एकात एक...
भात लावायचाच ना भांड्यात..
मूठभर डाळ त्यातच टाकू..
होऊन जाईल एकात एक..
भेकरटाप्रमाणे चहाच्या कपावर धरलेलं ओलंगिच्च बिस्कीट..
लपलपत पत्तकन चहात पडण्याची वाट पाहताना पुन्हा चटका मिळणार म्हणून शहारलेलं..
ते पडल्यानंतरही इकडे पेपरात रुतलेली बुबुळं तिथेच भिरभिरत राहतात..
चहासोबत पेपरही संपवू..
होऊन जाईल एकात एक..
आईची एकसष्ट पूर्ण झाली.. विधीबिधीवर विश्वास नाही पण सगळ्यांना बोलवायला हवंय एकदा....गेट टुगेदर..
रविवार बघून एकदाच एकत्र..बाहेरच कुठेतरी थाळी घालू सगळ्यांना..थाळी म्हणजे फिक्स बिल..
नव्या फ्लॅटची पार्टी, गाडीचीही मागताहेत साले कधीचे... आणि एकसष्टीपण..
होऊन जाईल एकात एक..
बायकोसोबत एरवी एकांत कुठला मिळायला...
गणपतिपुळ्याला जाऊ.. समुद्राकाठी रिसॉर्ट...व्हरांड्यात बियरमधून दिसणारा सोनेरी समुद्र..अन डोळ्यांना थंडावा..
दगदगीतून अनवाईंड व्हायला हवं...स्वतःला शोधायला हवं..
....देऊळही आहे.. जोडीने दर्शनही करु..
होऊन जाईल एकात एक..
पैसा.. बायकोपोरं..कामधंदा..मरातब....
लाँग ड्राईव्हज, वीकेंड गेटवेज.. पॉवर पॉईंट अन कॉन्फरन्सेस..
वर्क लाईफ बॅलन्स.. इंटरपर्सनल इफेक्टिव्हनेस..
आर्ट ऑफ लिव्हिंग... प्लेझर ऑफ गिव्हिंग..
आहारनियंत्रण.. योगासनं..
डूईंग डिफरंट थिंग्ज...आणि डूईंग थिंग्ज डिफरंटली..
उपवास आणि श्वासोच्छवास..
या सर्वांच्या गजबजाटात जगणंही उरकू ...हसत हसत.. लाफ्टर थेरपी..
होऊन जाईल.. एकात एक..
वर्गीकरण
प्रतिक्रिया
व्वा!!
प्र का टा आ
भौ, प्र का टा म 'घा' क????
नेहमीप्रमाणेच.. गवि रॉक्स!!!
छानच
छान!
+१
गवि साहेब, अप्रतिम पण रस्ता चुकलात...
असहमत.. हे ही एकात एक आहे.
वॉव
अ प्र ति म !!!!
गवि,
मस्त
कॅमेरा असलेलाच मोबाईल
मस्त!
सुंदर.
मस्त
मस्त...
वॉव
गवि टच...
टिपिकल गवि.... नेहमीप्रमाणे
छान.
छान नेहमीप्रमाणेच
योगायोगवादी काव्य...
आवडेश
फारच छान
मस्त
छान
+१
गवि, मस्त लिहिलंय, धन्यवाद.
छान
छान!
- वेळ -
हो ना
खल्लास!!
सहजमामांना सन्यास सोडायला भाग
मस्त
छानच.
मस्त
अप्रतीम!!
आवडली!
बरेच दिवसात कोणाशी मनमोकळा
खूप दिवस आपलं चर्चेचं
जिंदगी मै तुमसे कभी रूबरू
जिंदगी मै तुमसे कभी रूबरू
मस्त
मानला गवि
मुक्तक आवडलं.. मध्यम
गवि नि कवि हे ही
मानगये... चौकटराजा...