✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

उंच माझा झोका ..

अ — अरूण म्हात्रे, Tue, 03/20/2012 - 00:31
झी मराठीवर सध्या चालू असलेल्या उंच माझा झोका ह्या मालीकेचे शीर्षकगीत मी लिहीले आहे. चांदणचाहूल होती.. कोवळ्या पावली माप मी ओलांडले अन दूर गेली भातुकली खेळण्याचे होते वय.. अंगणाची होती सय सोवळ्या मनात माझ्या ..भरे नभाचा आशय थबकले उंबऱ्यात मी ..पाहुनी नवी पहाट जणू जन्मले नव्याने ..भरता हा मळवट हाती अमृताचा वसा , साथ देई माझा सखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात.. झुले उंच माझा झोका ----------------------------------------------------- पुढचे अंतरे दाटुनिया येता मेघ , भरे आकाश ओंजळ माळ ही व्रताची जपता, झाले घराचे देऊळ झिजे पायरी होऊन ..जन्म चंदनासारखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात ..झुले उंच माझा झोका आरतीत तेवे माझ्या ..मंद व्रताची ही समई तुळशीचे रोप माझे ..उंच आभाळात जाई मीच ओलांडले मला ..सोबतीस माझा सखा येई कवेत आकाश ..झुले उंच माझा झोका असे आगळे हे नाते ..ऐक ही रमा सांगते तेज हे रुजे अंतरी ..जगण्याचे फूल होते अशा संसार गाण्याला .. त्याचा माझा एक ठेका त्याच्या कृतार्थ डोळ्यात ..झुले उंच माझा झोका

प्रतिक्रिया द्या
9958 वाचन

💬 प्रतिसाद (25)

अरूण सर नि:शब्द केलंय तुम्ही

सांजसंध्या
Tue, 03/20/2012 - 03:07 नवीन
अरूण सर नि:शब्द केलंय तुम्ही या गीतात. शीर्षकगीतातून कथानकाची कल्पना यावी इतकं ताकदीचं झालंय ते. सर्वांना आवडलंय शीर्षकगीत....
  • Log in or register to post comments

हॅट्स ऑफ .

प्रचेतस
Tue, 03/20/2012 - 07:02 नवीन
हॅट्स ऑफ .
  • Log in or register to post comments

अरुणजी सुंदर रचना केली आहे...

लीलाधर
Tue, 03/20/2012 - 08:24 नवीन
अरुणजी खरच फारच सुंदर लिहीले आहे शिर्षक गीत. अगदी मनापासून सांगतो की ह्या गीताला झी मराठी अ‍ॅवॉर्ड्समध्ये नक्की अ‍ॅवॉर्ड मिळेल. टायटल साँग म्हणून खरच या गीताची दखल घेतली जाईल. आणि हो लगेच दुसर्र्याच दिवशी मी हे आपले गीत डाऊनलोड करून मोबाईलवर घेतले आहे. आणि हो मी स्वतःहा झी मराठीचा फारच मोठा फॅन आहे. सो तुमची अजून कोणती गीते असतील तर मला कळवा. कारण मला चांगल्या रचना ऐकायला फारच आवडतात. आणि काय बोलू निशब्द केलेत. दाटुनिया येता मेघ , भरे आकाश ओंजळ माळ ही व्रताची जपता, झाले घराचे देऊळ झिजे पायरी होऊन ..जन्म चंदनासारखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात ..झुले उंच माझा झोका अप्रतिम रचना...
  • Log in or register to post comments

आली एक आठवण

चौकटराजा
Tue, 03/20/2012 - 08:58 नवीन
आरतीत तेवे माझ्या ..मंद व्रताची ही समई तुळशीचे रोप माझे ..उंच आभाळात जाई मीच ओलांडले मला ..सोबतीस माझा सखा येई कवेत आकाश ..झुले उंच माझा झोका अरूण जी, खुपच जमलेले काव्य. साहित्यिकाला परकाया प्रवेशाचा हक्क व वकूब असतो. याचे हे काव्य म्हणजे उदाहरण ! खरंच एका स्त्री ने लिहिलेलं वाटतंय ते ! आपल्या वरील ओळीनी एका हिंदी गाण्याच्या एका अंतर्‍याची आठवण दिली . ते असे झूला धननका धीरे धीरे हम झुले अम्बर तो क्या है , तारोंके बी लब चुमे मस्तीमे डूबे और सभी गम भूले जो देगी दिलको दिलकी पनाहे आजा चले दे कही दूर फैली हुई है सपनोकी बाहे ....................
  • Log in or register to post comments

काय रचलय तुम्ही...

अमृत
Tue, 03/20/2012 - 10:29 नवीन
अप्रतिम. कविता लवकर संपल्या मूळे वाईट वाटलं. :-( वाचताना मनात कुठेतरी 'महाश्वेता'तील कवीवर्य 'ग्रेस' यांनी रचलेलं शिर्षकगीत आठवत होतं. तुमच्या आणखी रचना वाचायला आवडतील. अमृत
  • Log in or register to post comments

अप्रतिम

मानस्
Tue, 03/20/2012 - 11:33 नवीन
मालिका पाहाताना ऐकलं होतं.पण आता एकसंध वाचताना नी ट अर्थ समजला..रमाबाईंच्या बालमनाचे तरंग आणि नंतर त्यांच्या महान कार्याचे वर्णन दोन्ही अगदी योग्य शब्दात मांडलय. सुंदर काव्याबद्दल अभिनंदन.
  • Log in or register to post comments

खूप आवडले आहे

दिगम्भा
Tue, 03/20/2012 - 11:45 नवीन
पहिल्यापासून या गाण्यावर नजर आहे व खूप आवडले आहे. अतिशय अर्थपूर्ण वाटले. निलेश मोहरीर व जाह्नवी प्रभु-अरोरा यांनीसुद्धा या गाण्याचे सोने केले आहे. या निमित्ताने प्रत्यक्ष कवीला हे सांगण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे. वरील दोघांनाही कौतुक कळवावे ही विनंती. मोहरीर हे गुणी (जुन्या काळातला शब्दप्रयोग आहे, समजून घ्यावा) आहेतच, त्यांच्यावरही आमच्यासारख्या सामान्य रसिकांची नजर आहे हे त्यांना सांगा. (एवढे लिहिण्यासाठीच मुद्दत के बाद लॉगिन केले.) - दिगम्भा
  • Log in or register to post comments

फारच सुंदर

चैतन्य दीक्षित
Tue, 03/20/2012 - 12:10 नवीन
खरोखर सुंदर रचना! मानाचा मुजरा !! -चैतन्य
  • Log in or register to post comments

म्हात्रे साहेब, अतिशय मस्त व सुंदर खर तर अप्रतिम कविता

निश
Tue, 03/20/2012 - 12:16 नवीन
म्हात्रे साहेब, अतिशय मस्त व सुंदर खर तर अप्रतिम कविता आहे. ह्या ऊंच माझा झोका ग मालिकेत काहि भाग हे माझ्या गावी दाभोली येथे आमच्या देवळात गौतमेश्वर ह्या आमच्या कुलदेवाच्या देवळात चित्रित झाले आहेत. आणि म्हात्रे साहेब, तुमचि कविता मनाचा ठाव घेणारी आहे. फार सुंदर
  • Log in or register to post comments

अरूण जी अर्थपूर्ण गीत आणि

वेणू
Tue, 03/20/2012 - 13:27 नवीन
अरूण जी अर्थपूर्ण गीत आणि त्याला चालही उत्कृष्ट आहे, सुंदर रचना _/\_ स्वीकारा!! :)
  • Log in or register to post comments

संपुर्ण गीत लाजवाब. तोड नाहि

गणेशा
Tue, 03/20/2012 - 14:19 नवीन
संपुर्ण गीत लाजवाब. तोड नाहि शब्दांना.
आरतीत तेवे माझ्या ..मंद व्रताची ही समई तुळशीचे रोप माझे ..उंच आभाळात जाई मीच ओलांडले मला ..सोबतीस माझा सखा येई कवेत आकाश ..झुले उंच माझा झोका
ग्रेट. लिहित रहा... वाचत आहे.
  • Log in or register to post comments

सुरेख

स्मिता.
Tue, 03/20/2012 - 16:00 नवीन
मी मालिका बघत नसल्याने हे गीत इथेच पहिल्यांदा वाचतेय. मालिकेच्या पार्श्वभुमीशिवायही डोळ्यासमोर बाल-रमाबाईचे चित्र उभे राहिले. अजाण वयात संसाराला लागणार्‍या बालिकेचे भाव खूप छान शब्दबद्ध केले आहेत.
  • Log in or register to post comments

खूपच सुंदर कविता...!

प्यारे१
Tue, 03/20/2012 - 16:52 नवीन
खूपच सुंदर कविता...!
  • Log in or register to post comments

सुंदर

sneharani
Tue, 03/20/2012 - 16:54 नवीन
सुंदर आहे गीत!! :)
  • Log in or register to post comments

व्वा व्वा.. अप्रतिम रचना

सुहास झेले
Tue, 03/20/2012 - 17:17 नवीन
व्वा व्वा.. अप्रतिम रचना :) :)
  • Log in or register to post comments

अप्रतिम लिहलंय..!!

किसन शिंदे
Wed, 03/21/2012 - 20:57 नवीन
अप्रतिम लिहलंय..!!
  • Log in or register to post comments

काही शंका

दिगम्भा
गुरुवार, 03/22/2012 - 18:16 नवीन
काही शंका विचारू का? "सोवळ्या मनात माझ्या" - सोवळ्या हा शब्द जरा पोलिटिकली इन्करेक्ट वाटत नाही का? त्यावरून अनेक नसते आक्षेप येऊ शकतील असे वाटते (सोवळे-ओवळे, ब्राह्मणीपणा, इ.) . सहज सुचणार्‍या "कोवळ्या" ऐवजी हा शब्द कसा आला? "त्याच्या कृतार्थ डोळ्यात.. झुले उंच माझा झोका" डोळ्यात झुले झोका हे जरा विचित्र वाटते, तुलना: नजरेत, दृष्टीने, इ. त्याच्या कृतार्थ दृष्टीला दिसे उंच माझा झोका किंवा त्याची कृतार्थ दृष्टी ग पाही उंच माझा झोका असे काही तरी बरे वाटले असते. अर्थात अशा अनेक चर्चा होऊन मगच हे गाणे झाले असणार म्हणा, पण शंका येतात खर्‍या मनात. - दिगम्भा
  • Log in or register to post comments

दिगम्भा ही

चौकटराजा
Fri, 03/23/2012 - 11:10 नवीन
दिगम्भा ही चौकटराजांची दुप्लिकेट आय डी तर नाही ना ? जरा मेम्बरशीप डेट बघारे कुणीतरी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिगम्भा

बघाच ...

दिगम्भा
Tue, 03/27/2012 - 15:42 नवीन
- दिगम्भा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

सोवळ्या मनात माझ्या

निल्या१
Mon, 04/23/2012 - 21:05 नवीन
दिगम्भा, सोवळ्या मनात माझ्या ही वक्यरचना मला खूप आवडली त्यावर >>नसते आक्षेप येऊ शकतील असे वाटते (सोवळे-ओवळे, ब्राह्मणीपणा, इ.) असे तुम्ही म्हटले त्यामुळे माझे मत सांगावेसे वाटले.सोवळे-ओवळे म्हणजे वाईटच अशी लोकांची का समजूत का असावी? पाश्चात्य देशांत जेवण वाढणारा प्रत्यक्ष अन्नास हात लावत असेल तर घामातून जंतू जाऊ नयेत म्हणून ग्लव्ह्ज वापरतात. व ग्लव्हज वापरणा-यास केसांना हात लावण्यास अंग खाजवण्यास व इतरत्र शिवण्यास मज्जाव असतो तसे केल्यास ग्लव्हज बदलावे लागतात. हे नियम "हायजिनच्या" दृष्टीने आपल्याला चालतत. पूर्वीच्या काळी ग्लव्हज वगैरे गोष्टी नसल्याने स्वच्छतेच्या संकल्पना रुजवण्यासाठी सोवळ्याची पद्धत आमलात आणली गेली . म्हणजे स्वयपाक करणा-या व्यक्तिने स्वच्छ स्नान करुनच स्वयंपाक करायचा. इतरत्र शिवाशिव करायची नाही. सोवळे ओवळे पाळणा-या काही लोकांनी त्याचे अवडंबर माजवले व त्याचा मूळ उद्देश मागे पडला. त्यातून पुढे त्याला जातीवादाचे डाग लागले. पुढे जे काही झाले ते सर्वथा चूकच आहे. परंतु मूळ संकल्पना लक्षात घेता "सोवळा" हा शब्द मला पोलिटिकली इन्करेक्ट वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिगम्भा

सोवळ्या हा शब्द सोवळे म्हणजे

रेवती
Mon, 04/23/2012 - 21:19 नवीन
सोवळ्या हा शब्द सोवळे म्हणजे शुचिर्भूत झालेली व्यक्ती, जिला पूजा, स्वयंपाक करता येतो तर अंघोळ व्हायची असल्यास ओवळेपण असते. पूर्वी आजी पुजेत असताना, नैवेद्य शिजवत असताना "मी सोवळ्यात आहे" असे म्हणत असे तर कधी "ओवळ्याने शिवू नकोस" असेही म्हणताना आठवते. यात जातीयवाद वगैरे अजिबातच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिगम्भा

छान शीर्षक गीत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 03/23/2012 - 10:12 नवीन
आनंद वाटला. शीर्षक गीताची झलक. [ दुवा युट्यूब] -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

नुकतेच या मालिकेबद्दल

रेवती
Tue, 03/27/2012 - 17:42 नवीन
नुकतेच या मालिकेबद्दल ऐकले. तुम्ही गीत छानच लिहिले आहे. पूर्ण ऐकायला मिळते का ते पाहते. तूनळीवरच्या व्हिडीओवर शेवटची ओळ फक्त ऐकू आली. आता सिरियलही बघावी म्हणते. एकदा तासभर बसून पाचसात भाग एकदम पाहून होतील.
  • Log in or register to post comments

म्हात्रेजी,

निल्या१
Fri, 04/20/2012 - 05:36 नवीन
म्हात्रेजी, मागे हा धागा पाहिला तेव्हा ओझरता पाहिला होता व नंतर विसरुन गेलो. हे गाणे सिरिअल मध्ये ऐकले व वेडाच झालो या गाण्याने. एक एक शब्द अगदी मोत्या सारखा आहे. शब्दांची पेरण ही अगदी उत्कृष्ट. ही कविता कुणी लिहिली याचा शोध घेत होतो. शोध घेता घेता हा मिपाचा धागा सापडला व नंतर लक्षात आले की आपण हा धागा पूर्वी पाहिला होता. या गाण्याचे संगीतही अप्रतिम आहे. अद्वितीय!
  • Log in or register to post comments

हेच म्हणते. तूनळीवर पूर्ण

रेवती
Mon, 04/23/2012 - 21:15 नवीन
हेच म्हणते. तूनळीवर पूर्ण गाणे आहे. त्यात अरूणजींचे नावही आहे. भारी वाटले पाहून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निल्या१

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा