Skip to main content

'नट्स अँड बोल्ट्स'

लेखक Nile यांनी शनिवार, 10/03/2012 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
श्री आदिजोशी यांचे नट-बोल्ट तत्वज्ञान वाचले आणि बुद्धा बोधीवृक्षाखाली जे काय झालं असेल ते आम्हाला झालं. आधी आपण जोशींचे थोर विचार ऐकूयात.
एक नट आणि एक बोल्ट अशी स्पष्ट रचना निसर्गाने केली आहे. नट मधे नट अथवा बोल्ट मधे बोल्ट बसवण्याचा प्रयत्न करणं नैसर्गीक कसं होईल?
(दुवा) किती थोर नै! म्हणून आम्ही निसर्गाचा अभ्यास सुरु केला आणि आम्हाला काही धक्कादायक निरिक्षणं मिळाली. ती निरीक्षणं आम्ही तुमच्यासमोर चित्ररुपातच देऊ इच्छितो. १. एक बोल्ट दोन नट्स, एकाच बाजुने २. एक बोल्ट आणि दोन नट्स, एक पुढून एक मागून. ३. दोन्ही बाजूंनी वापरता येणारा नट ४. बोल्ट विथ अ होल (अ‍ॅन्ड अ नट टू)!! ५. नट आणी बोल्ट्स एकत्रच!! काही काही नट्स आणि बोल्ट्स तर इतके भयानक होते की ते फोटो इथे देणं मला सभ्यतेला अनुसरून वाटत नाही. त्याशिवाय काही भन्नाट नट्स आणि बोल्ट्स बनविण्याची कल्पनाही आम्हाला चाटून गेली. पण निसर्गाचा हा भन्नाट चमत्कार पाहून एक विचार आमच्या मनात आल्याशिवाय रहावला नाही: Nature has gone nuts!!

वाचने 7225
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

म्हणून आम्ही निसर्गाचा अभ्यास सुरु केला आणि आम्हाला काही धक्कादायक निरिक्षणं मिळाली
श्या प्रकारची "nuts and bolts" निसर्गात मिळतात?? फोटोन वरून तर हे मानव निर्मित वाटत आहे..ते हि विदेशी कंपन्यान मधील.. :P

तुंम्ही नीट पाहीले तर ते नट आणि बोल्ट असेच कॉम्बिनेशन आहेत. पण नटमध्ये नटच आणि बोल्टमध्ये बोल्टच असे नाही; असे होणे अशक्य आहे. आणि तसे करायचेच असल्यास त्यातील एकाला भिन्न पक्षाचा गुणधर्म द्यावा लागेल. उदा.= नटमध्ये बोल्ट्चा आकार देणे किंवा मग बोल्टला नटचा साचा देणे. ;) थिंक हटके सो नथिंग इज इम्पॉसिबल! ;) ;)

म्हणून आम्ही निसर्गाचा अभ्यास सुरु केला
?
तुंम्ही नीट पाहीले तर ते नट आणि बोल्ट असेच कॉम्बिनेशन आहेत. पण नटमध्ये नटच आणि बोल्टमध्ये बोल्टच असे नाही;
+१, सहमत. वरील सर्व चित्रांत दाखवलेले नट आणि बोल्ट्स हे मानवनिर्मीत दिसताहेत, असो तसाही आमचा निसर्गाचा अभ्यास कमीच हो, सिमेंच्या जंगलात वाढलो ना आम्ही. :)

धागा रोचक वाटला. नट-बोल्ट कॉबीनेशन हे २ वस्तु घट्टपणे एकत्र बांधण्यासाठी वापरात, शक्यतो २ वस्तुंमध्ये दुरावा अगर अंगत असु नये ह्यासाठी नट-बोल्ट कॉब्मीनेशनचा वापर करतात, नात्यांचेही ( रिलेशन्स रिलेशन्स ) काहीसे तसेच नाही काय ? ;) 'शेवटी काय तर सोय महत्वाची' असा निष्कर्ष ह्यातुन काढता येऊ शकतो. ;) - छोटा डॉन

निळ्यांनी नट आणि बोल्ट कॉम्बीनेशन असणारी दुर्मिळ अनैसर्गिकतेची अमुलाग्र आणि हलकट माहीती देऊन आमच्या डोक्याचे जे नटबोल्ट ढिले केले त्याबद्दल समस्त मिपा तर्फे त्यांचा सत्कार करण्यात येत हाये! ही शाल हे श्रीफळ आन् ही फुल न्हाय फुलाची पाकळी (टीपः- पाकळी ऐवजी अख्ख लाल गुलाबच देणार होतो पण ते उगीच "अग्गs!!" सारख अनैसर्गिक दिसल असत!) अवांतर वजा सुचना=> सदर साहीत्य मिपावरच्याच एका सदस्यांकडून तात्पुरते (सेकंड हॅन्ड) उसने घेतलेले असल्याने कार्यक्रम समाप्तीनंतर निळ्यांनी हे सामान लग्गेच आंम्हास गुपचुप परत आणून द्यायचे आहे. पाकळी हवी तर खिशातून घेऊन जाऊ शकता! ;)

चला या निमित्ताने का होईना नायल्याला बोर्डावर आणले म्हनुन आदी जोशी यांचे आभार मानायला हवेत. बाकी तुम्हा दोघाच्या तत्वज्ञानाने माझ्या भवती ही प्रकाशाच वलय दिसुन राहिलय असं माझा एल कलीग म्हणत होता.

In reply to by गणपा

अवांतराकरता मालकांनी खव आणि व्यनीची सोय केली आहे. कृपया धाग्यावरचं अवांतर आवरा! (अरे कोणी संपादक इथे कारवाई करेल काय?) ;-) मरतंय आता...

In reply to by पैसा

आधी पर्‍यासारख्यांचा धुडगूस थांबवा की! (मराठी संस्थळांवर पाशवी संपदकणींची टक्केवारी इतकी जास्त का असा धागा सुरु करावा म्हणतो!) ;-)

बाब्बौ, एवढ्या प्रकारचे नट्स पाहून आता कुठे मला 'नमन नटवरा, विस्मयकारा'चा खरा अर्थ समजला ;)

In reply to by नंदन

कोटीकेसरी, तुम्ही काय स्क्रूड्रायव्हर घेऊन बसला होतात का? बाकी आमचा निळ्या ना बाकी... हुशारच!

नट असे असतील तर नटी कशी असेल ? त्याची काही चित्रं देता येतील का ? आणि नटमध्ये बोल्ट फिरवुन फिरवुन घालावे लागतात ना ?

In reply to by राजेश घासकडवी

तांत्रिक ज्ञान पाजळण्याचा प्रयत्न क्षीण आहे, तरीही हहपुवा झाली आहे. म्हणजेच, हहपुवा होण्याचे कारण काही तरी वेगळेच आहे. काय आहे ते? :)

In reply to by चौकटराजा

म्हणजे.. फोर्जींग बद्दल ज्ञान वाढलं का नाही? ही घ्या डेफिनिशनः Forging is a process involving shaping using localized compressive forces. Forging is often classified according to the temperature at which it is performed: "cold", "warm", or "hot". ;-)

साला लईच दंगा माजवून र्‍हायली पोरं टोरं. अजून विचारमोती पाजळायला हवेत. मिपावर चैतन्य सळसळायला मदत होईल :) :) :) :)

In reply to by गोंधळी

समलिंगी, भिन्नलिंगी एकाच वेळी अनेकलिंगी, परग्रहलिंगी असे सगळे संबंध नैसर्गीक आहेत.

In reply to by गोंधळी

"नैतिक अनैतिक याचा हि खुलासा करावा." म्हणजे हो काय भावु?

In reply to by गोंधळी

ही चर्चा आहे असं कोणी सांगितलं?
चांगले/वाईट.
तुम्ही वाईट आहात इतकं तरी कळलं का?