✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

देव खरच नवसाला पावतो का?

न
निश यांनी
Mon, 03/26/2012 - 15:28  ·  लेख
लेख
देव खरच नवसाला पावतो का? ह्या शंकेच उत्तर मला अजुन मिळाल नाही आहे. ह्याला कारणही तसच घडल. काल रवीवारी , मी व माझे दोन मित्र एका प्रसिध्द देवळात देवाच्या पाया पडायला गेलो होतो. बाहेर बरीच लांब रांग लागली होती. त्या रांगेत उभे रहीलो असतो तर सहजच आम्हाला दोन ते तीन तास लागले असते देवाच्या पाया पडायला. माझ्या मित्राने तिथे असलेल्या स्वयंसेवकाला विचारले आज ही रांग एव्हढी लांब का आहे? तर तो म्हणाला नवसाचि आहे. ती रांग एव्हढी लांब होती की मला खरच नवल वाटल की जर देवाला नवस करुन जर ते नवस खरे होत असतील तर मग हे जग मग फक्त नवसांवर चालायला हवे. कर नवस घे नवसाच फळ. काहीही काम न करता नवस करुन ते काम व्हायला पाहीजे.पण तसे होत नाही. मग हे देव नवसाला पावतात अस का म्हटल जात? म्हणुन खरच देव नवसाला पावतो काय ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20464 वाचन

💬 प्रतिसाद (77)

प्रतिक्रिया

देवीला नवस करा, बोळा

सुहास..
Mon, 03/26/2012 - 17:42 नवीन
देवीला नवस करा, बोळा निघण्याची शक्यता नाकारता येत नाही .
  • Log in or register to post comments

टुकार धागे

कपिलमुनी
Mon, 03/26/2012 - 19:43 नवीन
टुकार धागे बंद व्हावेत म्हणून कुठल्या आय डी ला नवस बोलावा ??
  • Log in or register to post comments

नवस.

कवितानागेश
Mon, 03/26/2012 - 21:12 नवीन
टुकार धागे बंद व्हावेत म्हणून कुठल्या आय डी ला नवस बोलावा ??>> गणपाला बोला! ;) बायदवे, नवस नाही केला तरी देव पावतो म्हणे कधीकधी.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

उलट बाजूने?

पैसा
Mon, 03/26/2012 - 21:16 नवीन
आपला धागा ठेवावा म्हणून एखाद्या आयडीने एण्टिक्विटी ब्लू चा नवस बोलला तर? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

>>>>>>आपला धागा ठेवावा म्हणून

यकु
Mon, 03/26/2012 - 21:27 नवीन
>>>>>>आपला धागा ठेवावा म्हणून एखाद्या आयडीने एण्टिक्विटी ब्लू चा नवस बोलला तर? ह्यात्त्याच्या! गणपा आणि निश ह्या दोघांचाही निषेध !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आम्हाला आचमन करण्याची हुक्की

गणपा
Mon, 03/26/2012 - 21:54 नवीन
आम्हाला आचमन करण्याची हुक्की आलीच तर स्वतःची सोय स्वतःच करतो. पण कुणाला नवस बोलायचा/फेडायचा असल्यास आमची ना नाही. आम्ही फेडलेला नवस तिर्थ/प्रसाद म्हणुन आमच्या भक्तांमध्येच वाटू. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

एण्टिक्विटी ब्लू, व्वा, क्या बात है!

सोत्रि
Mon, 03/26/2012 - 22:19 नवीन
एक्सक्युज मी, एण्टिक्विटी ब्लू ला नवस करण्याचे हक्क माझ्याकडे राखिव आहेत. मला एण्टिक्विटी ब्लू जो कोणी पाजेल त्याचे सर्व मनोरथ सफळ संपूर्ण होतील. तथास्तु! - (एण्टिक्विटी ब्लू लावणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आम्ही अर्काचार्य सोकांजी

यकु
Mon, 03/26/2012 - 22:40 नवीन
आम्ही अर्काचार्य सोकाजींमार्फत संपादकाचार्य गणाधिप यांना एण्टिक्विटी ब्लू चा नवस बोलू इच्छितो. :p तीर्थप्रसाद प्रसाद अर्थातच भक्तमंडळात वाटला जाईल. ;-) गणपतीला दारुचा नैवैद्य दाखवला, पाप वाढले, कलियुग आले, भूकंप होणार म्हणणार्‍यांकडे दुर्लक्ष केले जाईल. :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

बूच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/26/2012 - 22:43 नवीन
बूच मारतो आहे. दोनदा पाहावा लागला विनाकारण प्रतिसाद मला. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

निशासाहेब बेसीकमध्ये राडा

मितभाषी
Mon, 03/26/2012 - 19:44 नवीन
निशासाहेब बेसीकमध्ये राडा आहे. तेवढा क्लिअर करुन या. तद्नंतर आपण काथ्या कुटूयात. बाकी गणपा (शकुणी)साहेबांनी टाकलेल्या कुटील फास्यांचा तीव्र णिषेढ हे जाताजाता नमूद करतो. ;)
  • Log in or register to post comments

त्यांचे नाव निशा नाही निश

भिकापाटील
Mon, 03/26/2012 - 19:57 नवीन
त्यांचे नाव निशा नाही निश आहे. शनि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

नवस..

प्रभाकर पेठकर
Mon, 03/26/2012 - 20:55 नवीन
नवस हा मानसोपचार आहे. नवस बोलणारा, समस्येचे निराकरण करण्याचे , सर्व प्रयत्न करून हरलेला, हतबल झालेला असतो. नव्याने काही प्रयत्न करण्याचे, त्या समस्येशी लढण्याचे बळ हरवून बसलेला असतो. विश्वास (किंवा अंधविश्वास म्हणा हवं तर) असल्याने देवाला नवस बोलल्यावर ती सर्वसमर्थ शक्ती आपल्या मदतीसाठी उभी आहे ह्या विचारातून त्याला समस्येशी लढण्याचे नव्याने बळ मिळते तो लढत राहतो आणि त्याच्या स्वतःच्या प्रयत्नांनी किंवा कर्मधर्मसंयोगाने जेंव्हा समस्येचे निराकरण होते तेंव्हा तो जास्त देवभक्त होतो पण समस्येचे निराकरण नाही झाले तर तो पुन्हा देवालाच शरण जाऊन तिथेच उपाय शोधत राहतो. त्यामुळेच 'देव नवसाला पावतो' आणि 'नवस वगैरे थोतांड आहे' अशी दोन्ही टोकाची मते असलेली माणसे भेटतात.
  • Log in or register to post comments

पूर्वी पावायचा हो पण........

सर्वसाक्षी
Mon, 03/26/2012 - 21:29 नवीन
एका बाईने देवाला नवस केला. देवा मुलगा दे, दिलास तर तुला सोन्याची कुंची वाहीन. तिला मुलगा झाला ( ). तिने मुलाचे नाव सोन्या ठेवले आणि एके दिवशी पोरांच्या अंगावरची कुंची घेऊन देवळात गेली. देवाला म्हणाली, ही घे सोन्याची कुंची. बोलल्याप्रमाणे नवस फेडला आहे. तेव्हा पासून देव नवसाला पावत नसावा असा अंदाज आहे. ( ) : भलत्या शंका मनात येऊ देऊ नयेत यासाठी रिकामा कंस दिला आहे.
  • Log in or register to post comments

>>>>> देव खरच नवसाला पावतो का

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/26/2012 - 21:55 नवीन
>>>>> देव खरच नवसाला पावतो का ? हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. आम्ही कोणाच्याही श्रद्धेत लुडबूड करत नाही. बाय द वे, सच्या (सचिन तेंडुलकर) काल सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गेल्यापासून साली आपली दोलायमान अवस्था झाली आहे. विश्वचषक क्रिकेटच्या अंतिम सामन्याच्या दरम्यान मिपावरील रनींग प्रतिसादादरम्यान मिपाकरांच्या नादी लागून भारताला विश्वचषक जिंकू दे.......मी सिद्धीविनायकाला दर्शनाला येईन असं बोलून गेलो. . आणि कर्मधर्म संयोगाने भारताने क्रिकेटचा विश्वचषक जिंकला. आता नवस पूर्ण करायची जवाबदारी माझी आहे. आणि ती मी पूर्ण करीन. कोणाला काय म्हणायचे असेल ते म्हणू दे..........! -दिलीप बिरुटे (श्रद्धाळू )
  • Log in or register to post comments

प्रा. डॉ.

इरसाल
Tue, 03/27/2012 - 12:35 नवीन
अजुन गेले नाय काय तुम्ही नवस फेडायला.......... तेव्हाच सच्याचे १०० चे १०० इतके दिवस लटकले होते. रनिंग कोमेंत्री मधे सामील असलेला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नवस म्हणजे काय

नेत्रेश
Mon, 03/26/2012 - 23:48 नवीन
नवस म्हणजे 'मी हे काम करत आहे, त्याचे फळ मला माझ्या मनासारखे मिळु दे' अशी प्रार्थना. म्हणजे नवस बोलणारा शक्यतो 'दे रे हरी खाटल्यावरी' म्हणणारा नसतो. तर 'मी परीक्षेसाठी अभ्यास केला आहे, पेपर, सोपा येउदे, फर्स्टक्लास मीळुदे', 'मी लॉटरीचे तीकीट काढत आहे, लाखाचे बक्षीस लागले तर ५ हजार पेटीत टाकेन', किवा 'आम्ही प्रयत्न करत आहोत, मुलगा/मुलगी होउ दे' अशा प्रार्थना. प्रयत्न न करता काहीच फ़ळ मिळणार नाही हे नवस करणाराही जाणतो. लोक प्रयत्न करत असतातच, पण जे आपल्या प्रयत्नांच्या पलीकडले आहे, त्यासाठी देवाची प्रार्थना केली तर काय चुकले?
  • Log in or register to post comments

देऊळ म्हण्जे काय इच्छापुरतीच दुकान वाटल कि काय तुम्हाला?

किचेन
Tue, 03/27/2012 - 00:43 नवीन
टाका देवापुढे चारणे आठने,आणि मग तुम्हाला काय मागायचं ते.मिळाल तर समजा देव नवसाला पावतो,नाही मिळाल तर समजा आपली इच्छा एवढी स्वस्त नव्हती थोडी महाग होती.पुढच्या वेळेस चारण आठन्या ऐवजी रुपया टाका बघा काय होतंय ते, अन सांगा आम्हाला.आम्ही पण ठरवू नवस करायचा कि न्हायी.
  • Log in or register to post comments

देऊळ म्हण्जे इच्छापुरतीच दुकानच आहे

नेत्रेश
Tue, 03/27/2012 - 01:19 नवीन
देऊळ म्हण्जे इच्छापुरतीच दुकानच आहे. अन्यथा लोक देवळात कशासाठी जातात. देवाची उपासना करण्यामागेसुद्धा प्रत्येकाचा काही ना काही हेतु असतोच. अगदी ग्यान प्राप्ती, स्व्-उद्धार, लोक्-उद्धार, मोक्ष या सुद्धा ईच्छाच आहेत. कुणी नामस्मरन, पुजन करुन देवाला प्रसन्न करायचा प्रयत्न करतो, तर कुणी आपल्या मतीनुसात सरळ पैसे देउन. कुणाचा मार्ग चुकीचा व कुणाचा बरोबर हे ठरवणार फक्त तो देवच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

सहज आठवलं म्हणून

चौकटराजा
Tue, 03/27/2012 - 10:35 नवीन
१९७४ च्या दरम्यान माझा भाउ व त्यांचा फर्गसन चा कंपू बी एस सी पास झाले . नंतर सगळे गप्पा मारताना आता काय करायचे याबद्द्द्ल बोलत होते. मिळेल ती नोकरी ते एम एस्सी ते डोक्टरेट इथवर प्रत्येकाने आपले बेत सांगितले. एक म्हणाला " आमची थोडी मोकळी जागा आहे मी एक झकास देऊळ टाकणार आहे ! म्हन्जे भक्तीचे दुकान ? यस यारो यू सेड ईट ! लेकाच्यानो, हा सनातन धंदा आहे. जागतिक मंदीतही मस्त चालणारा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

चौकटराजा साहेब, हो देऊळ हा सनातन धंदा आहे.

निश
Tue, 03/27/2012 - 16:42 नवीन
चौकटराजा साहेब, हो देऊळ हा सनातन धंदा आहे. खरच घरात पैसे नसणारी मंडळी हि मग हा धंदा करतात अगदी जोमाने व काही दिवसात धनदांडगे होऊन राजकारण राजकारण करत अजुन लुटालुट करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

नवस

रणजित चितळे
Tue, 03/27/2012 - 09:25 नवीन
एखादा नवस (येथे चांगला व सात्विक नवस अभिप्रेत आहे) केला की तो करे पर्यन्त आपला अॅटीट्यूड तेवढ्या पुरता पोझीटिव्ह आपोआप होतो. नवस पुरे करण्यात आपल्याला काहीतरी चांगली सवय सुद्धा चुकून लागू शकते - लवकर उठणे .... आपले मानसिक बळ वाढते. ही सगळी आपले जिवन मॅनेज करायची आपआपली सॉफ्टस्किल्स आहेत.
  • Log in or register to post comments

सहमत

आनन्दा
Tue, 03/27/2012 - 17:59 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

तुम्ही नवस बोला आणि काय घडते

मनीषा
Tue, 03/27/2012 - 12:54 नवीन
तुम्ही नवस बोला/करा आणि काय घडते ते आम्हाला सांगा .
  • Log in or register to post comments

विश्वास महत्वाचा...

स्वछन्दि
Tue, 03/27/2012 - 19:51 नवीन
विश्वास महत्वाचा आहे. पावेल कि नाहि ते महत्वाचे नाहि. देवाचे अस्तित्व नाकारु शकत नाहि कोनि.... आपन तर ब्वा मान्तो देवाला.
  • Log in or register to post comments

देवळाचा धंदा म्हटल्यावर आठवण

मराठे
Tue, 03/27/2012 - 20:15 नवीन
देवळाचा धंदा म्हटल्यावर आठवण झाली... ठाण्यात इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर शरणम हॉटेलच्या समोर असलेलं देऊळ बर्‍याच जणांना ठाऊक असेल. काही वर्षापर्यंत (म्हणजे तरी १० - १२ वर्षं झाली असतील) तिथला देव कुठल्याही दुर्लक्षीत गटासारखा आपल्या छोट्या देवळात एकटा आरामात राहात होता. तिथे कोणी कचरा टाकू नये म्हणून त्याची तिथे नेमणूक झाली असावी (कारण फार पूर्वी सर्विस रोड व्हायच्या आधी तिथे गटाराचं आणि घाणीचं साम्राज्य होतं). पण आता पहा ! तिथे सगळ्या देवांचं गेट-टुगेदर असल्यासारखं वाटतं. कोणता देव पाहिजे तो बोला. त्यातून हायवेने जाणारा प्रत्येक ट्रकवाले आणि गाडीवाले तिथे थांबून देवांना दर्शन देऊन जातात. त्यामुळे सध्या एखादा जुना वाडा पाडून बिल्डिंग बांधणार्‍या जुन्या घरमालकांसारखा त्या देवळाचा भाव वधारलाय! मागच्या वर्षी तिथून जाताना हीss भली मोठी रांग बघून आधी तर मला तिथे बस स्टॉप आहे की काय अशीच शंका आली. (पण लोकं नीट पद्धतशीरपणे लायनीत उभी होती म्हणजे बसस्टॉप नसावा हे लगेच लक्षात आलं.) नंतर तिथल्याच एका जुन्या रहिवाशाने त्या देवळचा इतिहास भूगोल सांगितला. अर्थात देवळाच्या परिसरातले बॅनर बघितले तर त्या देवाचा गॉडफादर कोण हे लगेच समजून येईलच. असो, पूर्वी एकेकाळी संध्याकाळच्या निरांजनाला महाग असणार्‍या त्या देवळाचं अस्तित्व सद्ध्या दर सणावारी तर येथेच्छ जाणवतं. त्या देवाने कोणाला नवस बोलला होता कोणास ठाऊक!
  • Log in or register to post comments

मराठे साहेब, हो आता त्या देवळात रांग असते लांबच लांब

निश
Wed, 03/28/2012 - 11:54 नवीन
मराठे साहेब, हो आता त्या देवळात रांग असते लांबच लांब. मी बघतो रोज येता जाता त्या रोडवरुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

लागच्या राजाला एकदा गेलो

मदनबाण
Wed, 03/28/2012 - 20:46 नवीन
मागच्या वेळी लाल बागच्या राजाला एकदा गेलो होतो,तिथे भली मोठी रांग होती,कोण कुठुन येतो हे सांगणे देखील महाकठीण. मी जेव्हा बाप्पाच्या समोर आलो तेव्हा मला तिथे एक भला मोठा हार दिसला...सोन्याचा होता.तैवान बेस्ड स्वीस कंपनी अशी नावे त्याच्या लेबलावर दिसत होती. मला जितके माहित आहे त्यानुसार लालबागचा गणपती नवसाला पावणारा म्हणुन प्रसिद्ध आहे. असो... बाकी नेहमी प्रमाणेच म्हटतो... चालुद्या ! ;)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा