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

हा घ्या हो मग गुर्जी.

प्रचेतस
Wed, 03/28/2012 - 13:55 नवीन
हा घ्या हो मग गुर्जी. जिलब्यांचा डोंगूर. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

धम्माल आहे विडंबन ...

सांजसंध्या
Wed, 03/28/2012 - 13:00 नवीन
धम्माल आहे विडंबन ...
  • Log in or register to post comments

कंट्री कारी - चुकलो

चौकटराजा
Wed, 03/28/2012 - 13:11 नवीन
कंट्री कारी - चुकलो क्रान्तीकारी कविता. आशयघन कविता. दाट कविता.अचाट कविता. महान काव्य . भन्नाट. जमलेले. जबरा... ढेरी व बनियन यांचे नाजुक गूढ नाते कविने फार वेचक शब्दात मांडले आहे. मैलाचा ( की मौलाचा ) दगड आहे ही कविता ! दहावीच्या मराठी पुस्तकात येणार. नव्या साठी तिथे कोटा आहे. अरे हे काय आम्हालाही प्रेरक आहे की ही कविता ... पहा पहा ! ढेर जणू सागर गलबते केसांची बेल्टचा तो सेतू शोभतसे आम्ही ही निसर्ग कवि झालो की काय ? सगळाच संभ्रम पडलाय भौ !
  • Log in or register to post comments

बीभत्स रसात घोळवलेली विडंबनाची जिलबी !!

हारुन शेख
Wed, 03/28/2012 - 13:44 नवीन
बीभत्स रसात घोळवलेली विडंबनाची जिलबी !!
  • Log in or register to post comments

चिडचिडरसात तळलेली

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/28/2012 - 14:20 नवीन
चिडचिडरसात तळलेली प्रतिक्रीयेची चकली ;-) उजेडात सगळेच बोके एकमेकांकडे बघतात ;-) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख

अ. आ.

हारुन शेख
Wed, 03/28/2012 - 17:02 नवीन
अ. आ. प्रतिक्रिया हलकी घ्या. विडंबन करायला कविपेक्षाही अधिक बुध्यांक लागतो कारण एकाच वेळी विनोदनिर्मिती आणि काव्य असा मामला असतो. तुमच्या बुध्यांकाबद्दल म्या पामराने काय बोलावे ;-) त्यात बर्याच जनांच्या +१ चा वाटा आहेच. आईनस्टीनने जर विडंबनं लिहली असती तर तो 'विज्ञानातला अतृप्त आत्मा' म्हणून ओळखला गेला असता. शिवाय मिपावरच्या कवींना शिस्तीत ठेवण्याचा तुम्ही जो वसा घेतला आहे त्यात थोडी उत मात होणारच. कोकरू चुकले म्हणजे योग्य टिकाणी(च) काठीने ढोसून वळावे लागते अश्या आपल्या श्रद्धेचा मला आदर वाटतो. ते काम अलम मिपावर तुम्ही सचोटीने करून दाखवले आहे. (चू. भू. द्या.घ्या.) तुम्ही स्वतंत्र कविता लिहित असल्यास महाराष्ट्राचे एक ख्यातनाम कवी म्हणून तुमची प्रसिद्धी कशी नाही याबद्दल एतद्देशीय लोक करंटे आहेत काय असा प्रश्न पडतो. कमरेच्या वर खालच्या प्रदेशात तुम्हाला शक्य असलेला काव्यसंचार हेवा वाटावा असा आहे. अश्या पुढच्या प्रत्येक भरारी करीता आपणाला आमच्या शुभेच्छांची गरज नाही. डॉक्टर श्रीराम दिवटे ह्या ऐतिहासिक पुरुषानंतर दक्षिण दिग्विजयाचे potential फक्त तुमच्यात दिसते. "उजेडात सगळेच बोके एकमेकांकडे बघतात" ह्या वाक्याची माळ तुमच्या फोटोला घालून आम्ही लोटांगण घातले आहे असे चित्र कल्पावे. तुमचा (न फिरणारा) पंखा -------------------------------------------------------------------------------------------------------------------------
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@"उजेडात सगळेच बोके

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/28/2012 - 17:12 नवीन
@"उजेडात सगळेच बोके एकमेकांकडे बघतात" ह्या वाक्याची माळ तुमच्या फोटोला घालून आम्ही लोटांगण घातले आहे असे चित्र कल्पावे. >>> उत्तम...आपलेही कल्याण असो... आंम्ही आपले आभारी आहोत... :-) @तुमचा (न फिरणारा) पंखा >>> कदाचित वीज गेली असावी ;-) असो... तुमची प्रतिसादातली मननीय भावना पोहोचली,,,धन्यवाद :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख

आत्मा तो हा अत्रुप्त, परी

प्रचेतस
Wed, 03/28/2012 - 18:38 नवीन
आत्मा तो हा अत्रुप्त, परी जाहला संत्रस्त, होवूनी लैच संतप्त प्रतिसादाने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

दुसर्‍याच वाक्याला डिश्क्लेमर

शैलेन्द्र
Wed, 03/28/2012 - 17:45 नवीन
दुसर्‍याच वाक्याला डिश्क्लेमर टाकुन प्रतिक्रीयेतील हवा काढुन घेण्याच्या प्रव्रुत्तीचा निषेध.. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख

+१

सोत्रि
Wed, 03/28/2012 - 23:53 नवीन
कवितेतले जास्त काही कळत नाही तरीही प्रेरणास्त्रोत असलेली कविता अतिशय उच्च आहे असे मला वाटते (वैयक्तिक मत). गणेशाचा प्रतिसाद त्या कवितेवरचा फारच बोलका आहे. भटजीबुवा, त्या कवितेचे विडंबन ही निव्वळ एक बळंच पाडलेली जिलबी आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते. असो! - (आता जिलब्यांची अ‍ॅलर्जी होईल अशी भिती वाटणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख

सोकाजी हल्के हल्के घ्या वो (

जेनी...
Wed, 03/28/2012 - 23:56 नवीन
सोकाजी हल्के हल्के घ्या वो :) ( उगाचच चिडलेले ) सोकाजी चांगले नाहि दिसत :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

@भटजीबुवा, त्या कवितेचे

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/29/2012 - 01:13 नवीन
@भटजीबुवा, त्या कवितेचे विडंबन ही निव्वळ एक बळंच पाडलेली जिलबी आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते. >>>खरं आहे अगदी...पण...आता थोडं उघड बोलावं म्हणतो... मी व्यक्तिशः हे विडंबन करायच्या विचारात नव्हतो... ;-) @आणी-हे विडंबन म्हणुन वाचू नये असा डिसक्लेमर टाकायचा र्‍हायलाच जरा... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

-१

स्पा
गुरुवार, 03/29/2012 - 14:11 नवीन
खरं आहे अगदी...पण...आता थोडं उघड बोलावं म्हणतो... मी व्यक्तिशः हे विडंबन करायच्या विचारात नव्हतो... काय सांगता.. तुम्हाला कोणी blackmail केल कि काय.. का जबरदस्ती केली हि जिलबी टाकायची :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@काय सांगता.. तुम्हाला कोणी

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/29/2012 - 14:19 नवीन
@काय सांगता.. तुम्हाला कोणी blackmail केल कि काय.. का जबरदस्ती केली हि जिलबी टाकायची >>> हा बघा पहिला चोर,याला हे इडंबन टाकण्यापूर्वी दाखवलं तेंव्हा ''छान जमलय... मेलो...मेलो... हसुन हसुन...'' अशी आर्त प्रतिक्रीया देऊन टाकायला उत्तेजना देणारा बोका... तिकडे छान/छान म्हणतो आणी इकडे जिलब्या देतो... अखेर जिलबीनीच गळा कापलान मेल्याने ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

D भटजी ब्वा .. चिल का

स्पा
गुरुवार, 03/29/2012 - 14:23 नवीन
D भटजी ब्वा .. चिल का ताप्ताय एवढे .. चला जरा एक बार मारून येऊ मस्त ४२० .. हे आपल ३२० चा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मन्या... तुला गोळ्याच हन्या

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/29/2012 - 14:40 नवीन
मन्या... तुला गोळ्याच हन्या ;-) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

(No subject)

प्रचेतस
गुरुवार, 03/29/2012 - 14:23 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हा बघा चोर नं -२...अता लोळतोय

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/29/2012 - 14:37 नवीन
हा बघा चोर नं -२...अता लोळतोय गड्बडा हसुन हसुन.... मेल्या गाव तू मला ;-) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आवरा आवरा हो बुवा. हसून हसून

प्रचेतस
गुरुवार, 03/29/2012 - 14:46 नवीन
आवरा आवरा हो बुवा. हसून हसून मरायची वेळ आलीय आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@हसून हसून मरायची वेळ आलीय

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/29/2012 - 15:38 नवीन
@हसून हसून मरायची वेळ आलीय आता.>>> :-D अता का..? अता का..? अता आज हसुन हसुनच मरयचय तुंम्हाला... या इकडे आता--- उतारा काढलाय या धाग्याचा ;-) http://www.misalpav.com/node/21175 http://www.misalpav.com/node/21175
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

+१

प्रीत-मोहर
गुरुवार, 03/29/2012 - 14:39 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

___/\___ भटजी बुवांचा विजय

प्यारे१
Wed, 03/28/2012 - 14:45 नवीन
___/\___ भटजी बुवांचा विजय असो...
  • Log in or register to post comments

मार्‍या मस्त.. जम्या चुस्त..

शैलेन्द्र
Wed, 03/28/2012 - 16:32 नवीन
मार्‍या मस्त.. जम्या चुस्त.. :)
  • Log in or register to post comments

खतरनाक

सर्वसाक्षी
Wed, 03/28/2012 - 23:10 नवीन
आत्मारामपंत खतरनाक कविता!
  • Log in or register to post comments

हे कस काय बॉ राहिल

जेनी...
Wed, 03/28/2012 - 23:39 नवीन
हे कस काय बॉ राहिल माझ्याकडुन?:( आत्ता वाचलं :D आत्मा त्रुप्त :P
  • Log in or register to post comments

हाहाहाहा!!

रसप
गुरुवार, 03/29/2012 - 13:59 नवीन
हाहाहाहा!!
  • Log in or register to post comments

अस्स होय....काल मिपावर नव्हतो

इरसाल
गुरुवार, 03/29/2012 - 14:36 नवीन
ह्याबद्द्ल बोलत होतात तर. हे कसे काय सुटले.
  • Log in or register to post comments

मानवंदना देत आहेत असे समजावे

मालोजीराव
गुरुवार, 03/29/2012 - 16:12 नवीन
अतिशय वास्तववादी कविता, बनियन सारख्या दुर्लक्षिलेल्या अंतर्वस्त्रावर महाकवींनी टाकलेला हा झगमगीत प्रकाश अवडण्यात आला आहे, आपल्या कवितेला १. अमृततुल्य मध्ये चहा गाळत बसलेला बंद बनियनमधला गाववाला अण्णा (बनियन कळकटलेला आहे याची नोंद घ्यावी ) २.उडुपी हाटेलात डोसे टाकणारा शेट्टी ३.किराणा,भुसार दुकानातल्या गल्ल्यावर बसणारा बंद बनियनमधला शेठ (बनियनला भोके पडली आहेत आणि शेठ कान खाजवत आहे याची नोंद घ्यावी) ४.मिठाईच्या दुकानात कढईसमोर बसून एका हाताने ढेरी खाजवणारा आणि दुसर्या हाताने जिलब्या सोडणारा बंद बनियनमधला हलवाई तसेच कामावरून नुकतेच घरी आलेले आणि शर्ट काढून आपल्या बनियन ला एक्स्पोस करणारे सर्व कामगारबंधू (यात आय टी सकट सर्व कामगारांचा समावेश केला जावा) हि मंडळी उभी राहून मानवंदना देत आहेत असे समजावे ! - मालोजीराव
  • Log in or register to post comments

ह्या प्रतिसादावर आम्ही टोप्या

वपाडाव
गुरुवार, 03/29/2012 - 16:24 नवीन
ह्या प्रतिसादावर आम्ही टोप्या उडवत आहोत असे समजावे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

काय बुवा

लीलाधर
Sat, 07/21/2012 - 09:22 नवीन
बुवांची ही अद्भूत काव्यप्रतिभा सर्व मिपाकरांना पुन्हा एकदा आस्वाद घेता यावा म्हणून वर आणत आहे. ;)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा