कट्टेकर्यांची वारी... चिंचवडवर स्वारी ...!
कवनरुपे कहाणी-श्री.अन्नक्षेत्र चिंचवड,मिपा खादाडवारी,संयोजक-मोदक ;-)
एक आहे गावं चिंचवड,तेथे मिपाची एक कावडं
अजोबा एक नातू सगळे,नाती काही असती...
मोदक नामे नवमिपाकरू,वल्ली मागे महामेरु
चिंचवडकरांसी आधारु,मिपा कट्टा करण्या...
तारीख सतरा वारं-शनिवार,रोजवूड मधला आहार
सायं-काली पक्ष्यांचा बहर,बरा होता तेथे बा... ;-)
आंम्ही पोहोचता मुक्कामी,प्रथम येवोनी थडकली चिमी
मोदका फोनवता आंम्ही,शीघ्र तो ही धावला...
मागोनी वल्ली आणी पक पकं,येताच अन्य कितिक...
मिपा परंपरेप्रमाणे,तेथे हलकल्लोळ जाहला...
हाटीलाचा तो द्वार-रक्षक,पाहे जणु मनुष्य भक्षक
आत चला,आत चला...असे,दरडावू तो लागला...
मग समस्तानी कालाजामुन हणुनी,उशिरा येणार्यास फोनवुनी...
आठ वाजले म्हणीता म्हणीता,अंतःपुर गाठला...
शोधले होते आधी टेबल, दहा जणांसी केवल...
परी मेंबर संख्या पहाता,खुर्च्या आणिक जोडिल्या
मग चर्चांना आला बहरं,,,विषय एकाहुनी एक कहरं
आजुबाजुचे यात्रेकरु...त्रासिक बहु जाहले...
हाटीलाचेही वेटर नामी..एकही ऑर्डर घेण्याकामी
पाणी वाटोनी ते हरकामी,अदृष्य कुठे जाहले... ?
मिपाकरांसी ही नामी संधी,,बराच येळं बसायची बंदी
या हाटीलास नाही बघुनी,,कल्लोळ माजवू लागले...
थोड्या समयानी मितान नामे,आल्या ताई मुक्कामे
प्रथम भेटता ओळखा सर्वांसी,चौ.रा.का---का(?) म्हणाले...
मग न्यहाळेनी सार्यांसी,नच ओळखे कोणासी..
ऐसे म्हणोनी स्वस्थानासी,विराजमान जाहल्या..
केली एकमेकांची ओळख,आयडी मुळनामे पाळख
दाटुन येता काळेख...पन्नास प्रकट जाहले...
पन्नासांसह चिरंजीव,दिसताची खुर्ची राखिव
टुण्ण-करुनी उडी मारुनी,बागडू आनंदे लागला...
फ्लाईंग व्हिजिटर दोन त्यात,सौरभ आणी प्र-शांत...
सूप- गफ्फा हणुनी आणिक,मार्गस्थ दोघे जाहले
अन्नपत्रका मधले उप-लब्ध,सूप स्टार्टर कितिकं
ठरवोनी प्रति-पाना गणिक,आर्डर देई मोदके ;-)
मग पुन्हा नेहमिची खेचाखेची,धाग्यांवरुन खोचाखोची ;-)
म्यानी काढोनी तलवारी,सारे युद्ध करो लागले...
बाजुचे पब्लिकं भय-भीतं, विचंलीत जाहले त्यांचे चित्त
सूपं स्टार्टरं मारोनी, वेटरानी त्यास सोडविले...
चौराकाका आणी आंम्ही,स्माई-ली टाकण्या वरोनी
एकमेकासी झणी,छळू लागलो वारं-वारे...!
आपुल्याच नामे स्माईली,कधी होती का-कुणी केली
तैसीची करावी सार्यांनी,प्रस्ताव ठेविती चौरा..का का(?) ;-)
मधेच आलेले मनोबा,आंम्हासी नच कळले बा...
एवढी काकांसह आमुची,स्मायल्या-नंदी टाळी लागली ;-)
पकपक नी वल्ली पलिकडे,हैदोस घालीती खडे-खडे... :-p
वेटरांसी आतल्या आत घडे,दृष्टांतू बाह्य मनांचा...
वेटरंही पन्नासांशी जाती,काय अंतरीची नाती
खाण्यासी जन्म जयांचा,ऑर्डरु लागले मेन-कोर्सी...
एक भाजी कोल्हा-पुरी,तिला दिधलेली मिर्च्यांची धुरी... :-p
अपुरीचं जरी मिळती, लोणचे म्हणुनी कामी येई
परी पनीराची भाजी,मटारासंगे ताजी ताजी..
चाखुन पहाती आजी-माजी,बोटे चाटती रोटीसंगे
नंतर व्हेजं ची बिर्याणी, बरी आहे,,म्हणती कुणी
पोटे भरता आणी,खिचडी आंम्ही म्हणलो बा... ;-)
अश्यारितिने स्वाहा-कार, करोनी सारे मेंबर...
उदरे येता ढेकर... पान खाण्या वळले बा...
पुन्हा भायेर तो रक्षक,भूतं-काळातील शिक्षक :-p
मला भासे तक्षक, आता सलामीण्यासी आला...
मितान आणी छोटुकली चिमी,गेल्या आपुल्या मुक्कामी
मग उरलेले आंम्ही, गप्पा हाणीत राहिलो...
उत्तर रात्र बहुत होता,,,स्वये दूर नगरे जाता
केला सर्वांसी टाटा,,,गुडनाईट..गुडनाईट म्हणोनी.. ;-)
ऐकोनी आत-म्या-चे कवन,कट्टेकर्यांनी करावे चिंतन..
आणिक करोनी मननं,प्रतिसादी जिलब्या पाडाव्या... ;-)
जमला काहो वृत्तांतू, कळवा-जीव होईल शांतू
नविन रुपे म्हणोनी,,,या सम हा लिहिला... :-)
०====०====००====०====००====०====००====०====००====०====००====०====००====०====००====०====००====०====००====०====००====०====००====०====०====०===
कट्टा नेहमीचाच,फोटोही नेहमी सारखे,पण दंगल मात्र नविन ;-)
ता.क.-अत्ता वेळे अभावी नावे ठेवण्याचा कार्यक्रम पुढे ढकलीत आहोत... ;-) (आठवली तेवढी ठेवली आहेतच ;-) )
आपला(च) अत्रुप्त आत्मा... :-)
१)हळुहळू-जमणारे (पानासारखे ;-) ) मिपाकर..
२)जादुचे प्रयोग करतांना,जादु-गार जॅकेट आत्मा आणी टि-शर्ट वल्ली=एकमेव प्रेक्षक-पक पक पक ;-)
३)स्वीट सेल्फ स्टाटर>>> काला-जामुन
४)सु-हासित पक पक...
५) दंगल खोर-डावीकडुन-वल्ली,मोदक, -----,
६) दंगल खोर-डावीकडुन------,चौकटराजा,मितान,चिमी,आणी आंम्ही....
७)लाँग-मार्च- अ-नेक जण
८)आमच्याशी चर्चा करुन बेजार झालेले चौरा.काका... एका थरथरत्या मुव्हमेंटसह ;-)
९)पक पक यांची तशीच थरथर बघतांना....प्र-शांत .....!
१०)कोल्हा-पुरीचा (मायापुरीसारखा ;-) ) दणका बसल्याने हा फोटू धरणीकंपावस्थेत आलेला आहे...
११)हा.....! अता पनीर माखनवाला मुळे क्यामेराही जागेवर आला... ;-)
तिथेच लास्टला डाव्या कोपर्यात पन्नासराव चिरं-जीव शंभर सह ;-)
१२)डावीकडुन-मन-१,चौराकाका,पंकज,अनुप
१३) आणी---जाता,जाता---नव-कविंना टेंपोत बशिवतो,म्हणुन आंम्हाला मनरावांच्या बुलेटवर सगळ्यांनी शिक्षितावस्थेत बशिवले...तो काळजाचा थर-काप उडवणारा फोटू ;-)
=====================================================================
वाचने
17940
वाचनखूण
प्रतिक्रिया
108
आत्मा भाऊ, लय भारी दोस्ता, एक दम भन्नाट सुसाट बुंबाट..
In reply to आत्मा भाऊ, लय भारी दोस्ता, एक दम भन्नाट सुसाट बुंबाट.. by निश
हा हा हा !! चान चान , लहाणपणी
In reply to हा हा हा !! चान चान , लहाणपणी by सुहास..
मित्रा.. प्रतिसाद कळाला नाही.. जरा विस्कटून सांगतोस काय..?
In reply to हा हा हा !! चान चान , लहाणपणी by सुहास..
बालादपि
१ नंबर वर्णन
पहिल्या काही ओळींतच हसून
In reply to पहिल्या काही ओळींतच हसून by यकु
+१११११११११११११
In reply to +१११११११११११११ by स्पा
@बाकी फोटो लैच सुमार आलेत हो
In reply to @बाकी फोटो लैच सुमार आलेत हो by अत्रुप्त आत्मा
??
स्तोत्रं म्हणत असल्यासारखा
In reply to स्तोत्रं म्हणत असल्यासारखा by रेवती
>>>(हा आयडी आठवत का
In reply to >>>(हा आयडी आठवत का by यकु
सांगा की एस्वंतराव.
In reply to सांगा की एस्वंतराव. by रेवती
मला पण माहित नाही. पण कुणीतरी
In reply to मला पण माहित नाही. पण कुणीतरी by यकु
काय हो,
In reply to काय हो, by प्रास
धन्यवाद्स.
मस्त जमलाय वृतांत. एक भाजी
गटगचा काव्यात्मक वृ.
In reply to गटगचा काव्यात्मक वृ. by सांजसंध्या
@गटगचा काव्यात्मक वृ.>>>
In reply to @गटगचा काव्यात्मक वृ.>>> by अत्रुप्त आत्मा
गटग = गेट टू गेदर ... माबोची
In reply to गटग = गेट टू गेदर ... माबोची by सांजसंध्या
@गेट टू गेदर ... माबोची सवय
मस्त!!
__/\__
In reply to __/\__ by मोदक
फक्त हात जोडा
In reply to फक्त हात जोडा by पक पक पक
हात जोडून पुढे काही म्हणायचे आहे का..? ;-)
In reply to हात जोडून पुढे काही म्हणायचे आहे का..? ;-) by मोदक
गुरुजी आहेत की म्हणायला...
In reply to गुरुजी आहेत की म्हणायला... by पक पक पक
ब्वॉर. :-)
In reply to ब्वॉर. :-) by मोदक
मेलो मेलो.
पारायण करा
In reply to पारायण करा by चौकटराजा
@पक्षांचा बहर कसा होता तिथे ?
In reply to @पक्षांचा बहर कसा होता तिथे ? by अत्रुप्त आत्मा
अफाट ही काव्यप्रतिभा.
In reply to अफाट ही काव्यप्रतिभा. by प्रचेतस
सहमत आहे आम्ही आधीच सपशेल
In reply to @पक्षांचा बहर कसा होता तिथे ? by अत्रुप्त आत्मा
यास्तव
In reply to यास्तव by चौकटराजा
(No subject)
In reply to (No subject) by प्रचेतस
नवीन स्मायली काढायला शिकलास का..?
In reply to यास्तव by चौकटराजा
णिषेध..!णिषेध..!णिषेध..! ;-)
In reply to णिषेध..!णिषेध..!णिषेध..! ;-) by अत्रुप्त आत्मा
येत रहा
In reply to येत रहा by चौकटराजा
अहो मी विडंबक नाहीये हो.
गटग ???
अ. आ.
छानच .. असेच सगळे भेटोत राहोत
In reply to छानच .. असेच सगळे भेटोत राहोत by गणेशा
.../\...
In reply to .../\... by वपाडाव
वपाडाव , टाकू का एक डाव ?
In reply to वपाडाव , टाकू का एक डाव ? by चौकटराजा
काका बरे आहात ना
In reply to काका बरे आहात ना by स्पा
का बा असा इचारतो ?
भटोबा पुन्हा एकदा फार्मात..
In reply to भटोबा पुन्हा एकदा फार्मात.. by पिंगू
@बाकी बैठकीत किती जामुन
In reply to @बाकी बैठकीत किती जामुन by अत्रुप्त आत्मा
अनलिमीटेड जामूनची थाळी कुठे मिळते का..?
In reply to अनलिमीटेड जामूनची थाळी कुठे मिळते का..? by मोदक
राजधानीत असतात रे काला जामुन
In reply to राजधानीत असतात रे काला जामुन by प्रचेतस
आधी चौकशी अशासाठी
In reply to आधी चौकशी अशासाठी by चौकटराजा
छे छे. ते फक्त स्वादला.
In reply to छे छे. ते फक्त स्वादला. by प्रचेतस
वल्लीपंत !
In reply to वल्लीपंत ! by चौकटराजा
अहो करणारच. शेवटी दोन्हीकडचा
In reply to राजधानीत असतात रे काला जामुन by प्रचेतस
फक्त आधी चौकशी करून जा.
In reply to फक्त आधी चौकशी करून जा. by मोदक
तू आणि गणेशापुढे आम्ही
पुजा घालुन झाली..... उत्तर
In reply to पुजा घालुन झाली..... उत्तर by पक पक पक
तुमच्या दक्षिणेत माझाही वाटा आहे...
In reply to तुमच्या दक्षिणेत माझाही वाटा आहे... by मोदक
अजून पेंडींग आहे पक पक
In reply to अजून पेंडींग आहे पक पक by पक पक पक
परत असा घोर अपराध घड्ल्यास
In reply to परत असा घोर अपराध घड्ल्यास by पक पक पक
मला हात जोडायला लावले...
In reply to मला हात जोडायला लावले... by मोदक
@तुम्ही नक्की माझे मित्रच
अरे काय लिहिलाय वृत्तांत!
वरुन तिन नम्बर चा फोटू लै
ह्म्म्म...
In reply to ह्म्म्म... by सोत्रि
चेनैला जाऊन सोकाजींचा
उधळिला आत्म्याचा वारू, जरी
In reply to उधळिला आत्म्याचा वारू, जरी by प्रचेतस
@उधळिला आत्म्याचा वारू, जरी
वृत्तांत आणि फोटो आवडले.
भारी लिवलंय हो भटजी.. =))
In reply to भारी लिवलंय हो भटजी.. =)) by किसन शिंदे
मंजी
भारी लिवलंय हो भटजी.. =))
भारी लिवलंय हो भटजी.. =))
In reply to भारी लिवलंय हो भटजी.. =)) by किसन शिंदे
तुझ्या तिहेरी प्रतिसादांनी
In reply to तुझ्या तिहेरी प्रतिसादांनी by प्रचेतस
@तुझ्या तिहेरी प्रतिसादांनी
भारी लिवलंय हो भटजी.. =))
In reply to भारी लिवलंय हो भटजी.. =)) by किसन शिंदे
म्हणणं परिणामकारक व्हायला चार
In reply to म्हणणं परिणामकारक व्हायला चार by सूड
कसली डोंबलाची पध्दत
In reply to कसली डोंबलाची पध्दत by किसन शिंदे
@आयडियाच्या नेटवर्क टाॅवर वर
सहीच... एकदम जबरदस्त
जाम भारी लिहिलंय ओ भटजी,
जबरदस्त कट्टा.जय हो मिपाकर्स!
भारीच ........ह
निव्वळ अप्रतिम व्रुत्तांत....
In reply to निव्वळ अप्रतिम व्रुत्तांत.... by लीलाधर
ओ भडजी बुवा फारच छान लिहीला
इश्टायल आवडली. कट्टा सुद्धा
In reply to इश्टायल आवडली. कट्टा सुद्धा by स्पंदना
लेट करंट
In reply to इश्टायल आवडली. कट्टा सुद्धा by स्पंदना
@पन्नास रावांचा चिरंजिव शंभर
In reply to @पन्नास रावांचा चिरंजिव शंभर by अत्रुप्त आत्मा
नशिब समजा चमचा आणि हात
छान
In reply to छान by चिमी
@कट्ट्यापेक्षा कट्ट्याचा
वा !