प्रतिशोध
काय कायदा काय वायदा कसले पोलिस ठाणे
ओलिस आहे मुके रांगणे गुंडच इथे शहाणे
डोंबाच्या हाती सत्तेचे उजवे चलनी नाणे
डावे पाठी री ओढे गुणगुणे पोरके अन गाणे
सारे गनिमी व्याध; अमीषे त्यांची मिठास वाणी
माया भरते दारी त्यांच्या अथक कृपेचे पाणी
कळसावर लखलखते सोने वार सोसते कोणी
आटपाटची नगरी ही तर; ताक चोरते लोणी
सांग विठू तू बद्ध करांनी का अजुनी रे मौनी
पायाखालिल वीट क्रयास्तव कलली पाहुन चैनी
रेत जाळते पाणी रानी चौखुर आणीबाणी
आक्रंदे प्रतिशोध; संयमी जनता केविलवाणी
..............................अज्ञात
वाचने
1595
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
व्यवस्थेविरूद्धचा मूक आक्रोश
In reply to व्यवस्थेविरूद्धचा मूक आक्रोश by सांजसंध्या
+1, पण 'इथल्या' व्यवस्थेविरुद्धचा आक्रोश
In reply to +1, पण 'इथल्या' व्यवस्थेविरुद्धचा आक्रोश by यकु
यशवंत साहेब , अतिशय मस्त आहे तुमचि कविता.
In reply to यशवंत साहेब , अतिशय मस्त आहे तुमचि कविता. by निश
धन्यवाद. >>यशवंत साहेब --
In reply to +1, पण 'इथल्या' व्यवस्थेविरुद्धचा आक्रोश by यकु
तुमची कविता नक्की आवडली.
In reply to तुमची कविता नक्की आवडली. by अज्ञातकुल
>>>तुमची कविता नक्की आवडली.
In reply to व्यवस्थेविरूद्धचा मूक आक्रोश by सांजसंध्या
नुकतंच माझ्या दृष्टीला
व्यवस्थेविरुद्ध
अज्ञातकुल साहेब, अतिशय मस्त आहे तुमची कविता
आक्रंदे प्रतिशोध; संयमी जनता
आभार