Skip to main content

शूरवीर

लेखक निश यांनी सोमवार, 19/03/2012 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा जेव्हा सीमेवर गोळी वर गोळी चालली तेव्हा तेव्हा मॄत्युची गिधाडे आस पास वावरली. झेलले घाव छातीवर होउन रक्तबंबाळ कितीदा घेतले पाय मागे न कधीही लढलो परी शूरासारखा. घर ठेवले मागे, नाती सगळी विसरलो झुंजता झुंजता शत्रुशी, नमकहराम दोस्तामुळे घायाळ हा झालो. श्वास असे जोपरी तनात, करीन शत्रुवरी मात. मेलो जरी रणात तरी, अमर होउन राहिन नेहमी जिवंत तुमच्या मनात. राहिल देशभक्ति मनात राहिल देशभक्ति मनात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2081
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

निश पद्यात लिहायचा प्रयत्न करतो आहेस हे चांगलं आहे. हळू हळू लय, ताल समजू लागले, शब्दयोजना आणि काव्य समजले कि खूप सुधारणा होईल. लिहीत रहा :)

In reply to by प्रचेतस

ट्युशन सुरु आहे ना चौरा काकांची. वाण नी गुण का काय म्हणतात तसं. ;)

कविता छान ! अजुन थोडे रणभुमीवरील वर्णने दिल्यास आनखिन छान वाटेल .. अवांतर : मागे एकदा सुधीर काळेंनी एका सैनिकाची इंग्रजी कविता दिली होती. त्याचे केलेले भाषांतर आठवले.

चांगला प्रयत्न, मुख्य म्हणजे प्रयत्न आहे.. कविता जरा वरवरची झालीय.. कवितेचा गोल्ड्न रुल म्हणजे जेंव्हा स्वत:ची कविता लिहुन २-३ दिवस तशीच ठेवायची.. नंतरही ती बरी वाटली तरच पोस्टायची..

निश...मित्रा गल्ली-बोळ भयंकर चुकलेत... अर्थाच्या पाठी लागताना, स्ट्र्क्चरनीच मार खाल्लाय,,, विषय चांगलाच निवडलाय... पण त्यात वेगळं म्हणावं असं काहिच चिंतन नाही... व्यथेची मांडणीही उपरोक्त कारणांमुळे हरपली आहे... वरती संध्येनी दिलेल्या प्रतिसादावर मनन कर... :-)

तुम्हा सगळ्यांचे मनापासुन आभार व धन्यवाद तुम्ही सागितलेली प्रत्येक सूचना अमलात आणण्याचा मी नक्की प्रयत्न करीन.