Skip to main content

तमाशा खरंच महाराष्ट्राची संस्कृती आहे का ?

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 27/03/2012 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
तमाशा खरंच महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? ह्या शंकेच उत्तर मला अजुन मिळाल नाही आहे. ह्याला कारणही तसच घडल. परवा रवीवारी , मी व माझे दोन मित्र एका प्रसिध्द फडात तमाशा पहायला गेलो होतो. बाहेर बरीच लांब रांग लागली होती. त्या रांगेत उभे रहीलो असतो तर सहजच आम्हाला दोन ते तीन तास लागले असते तिकिटं काढायला. माझ्या मित्राने तिथे असलेल्या 'साखरभाताला' विचारले आज ही रांग एव्हढी लांब का आहे? तर तो म्हणाला जत्रेच्या सुपारीची आहे. ती रांग एव्हढी लांब होती की मला खरंच नवल वाटल की जर जत्रेत फड भरवून ह्या मातीची संस्कृती जपली जात असेल तर मग आपली संस्कृती फक्त तमाशांवर चालायला हवी. नाचव बाई जप संस्कृती. काहीही सांस्कृतीक काम न करता बाई नाचवून संस्कृती रक्षण व्हायला पाहीजे.पण तसे होत नाही. मग तमाशा देखील आपली संस्कृती आहे अस का म्हटल जातं? म्हणुन खरंच तमाशा महाराष्ट्राची संस्कृती आहे का ?

वाचने 24597
प्रतिक्रिया 100

प्रतिक्रिया

तमाशा खरंच महाराष्ट्राची संस्कृती आहे का ?
माहित नाय पण महाराष्ट्राची संस्कृती तमाशात आहे. ;-)

तमाशा खरंच महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? ह्या शंकेच उत्तर मला अजुन मिळाल नाही आहे. मलाही मिळालेले नाही ! तुम्हाला उत्तर मिळाले की मला नक्की सांगा बरं का ! ;) काहीही सांस्कृतीक काम न करता बाई नाचवून संस्कृती रक्षण व्हायला पाहीजे.पण तसे होत नाही. मग तमाशा देखील आपली संस्कृती आहे अस का म्हटल जातं? काहीही कामे न-करता,तथाकतिथ जनजागॄती केली जाते तर मग बाई नाचवुन संस्कृती रक्षण होत नाही का ? ;) म्हणुन खरंच तमाशा महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? तमाशा करुन घेणे ही काही लोकांची संस्कॄती असावी, अशी मात्र खात्री पटत चालली आहे ! ;) बाकी तू-नळीवर बरेच तमाशाचे(लावणीचे) इडियो उपलब्ध आहेत्,त्यातही उसगावात राहणार्‍या मंडळींच्या स्त्रीया मोठ्या प्रमाणात नाचताना दिसतात !

टोरेंटवर डाऊनलोड न मारता प्रत्यक्ष "तमाशा" स्वतः पहायला गेल्याबद्दल पराशेठ ह्यांचे अभिनंदन.;) तुम्ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक रक्षणाबद्दलचा बोललेला नवस अशा त-हेने तमाशा पाहून फेडलात त्याबद्दल हि अभिनंदन. आता पराशेठ ह्यांनी पाहिलेल्या तमाशाचे रसग्रहण इथे टाकावे हि त्यांना विनंती. :) अभिज्ञ

In reply to by अभिज्ञ

मला एकदम "गुरुवर्य येरकुंटकरांचा सत्कार, म्हणजे साक्षात विद्वत्तेच्या सूर्याचा सत्कार.." आठवले रे अभिज्ञ.

In reply to by परिकथेतील राजकुमार

ठ्ठो =)) =)) =))

In reply to by अभिज्ञ

:-) बाकी श्री पॅपिलॉन पंडीत सेठ, अहो दस्तुरखुद्द मराठीसंस्कृतीतज्ञ माननीय श्री पु. ल. देशपांडे (भाईकाका) यांच्या पंचांगात, आपलं ग्रंथात उल्लेख नसल्याने तमाशा हा महाराष्ट्री संस्कृतीचा भाग दिसत नाही. बहुदा महाराष्ट्रातल्या अनार्यांच्या संस्कृतीचा भाग असेलही. आधीक माहीतीकरता सहज उपाध्ये यांना भेटा ;-) मुळ ग्रंथातला उतारा खाली. पैलवान स्पा यांच्या प्रकाशन संस्थेतून.. शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी,वांग्याचे भरीत... गणपतीबाप्पा मोरयाची मुक्त आरोळी... केळीच्या पानावरील भाताची मूद आणि त्यावरचे वरण... उघड्या पायानी तुडवलेला पंचगंगेचा काठ... मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी... दुसरयाचा पाय चुकून लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार... दिव्या दिव्याचा दिपत्कार... आजीने सांगितलेल्या भूताच्या गोष्टी... मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहान मोठी होणारी शेपटी... दसरयाला वाटायची आपट्याची पाने... पंढरपूरचे धूळ आणि अंबीर याचे समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफूटाणे... सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत आप्ताच्या मूठभर अस्थिन्चा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श...(पु ल)

In reply to by सहज

>>>>माननीय श्री पु. ल. देशपांडे (भाईकाका) यांच्या पंचांगात, आपलं ग्रंथात उल्लेख नसल्याने तमाशा हा महाराष्ट्री संस्कृतीचा भाग दिसत नाही. माननीय श्री. सहज मामांच्या या विधानावर ‍तीव्र आक्षेप! खुद्द पुलंनी ते (ही) 'तमासगीर'(च) (Performing Artist) असल्याची कबूली दिलेली आहे. योग्य ती क्लीप संधी मिळताच इथे आणून आदळली जाईलच :p

In reply to by यकु

हे पहा आपल्याकडे प्रथाच आहे. पुराणात अनेक देव आपल्या फावल्या वेळात अनेक आक्षेपार्ह वाटतील असे प्रकार करत होते पण त्यांच्या त्या कृत्यांना आपण आपली संस्कृती म्हणत नाही. त्यामुळे भाईकाका फावल्या वेळात काय तमाशा करत होते याची दखल घ्यायची गरज नाही. त्यांची महाराष्ट्र बहुसंख्य मान्यताप्राप्त संस्कृती परिभाषा मंडळात केलेली सोवळ्यातली विधानेच ग्राह्य. बाकी सगळी विधाने अनधिकृत आहेत.

In reply to by सहज

>>>>> त्यांची महाराष्ट्र बहुसंख्य मान्यताप्राप्त संस्कृती परिभाषा मंडळात केलेली सोवळ्यातली विधानेच ग्राह्य. बाकी सगळी विधाने अनधिकृत आहेत. --- असं कसं, असं कसं.. :p तमाशा ही महाराष्‍ट्राचीच संस्कृती आहे.. आत्ताच जुने रुमाल चाळून पाहिले तर प्रत्यक्ष शिवाजीराजे त्यांचे बंधू व्यंकोजींना 'पराक्रमाचा तमाशा दाखवा' वगैरे बोलताना दिसले.. आता तुम्हाला इतिहासातील सत्ये मान्यच करायची नसतील तर मात्र तुम्ही ब्रिगेडी झालात असे खेदाने म्हणावे लागेल :p

In reply to by यकु

आणि त्याला तुणतुणं वाजवायची हुक्की आली असेल तर ? ;) पळा तेज्यायला येतय आता परा काठी घेउन ..........

In reply to by गणपा

आम्ही हाथरुणं पाहून तुणतुणं वाजवतो. ;) आणि आम्हाला तमाशा बघण्यात जास्ती विंटेष्ट्र आहे, तमाशाचा भाग होण्यात नाही.

In reply to by परिकथेतील राजकुमार

तमाशा बघणं काय आणि त्याचा भाग होणं काय दोन्ही सारखंच ;-) ती सातारकरीण नाचली तेव्हा फेटे, रुमाल उडाले आणि न राहवून तुम्ही पण शेवटी बोर्डावर चढलातच, मग तो एक वेगळाच तमाशा झाला असं उडत उडत कळालं होतं ब्वॉ मागे... ;-)

In reply to by यकु

ती सातारकरीण नाचली तेव्हा फेटे, रुमाल उडाले आणि न राहवून तुम्ही पण शेवटी बोर्डावर चढलातच, मग तो एक वेगळाच तमाशा झाला असं उडत उडत कळालं होतं ब्वॉ मागे...
यक्कुशेठ या की एकदा फार्महाऊसवरती. निवांत बसून बोलु ;) उगा इथं आणि कशाला बोंबा मारुन राहीले राव ? बाकी बोर्डावरती काही 'मधल्यांचा' मध्ये मध्ये येऊन नाच चालू होता त्याविषयी काय कळले का नाय तुम्हाला ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>>> यक्कुशेठ या की एकदा फार्महाऊसवरती. निवांत बसून बोलु उगा इथं आणि कशाला बोंबा मारुन राहीले राव ? ---- आता तुम्ही बोलावणार आणि आम्ही येणार नाही असं कधी होईल का? ;-) नक्की येऊ! :) >>>> बाकी बोर्डावरती काही 'मधल्यांचा' मध्ये मध्ये येऊन नाच चालू होता त्याविषयी काय कळले का नाय तुम्हाला ? ---- अं? त्याचं काय, आता तमाशा म्हटल्यावर थोडीशी ढकलाढकली, मिशांवर ताव, दौलतजादा वगैरे चिल्लर गोष्‍टी होत रहातात ;-) यापेक्षा गंभीर काही घडलं असलं तर कल्पना नाय ब्वॉ..

In reply to by यकु

नक्की येऊ!
ज्जे बात ! या निवांत वेळ काढून, जौ मग नगर रोडला.
---- अं? त्याचं काय, आता तमाशा म्हटल्यावर थोडीशी ढकलाढकली, मिशांवर ताव, दौलतजादा वगैरे चिल्लर गोष्‍टी होत रहातात यापेक्षा गंभीर काही घडलं असलं तर कल्पना नाय ब्वॉ..
छे छे ! अहो दोन्ही पार्ट्या समजूतदार असल्या तर कशाला काय गंभीर घडेल ? आन तसे पण आम्ही येता जाता कोणाचा पण 'नटरंग' करत नाही. ;)

In reply to by चिंतामणी

चला, फार्महाऊसवर पराशेठची भेट घेताना चिंकांच्या पाठीस दडून जाण्याचा मार्ग मोकळा झाला ;-) खीखीखी

In reply to by परिकथेतील राजकुमार

सहमत एकदम लोकाना ऊपरती होते म्हणतात , बघितली. सौ चुहे खाके बिल्ली हज को चली...... चालुदे

पुराणात अनेक देव आपल्या फावल्या वेळात अनेक आक्षेपार्ह वाटतील असे प्रकार करत होते पण त्यांच्या त्या कृत्यांना आपण आपली संस्कृती म्हणत नाही अरे व्वा . कशाला संस्कृती म्हणायचे याची व्याख्या इतकी सोप्पी आहे हे माहितीच नव्हते. आपले पूर्वज एकमेकांवर हल्ले करायचे. भाऊ भावाच्या विरोधात शत्रुकडुन लढायचे पण ती आपली संस्कृती नाही. सख्ख्या भावाचा /पुतण्याचा राज्याच्या गादीसाठी खून केला जायचा. ईद्रदरबारी अप्सरांचा नाच चाले. देव /ऋषी सुरापान करत रामाने अकारणच शंबूकाचा वध केला. त्याच रामाने झाडाचा आडोसा घेवून वालीचा एन्काउंटर केला धर्मराजा जुगार खेळायचा पण ही आपली संस्कृती नाही. तरीही हे प्रकार समाजात सर्वमान्य आहेत. आजही ते चालतातच. बुद्धाने राज्याचा त्याग करून बौद्धत्व प्राप्त केले. शिवाजीने परकियांविरुद्ध युद्ध पुकारून स्वाभिमान दिला ही आपली संस्कृती आहे मात्र त्याचे आपण सोयीस्करपणे विसर्जन केले आहे. आज आपण असे काहीच करत नाही. म्हणजे ज्याचे गोडवे गातो आणि करणे टाळतो करत नाही ती संस्कृती . ज्याला नावे ठेवतो मात्र आवर्जून त्या गोष्टी करतो ती संस्कृती नाही

In reply to by विजुभाऊ

पण असा खुलासा करु नका हो जरा संभ्रम राहू दे, मग आपण सगळेच अर्जुन होणार मग कुठे तो कल्की अवतार होईल सगळे आपल्याला समजुन देईल व आपले पुन्हा एकदा भले होईल. त्यामुळे सध्या फक्त संभ्रम वाढवत राहूया कसे ;-)

अज्याबात शिरेस वाटत नाय......आय्ला पुरा दिवस खावून १०० नाय म्हण्जे काय ?

इतिहास माझा आवडता विषय त्यात मस्तानी चा विषय आला म्हणून मनीचा सल येथे खरडतो, ती राजनर्तिका होती क राजकन्या हा वाद घालण्यापेक्षा माझ्या मनात नेहमी असा विचार येतो,ती जर पेशवीण बाई म्हणून शनिवार वाड्यात नांदायला आली असती. तर यवनी पेशवीण ह्या मुद्यांचा मराठ्यांचा तत्कालीन राजकारणावर व राज्यकार्त्यांशी कसा प्रभाव पडला असता. उदा राजपूर राणी केल्यावर अकबराचे राजपुतांशी संबंध सलोख्याचे झाले अपवाद वगळता. पण राजपुतांनी पुढे मुघल साम्राज्य विस्तारास मोलाची मदत केली. मस्तानी व राऊ चा मुलगा कदाचित निजाम व भारतातील अनेक नबाब ,भविष्यातील हैदर अली व नजीब ह्यांच्याशी मराठ्यांचे असलेल्या दुष्मनीला पर्याय ठरू शकला असता कदाचित इंग्रजंना अधिक काळ वाट पहावी लागली असती. किंवा प्लासी ची लढाई ते जिंकलेच नसते. पानिपत झाले नसते. मुघलांनी सरत शेवटी राजपूत राजकन्या स्वीकारली आम्ही मात्र ......... आणि ती जर राजकन्या नव्हती हाच मुद्दा असेल तर पूर्वी नुरजहा ही कनीज पुढे मुघल राज्यकर्ती दिल्लीत होऊन गेली.( हे पात्र साकारलेली गौरी प्रधान आणि तिच्यावर फिदा मुघला शहेजादा मिलिंद सोमण डोळ्यासमोर येतात.) सलीम अनारकली अशी प्रेमळ भाकडकथा लिहिण्यापेक्षा तिच्यावर सिनेमा करायला हवा होता ,दासी ते महाराणी पर्यंत प्रवास कोणतीही शक्यता अशक्यप्राय किंवा अविश्नीय वाटली तरी अश्याच घटना इतिहास जागोजागी विखुरल्या गेल्या आहेत.

(प्रश्नकर्त्याच्या) विचारण्यात शंकेपेक्षा आगाऊपणा (!!! -- दुसरा शब्द सुचवावा ) जास्त वाटतो .......