रेशमी सलवार कुडता जाळीचा
मुलगा:
रेशमी सलवार कुडता जाळीचा |
रूप सह्य न, नखराही कमालीचा ||
मुलगी:
जा रे पिच्छा सोड मज मतवालीचा |
का रे रस्ता शोधतोसी चौकीचा || धृ ||
मुलगा:
पाहे जेव्हा तुला मी |
फुलझड्या अंतरी झडती ||
मी करेन पिच्छा, पडल्या |
जरी हातकड्याही हाती |
पाड काय चौकीचा || १ ||
मुलगी:
आहे घरंदाज मी नारी |
मला समज न असली तसली ||
बड्याबड्यांची केली |
मी आहे ऐशी तैशी |
तू कुण्या गणतीचा || २ ||
ही कविता माझी नाही. मात्र, हा आविष्कार माझाच आहे.
चाल ओळखीची वाटू शकते. उमगली तर अवश्य सांगा.
मूळ कवितेतला मुलगा गातो ते मात्र 'आशा भोसले' ह्यांच्या आवाजात!
वर्गीकरण
हा हा. रेशमी सलवार कुर्ता
In reply to हा हा. रेशमी सलवार कुर्ता by रेवती
मतलाई = झुळूक.
लहानपणच्या मुकाबल्याची आठवण
लहानपणच्या मुकाबल्याची आठवण
झकास. आविष्कार आवडला.
मस्त!
प्रतिसादांखातर मनःपूर्वक धन्यवाद!
छानच आहे भावानुवाद