मी वळूनी हासले - चुकले जरासे
प्रश्न त्याचे टाळले, चुकले जरासे
उत्तराशी थांबले, चुकले जरासे
शीळ त्याची ओळखीची रानभूली
मी वळूनी हासले - चुकले जरासे
पाळले ना भान तू मज छेडतांना
लाजले मी लाजले, चुकले जरासे
भावनांना बांधले त्या, धुंद राती
आज का सैलावले चुकले जरासे
बंद होते द्वार माझे तव सुरांना
का कशी नादावले - चुकले जरासे
रोखले मी आसवांच्या आठवांना
शेवटी रागावले - चुकले जरासे
सोडतांना गांव जे मन घट्ट केले
त्या तिथे रेंगाळले चुकले जरासे
सांजछाया दाटल्या या अंगणाशी
मी पुन्हा भांबावले, चुकले जरासे
संध्या
२६.११.२०१०
रद्दीफ : एक शेर कुणीतरी एसेमेस केला होता. त्यातला चुकलो का ... असा काहीसा रद्दीफ थोडा बदलून घेतलाय.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5091
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह !
फक्त इतकंच??? रसग्रहण नाही का
In reply to वाह ! by चौकटराजा
वल्ली हा आय डी
In reply to फक्त इतकंच??? रसग्रहण नाही का by प्रचेतस
आपलं गाव एकच आहे हो. तसाही
In reply to वल्ली हा आय डी by चौकटराजा
चुकले जरासे
In reply to वाह ! by चौकटराजा
चुकले जरासे
In reply to वाह ! by चौकटराजा
वल्ली पर्या?
In reply to चुकले जरासे by चौकटराजा
कवि हाजिर है
In reply to वल्ली पर्या? by पैसा
कवि हाजिर है
In reply to वल्ली पर्या? by पैसा
गझल मस्तच. पण ही जरा गाऊन
स्पावडा? ते बेनं गात का? बोलल
In reply to गझल मस्तच. पण ही जरा गाऊन by यकु
गातो म्हणजे काय.. चांगला
In reply to स्पावडा? ते बेनं गात का? बोलल by शैलेन्द्र
गातो म्हणजे काय.. चांगला
In reply to गातो म्हणजे काय.. चांगला by यकु
_/\_
In reply to गातो म्हणजे काय.. चांगला by यकु
बापरे.. गाणं
In reply to गझल मस्तच. पण ही जरा गाऊन by यकु
द्विरुक्ती
सुंदर कविता.
मस्तच !
रचना झ्याक जमली आहे...
तुम्हाला विडम्बनाला पण झ्याक
In reply to रचना झ्याक जमली आहे... by अत्रुप्त आत्मा
@तुम्हाला विडम्बनाला पण झ्याक
In reply to तुम्हाला विडम्बनाला पण झ्याक by मोहनराव
रचना झ्याक जमली आहे...
In reply to @तुम्हाला विडम्बनाला पण झ्याक by अत्रुप्त आत्मा
@किती विसंगत विधाने करता हो
In reply to रचना झ्याक जमली आहे... by प्रचेतस
पळा पळा... आत्मा संतापलेला
In reply to @किती विसंगत विधाने करता हो by अत्रुप्त आत्मा
@ वल्ली
In reply to पळा पळा... आत्मा संतापलेला by प्रचेतस
मी आत्म्याला विडंबन करावयास
In reply to @किती विसंगत विधाने करता हो by अत्रुप्त आत्मा
मस्त .. अप्रतिम .. भावनांना
सुरेख !!
सर्वांचे मनःपूर्वक आभार
या गझलेची सुचलेली चाल
हे
वाह!!!!!!
वाह .. मस्तच !