मेल गिबसन या नटाची प्रमुख भूमिका असलेला आणि त्याच्या सदाबहार अभिनयाने तारून नेलेला सिनेमा - "What Women Want" मी काल डीव्हीडी वरती पाहीला. "अगं बाई अरेच्च्या" हा सिनेमा ज्या सिनेमापासून प्रेरणा घेऊन बनविला आहे, तो पहण्याची इच्छा बर्याच दिवसापासून मनात घोळत होती.
सिनेमाकडून माझ्या बर्याच अपेक्षा होत्या त्या मानाने मग तो ठीकठाकच वाटला. सिनेमाभर पाश्चात्य जगतातील प्रातिनिधिक स्त्रिया आणि त्यांचे मनोव्यापार उथळ आणि लॅकलस्टर रीतीने सामोरे येत राहतात.
निक (मेल गिबसन) हा कथानायक "MCP + Womanizer" आहे. आकर्षक व्यक्तीमत्वाच्या, देखण्या, मार्केटींग फर्ममध्ये एक्झिक्युटिव्ह असणार्या या पुरषाचा आपल्या पहील्या पत्नीबरोबर घटस्फोट झालेला असून, त्याला १५ वर्षाची मुलगी आहे. या मार्केटींग फर्ममध्ये एका मोठ्या पदावर नियुक्ती होता होता ते पद त्याच्या हातातून निसटते आणि डार्सी (हेलेन हंट) या महत्त्वाकांक्षी स्त्रीला देऊ केले जाते.
पुढे थोड्याच काळात एका अपघातात निक ला स्त्रियांच्या मनातील विचार ऐकू येऊ लागतात. प्रथम तो चक्रावून जातो आणि एका मानसोपचारतज्ञ स्त्री ची मदत घेतो. पण तिच्या सल्ल्याने तो या विचित्र गोष्टीचा वैयक्तिक लाभ करून घेण्याचे ठरवितो.
डार्सी शी स्पर्धा करता करता, तिचे अंतरंग जाणून घेत तो तिच्या प्रेमात पडतो का? हे विचित्र वरदान किती काळ त्याला लाभते आदि उत्तरे सिनेमा पाहील्यास मिळतील.
दिग्दर्शिकेने विविध स्तरातील स्त्रियांचे विचार मांडण्याचा प्रयत्न तर केला आहे पण माझ्या मते तो बराचसा अयशस्वी ठरला आहे. कारण स्त्रियांच्या भावनांना जो श्रीमंत पोत असतो, एक खोली आणि व्याप्ती असते, हळूवारता असते ती क्वचितच पकडीत आली आहे. काही मनोव्यापार विनोदी आहेत , काहींना करुणेची झालर आहे, काही रोखठोक जाब विचारणारे आहेत तर काहींना असुरक्षिततेची बोच आहे. पण अधिक वैविध्य आणता आले असते, अधिक खोली देता आली असती.
मला सिनेमातील संगीत आवडले. एका तुकड्यावर मेल गिबसनच्या ग्रेसफुल डान्सींग स्टेप्स आहेत. त्या अफलातून आहेत.
एकंदर मी १० च्या पट्टीवर ६ म्हणेन.
![]() |
| From |
वाचने
5369
प्रतिक्रिया
27
मिसळपाव

प्रतिक्रिया
छान! आणखी थोडं लिहीलं असतं तर
धन्यवाद यकु. नक्की पाहीन हे
In reply to छान! आणखी थोडं लिहीलं असतं तर by यकु
असेच म्हणतो.
In reply to छान! आणखी थोडं लिहीलं असतं तर by यकु
= लिटल मिस सनशाइन =
In reply to छान! आणखी थोडं लिहीलं असतं तर by यकु
ह्या वरिजनल शिनुमात नसणारं एक
In reply to = लिटल मिस सनशाइन = by वपाडाव
छान परिचय.
छान ओळख.
दिग्दर्शिकेला स्त्रियांचे
In reply to छान ओळख. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुळ कलाकृती कळवलीत...थेंकू...
छान ओळख!
बर्याच दिवसांपूर्वी पाहिलाय
फावा म्हणतोय....
त्रोटक पण चान धागा.
असंच म्हणतो.
In reply to त्रोटक पण चान धागा. by आत्मशून्य
+१
In reply to असंच म्हणतो. by इष्टुर फाकडा
व्हॉट विमेन वाँट याचे उत्तर
म्हणजे?
In reply to व्हॉट विमेन वाँट याचे उत्तर by नगरीनिरंजन
उत्तर सोपे आहे. एव्हरीथिंग.
In reply to म्हणजे? by मन१
व्हॉट विमेन वाँट
बोलोगे तो बोलाच
In reply to व्हॉट विमेन वाँट by सन्जोप राव
मस्तच जाहिराती!!
In reply to व्हॉट विमेन वाँट by सन्जोप राव
धन्यवाद...
पारच काशी केलीत सिनेमाची
-१
In reply to पारच काशी केलीत सिनेमाची by आदिजोशी
वाटलच म्हटल शुचितैंचा धागा
In reply to -१ by परिकथेतील राजकुमार
घोर निराशा!
मस्तच आहे परीक्षण .