दि 22 ऑक्टोबर 2011ला बातमी आली की, कॅप्टन राव स्वर्गवासी झाले आणि कॅप्टन रावांच्या विस्मृतींचा उजाळा झाला. पांढरेशुभ्र भुरभूरीत केसांचं टोपलं. निळसर झाक असलेले डोळे. कानाच्या खालपर्यंत आलेले कल्ले, चेहऱ्यावर सदैव हसरा भाव असे शिडशिडीत बांधा असलेल्या एक्याण्णवावं वर्ष चालू असतानादेखील कॅप्टन रावांचा उत्साह तरूणाला लाजवेल असा होता. स्फुर्तिदायक भाषेचा वापर करण्याची शैली अनोखी होती. अगदी दोन आठवड्यांपूर्वी ते तीन जिने चढून अत्री आणि अनुसूया यांच्या नाडीग्रंथांच्या आशिर्वादासाठी चोपन्न पायऱ्या चढून आले. तेव्हा महर्षी त्यांना आशिर्वाद देताना म्हणाले, अरे तरूण माणसा, तुला आंतरिक आनंद हवाय ना? कर या नाडीग्रंथांची सेवा... पहा काय होतं ते... आणि खरोखरच ते एक्याण्णव वर्षांचे तरूण महर्षींच्या ताडपत्रांच्या कथनाकडे बघून म्हणाले, ‘यस सर... आय विल डू इट!’... तो त्यांचा आवाज त्यामधील गुढार्थ तेव्हा कळला नव्हता. नंतर त्यांच्या अस्खलित इंग्रजीमधून त्यांनी नाडीग्रंथांचा केलेला गौरव जेव्हा व्हिडीओवर अवतरित झाला, तेव्हा त्यांचे डोळे, त्यांच्या कथनातील आदरभाव हा आज एक चर्चेचा विषय आहे.

माहोल शेरलॉकहोम्स च्या एका गुप्तहेर कथेचा होता. शेरलॉक होम्सनी त्यांचा तो बाकदार पाईप तोंडात धरून एक मॅचबॉक्समधून काडी काढून पाईप पेटवला आणि वॉटसनकडे बघून त्यांनी म्हटलं, ‘आता बहुतेक दारावर टकटक होईल’. तिकडे दारावर टक-टक! आणि पुढे ती कथा चालू राहिली. कथा ऐकताना त्यातील स्कॉटिश, ब्रिटिश आणि काही कॅरॅक्टरर्सचे स्पॅनिश आणि ग्रीक संवाद कॅप्टन रावांच्या तोंडातून त्या त्या भाषेच्या बाजातून इंग्रजी येत असताना आम्ही जणू काही वॉटसनच्या बरोबरच शेरलॉकच्या लंडनमधील 221बी, बेकर स्ट्रीटमधील केलेल्या प्रत्येक कृतीच्या पासून अगदी पाच फुटावर असल्याचा आभास निर्माण होत होता. राव कथाकथनाच्या त्या धुंद वातावरणाचे निर्माते होते. आम्हाला ते त्या काळात घेऊन गेले. शेरलॉक होम्सनी सोडवलेला तो किचकट रहस्याचा गुंता अगदी सहजपणे सुटला नी आम्ही प्रचंड आवेगाने टाळ्या वाजवून कॅप्टन साहेबांच्या त्या कथाकथनाचा, त्यातील शैलीचा, प्रत्येक तपशिलाचा आणि त्यामधील आणि त्यामधील रहस्याचा इतके लीलया कथन कसे झाले, कसे करतात असे म्हणत चर्चा करत राहिलो.
खरतर कॅप्टन रावांचा हा एक आगळा छंदच. माझा भाऊ प्रकाश म्हणाला, ‘गेले कित्येक वर्ष मी माझ्या संध्याकाळी कॅप्टन रावांच्या समवेत बसून अनेक अशा साहित्यिक कलाकृती ऐकून कानात साठवल्या. कथनासाठी महत्वाच्या भागांचा अतिशय सूक्ष्म उल्लेख करुन देणारी त्यांची प्रचंड स्मरणशक्ती, घटना ज्या भागात होते त्या भागातील भौगोलिक आणि सांस्कृतिक परिप्रेक्षाचे आकलन नीट व्हावे म्हणून त्याचा सदैव कटाक्ष. आधून मधून काही क्वचित ठिकाणी स्पॅनिश भाषेच्या संवादाची उकल करून सांगताना मराठी कथनातून, ‘आता अस बघा बर का’.. म्हणायची स्टाईल. मनात घर करुन राहयची’.
’एखादी कांदबरी आणून द्याना. छान कथा सांगायसाठी असेल तर’ आणि नव नव्या कलाकृतींची ओळख आम्हाला होई. प्रकाश मला सांगताना म्हणाला होता. ‘आमचा कांदबरी कथनाचा कार्यक्रम चालू राहिला. समोर ग्लासमध्ये व्हिस्कीचे पेग, त्यात सोडा पण बर्फ नाही. थोडसं चॅवमॅव आणि आसपास त्यांनी जलरंगात तयार केलेली निसर्गचित्रं. काही पूर्ण होऊन तयार, काही थोड्याश्या टचच्या प्रतिक्षेत, तर काही आपल्या गालांवरून गोंजारून निसर्गाने नटायला सज्ज झालेले कॅनव्हास ब्रशच्या नाजुक फटकाऱ्यांची वाट पाहताहेत’. कॅप्टन रावांच्या रंगवलेल्या रंगात ओढलेल्या ब्रशची. त्यांच्या निसर्गचित्रांची एक वेगळीच आगळी शैली आहे. त्यात कुठेच माणूस दिसत नाही. एक वाट, थोडासा चढाव किंवा टेकडीवजा डोंगर, डोंगराच्या आसपास हिरवळ त्या पायवाटेतून जाण्याकरता निर्माण झालेला कोरड्या जमीनाचा भाग आणि आकाशातील विविध ...... विविध मोसमांच्या छटा परंतु खासकरून आभाळलेलं, पाण्याने ओथंबलेल्या ढगांचं आभाळ, असा थोडासा मंद सांयकाळचा निसर्ग. ही त्यांच्या चित्रातील वैशिष्टय. हिरव्या रंगाचा भरपुर उपयोग हाही त्याचा भाग. कॅप्टन रावांचा एक्याण्णव्या वर्षाचा प्रवास सांगताना ते म्हणाले होते, ‘मला एक बहिण आणि दोघं तिघं भाऊ. जाता आता फक्त मी आणि माझा एक मोठा थोरला भाऊ असे उरलोयत. तो तिकडे कॅनडात असतो, मी इथे एकटा.

भाग १ समाप्त.
लेखन काल २४ ऑक्टोबर २०११.
मिसळपाव

प्रतिक्रिया
सर्व तथाकथित "मान्यवर व
सर्व तथाकथित "मान्यवर व बहुचर्चित " व्यक्तींच्या पुण्यातीथ्या,जयंत्या,लग्नाचे वाढदिवस ह्या साठी एक वेगळे सादर सुरु करावे अशी नम्र विनंती आहे ...जेणे करून "साहित्य" ह्या सदरावर साहित्यच वाचायला मिळेल...
तरीही तुमचे कॅप्टन कशात होते कॅप्टन ?? आर्मी ,नेवी ली मेर्चंत नेवी कि गोष्टी सांगण्यात कि वातावरण निर्मिती करणायत ?
चांगली ओळख. त्यांच्या
चांगली ओळख.
त्यांच्या चित्रांचे फोटो दिले तर व्यक्तिमत्त्व समजून घेणे सोपे जाईल...
जरूर
In reply to चांगली ओळख. त्यांच्या by कवितानागेश
माउलीजी,
जरूर देईन.
त्यांच्या चित्रांचे फोटो दिले
In reply to चांगली ओळख. त्यांच्या by कवितानागेश
त्यांच्या चित्रांचे फोटो दिले तर व्यक्तिमत्त्व समजून घेणे सोपे जाईल..
माउली 'हात दाखवुन अवलक्श्ण' म्हणतात ते हेच... ;)
माझ्या प्रतिसादांवरुन माझ्या वयाचा सुद्धा पत्ता मुळीच लागत नाही मुळी... :bigsmile:
लिखाण छान. पण नाडीपट्टीचा
लिखाण छान. पण नाडीपट्टीचा उल्लेख अस्थानी वाटतोय.
सिनेमातही आता नाही का
In reply to लिखाण छान. पण नाडीपट्टीचा by प्रचेतस
सिनेमातही आता नाही का क्रिश बोर्न व्हि टा पीत?
:)
In reply to सिनेमातही आता नाही का by गवि
:)
मार्मिक
In reply to सिनेमातही आता नाही का by गवि
__/\__
कॅप्टन आनंद राव (Capt Annand
कॅप्टन आनंद राव (Capt Annand Rowe) एक मनस्वी व्यक्तिमत्व
इंग्लिश मधे नाव लिहीण्याचे प्रयोजन काय..?
पक पक राव किती पक पक करताय..
In reply to कॅप्टन आनंद राव (Capt Annand by पक पक पक
पक पक राव किती पक पक करताय.. :D
का हो ते तुमची नाडी फुकट
In reply to पक पक राव किती पक पक करताय.. by चेतनकुलकर्णी_85
का हो ते तुमची नाडी फुकट पहाणार आहेत का.. ;)
नाडीचा जमान गेला हो "elastic"
In reply to का हो ते तुमची नाडी फुकट by पक पक पक
नाडीचा जमान गेला हो "elastic" चा आलाय... :bigsmile: :bigsmile: :bigsmile:
नाडीचा जमान गेला हो "elastic"
In reply to नाडीचा जमान गेला हो "elastic" by चेतनकुलकर्णी_85
नाडीचा जमान गेला हो "elastic" चा आलाय...
मग ते त्यांनाच सांगा ना ;) तुमच इलेस्टीक लुज पड्लय ते.. :bigsmile: :bigsmile: :bigsmile:
......................../\...
In reply to नाडीचा जमान गेला हो "elastic" by पक पक पक
......................../\.................................
की नाडीची आठवण येईल.
In reply to नाडीचा जमान गेला हो "elastic" by पक पक पक
कमरेला बांधयच्या नाडीचा जमाना गेला. मी पण विलास्टिक वापरतो.
पण नोकरी गेली , छोकरी गेली, परदेसवारी गेली की नाडीची आठवण येईल.
नोकरी गेलीनाही जाणारछोकरी
In reply to की नाडीची आठवण येईल. by शशिकांत ओक
नाही जाणार
ती बी नाय जाणार ;) ;-) :wink:
हौस फिटलिय
आता बोला..
अवांतर : अच्छा म्हणून कॅप्टन साहेबाना नाडीचा अनुग्रह घ्यावासा वाटला होय...
कमरेला बांधयच्या नाडीचा जमाना
In reply to की नाडीची आठवण येईल. by शशिकांत ओक
कमरेला बांधयच्या नाडीचा जमाना गेला. मी पण विलास्टिक वापरतो
मग ते लु़ज पड्ल्यावर काय करता आपण..? चे कुं ना पण सांगा..
:bigsmile: :bigsmile: :bigsmile:
पण नोकरी गेली , छोकरी गेली, परदेसवारी गेली की नाडीची आठवण येईल.
घ्या...
:tongue: :tongue: :tongue:
कुणाच्या खांद्यावर कुणाचे
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे..!,कुणाचे ओझे..! ;-)
(युद्ध सज्ज) अत्रुप्त आत्मा... ;-)
