Skip to main content

सांब भोळा

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 24/03/2012 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
रानात सांब भोळा उघडा असे दुपारी 'देवा कसाही तू रे...!?' मी एक त्या विचारी म्हणतो मलाही सांब 'मी खेळ तव मनाचा, असतो निसर्ग सारा.. कधी देव का कुणाचा..?' 'पडणार साऊली जी माझेच अल्प रूपं.., का बांधता तुम्ही हे.. नसते खुळे हिशेबं..?' 'व्यापुनि चराचरी या मी विश्वरूपं सारे..., माझेच भोग मजसी.. छळतीलं का कधी रे..?' 'तुमच्या खुळ्या स्वभावी मज देव-जन्म आहे.., कुणी 'देवं' का म्हणा ना..? अंती निसर्ग आहे...!' 'त्याचीच शुद्ध किमया भासे तुम्हा उन्हाळा, निर्जीव मूळचा मी तुमचाच सांब भोळा...!' फोटो:-घनगड-शिवाजी ट्रेल ट्रीप----
काव्यरस

वाचने 6915
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

आत्माजी, पहिलं म्हणजे आपलं चित्रं टाकण्याचं वेड, दुसरं वि+ चित्र टाकण्याचं वेड, तिसरं विडंबन टाकण्याचं वेड ... म्हण्जे एक वेड नाही हजार वेडं ? खरे अतृप्त शोभता आपण. अरूपास पाहे रूपी तोच भाग्यवंत निसर्गात भरूनि राहे अनादि अनंत हीच कल्पना जरा वेगळ्या स्वरूपात. आता नवकवि तुमच्या इतर कवितांवर कद्धी कद्धी रागावणार नाहीत बरं ? मस्त कविता !

म्हणतो मलाही सांब 'मी खेळ तव मनाचा, असतो निसर्ग सारा.. कधी देव का कुणाचा..?'
वा गुर्जी क्या बात है! चित्रही अगदी समयोचित.

फोटो आणि कदाचित त्यावरुनच झालेला काव्यरुपी संवाद दोन्ही आवडले.

In reply to by यकु

@फोटो आणि कदाचित त्यावरुनच झालेला काव्यरुपी संवाद दोन्ही आवडले. >>> कदाचित नाही हो यक्कूशेठ,,, निश्चित त्यावरुन झालाय हा संवाद...! घनगडला जाताना मला एका ट्रेलच्या सभासदानी मुद्दाम आडवाटेला असलेला ह्ये सांब भोळा दाखवला..आणी ह्याला छत बांधायला हवं असं तो बोलला.झालं... तिथुन गडावर जाईपर्यंत आमचं निधर्मविषयक चिंतन सुरू झालं...पण वरती गेल्यावर ते कामाच्या नादात अडगळीत जाऊन पडल होतं. ते आज दुपारी फोटो पहाता पहाता बाहेर आलं... आणी दिल की बात बाहेर आल्यावर-जे व्हायचं तेच झालं- कविता,,, नाईलाज आहे भाऊ..नाईलाज आहे... :-)

वनवासी सांब सदाशिव आणि त्याचं मनोगत आवडलं!

सुंदर. भटा छान कविता रचलीस रे.
तुमच्या खुळ्या स्वभावी मज देव-जन्म आहे.., कुणी 'देवं' का म्हणा ना..? अंती निसर्ग आहे...!'
_/\__/\__/\_

In reply to by प्रचेतस

आपले तीन नमस्काराची आयडिया उत्तम पण " कोपरापासून ढोपरापर्यंत " नमस्कार याविषयी काही संशोधन ????? काही चिन्हे ???

In reply to by चौकटराजा

कोपरापासून ढोपरापर्यंत संशोधन नाही ब्वा आपले, पण कोपरखळ्या मारताना ढोपरं(दुसर्‍यांची) दुखावली जाणार नाहीत हे मात्र बघतो

In reply to by प्रचेतस

@शाक्तपंथीयांची असावी काय?>>> कल्पना नाही,पण पुढच्या वर्षीच्या पुजेवेळीपर्यंत गावकर्‍यांच्या सहमतीने,पिंड तिथुन गडावर हलवली जाणार आहे... भोवती देऊळही बांधले जाणार आहे... तेंव्हा कदाचित पिंड काढतांना काही माहिती कळेल...

कुणी 'देवं' का म्हणा ना..? अंती निसर्ग आहे...! यावरून सतार नवाझ उ. शुजात खाँ यांनी गायलेल्या गझल मधला एक शेर आठवला - मेरी बेज़ुबा आँखों से, गिरे जो चंद कतरे जो समझ सको तो आंसु, ना समझ सको तो पानी

In reply to by मूकवाचक

@जो समझ सको तो आंसु, ना समझ सको तो पानी >>> व्वा... उदाहरण छान आहे,... शायर म्हणतोय...की, ''अरे वेड्यांनो माझ्या डोळ्यातुन वाहिलेल्या या अश्रूंना,जर समजुन घेतलं नाहित तर तुमच्या लेखी ते पाण्यासमानच रहाणार...'' म्हणजेच इथे अश्या अश्रूंना पाणी समजणारे निव्वळ मूढमती ठरतात...! तद्वतच वरिल ओळीतुन आधुनिक मनात आज शिल्लक असलेला देव मानवांना असे आवाहन करतो,की... '' तुंम्ही निसर्गाच्या प्रत्येक रुपाची/परिणामाची देव म्हणुन कितीही भलावण केलीत,तरी मी अंतिमतः फक्त आणी फक्त निसर्गच आहे.मला तुंम्ही अज्ञपणानी,मूर्खतेनी,स्वार्थानी,भोळेपणानी दिलेलं देवाचं/देवं-धर्म कल्पनेचं रुप मूलतः खोटं/निसर्गविसंगत/आणी मनुष्य हिताचं नाही...,त्यामुळे ज्याप्रमाणे शायर म्हणतो,की अश्रूंना पाणी म्हणु नका,त्याप्रमाणेच हे आधुनिक मन म्हणते.की...निसर्गाला देव म्हणु नका...! अश्रूंना अश्रूच म्हणा आणी निसर्गाला निसर्गच म्हणा'' :-) म्हणजे इथे निसर्गाला देव समजणारे मूढमती ठरतात... आत्मत्रुप्त यांनी तुलनेसाठी आणी अर्थ अधिक खोलात स्पष्ट होण्यासाठी जो शेर शेअर केला,त्याबद्दल मी धन्यवाद देतो... :-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

मुहब्बत एक एहसानों की पावन सी कहानी है, कभी कबीरा दीवाना था कभी मीरा दीवानी है, यहाँ सब लोग कहते है मेरी आँखों में आसूँ हैं जो तू समझे तो मोती है, जो न समझे तो पानी है II - कुमार विश्वास
हे घ्या भटजी !!! बाकी, कविता मस्तच...

क्या बात क्या बात मजा आला. खुप खुप मस्त झाली आहे रचना!!

छान प्रकटन. :) राघव

व्वा व्वा भटजीबुवा.... सुंदर !!! म्हणतो मलाही सांब 'मी खेळ तव मनाचा, असतो निसर्ग सारा.. कधी देव का कुणाचा..?' ह्या ओळी विशेष आवडल्या :) :)

अप्रतिम...खूप आवडली. लै च भारी

अप्रतिम...खूप आवडली. लै च भारी

महाशिवरात्रीलाच वर काढणार होतो, पण कामाच्या नादात राहीलं. बुवा...या रचनेत तुम्ही जी काही उंची गाठलीये त्याला तोड नाही. मला फारच आवडते ही रचना.