✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

देव खरच नवसाला पावतो का?

न
निश यांनी
Mon, 03/26/2012 - 15:28  ·  लेख
लेख
देव खरच नवसाला पावतो का? ह्या शंकेच उत्तर मला अजुन मिळाल नाही आहे. ह्याला कारणही तसच घडल. काल रवीवारी , मी व माझे दोन मित्र एका प्रसिध्द देवळात देवाच्या पाया पडायला गेलो होतो. बाहेर बरीच लांब रांग लागली होती. त्या रांगेत उभे रहीलो असतो तर सहजच आम्हाला दोन ते तीन तास लागले असते देवाच्या पाया पडायला. माझ्या मित्राने तिथे असलेल्या स्वयंसेवकाला विचारले आज ही रांग एव्हढी लांब का आहे? तर तो म्हणाला नवसाचि आहे. ती रांग एव्हढी लांब होती की मला खरच नवल वाटल की जर देवाला नवस करुन जर ते नवस खरे होत असतील तर मग हे जग मग फक्त नवसांवर चालायला हवे. कर नवस घे नवसाच फळ. काहीही काम न करता नवस करुन ते काम व्हायला पाहीजे.पण तसे होत नाही. मग हे देव नवसाला पावतात अस का म्हटल जात? म्हणुन खरच देव नवसाला पावतो काय ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20464 वाचन

💬 प्रतिसाद (77)

प्रतिक्रिया

नवसे कन्या पुत्र होती । मग का

प्रचेतस
Mon, 03/26/2012 - 15:33 नवीन
नवसे कन्या पुत्र होती । मग का करणे लागे पती । -- संत तुकाराम
  • Log in or register to post comments

छान !

परिकथेतील राजकुमार
Mon, 03/26/2012 - 15:39 नवीन
एकदम नवा कोरा आणि युनिक प्रश्न. ह्या विषयावरती चर्चा व्हावी अशी आमची गेली अनेक वर्षाची मागणी होती. स्वेटरमधल्या गोग्गोड गणपती बाप्पाचा फ्यान परा
  • Log in or register to post comments

:)

आबा
Mon, 03/26/2012 - 15:42 नवीन
sarcastic स्मायली तयार करायला हवी राव ! :)
  • Log in or register to post comments

मनात नाही भाव, अन देवा मला

मोहनराव
Mon, 03/26/2012 - 15:56 नवीन
मनात नाही भाव, अन देवा मला पाव!! ;)
  • Log in or register to post comments

अजुन एक मिपाची ब्यांड विड्थ आणि लोकांचा वेळ खाणारा धागा.

गणपा
Mon, 03/26/2012 - 16:01 नवीन
तुमच्या विश्वास नाही ना? (एकंदर जो सुर आहे धाग्याचा त्यावरुन काढलेल अनुमान) तर मग नका हो बोलू नवस. ज्यांच्या विश्वास आहे ते बोलतील. मुळात तुमचा प्रॉब्लेम काय तोच कळला नाही? देवार विश्वास नाही ना मग देवळात गेलातच का? सच्याने महाशतक काय मारल... साला हल्ली शतकांची हाव वाढत चालली आहे लोकांची. (नवसाचा) गणा ;)
  • Log in or register to post comments

गणपा साहेब, देवावर विश्वास नाही तर हा धागा नवसावर आहे

निश
Mon, 03/26/2012 - 16:17 नवीन
गणपा साहेब, देवावर विश्वास नाही ह्यावर हा धागा नसुन तर हा धागा नवसावर आहे.तो तुम्ही नीट वाचलेला दिसत नाही आहे. दुसर जर हे सदर तुम्ही सभासदानी शंका विचाराव्यात म्हणुन जर चालवत असाल तर मग मला शंका विचारायचा हक्क नाही आहे का? मुळात शंका काय आहे ते आधि नीट समजावुन घ्या. घाईगडबडित प्रतिसाद देउ नका. माझ्या शंकेच उत्तर तुमच्या कडे नसेल तर मग ते शोधा किंवा इतर लोक जे उत्तर देतील ते वाचा. शिकलेल्या माणसाचे हे लक्षण म्हणजे विचार करुन बोलण किंवा लिहीण. वरचा तुमचा प्रतिसाद बघता तुम्हाला उत्तर देता येत नाही. मग जरुर इथे प्रतिसाद येतिल ते वाचा. नवस न करणारा निश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

सॉरी शक्तिमान, धागा पुर्ण

गणपा
Mon, 03/26/2012 - 16:35 नवीन
सॉरी शक्तिमान, धागा पुर्ण वाचला (होत्याच कितिशा ओळी म्हणे?) आणि पुर्ण विचार करुनच तो प्रतिसाद दिला आहे. फक्त एक सांगा.. जर उद्या तुमच्या या कुटलेल्ल्या काथ्याचा कौल "हो देव नवसाला पावतो" असा लागला तर तुम्ही पण त्या रांगेत उभे रहाणार का? बाकी चालुद्या तुमचं गुर्‍हाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

गणपा (शकुनि) साहेब, तुम्हि धागा वाचलात पण नीट वाचलात का?

निश
Mon, 03/26/2012 - 16:54 नवीन
गणपा (शकुनि) साहेब, तुम्हि धागा वाचलात पण नीट वाचलात का? पुर्ण नाही म्हटल मी. नीट वाचलात का अस म्हटल. असो . नवस जर खरे होत असतिल (?) हे खर मानल तर मग काम करायलाच नको ना. मग गणपा साहेब, कर नवस होईल काम पटकन असच ना. मस्त मग आपण संत गाडगे बाबांची शिकवण चुकीची आहे अस मानायच का? कि नवसाच्या नावाखाली वेगवेगळ्या देवळात होणारी गरीब प्राणी व पक्षांचि हत्या ग्राह्य मानायची. तुम्हिच ठरवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

आता बोला गणपा साहेब, बोला

बिपिन कार्यकर्ते
Mon, 03/26/2012 - 16:59 नवीन
आता बोला गणपा साहेब, बोला आता! टेल टेल गणपा सर, टेल नाउ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

=)) हात मेल्या अच्त्रत.

गणपा
Mon, 03/26/2012 - 17:03 नवीन
=)) हात मेल्या अच्त्रत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

विषय बदलू नको!

पिवळा डांबिस
Tue, 03/27/2012 - 01:13 नवीन
बिकाचा मुद्दा बरोबर आहे... टेल हिम नाऊ ऑर नील बिफोर अ काऊ!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

गणपा (शकुनि) साहेब, तुम्हि

गणपा
Mon, 03/26/2012 - 17:16 नवीन
गणपा (शकुनि) साहेब, तुम्हि धागा वाचलात पण नीट वाचलात का?
बाळा निश धागा संपुर्ण मन लावून वाचला. (तुझ्या सारख्या बालकांसाठी या पुढे योग्य ते शब्द वापरुन वाक्य रचना केल्या जाईल. ;) )
असो . नवस जर खरे होत असतिल (?) हे खर मानल तर मग काम करायलाच नको नामग. गणपा साहेब, कर नवस होईल काम पटकन असच ना.
ते तुमचं तुम्ही काय ते पहा. (माताय ते कंसातल शकुनी राहिल की जी या वेळी. अस नाय कराच हा. एकद उपाधी दिलीत ना मोठ्या मनाने मग अशी कंजुशी नाय कराची. ) तुम्ही नवस करा वा नका करु आमाला काय बी देनं घेनं न्हाई.
मस्त मग आपण संत गाडगे बाबांची शिकवण चुकीची आहे अस मानायच का?
नाही ना? मग असला वांझोटा धागा काढायच प्रयोजन काय ते कळलं नाही.
कि नवसाच्या नावाखाली वेगवेगळ्या देवळात होणारी गरीब प्राणी व पक्षांचि हत्या ग्राह्य मानायची.
'प्रसाद' म्हणुन नळ्या फोडायला मिळणार असेल तर आपली ना न्हाई. बाकी तुम्ही माझ्या वरच्या प्रतिसादातल्या प्रश्नाला सोईस्कर बगल दिली का आहे कळुन चुकले. हॅ हॅ हॅ. (साधुवाणी) गणा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

गणपा (शकुनि) साहेब, प्रसाद म्हणुन...

निश
Mon, 03/26/2012 - 17:27 नवीन
'प्रसाद' म्हणुन नळ्या फोडायला मिळणार असेल तर आपली ना न्हाई. वा गणपा साहेब, मानल तुम्हाला, देवाच्या नावाखाली नवसाच्या माध्यमातुन मुक्या बिचार्‍या प्राण्यांचे बळि गेलेले चालणार वाटत तुम्हाला. लय भारी , मस्त. माणस शिकुन शहाणी होतात म्हणतात मग ते 'प्रसाद' म्हणुन नळ्या फोडायला मिळणार असेल तर आपली ना न्हाई अस ही म्हणतात. मस्त मग तर आम्ही अडाणीच कि (किंवा बाळ तुमच्या प्रतिसादाप्रमाणे).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

तुम्ही अभक्ष भक्षणारे दिसत

गणपा
Mon, 03/26/2012 - 17:34 नवीन
तुम्ही अभक्ष भक्षणारे दिसत नाही. जौदे तो वाद ईथे उकरुन काढला तर त्रिशतक झळकलच म्हणुन समजा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

अभक्ष भक्षणारे असु किंवा नसु पण..

निश
Mon, 03/26/2012 - 17:43 नवीन
अभक्ष भक्षणारे असु किंवा नसु पण नवसाच्या व देवाच्या नावावर नक्किच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

प्रसादाचा शिरा चालत असेल तर

शिल्पा ब
Tue, 03/27/2012 - 00:09 नवीन
प्रसादाचा शिरा चालत असेल तर नळ्या का नकोत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

अरे रे !

परिकथेतील राजकुमार
Mon, 03/26/2012 - 17:03 नवीन
बाकी चालुद्या तुमचं गुर्‍हाळ.
ज्या संस्थळावरती नवलेखखकांना प्रोत्साहन दिले जावे असा आग्रह आहे, त्याच संस्थळाचे संपादक नवलेखकांना असे हताश करताना पाहून एक मिपाकर म्हणून शरम वाटली. (मिक्सर मध्ये वाटली का खलबत्त्यात ते विचारु नये. वेगळ्या मार्गाने अपमान केल्या जाईल.) श्री. गणपा ह्यांच्यावरती काही कायदेशीर कारवाई करता येईल काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

हॅ हॅ हॅ

गणपा
Mon, 03/26/2012 - 17:19 नवीन
हे आले लगेच हवनात (तुपाची) धार सोडायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

@हे आले लगेच हवनात (

अत्रुप्त आत्मा
Mon, 03/26/2012 - 18:51 नवीन
@हे आले लगेच हवनात ( ) धार सोडायला.>>> Image removed. काय चित्र आलय डोळ्यांसमोर म्हणुन सांगू.... !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

वाइट्ट फुटलो.. )))))

शैलेन्द्र
Mon, 03/26/2012 - 22:46 नवीन
वाइट्ट फुटलो.. :))))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

...

परिकथेतील राजकुमार
Tue, 03/27/2012 - 11:18 नवीन
हे आले लगेच हवनात (तुपाची) धार सोडायला.
हवनाच्या दर्शनाला येता येता मध्येच समुद्र लागला, त्याला मी तरी काय करणार ? अगस्ती परा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

मेलो...

चिगो
Tue, 03/27/2012 - 10:56 नवीन
>>(मिक्सर मध्ये वाटली का खलबत्त्यात ते विचारु नये. वेगळ्या मार्गाने अपमान केल्या जाईल.) >>हे आले लगेच हवनात () धार सोडायला. मेलो... :) :) :D खतरा पराशेठ आणि गणपाशेठ.. बास राव, अश्या खंग्री प्रतिसादांसाठी तरी मिपावर असे फुटकळ धागे येत राहोत, हिच प्रार्थना.. (नवस नको.. फेडायचे वांधे. ;-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

देव जर नवसाला पावत असता, तर

पिंगू
Mon, 03/26/2012 - 16:31 नवीन
देव जर नवसाला पावत असता, तर मी रोज सकाळसंध्याकाळ दगडूशेठ गणपतीसमोर डोके टेकायला गेलो असतो. हाकेच्या अंतरावर असूनसुद्धा कधी तिथे जायची माझी इच्छा होत नाही. - पिंगू
  • Log in or register to post comments

अरे ?

परिकथेतील राजकुमार
Mon, 03/26/2012 - 17:30 नवीन
हाकेच्या अंतरावर असूनसुद्धा कधी तिथे जायची माझी इच्छा होत नाही.
तिथूनच हाकेच्या अंतरावरती अजूनही बरेच काही आहे. तिकडे चक्कर मारत जा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू

अरेरे??

मी-सौरभ
Tue, 03/27/2012 - 14:02 नवीन
ते तिकडे चक्कर मारत असताना बाप्पाचं देऊळ हाकेच्या अंतरावर असू शकते ही शक्यता पण विचारात घ्या. ;) (शंकेखोर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

शक्य आहे, पण..

परिकथेतील राजकुमार
Tue, 03/27/2012 - 14:06 नवीन
हाकेच्या अंतरावर असूनसुद्धा कधी तिथे जायची त्यांची इच्छा होत नाही असे त्यांनीच कबूल केले आहे. मग 'देवळात नको, तर गोकुळात जा' असा सल्ला आम्ही त्यांना दिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

जरी गेला असता तरी डोक टेकायला

किचेन
Mon, 03/26/2012 - 17:52 नवीन
जरी गेला असता तरी डोक टेकायला मिळाल नसत.गर्दीच किती असते त्या श्रीमंत गणपती समोर! जर दगडूसेथ गणपती हाकेच्या अंतरावर तर कसबा गणपतीही हि हाकेच्या अंतरावरच असणार...येत जा कधी मधी गरीबाकड...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू

सांभाळून जा रे. आणि हेल्मेट

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 03/26/2012 - 20:45 नवीन
सांभाळून जा रे. आणि हेल्मेट घालून जा. त्यांना एखादे विधान आवडले नाही तर नाकाड फोडतात म्हणे त्या ;-) त्यातून त्या कराटे वाल्या असल्याने त्यांचा नाकावर बरोब्बर नेम पण लागत असणार. नाक मुठीत धरून शरण येशील मग. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

ह्म्म्म्म

स्पा
Mon, 03/26/2012 - 16:33 नवीन
म्हणुन खरच देव नवसाला पावतो काय ? आमच्या हो किंवा नाही म्हणण्याने काय फरक पडणारे का निश साहेब..? कशाला उगाच वांझोटे धागे काढता.. वेळ जात नाहीये का?
  • Log in or register to post comments

पावतो हो पावतो! देव नवसाला

अन्या दातार
Mon, 03/26/2012 - 16:38 नवीन
पावतो हो पावतो! देव नवसाला पावतो. काम तडीस नेण्याचा शेवटचा उपाय म्हणून लोक नवस बोलतात अन कामाला लागतात. कुणीही या भ्रमात राहू नये की नवस बोललो की आपण काहीही न करता काम होईल. (श्रीगुरुकृपा पॉपकॉर्न सेंटरचालक) अन्या ;)
  • Log in or register to post comments

बायकोसाठी नवस बोला..

योगप्रभू
Mon, 03/26/2012 - 16:42 नवीन
विवाहेच्छुकांनी बायको शांत-समजूतदार मिळावी म्हणून अवश्य नवस बोलावा. नंतरही बायकोचे डोके ताळ्यावर राहावे म्हणून नियमित प्रार्थना करत राहावी. स्त्रीमुक्तीवाल्या दुष्ट शक्तींपासून लांब राहाण्यासाठी गृह (स्वामिनी)शांती करावी.
  • Log in or register to post comments

@स्त्रीमुक्तीवाल्या दुष्ट

अत्रुप्त आत्मा
Mon, 03/26/2012 - 18:10 नवीन
@स्त्रीमुक्तीवाल्या दुष्ट शक्तींपासून लांब राहाण्यासाठी गृह (स्वामिनी)शांती करावी. >>> Image removed. हे प्रभू वाचिव आंम्हाला वाचिव या हसवुन हसवुन मारणार्‍या योगप्रभू पासुन... ब्बास आता लिहिवत नाही... आम्चा शि.सा.न. स्विकारा हो प्रभू ;-) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

फोटू बदला की हो आता.

प्रचेतस
Mon, 03/26/2012 - 18:50 नवीन
फोटू बदला की हो आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

व्हय जी...द्या ना दुसरा

अत्रुप्त आत्मा
Mon, 03/26/2012 - 18:53 नवीन
व्हय जी...द्या ना दुसरा येखादा धुंडाळुन ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तुम्हीच धुंडाळा. आत्मा ना

प्रचेतस
Mon, 03/26/2012 - 18:56 नवीन
तुम्हीच धुंडाळा. आत्मा ना तुम्ही? ते ही अत्रुप्त. सर्वसंचारी असून एक साधा फोटू तुम्हाला धुंडाळता येऊ नये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हे घ्या!!

मोहनराव
Mon, 03/26/2012 - 19:34 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

@सर्वसंचारी असून एक साधा फोटू

अत्रुप्त आत्मा
Mon, 03/26/2012 - 21:38 नवीन
@सर्वसंचारी असून एक साधा फोटू तुम्हाला धुंडाळता येऊ नये? >>> मित्र असून अडचणीच्या वेळी हूर्रर्र करुन दूर लोटल्याबद्दल णिषेध...!णिषेध...!णिषेध...! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मित्र असून अडचणीच्या वेळी

प्रचेतस
Mon, 03/26/2012 - 21:48 नवीन
मित्र असून अडचणीच्या वेळी हूर्रर्र करुन दूर लोटल्याबद्दल णिषेध...!णिषेध...!णिषेध...! Wink
Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

असला तर पावतो नसला तर नाही !

चौकटराजा
Mon, 03/26/2012 - 16:50 नवीन
निशा , झिलग्या तू रवळनाथाच्या दरर्शनाला गेला काय ? ( हे मस्त मालवणीत कसं लिहायच.मला सांग ना . तू तरी माझ्या नवसाला पाव रे निशूनाथा ! ) हाडाचा देवभक्त तोच "करविता "आहे असे म्ह्णणतो आणि आक्रित झालं तरी आम्ही नास्तिक म्हणतो " योगायोग ! "
  • Log in or register to post comments

रवळनाथाच्या दरर्शनाक जाउन ईलस काय ?

निश
Mon, 03/26/2012 - 17:01 नवीन
रवळनाथाच्या दरर्शनाक जाउन ईलस काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

आरतिच्यामारी

चौकटराजा
Mon, 03/26/2012 - 17:23 नवीन
आरतिच्यामारी, म्हण्जे क म्हन्जे स ते , स ला ना ते बरोबर ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

ब्याण्डविडथ खातर

चौकटराजा
Mon, 03/26/2012 - 16:54 नवीन
निश च्या धाग्याला प्रतिसाद दिल्याबद्द्ल धन्यवाद ! निश च्या धाग्याला प्रतिसाद दिल्याबद्द्ल धन्यवाद !निश च्या धाग्याला प्रतिसाद दिल्याबद्द्ल धन्यवाद !निश च्या धाग्याला प्रतिसाद दिल्याबद्द्ल धन्यवाद !
  • Log in or register to post comments

हात च्या काकणाला आरसा कशाला

जगदिश देशमुख
Mon, 03/26/2012 - 17:14 नवीन
"बाहेर बरीच लांब रांग लागली होती. त्या रांगेत उभे रहीलो असतो तर सहजच आम्हाला दोन ते तीन तास लागले असते देवाच्या पाया पडायला." आत्ता एव्हडी रांग लागली मंजे देव पावत असणार की .... "हात च्या काकणाला आरसा कशाला"
  • Log in or register to post comments

मी नवस-सायास वगैरे काही मानत

यकु
Mon, 03/26/2012 - 17:35 नवीन
मी नवस-सायास वगैरे काही मानत नाही, करीतही नाही.. कारण या शब्दांना विचित्र पार्श्वभूमी आहे.. त्याऐवजी मी माणसाला नेहमीच अज्ञात असणार्‍या, पण कधीही साद घालता येऊ शकणार्‍या अज्ञात प्रकाराला शरण जाणे असे म्हणायला मला आवडेल. असली शक्ती प्रतिसाद देते काय त्याची सत्यता पडताळून पाहणे म्हणा किंवा त्या प्रतिसादातून स्वत:ची अडचण सोडविण्‍याची संधी नुकतीच ओघाने आली.. मी आत्मशून्यसोबत बारा कि.मी.च्या परिक्रमेला वगैरे गेलो होतो.. मला नेहमी चार वर्षांपासून टकूरं आऊट होण्‍याचा त्रास होता.. डोकं जड पडण्‍याचा त्रास होता. हा त्रास ध्‍यान, कुंडलीनी जागृतीमुळे सुरु झाला होता.. डॉक्टर, गोळ्या, स्कॅन सगळं करुन पाहिलं होतं. ते नर्मदामाई, नर्मदामाई, ती इच्छा पूर्ण करते वगैरे हॅमरींगमुळे मी एकदा त्रास होत असताना चिडून म्हणालो की माझा हा त्रास बंद होऊ दे, मी पण नर्मदा परिक्रमेला जाईन! पुढच्याच काही दिवसांत तो त्रास दूर करणारी कृपावंत माता मला इथेच मिसळपाववर मिळून गेली.. आणि तो त्रासही कमी कमी होत जातो आहे.. मला परिक्रमेला जावं लागणार आहे, किंवा नेहमीच्या भाषेत नवस फेडायला जावं लागणार आहे..
  • Log in or register to post comments

कुंडलिनी (म्हणजे नक्की काय ते

शिल्पा ब
Tue, 03/27/2012 - 00:20 नवीन
कुंडलिनी (म्हणजे नक्की काय ते देव जाणे) जागृत झालेली चांगलं असतं ना? का नै? अन उगाच आपली चुकुन जागी झाली असेल तर कसं झोपवायचं? आमच्या आपल्या अडाणी शंका!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

कुंडलिनी (म्हणजे नक्की काय ते

यकु
Tue, 03/27/2012 - 00:27 नवीन
कुंडलिनी (म्हणजे नक्की काय ते देव जाणे) जागृत झालेली चांगलं असतं ना? का नै? अन उगाच आपली चुकुन जागी झाली असेल तर कसं झोपवायचं? आमच्या आपल्या अडाणी शंका!!
हो चांगलं असतं की.. पण ती हौस म्हणून, चुकून जागी करता येत नाही आणि झोपवताही येत नाही..:p याला शंका नै कै, नसत्या चौकशा म्हणतात :p बाकी ती जागृत झाल्याची खूण म्हणजे जे जे काही जागृत झालेल्या कुंडलिनीभोवती घडतं, ते सगळ्या जगाला अफेक्ट करतं.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

त्रास

पिवळा डांबिस
Tue, 03/27/2012 - 01:22 नवीन
>>हा त्रास ध्‍यान, कुंडलीनी जागृतीमुळे सुरु झाला होता.. क्यों की आपको ठीकसे ढक्कन खोलना आता नही है ना, इसके वास्ते!!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

हौ ना पिडांकाका.. लैच अवघड

यकु
Tue, 03/27/2012 - 01:32 नवीन
हौ ना पिडांकाका.. :( लैच अवघड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

हाहा +१

Nile
Tue, 03/27/2012 - 02:43 नवीन
योग्य वयात योग्य ढक्कन उघडून योग्य ती क्रिया केली असती तर असी अयोग्य वेळ आली नसती.... असंच म्हणायचं आहे ना हो तुम्हाला पिडांकाका? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

कोण?

श्रावण मोडक
Wed, 03/28/2012 - 16:36 नवीन
पुढच्याच काही दिवसांत तो त्रास दूर करणारी कृपावंत माता मला इथेच मिसळपाववर मिळून गेली.. आणि तो त्रासही कमी कमी होत जातो आहे..
कोण? जाहीर नको. व्यनि कर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा