✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मंद तारका

अ — अन्या दातार, Tue, 03/27/2012 - 22:48
मंद तारका त्या तेजाळती नभी विश्वाची दिवाळी सदोदित । तुझा सहवास करे उल्हसित नको तो विरह जीवघेणा । अथांग सागर जैसे तुझे मन निराळेच पैलू दावितसे । तुझी-माझी साथ हातामध्ये हात घालू गगनास गवसणी । टीपः कवितेचा पहिलाच प्रयत्न आहे, सांभाळून घ्यावे.

प्रतिक्रिया द्या
5177 वाचन

💬 प्रतिसाद (28)

१००/१००

पैसा
Tue, 03/27/2012 - 23:02 नवीन
सांभाळून आम्ही घेऊच. आणखी कोणाला सांगायचं आहे का?
  • Log in or register to post comments

झालं, गेले दातारसुद्धा

यकु
Tue, 03/27/2012 - 23:12 नवीन
झालं, गेले दातारसुद्धा कामातून.. ;-) अवांतरः भार्री जमलंय
  • Log in or register to post comments

+१

स्पा
Wed, 03/28/2012 - 09:36 नवीन
गेले गेले.. साफ ख प ले :) मस्तच रे अन्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

+ ln(e). असेच म्हणतो. जमलंय

बॅटमॅन
गुरुवार, 03/29/2012 - 13:07 नवीन
+ ln(e). असेच म्हणतो. जमलंय तर छानच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

शेवटचं कडवं एकदम कातिल आहे.

सूड
Tue, 03/27/2012 - 23:17 नवीन
शेवटचं कडवं एकदम कातिल आहे. पहिलाच प्रयत्न पण झक्कास जमलाय.
  • Log in or register to post comments

+ १

मेघवेडा
Wed, 03/28/2012 - 13:39 नवीन
तंतोतंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

एक पकडलं झाड परि सावली नाही

प्रचेतस
Tue, 03/27/2012 - 23:22 नवीन
एक पकडलं झाड परि सावली नाही आड शोधू दुसरीकडे आता रानभूल.!! चैन पडत नाय का हो खडगपुरात आता? कविता आवडली. पहिलाच प्रयत्न जोरदार यशस्वी.
टीपः कवितेचा पहिलाच प्रयत्न आहे, सांभाळून घ्यावे.
नवकवीचे मिपावर स्वागत. इथे विडंबन पाडण्यास आत्मे टपलेले असतात, तुम्हास हे सांगण्याची जरूरी नाहीच. तरी सावधान. ;)
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/30/2012 - 18:30 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आवडली !

चौकटराजा
Wed, 03/28/2012 - 05:02 नवीन
अन्या जी, कमीतकमी शब्दात ( आणि अचूक शब्दात ) जास्त आशय ! आम्ही "धमकू " संघटना नाही . अशा संघटनेला घाबरतही नाही. पण खरीच मस्त कविता असताना काय उगाच लिहित बसायचं? पुन्हा लिहाच.
  • Log in or register to post comments

साडेतीन चरणाचे षष्टाक्षरी

सांजसंध्या
Wed, 03/28/2012 - 05:14 नवीन
साडेतीन चरणाचे षष्टाक्षरी ओवी वृत्त आहे. मला खूप आवडते हे. छान प्रयत्न आहे. पुलेशु ( दुस-या आणि तिस-या चरणामधे यमक साधण्याचा प्रयत्न करा. )
  • Log in or register to post comments

जौ द्या हो सांजसंध्याताई

चौकटराजा
Wed, 03/28/2012 - 08:41 नवीन
जौ द्या हो सांजसंध्याताई , त्या यमकाचं एवढं नका मनावर घेउ ! काय आहे कवि हा आत्मकेंद्रित असतो. त्याला जे "भावते" ते तो लिहितो. मन मोठं करा ! जाउ द्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या

ओये होये अन्या तु पण भारिच

जेनी...
Wed, 03/28/2012 - 08:15 नवीन
ओये होये अन्या तु पण :P भारिच ..जाम आवडलं :)
  • Log in or register to post comments

वण्ण्कम्म.. या या.. छान

शैलेन्द्र
Wed, 03/28/2012 - 08:33 नवीन
वण्ण्कम्म.. या या.. छान जमतय..
  • Log in or register to post comments

चांगली जमली आहे..

मोदक
Wed, 03/28/2012 - 09:29 नवीन
चांगली जमली आहे.. :-)
  • Log in or register to post comments

छान आहे कविता

जाई.
Wed, 03/28/2012 - 09:43 नवीन
छान आहे कविता
  • Log in or register to post comments

छान थोडक्या शब्दात, उत्तम

५० फक्त
Wed, 03/28/2012 - 09:59 नवीन
छान थोडक्या शब्दात, उत्तम मानापमान खेळला आहात, अवांतर - तेवढं शेवटचं कडवं, दोन महिन्यापुर्वी लिहिलं असतं तर निवडणुकीच्या प्रचारात जाम भाव खावुन गेलं असतं, पण ज्या पार्टीला हे गाणं दिलं असतं ती जर पडली असती, तर मग तुमची काय खैर नव्हती.
  • Log in or register to post comments

:)

राघव
Wed, 03/28/2012 - 10:28 नवीन
छान लिहिलंय. :) पुलेशु. राघव
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
Wed, 03/28/2012 - 12:20 नवीन
पुलेशु. अन्याभाऊंची माफी मागून या कवितेची 'विधुर' आवृत्ती: मंद तारका त्या| तेजाळती नभात| माझ्या अंतरात| अमावस्या|| सखे हरपला| तुझा सहवास| आता वनवास| नित्याचाच|| गोठलेले तळे| झाले माझे मन| विरहाचे भान| सदोदित|| तुझ्या आठवात| विरताच श्वास| शेवटचा दिस| गोड व्हावा||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

_/\_ भन्नाट.

प्रचेतस
Wed, 03/28/2012 - 12:21 नवीन
_/\_ भन्नाट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

मी विद्ध मी तृप्त

चौकटराजा
Wed, 03/28/2012 - 13:20 नवीन
तुमचा या व्हर्शन मधून वाचत जाता स्तब्द झालो .विद्ध झालो. पण निर्दोष काव्य वाचून तृप्त झालो. आय लव्ह धिस ! पुन्हा लिहा आणखी की एका विषयावर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

काव्य-प्रताप

प्रास
Wed, 03/28/2012 - 10:48 नवीन
नामे मंद तारका कविता रुपी खारका बहु मधुर बनल्या अन्याभाऊच्या पहिला तो काव्य यत्न हाती गवसले रत्न वाचकां केले कौतुक अन्याभाऊचे आमचाही असे जसा पहिला काव्य-प्रतिसाद असा कौतुकाचा तो प्रयत्न अन्याभाऊच्या मिपाच्या काव्य विभागात अन्याभाऊंचे स्वागत. :-)
  • Log in or register to post comments

.../\...

वपाडाव
Wed, 03/28/2012 - 12:30 नवीन
अरेरे अन्या, कसा रे भाड्या, झाला तु असा, सद्गदित !! करुन दे वाट, वाहु दे पाट, बोळांचे दाट, तुंबलेले !!
  • Log in or register to post comments

अन्या पहिल्याच प्रयत्नात एकदम

गणेशा
Wed, 03/28/2012 - 13:33 नवीन
अन्या पहिल्याच प्रयत्नात एकदम अभंग लिहिलायेस तु .. नक्कीच उच्च प्रयत्न आहे हा. खुप छान
  • Log in or register to post comments

हुच्च

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 03/28/2012 - 13:44 नवीन
हुच्च आहे... पहिला प्रयत्न आहे तर विषेश कौतुकास पात्र!! अभिनंदन!
  • Log in or register to post comments

मस्तच!

सोत्रि
Wed, 03/28/2012 - 23:45 नवीन
खूप छान! - (पहिल्या प्रयत्नास संभाळून घेतलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

आले काही मनात संचारले

सस्नेह
गुरुवार, 03/29/2012 - 12:34 नवीन
आले काही मनात संचारले अंगात सांगाया जनात आले अन्याभाऊ.. येत रहा...स्वागतम !
  • Log in or register to post comments

मंद तारका त्या तेजाळती

ajay wankhede
Fri, 03/30/2012 - 04:14 नवीन
मंद तारका त्या तेजाळती नभी विश्वाची दिवाळी सदोदित । परत एकदा तपासा वर शांतरस आत शृंगार हा कसला प्रकारImage removed.Image removed.
Smiley Face" alt="" />
  • Log in or register to post comments

शांतपणे शृंगार चालला असल्याने

अन्या दातार
Fri, 03/30/2012 - 08:26 नवीन
शांतपणे शृंगार चालला असल्याने "शांत"रसच! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ajay wankhede

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा