मिपाकरांना नमस्कार,
संगीतकार श्रीधर फडके हे मराठी भावसंगीतातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व! ऋतु हिरवा, तेजोमय नादब्रम्ह, संगीत मनमोही रे अशा अनेक अल्बम्सनी मराठी मनाला गेली अनेक वर्षे घातलेली मोहीनी अजूनही तशीच आहे. यात भर म्हणून श्रीधरजींनी संगीतबद्ध केलेल्या मराठी गीतांचा "लिलाव"साठी काम करण्याचा मला योग आला. या अल्बममधील गीते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज, शांता शेळके तसच आत्ताच्या काळातील कवी नितिन आखवे, प्रवीण दवणे, ग्रुरू ठाकूर यांनी लिहीली आहेत असून या गाण्यांना स्वर बेला शेंडे, आरती अंकलीकर, प्रसेनजित कोसंबी, सुदेश भोसले, सध्याचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक आनंद भाटे आणि स्वत: श्रीधर फडके यांचे लाभले आहेत. या अल्बमच्या निमित्ताने श्रीधरजींशी अनेकदा भेट झाली आणि एका भेटीत त्यांना मी या अल्बममधलं एखादं गाणं गुणगुणायलं सांगितलं आणि त्यांनीही सहज होकार दिला. कॅमेराही सोबत होताच! त्यांनी लिलाव या अल्बममधील "झुळूक तुझ्या दिसण्याची" ही गझल हार्मोनियम वर गुणगुणून दाखवली.
ती तुम्हाला http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=wi5QRfg-YGk इथे पहाता येईल . या व्हिडीयोमध्ये श्रीधरजी वाजवत असलेली हार्मोनियम ही बाबुजींची आहे!! या अल्बमच्या निमित्ताने अनेक दिग्गज लोकांना जवळून भेटण्याचा योग आला आणि त्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो :)
य़ा अल्बमबद्द्ल मधली सगळी गाणी तुम्ही http://www.maanbindu.com/new-marathi-music-album-Lilav इथे ऐकू शकता.
धन्यवाद
योगेश पितळे
वाचने
2579
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!!
धन्यवाद!
In reply to वा!! by अक्षया
धन्यवाद!
ग्रुरू?
:)
In reply to ग्रुरू? by रामपुरी
रत्नागिरीच्या सर्व म्हशी तुर्तास गाभण काय रे झंप्या !!!
In reply to :) by योगेश पितळे
अरे वाह!! मस्तच. आणि
हाबिणंदण हो योगेश शेठ.