उंच माझा झोका ..
झी मराठीवर सध्या चालू असलेल्या उंच माझा झोका ह्या मालीकेचे शीर्षकगीत मी लिहीले आहे.
चांदणचाहूल होती.. कोवळ्या पावली
माप मी ओलांडले अन दूर गेली भातुकली
खेळण्याचे होते वय.. अंगणाची होती सय
सोवळ्या मनात माझ्या ..भरे नभाचा आशय
थबकले उंबऱ्यात मी ..पाहुनी नवी पहाट
जणू जन्मले नव्याने ..भरता हा मळवट
हाती अमृताचा वसा , साथ देई माझा सखा
त्याच्या कृतार्थ डोळ्यात.. झुले उंच माझा झोका
-----------------------------------------------------
पुढचे अंतरे
दाटुनिया येता मेघ , भरे आकाश ओंजळ
माळ ही व्रताची जपता, झाले घराचे देऊळ
झिजे पायरी होऊन ..जन्म चंदनासारखा
त्याच्या कृतार्थ डोळ्यात ..झुले उंच माझा झोका
आरतीत तेवे माझ्या ..मंद व्रताची ही समई
तुळशीचे रोप माझे ..उंच आभाळात जाई
मीच ओलांडले मला ..सोबतीस माझा सखा
येई कवेत आकाश ..झुले उंच माझा झोका
असे आगळे हे नाते ..ऐक ही रमा सांगते
तेज हे रुजे अंतरी ..जगण्याचे फूल होते
अशा संसार गाण्याला .. त्याचा माझा एक ठेका
त्याच्या कृतार्थ डोळ्यात ..झुले उंच माझा झोका
अरूण सर नि:शब्द केलंय तुम्ही
हॅट्स ऑफ .
अरुणजी सुंदर रचना केली आहे...
आली एक आठवण
काय रचलय तुम्ही...
अप्रतिम
खूप आवडले आहे
फारच सुंदर
म्हात्रे साहेब, अतिशय मस्त व सुंदर खर तर अप्रतिम कविता
अरूण जी अर्थपूर्ण गीत आणि
संपुर्ण गीत लाजवाब. तोड नाहि
सुरेख
खूपच सुंदर कविता...!
सुंदर
व्वा व्वा.. अप्रतिम रचना
अप्रतिम लिहलंय..!!
काही शंका
दिगम्भा ही
बघाच ...
सोवळ्या मनात माझ्या
सोवळ्या हा शब्द सोवळे म्हणजे
छान शीर्षक गीत.
नुकतेच या मालिकेबद्दल
म्हात्रेजी,
हेच म्हणते. तूनळीवर पूर्ण