Skip to main content

माझी पाखरे

लेखक पुष्कराज यांनी बुधवार, 30/07/2008 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
गडबड वेड्या वस्तीमध्ये शाळा पाखरांची पोपट मैना आणि कबुतर लगबग चिमण्यांची डेरदार त्या वृक्षावरती घर आणिक शाळा सकाळ सायंकाळी भरतो प्क्ष्यांचा मेळा कावळा मास्तर शाळेमध्ये पोर चिमणा-चिमणी कावळा शिकवी धडे-कविता मुले गाती गाणी किलबिल किलबिल किती तयांची आसमंत दाट्तो मैना गाइ सुरेल गाणे पोपट तो नाचतो अवतीभवती मनुष्यप्राणी लोभी हलकट मारामारी आणि भांडणे नुसता हवरट स्वार्थापायी या अधमाने कुर्हाड हो आणलि घर आणिक शाळा त्यांची झरझर हो तोडली घिरट्या घालीत होते पक्षी घर हरवले कोठे आर्त स्वराने त्या पक्ष्यांच्या आसमंत दाटे किलबिल किलबिल हरवून गेली सुने सुने झाले माझी पाखरे माझे पक्षी दूर उडून गेले
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2597
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

'...माझी पाखरे माझे पक्षी दूर उडून गेल....'' या ओळींमुळे, 'माझी पाखरे' नावामुळे हे नुसतं वर्णन न वाटता खरोखरंच कवीचा कळवळा जाणवतो.

नुकतेच आमच्या शेजारील गर्द झाडी पाडून एक नवे संकुल उभे रहात आहे. गुगल अर्थ मधुन पहीले असता गर्द हिरवा दिसणारा तो पट्टा एकदम बोडका झाला. गेले आठवडाभर संध्याकाळी घरात बरेच पतंग/फुलपाखरु, वेगळेच रंगीत किडे दिसले बहुदा तिथुनच विस्थापीत झालेलेच असावेत. खूप वाईट वाटले. ही कविता त्यांची कहाणी सांगून गेली असे वाटले.

बळेच जोडल्या आहेत असे वाटले. पहिली चार कडवी स्वतंत्र आवडली. पुढची चार कडवी स्वतंत्र आवडली.