✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एकात एक...

ग
गवि यांनी
Wed, 03/07/2012 - 18:05  ·  लेख
लेख
भात लावायचाच ना भांड्यात.. मूठभर डाळ त्यातच टाकू.. होऊन जाईल एकात एक.. भेकरटाप्रमाणे चहाच्या कपावर धरलेलं ओलंगिच्च बिस्कीट.. लपलपत पत्तकन चहात पडण्याची वाट पाहताना पुन्हा चटका मिळणार म्हणून शहारलेलं.. ते पडल्यानंतरही इकडे पेपरात रुतलेली बुबुळं तिथेच भिरभिरत राहतात.. चहासोबत पेपरही संपवू.. होऊन जाईल एकात एक.. आईची एकसष्ट पूर्ण झाली.. विधीबिधीवर विश्वास नाही पण सगळ्यांना बोलवायला हवंय एकदा....गेट टुगेदर.. रविवार बघून एकदाच एकत्र..बाहेरच कुठेतरी थाळी घालू सगळ्यांना..थाळी म्हणजे फिक्स बिल.. नव्या फ्लॅटची पार्टी, गाडीचीही मागताहेत साले कधीचे... आणि एकसष्टीपण.. होऊन जाईल एकात एक.. बायकोसोबत एरवी एकांत कुठला मिळायला... गणपतिपुळ्याला जाऊ.. समुद्राकाठी रिसॉर्ट...व्हरांड्यात बियरमधून दिसणारा सोनेरी समुद्र..अन डोळ्यांना थंडावा.. दगदगीतून अनवाईंड व्हायला हवं...स्वतःला शोधायला हवं.. ....देऊळही आहे.. जोडीने दर्शनही करु.. होऊन जाईल एकात एक.. पैसा.. बायकोपोरं..कामधंदा..मरातब.... लाँग ड्राईव्हज, वीकेंड गेटवेज.. पॉवर पॉईंट अन कॉन्फरन्सेस.. वर्क लाईफ बॅलन्स.. इंटरपर्सनल इफेक्टिव्हनेस.. आर्ट ऑफ लिव्हिंग... प्लेझर ऑफ गिव्हिंग.. आहारनियंत्रण.. योगासनं.. डूईंग डिफरंट थिंग्ज...आणि डूईंग थिंग्ज डिफरंटली.. उपवास आणि श्वासोच्छवास.. या सर्वांच्या गजबजाटात जगणंही उरकू ...हसत हसत.. लाफ्टर थेरपी.. होऊन जाईल.. एकात एक..
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
जीवनमान
राहणी
भूगोल
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिसाद
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
15098 वाचन

💬 प्रतिसाद (61)

प्रतिक्रिया

व्वा!!

मी-सौरभ
Wed, 03/07/2012 - 18:09 नवीन
मस्त जमलयं (नेहमीप्रमाणे) :) (एकात अजून एक असावा असे दिसणार्‍या गविंचा पंखा)
  • Log in or register to post comments

प्र का टा आ

विजुभाऊ
Wed, 07/25/2012 - 12:46 नवीन
प्र का टा आ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

भौ, प्र का टा म 'घा' क????

प्यारे१
Wed, 07/25/2012 - 12:57 नवीन
भौ, प्र का टा म 'घा' क???? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

नेहमीप्रमाणेच.. गवि रॉक्स!!!

प्रचेतस
Wed, 03/07/2012 - 18:12 नवीन
नेहमीप्रमाणेच.. गवि रॉक्स!!!
  • Log in or register to post comments

छानच

सांजसंध्या
Wed, 03/07/2012 - 18:16 नवीन
छानच :)
  • Log in or register to post comments

छान!

प्रदीप
Wed, 03/07/2012 - 18:23 नवीन
.
  • Log in or register to post comments

+१

तिमा
गुरुवार, 03/08/2012 - 12:03 नवीन
असेच म्हणतो, छान गवि टच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

गवि साहेब, अप्रतिम पण रस्ता चुकलात...

निश
Wed, 03/07/2012 - 18:23 नवीन
गवि साहेब, अप्रतिम पण रस्ता चुकलात, खर तर हि मुक्त काव्य आहे ते काव्य ह्या गटात हव होत. राग मानु नये
  • Log in or register to post comments

असहमत.. हे ही एकात एक आहे.

गणपा
Wed, 03/07/2012 - 21:26 नवीन
असहमत.. हे ही एकात एक आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

वॉव

चिमी
Wed, 03/07/2012 - 18:24 नवीन
मस्तच तुमच्या पंख्यांमधे अजुन एक -चिमी :-)
  • Log in or register to post comments

अ प्र ति म !!!!

राजो
Wed, 03/07/2012 - 18:30 नवीन
अ प्र ति म !!!!
  • Log in or register to post comments

गवि,

प्रास
Wed, 03/07/2012 - 18:43 नवीन
मस्त लिहिलयस रे!
पैसा.. बायकोपोरं..कामधंदा..मरातब.... लाँग ड्राईव्हज, वीकेंड गेटवेज.. पॉवर पॉईंट अन कॉन्फरन्सेस.. वर्क लाईफ बॅलन्स.. इंटरपर्सनल इफेक्टिव्हनेस.. आर्ट ऑफ लिव्हिंग... प्लेझर ऑफ गिव्हिंग.. आहारनियंत्रण.. योगासनं.. डूईंग डिफरंट थिंग्ज...आणि डूईंग थिंग्ज डिफरंटली.. उपवास आणि श्वासोच्छवास.. या सर्वांच्या गजबजाटात जगणंही उरकू ...हसत हसत.. लाफ्टर थेरपी..
हे तर मनाला जास्त भिडलं. "बाकी होऊन जाईल... एकात एक" हे जर धृवपद मानलं तर एकूण लिखाणाचा बाज या गाण्यासारखा वाटतोय - * काय बोल्तो? ;-)
  • Log in or register to post comments

मस्त

इरसाल
Wed, 03/07/2012 - 18:44 नवीन
सुंदर आणी सुरेख..............
  • Log in or register to post comments

कॅमेरा असलेलाच मोबाईल

अन्या दातार
Wed, 03/07/2012 - 18:55 नवीन
कॅमेरा असलेलाच मोबाईल घेऊ दुसरा कॅमेरा घ्यायची गरज नाही. होऊन जाईल एकात एक या सगळ्या एकात एक करता येणार्‍या गोष्टींना मिपा किंवा तत्सम मराठी संस्थळे अपवाद असावीत. कुठेही प्रतिसाद व लेख एकात एक आढळणार नाहीत
  • Log in or register to post comments

मस्त!

सोत्रि
Wed, 03/07/2012 - 18:59 नवीन
गवि रॉक्स! - (जगणं उरकणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments

सुंदर.

तर्री
Wed, 03/07/2012 - 19:03 नवीन
गवि घरण्याला साजेसे लेखन. कविता करित होतोत की लेख ? जमले आहेच एकात एक .
  • Log in or register to post comments

मस्त

अमितसांगली
Wed, 03/07/2012 - 19:08 नवीन
लय भारी...आवडल सगळ एकात एक
  • Log in or register to post comments

मस्त...

धन्या
Wed, 03/07/2012 - 19:38 नवीन
मस्त...
डूईंग डिफरंट थिंग्ज...आणि डूईंग थिंग्ज डिफरंटली..
आताच फुड कोर्टमधलं अक्षरधाराचं पुस्तक प्रदर्शन पाहून आलो. ढीगांनी दिसली अशी पुस्तकं. :)
  • Log in or register to post comments

वॉव

मन१
Wed, 03/07/2012 - 19:44 नवीन
मस्त...
  • Log in or register to post comments

गवि टच...

वपाडाव
Wed, 03/07/2012 - 19:50 नवीन
गवि टच...
  • Log in or register to post comments

टिपिकल गवि.... नेहमीप्रमाणे

सुहास झेले
Wed, 03/07/2012 - 20:55 नवीन
टिपिकल गवि.... नेहमीप्रमाणे अफलातून लेखन :) :)
  • Log in or register to post comments

छान.

रेवती
Wed, 03/07/2012 - 21:20 नवीन
छान.
  • Log in or register to post comments

छान नेहमीप्रमाणेच

जाई.
Wed, 03/07/2012 - 21:23 नवीन
छान नेहमीप्रमाणेच
  • Log in or register to post comments

योगायोगवादी काव्य...

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/07/2012 - 22:37 नवीन
योगायोगवादी काव्य... :-)
  • Log in or register to post comments

आवडेश

जयवी
गुरुवार, 03/08/2012 - 00:15 नवीन
आवडेश :)
  • Log in or register to post comments

फारच छान

धनंजय
गुरुवार, 03/08/2012 - 01:00 नवीन
फारच छान
  • Log in or register to post comments

मस्त

मिसळ
गुरुवार, 03/08/2012 - 01:03 नवीन
थोड्या शब्दात बरच काहि सांगून जाणारं!
  • Log in or register to post comments

छान

नंदन
गुरुवार, 03/08/2012 - 01:31 नवीन
नेहमीप्रमाणेच अप्रतिम. मोजके, थेट शब्द; नेमकी वाक्यं. (या स्फुटावर कोणी '+१' असा प्रतिसाद दिला, तर तो काव्यगत न्याय म्हणावा लागेल :))
  • Log in or register to post comments

+१

पैसा
गुरुवार, 03/08/2012 - 08:01 नवीन
+१ झालं एकात एक!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

गवि, मस्त लिहिलंय, धन्यवाद.

५० फक्त
गुरुवार, 03/08/2012 - 07:29 नवीन
गवि, मस्त लिहिलंय, धन्यवाद.
  • Log in or register to post comments

छान

पप्पु अंकल
गुरुवार, 03/08/2012 - 08:11 नवीन
तुम्ही लिहीत रहा आम्ही वाचतोय नव्हे आवडीने वाचतोय……
  • Log in or register to post comments

छान!

नगरीनिरंजन
गुरुवार, 03/08/2012 - 08:31 नवीन
कमीतकमी शब्दांत बरोबर नस पकडण्याची हातोटी विलक्षण आहे! आवडले. या एकात एकच्या मागे सतत पैसा वाचवणे हा उद्देश असतो का? भरभरून जगण्याऐवजी आपण सतत कॅल्क्युलेटीव्ह का असतो वगैरे. बरेच दिवस हा विषय छळत होताच.
  • Log in or register to post comments

- वेळ -

वपाडाव
गुरुवार, 03/08/2012 - 14:42 नवीन
या एकात एकच्या मागे सतत पैसा वाचवणे हा उद्देश असतो का?
ननि, पैश्यासोबतच वेळही वाचत असावा म्हणुन कदाचित...
भरभरून जगण्याऐवजी आपण सतत कॅल्क्युलेटीव्ह का असतो वगैरे
सहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

हो ना

कापूसकोन्ड्या
Fri, 03/09/2012 - 19:08 नवीन
हो ना पैसा वाचतो नी वेळ ही ! होउन जाउन द्या एकात एक !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

खल्लास!!

सहज
गुरुवार, 03/08/2012 - 08:44 नवीन
फारच सुंदर कविता गवि!! फारएन्डची क्रांती, चिगोची ईशान्य फॅक्ट फाईल, विमुक्ताचे पुनरागमन, मितानतैंच्या महत्त्वाच्या विषयावर सुरु झालेल्या लेखांची सुरवात, मिपाकर बंदा-खुर्दांना सगळ्यांनाच दंडवत , क्या बात क्या बात क्या बात, ग्रँड सॅल्युट द्यायचा होता. होउन जाउ दे एकात एक! सहज चक्रवर्ती डान्स मिपा डान्स!
  • Log in or register to post comments

सहजमामांना सन्यास सोडायला भाग

प्रभो
गुरुवार, 03/08/2012 - 12:22 नवीन
सहजमामांना सन्यास सोडायला भाग पाडलं म्हणजे बघा... गवि, कविता आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

मस्त

सर्वसाक्षी
गुरुवार, 03/08/2012 - 10:06 नवीन
एकिकरण आवडल
  • Log in or register to post comments

छानच.

किसन शिंदे
गुरुवार, 03/08/2012 - 10:09 नवीन
तुमचं कोणतंही लेखन असो, आपल्याला तर जाम आवडतं ब्वा.
  • Log in or register to post comments

मस्त

sneharani
गुरुवार, 03/08/2012 - 11:04 नवीन
मस्त लिहलय!! :)
  • Log in or register to post comments

अप्रतीम!!

श्रीरंग
गुरुवार, 03/08/2012 - 11:27 नवीन
अप्रतीम!! :)
  • Log in or register to post comments

आवडली!

फारएन्ड
गुरुवार, 03/08/2012 - 12:39 नवीन
त्या "म्हणून" प्रमाणेच ही ही आवडली. तेथेही कोणीतरी लिहीले होते त्याप्रमाणे कमी शब्दात जबरी इफेक्ट!
  • Log in or register to post comments

बरेच दिवसात कोणाशी मनमोकळा

विजुभाऊ
गुरुवार, 03/08/2012 - 14:14 नवीन
बरेच दिवसात कोणाशी मनमोकळा बोललो नाहिय्ये. मिपावर लिहीन म्हणतो....होऊन जाईल एकात एक.........
  • Log in or register to post comments

खूप दिवस आपलं चर्चेचं

गवि
गुरुवार, 03/08/2012 - 14:19 नवीन
खूप दिवस आपलं चर्चेचं गुर्‍हाळ चाललंय.. शनिवार-शुक्रवार-रविवार..कधी ना कधी भेटू.. पण आलीच नाही वेळ अजून.. बोलायचंय बसून याची खात्री बाळगा.. आता असं करा ना... काढा एखादं काम माझ्या गावी...मग त्यानंतर बसू रात्री.. कामही होईल..बसणंही होईल.. होऊन जाईल एकात एक.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

जिंदगी मै तुमसे कभी रूबरू

विजुभाऊ
गुरुवार, 03/08/2012 - 14:27 नवीन
जिंदगी मै तुमसे कभी रूबरू मिलना चाहता था. तुम राह देखती रही... मै अपना आशियां बसाता रहा. जिंदगी जीने केलीये होती है ये भूल गया जीने की तैय्यारीयो मे सारी जिंदगी बीत गयी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

जिंदगी मै तुमसे कभी रूबरू

विजुभाऊ
गुरुवार, 03/08/2012 - 14:27 नवीन
जिंदगी मै तुमसे कभी रूबरू मिलना चाहता था. तुम राह देखती रही... मै अपना आशियां बसाता रहा. जिंदगी जीने केलीये होती है ये भूल गया जीने की तैय्यारीयो मे सारी जिंदगी बीत गयी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मस्त

स्मिता.
गुरुवार, 03/08/2012 - 14:21 नवीन
छान लिहिलंय. आजकाल सगळ्याच गोष्टी जेवध्या एकात एक होतिल तेवढ्या करयाची सवयच लागलीये.
  • Log in or register to post comments

मानला गवि

कपिलमुनी
गुरुवार, 03/08/2012 - 14:35 नवीन
तुमच्या प्रतिभा ज्या सहजतेने विहारत गगनी पोचली आहे ते बघुन गगन विहारी या नावाची आठवण झाली ..
  • Log in or register to post comments

मुक्तक आवडलं.. मध्यम

मराठमोळा
गुरुवार, 03/08/2012 - 16:20 नवीन
मुक्तक आवडलं.. मध्यम वर्गीयांच्या ठराविक रक्कम महिन्याकाठी मिळणार्‍या चौकटीतल्या आयुष्यात असेच प्रसंग वारंवार येत राहतात. (आता एकात एक करुन मध्यम वर्गीय कोन यावर दंगा झाला नाही म्हणजे मिळवली ;) )
  • Log in or register to post comments

गवि नि कवि हे ही

चौकटराजा
गुरुवार, 03/08/2012 - 16:32 नवीन
गवि नि कवि हे ही एकात एकच आहे की ! विधाता कोब्रा असला पाहिजे त्याने एकाच माणसात दोन वल्ली निर्माण करून म्हटले पृथ्वीवर झाली गर्दी माणसांची ना पार्कींगला जागा घाई वहाने उचलण्याची गवि नावाचा लेखक निर्मावा त्याच वेळी कविला त्यात सामावावा म्हणजे साधले की नाही एकात एक ??
  • Log in or register to post comments

मानगये... चौकटराजा...

वपाडाव
गुरुवार, 03/08/2012 - 16:44 नवीन
मानगये... चौकटराजा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा