श्री आदिजोशी यांचे नट-बोल्ट तत्वज्ञान वाचले आणि बुद्धा बोधीवृक्षाखाली जे काय झालं असेल ते आम्हाला झालं. आधी आपण जोशींचे थोर विचार ऐकूयात.
एक नट आणि एक बोल्ट अशी स्पष्ट रचना निसर्गाने केली आहे. नट मधे नट अथवा बोल्ट मधे बोल्ट बसवण्याचा प्रयत्न करणं नैसर्गीक कसं होईल?
(दुवा)
किती थोर नै! म्हणून आम्ही निसर्गाचा अभ्यास सुरु केला आणि आम्हाला काही धक्कादायक निरिक्षणं मिळाली. ती निरीक्षणं आम्ही तुमच्यासमोर चित्ररुपातच देऊ इच्छितो.
१. एक बोल्ट दोन नट्स, एकाच बाजुने

२. एक बोल्ट आणि दोन नट्स, एक पुढून एक मागून.

३. दोन्ही बाजूंनी वापरता येणारा नट
४. बोल्ट विथ अ होल (अॅन्ड अ नट टू)!!

५. नट आणी बोल्ट्स एकत्रच!!

काही काही नट्स आणि बोल्ट्स तर इतके भयानक होते की ते फोटो इथे देणं मला सभ्यतेला अनुसरून वाटत नाही. त्याशिवाय काही भन्नाट नट्स आणि बोल्ट्स बनविण्याची कल्पनाही आम्हाला चाटून गेली. पण निसर्गाचा हा भन्नाट चमत्कार पाहून एक विचार आमच्या मनात आल्याशिवाय रहावला नाही: Nature has gone nuts!!
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्हणून आम्ही निसर्गाचा अभ्यास
श्या प्रकारची "nuts and bolts" निसर्गात मिळतात??
फोटोन वरून तर हे मानव निर्मित वाटत आहे..ते हि विदेशी कंपन्यान मधील.. :P
तुंम्ही नीट पाहीले तर ते नट
तुंम्ही नीट पाहीले तर ते नट आणि बोल्ट असेच कॉम्बिनेशन आहेत. पण नटमध्ये नटच आणि बोल्टमध्ये बोल्टच असे नाही; असे होणे अशक्य आहे. आणि तसे करायचेच असल्यास त्यातील एकाला भिन्न पक्षाचा गुणधर्म द्यावा लागेल. उदा.= नटमध्ये बोल्ट्चा आकार देणे किंवा मग बोल्टला नटचा साचा देणे. ;)
थिंक हटके सो नथिंग इज इम्पॉसिबल! ;) ;)
अशक्य अतिरेक....
आवरा रे आवरा.
.
.
.
.
.
.
.
.
.
.( खाजगी : ह.ह.पु.वा)
'तर्री' च म्हटल तुंम्ही कुठे
In reply to अशक्य अतिरेक.... by तर्री
'तर्री' च म्हटल तुंम्ही कुठे हरवलात!
वा: ! निळ्या वा: !
रिश्ता वही सोच नयी....
वेगळाच लेख. आवडून गेला..!
वेगळाच लेख. आवडून गेला..! :)
ह्म्म्म
?
+१, सहमत. वरील सर्व चित्रांत दाखवलेले नट आणि बोल्ट्स हे मानवनिर्मीत दिसताहेत, असो तसाही आमचा निसर्गाचा अभ्यास कमीच हो, सिमेंच्या जंगलात वाढलो ना आम्ही. :)
क्र २ चित्रातल्या उजवीकडील
क्र २ चित्रातल्या उजवीकडील पदार्थांना "स्टड" असेही मॅशो नाव आहे.
झाला रे झाला....निळ्या खर्या
झाला रे झाला....निळ्या खर्या अर्थाने हिरवा झाला. ;)
सोय महत्वाची ....
धागा रोचक वाटला.
नट-बोल्ट कॉबीनेशन हे २ वस्तु घट्टपणे एकत्र बांधण्यासाठी वापरात, शक्यतो २ वस्तुंमध्ये दुरावा अगर अंगत असु नये ह्यासाठी नट-बोल्ट कॉब्मीनेशनचा वापर करतात, नात्यांचेही ( रिलेशन्स रिलेशन्स ) काहीसे तसेच नाही काय ? ;)
'शेवटी काय तर सोय महत्वाची' असा निष्कर्ष ह्यातुन काढता येऊ शकतो. ;)
- छोटा डॉन
हैशा!
निळ्यांनी नट आणि बोल्ट कॉम्बीनेशन असणारी दुर्मिळ अनैसर्गिकतेची अमुलाग्र आणि हलकट माहीती देऊन आमच्या डोक्याचे जे नटबोल्ट ढिले केले त्याबद्दल समस्त मिपा तर्फे त्यांचा सत्कार करण्यात येत हाये!

ही शाल
हे श्रीफळ

आन् ही फुल न्हाय फुलाची पाकळी

(टीपः- पाकळी ऐवजी अख्ख लाल गुलाबच देणार होतो पण ते उगीच "अग्गs!!" सारख अनैसर्गिक दिसल असत!)
अवांतर वजा सुचना=> सदर साहीत्य मिपावरच्याच एका सदस्यांकडून तात्पुरते (सेकंड हॅन्ड) उसने घेतलेले असल्याने कार्यक्रम समाप्तीनंतर निळ्यांनी हे सामान लग्गेच आंम्हास गुपचुप परत आणून द्यायचे आहे.
पाकळी हवी तर खिशातून घेऊन जाऊ शकता! ;)
च्यायला निळ्या आयडी बदल म्हण
च्यायला निळ्या आयडी बदल म्हण आता..
- (नटोरियस नट) पिंगू
चला या निमित्ताने का होईना
चला या निमित्ताने का होईना नायल्याला बोर्डावर आणले म्हनुन आदी जोशी यांचे आभार मानायला हवेत.
बाकी तुम्हा दोघाच्या तत्वज्ञानाने माझ्या भवती ही प्रकाशाच वलय दिसुन राहिलय असं माझा एल कलीग म्हणत होता.
अवांतर आवरा!
In reply to चला या निमित्ताने का होईना by गणपा
अवांतराकरता मालकांनी खव आणि व्यनीची सोय केली आहे. कृपया धाग्यावरचं अवांतर आवरा! (अरे कोणी संपादक इथे कारवाई करेल काय?) ;-)
मरतंय आता...
?
In reply to अवांतर आवरा! by Nile
लेख उडवायचा आहे का ?
काय रे, काय रे!
In reply to ? by परिकथेतील राजकुमार
आलेच कात्री घेऊन!
ओ काकू!
In reply to काय रे, काय रे! by पैसा
आधी पर्यासारख्यांचा धुडगूस थांबवा की!
(मराठी संस्थळांवर पाशवी संपदकणींची टक्केवारी इतकी जास्त का असा धागा सुरु करावा म्हणतो!) ;-)
मि. नटवरलाल :)
बाब्बौ, एवढ्या प्रकारचे नट्स पाहून आता कुठे मला 'नमन नटवरा, विस्मयकारा'चा खरा अर्थ समजला ;)
कोटीसम्राट
In reply to मि. नटवरलाल :) by नंदन
__/\__
समास?
In reply to मि. नटवरलाल :) by नंदन
इथे काय समास वगैरेची भानगड आहे का रे? ;-)
__/\__ दंडवत स्वीकार करा
In reply to मि. नटवरलाल :) by नंदन
__/\__
दंडवत स्वीकार करा कोटिसम्राट!!!!
कोटीकेसरी, तुम्ही काय
In reply to मि. नटवरलाल :) by नंदन
कोटीकेसरी, तुम्ही काय स्क्रूड्रायव्हर घेऊन बसला होतात का?
बाकी आमचा निळ्या ना बाकी... हुशारच!
नट असे असतील तर नटी कशी असेल
नट असे असतील तर नटी कशी असेल ? त्याची काही चित्रं देता येतील का ?
आणि नटमध्ये बोल्ट फिरवुन फिरवुन घालावे लागतात ना ?
आपलं तांत्रिक ज्ञान
आपलं तांत्रिक ज्ञान पाजळण्याचा क्षीण प्रयत्न.
हहपुवा झाली हे सांगायला नकोच.
क्षीण आणि हास्य
In reply to आपलं तांत्रिक ज्ञान by राजेश घासकडवी
तांत्रिक ज्ञान पाजळण्याचा प्रयत्न क्षीण आहे, तरीही हहपुवा झाली आहे. म्हणजेच, हहपुवा होण्याचे कारण काही तरी वेगळेच आहे. काय आहे ते? :)
लै भारी
लै भारी कल्पनाशक्ती. हे असलंच कैतरी हुडकत होतो लै दिवस.
अभिआंतरीचे ( अभियांत्रिकीचे )
आमचे मेटलर्जी, कास्टींग, थ्रेडिंग, कटिंग मोल्डिंग चे ज्ञान " सखोल " वाढले.
ते ठीक आहे.. पण सगळ्यात महत्त्वाचं
In reply to अभिआंतरीचे ( अभियांत्रिकीचे ) by चौकटराजा
म्हणजे.. फोर्जींग बद्दल ज्ञान वाढलं का नाही?
ही घ्या डेफिनिशनः
Forging is a process involving shaping using localized compressive forces. Forging is often classified according to the temperature at which it is performed: "cold", "warm", or "hot".
;-)
हा हा हा
निळुभाऊ जबरा लेख. माझ्याकडुन तुला सप्रेम भेट ;-)
हॅ हॅ हॅ हॅ हॅ
साला लईच दंगा माजवून र्हायली पोरं टोरं. अजून विचारमोती पाजळायला हवेत. मिपावर चैतन्य सळसळायला मदत होईल :) :) :) :)
उनसं
In reply to हॅ हॅ हॅ हॅ हॅ by आदिजोशी
हल्ली तुमचा तो "उपेक्षित नवरे संघ" दुर्लक्षित पँथरसारखा थंड पडला काय?
confuse..
चर्चे चा रोख कळ ला नहि ......??????ह्या तुन बोध काय ?????
ह्म्म्म
In reply to confuse.. by गोंधळी
समलिंगी, भिन्नलिंगी एकाच वेळी अनेकलिंगी, परग्रहलिंगी असे सगळे संबंध नैसर्गीक आहेत.
सगळे संबंध नैसर्गीक आहेत
In reply to ह्म्म्म by आदिजोशी
सगळे संबंध नैसर्गीक आहेत तर नैतिक अनैतिक याचा हि खुलासा करावा.
"नैतिक अनैतिक याचा हि खुलासा
In reply to सगळे संबंध नैसर्गीक आहेत by गोंधळी
"नैतिक अनैतिक याचा हि खुलासा करावा."
म्हणजे हो काय भावु?
म्हणजे ???
In reply to "नैतिक अनैतिक याचा हि खुलासा by शैलेन्द्र
म्हणजे म्हणजे वा. पं. कु. का. उं. मा.
चांगले/वाईट.
हं?
In reply to म्हणजे ??? by गोंधळी
ही चर्चा आहे असं कोणी सांगितलं?
तुम्ही वाईट आहात इतकं तरी कळलं का?
.
In reply to हं? by Nile
फुल स्टॉप.