✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

राजकारणी अन आपण.......... बरोबर ना ??

अ — अमितसांगली, Tue, 02/28/2012 - 20:21
भ्रष्टाचाराचे रोज नवे प्रकरण ....देशद्रोह्यांचे लांगुलचालन | जातीच राजकारण करण ....झोळी स्वताची भरण | देशाचे लचके तोडण ....चालू आहे ताठ मानेन | हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी | जवान उपाशी-कसाब तुपाशी ....खेळीतात सैनिकांच्या जीवाशी | नक्षलवाद्याना धरलय हाताशी ....वैर याचं भारतामातेशी | घुसलेत अनेक बांगलादेशी....कारवाई न करण्याच ठरवलय मनाशी | हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी | स्त्री असुरक्षित....बालके कुपोषित | गर्भहत्या तेजीत.....तरुण बेरोजगारीच्या खाईत | शेतकऱ्यांना कापत.....स्वारी चालली देश लुटत | हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी | महिन्यातून एकदा तिहाराची वारी.....समजतात स्वताला जनतेचे कैवारी | अन्याय, भ्रष्टाचाराचे पुजारी.....देश विकण्याच्या मार्गावरी | सत्तेच्या पूर्ण आहारी.....द्यायला हवे यांना फासावरी | हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी | अमित सतीश उंडे, सांगली

प्रतिक्रिया द्या
12377 वाचन

💬 प्रतिसाद (53)

कॉलिंग वल्ली.. कॉलिंग वल्ली..

गणामास्तर
Tue, 02/28/2012 - 20:37 नवीन
कॉलिंग वल्ली.. कॉलिंग वल्ली..
  • Log in or register to post comments

आलो आलोच मी

प्रचेतस
Tue, 02/28/2012 - 22:27 नवीन
धाग्याचे रोज नवे कारण.. मिपा बोर्डावर आगमन | लेखांचे अनेक प्रकरण..धागे भराभर पाडण | बँडविड्थचे लचके तोडण..चालू आहे ताठ मानेन | हे सर्वच मजला कळी..पण अळी मिळी गुपचिळी | रसिक वाचक जणू उपाशी.. देई त्यांना धागे अधाशी | अशुद्दलेखनाला धरलय हाताशी...वैर याचं शुद्धलेखनाशी | घुसवलेत अनेक धागे जोराशी..परी थांबवणे ना धरले मनाशी | हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी | मिपाकर वार्‍यावर...संपादक कुंठित | जिलब्या तेजीत..मिपा झाले रूग्णाईत | वाचकांना कंपवत..हलवाई चालले धागे पाडत | हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी | दिवसातून अनेकदा धागे काढी..समजतात स्वत:ला रसिकांचे कैवारी | राजकारण,व्यसनांचे विचारी..धागे पाडून घेई उभारी | मिपाकरांच्या पूर्ण उरावरी...घ्यायला हवी रजा जरी | हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी ||
  • Log in or register to post comments

ज ब रा विडंबन :-D

मोदक
Wed, 02/29/2012 - 00:18 नवीन
ज ब रा विडंबन :-D बघुया काही फरक पडतो का...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

!

आबा
Wed, 02/29/2012 - 00:47 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मेलो...मेलो...वल्ली ब्बेक्कार

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/29/2012 - 08:21 नवीन
Image removed. मेलो...मेलो...वल्ली ब्बेक्कार फुटलोय वाचताना @हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी ||>>> Image removed. बाकी काहिही असो...पण मिपावर सध्या आपटीधागे विरुद्ध Image removed. विडंबनकार वल्ली= जोरदार म्याच असं समिकरण रुजलेलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तारे तोडू नये ...

अमितसांगली
Wed, 02/29/2012 - 08:54 नवीन
दुसऱ्याच्या लिखाणावर धागे काढण्यापेक्षा प्रतिक्रिया नाही दिली तरी चालेल. विडंबन करणे कधीही सोपे असते त्यासाठी जास्त तारे तोडावे लागत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ओपन फोरम आहे. ज्या तन्मयतेने

प्रचेतस
Wed, 02/29/2012 - 08:56 नवीन
ओपन फोरम आहे. ज्या तन्मयतेने तुम्ही धागा टाकला आहे त्याच तन्मयतेने आम्ही प्रतिसाद दिला आहे. शिवाय आम्हाला तारे तोडण्याची हौस नसल्याने सोपेच प्रकार जास्त आवडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितसांगली

ओपन फोरम आहे ना..?

अमितसांगली
Wed, 02/29/2012 - 10:34 नवीन
ओपन फोरम आहे ना.. मी काय लिहावे नि किती लिहावे यासाठी मला तुमच्या परवानगीची गरज नाही. तुम्हाला जे आवडेल तसेच लिहावे असेही काही नाही. तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नाही तर ती वाईटच आहे, असा समाज किमान मी तरी करून घेणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अरे, परवानगीचा काय संबंध आला

प्रचेतस
Wed, 02/29/2012 - 10:40 नवीन
अरे, परवानगीचा काय संबंध आला इथे? मी तुम्हाला लिहू नका असे बोललोय का कुठे? मला आवडेल तेच लिहा असेही मी कुठेही म्हटले नाही. तुम्हाला आवडणारेच प्रतिसाद यावेत अशी तुमची अपेक्षा आहे का? प्रतिसाद वाईट असल्यास ते उडवण्यास संपादक समर्थ आहेतच. तेव्हा तुम्हीही लिहित राहा, आम्हीही लिहित राहूच. वाढदिवसाच्या शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितसांगली

एकच धागा

अमितसांगली
Wed, 02/29/2012 - 11:43 नवीन
लिहू नका हाच एक धागा पकडून तुम्ही लिखान केले आहे. प्रतिसाद चांगलाच हवा अशी अपेक्षा मी कधीच केली नाही. दुसऱ्यावर हसणे सोप असत पण त्रुटी दाखविण अवघड. शुभेच्छांसाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

लिहू नका असे मी कुठे

प्रचेतस
Wed, 02/29/2012 - 11:49 नवीन
लिहू नका असे मी कुठे म्हणालोय? उलट लिहित रहा असेच म्हणतोय. आमचे एक मित्र म्हणतात की एकदा धागा टाकल्यानंतर गंगार्पणमस्तु म्हणायचे. मी तर साधं सोपं एक विडंबन टाकलय(फारसे तारे न तोडता). तुम्ही कशाला मनाला लावून घेताय उगाच. पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितसांगली

@पण त्रुटी दाखविण अवघड.>>>

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/29/2012 - 12:26 नवीन
@पण त्रुटी दाखविण अवघड.>>> छे...! तुमच्या या कवितेत त्रुटी दाखवणे अत्यंत सोप्पे आहे... पिठ कसदार नसल्याने जिलबी जोमदार पडलेली नाही... उदा-सामाजिकतेचा नुसता विषय आलाय,आणी तोही नुसता यमकं धरुन इन्सर्ट केलेला आहे...स्वतःची अभिव्यक्ती त्यात कुठेही नाही. सामाजिक विषयावर काहिही लिहिताना नुसती मांडणी करुन चालत नाही,त्यातुन आपलं स्वतःच गंभीर चिंतन बाहेर पडलं पाहिजे.वाचकांसमोर प्रश्न नीट निर्माण करता आला पाहिजे.तुमची अख्खी कविता म्हणजे फक्त यमक बांधणी झालेली आहे.आपण नविन लिहित असाल तर आपल्या भावुक बाल्यावस्थेला हे साजेसंच आहे,पण त्याचे कोणी विडंबन केले तर त्यावर उखडण्याचा हक्क असला,तरी चिडण्यामागे कारण काहिच असू शकत नाही...विडंबनावर उखडतो,तो कवी नव्हेच... १)प्रकरण<< >> लांगुलचालन करण << >> भरण तोडण<< >> मानेन कळी<< >> गुपचिळी २)तुपाशी << >> जीवाशी हाताशी << >> भारतामातेशी बांगलादेशी << >> मनाशी कळी<< >> गुपचिळी ३)असुरक्षित << >> कुपोषित तेजीत << >> खाईत कापत << >> लुटत कळी<< >> गुपचिळी ४)वारी << >> कैवारी पुजारी << >> मार्गावरी आहारी << >> फासावरी कळी<< >> गुपचिळी यात ''काव्य'' म्हणावे असे काय आहे..? या यमक सेतूच्या टोकांमधे तुंम्ही ठराविक मापाच्या पट्ट्या ठोकुन बसवल्या आहेत... म्हणुन याचं वल्लींनी विडंबन केलय,आणी त्या विडंबनातही मी जे काही म्हणतोय त्याबद्दलचा व्यापक आशय सामावलेला आहे... तो तुंम्हाला समजला तर तुमचा राग खरच जाइल :-) अवांतर-येथील एक नवमिपा सदस्य च.चा.यांचे आपण अगदी जुळे भाऊ शोभाल अश्या दर्जाची आपली (सध्याची) काव्यप्रतिभा आहे...त्यांनाही ही यमक जुळी काव्य करण्याचा नाद आहे... या त्यांच्या काही लिंक्स--- http://www.misalpav.com/node/20317 http://www.misalpav.com/node/19658 http://www.misalpav.com/node/19732 http://www.misalpav.com/node/19908 http://www.misalpav.com/node/19535 http://www.misalpav.com/node/19545 http://www.misalpav.com/node/19709
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितसांगली

फक्त यमकच...??

अमितसांगली
Wed, 02/29/2012 - 13:33 नवीन
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.. यमक जुळविण्यासाठी कसरत केली आहे, हे मान्य. पण राजकारणी लोक आज जे काही करत आहे ते मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. भ्रष्टाचार, घुसखोरी, शेतकऱ्यांची लुट, बेरोजगारी, स्त्री सुरक्षा, गर्भहत्या आणि एकूणच सामान्य जनतेला देशोधडीला लावण्याचे त्यांचे उद्योग हे मी मांडलय. तरीही हि फक्त यमक बांधणीच आहे का? भावनिक होऊन मी काही मनात राग धरला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@यमक जुळविण्यासाठी कसरत केली

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/29/2012 - 14:58 नवीन
@यमक जुळविण्यासाठी कसरत केली आहे, हे मान्य.>>> आपल्याला मान्य झालं,ही एक जमेची बाजू आहे,अता त्याचा स्विकार करा,म्हणजे जमा हिशोबात लागेल.. @तरीही हि फक्त यमक बांधणीच आहे का? >>> होय.यमक बांधणीच आहे... सामाजिक काव्य आशयगर्भ हवं,हा नुसताच गर्भाशय आहे.. ;-) @भावनिक होऊन मी काही मनात राग धरला नाही.>>> उत्तम... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितसांगली

अर्रारा...

चिगो
गुरुवार, 03/01/2012 - 16:22 नवीन
वल्लीचं विडंबण खंग्री आहेच, त्याला टाळ्या.. पण >>सामाजिक काव्य आशयगर्भ हवं,हा नुसताच गर्भाशय आहे.. ह्याने मी पुरता वारलोय. अतृप्ता, सॉलिड यार..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

-

अन्या दातार
Wed, 02/29/2012 - 10:49 नवीन
तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नाही तर ती वाईटच आहे, असा समाज किमान मी तरी करून घेणार नाही.
हे जितक्या सहजतेनं लिहिताय तितके सहजशक्य नाहीये हेच तुम्ही प्रतिसादातून दिसतंय. बाकी चालूद्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितसांगली

मा. अमित जी,

मी-सौरभ
Wed, 02/29/2012 - 13:11 नवीन
विडंबन करणे कधीही सोपे असते त्यासाठी जास्त तारे तोडावे लागत नाहीत. कळावे ...
चांगल्या विडंबनाचे सोपे काम आपण कधीतरी करुन दाखवावे. मगच ते सोपे आहे हे आम्हा साध्या सरळ लोकांना कळू शकेल ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितसांगली

@चांगल्या विडंबनाचे सोपे काम

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/29/2012 - 15:04 नवीन
@चांगल्या विडंबनाचे सोपे काम आपण कधीतरी करुन दाखवावे. मगच ते सोपे आहे हे आम्हा साध्या सरळ लोकांना कळू शकेल ना?>>> ++++++++११११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

हा हा हा ... वल्लीशेठ, एकदम

सुहास झेले
गुरुवार, 03/01/2012 - 16:30 नवीन
हा हा हा ... वल्लीशेठ, एकदम जबरदस्त विडंबन. :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

+१

गणपा
गुरुवार, 03/01/2012 - 16:58 नवीन
नशीब वल्लीने विडंबनाचा दुसरा धागा काढला नाही, नैतर मुद्दला पेक्षा व्याजच भारी पडलं असत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले

किती ते टेन्शन घ्याल..?

मोदक
Wed, 02/29/2012 - 00:19 नवीन
किती ते टेन्शन घ्याल..?
  • Log in or register to post comments

त्यांचे एकंदरीत लिखाण पाहता

गणामास्तर
Wed, 02/29/2012 - 09:47 नवीन
त्यांचे एकंदरीत लिखाण पाहता पाणी वाहते करण्याची गरज आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments

@पाणी वाहते करण्याची गरज आहे

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/29/2012 - 11:23 नवीन
@पाणी वाहते करण्याची गरज आहे असे वाटते.>>> अमच्या मते अजुन खरं पाणी पडायलाच लागलं नाहीये... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

अरे त्याचं कसंय ना पोरांनो,

प्यारे१
Wed, 02/29/2012 - 12:41 नवीन
अरे त्याचं कसंय ना पोरांनो, आपलं लफडं सॉरी- आपलं प्रेम असतं -तर ते नवीन नवीन असलं की नै आपल्या लव्हर कडं कुणी बघितलं ना तरी लय तरास होतो... मग त्यावर कुणी काही बोलणं तर लांबच. भावनाओंको समझो यार...!
  • Log in or register to post comments

@भावनाओंको समझो यार...!>>>

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/29/2012 - 12:54 नवीन
@भावनाओंको समझो यार...!>>> आमेन ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

शिफ्ट +एम दाबुन अनुस्वार देता

५० फक्त
Wed, 02/29/2012 - 13:30 नवीन
शिफ्ट +एम दाबुन अनुस्वार देता येतो, अर्थात शेवटचं अक्षर ए टाईप करुन पुर्ण करायच्या आधी. हे सर्वच मजला कळी, - यातला कळी हे क्रियापद म्हणुन योग्य वाटत नाही, कळे, कळाले असे होउ शकते ,पण कळी फार विचित्र वाटतंय. गर्भहत्या तेजीत.....तरुण बेरोजगारीच्या खाईत | - गर्भहत्या तेजीत, इथं फक्त भावना व्यक्त केल्यात की कसे, कारण मिडिया किंवा इतर माध्यमातुन देखील आपल्या देशात सर्रास गर्भहत्या होतात असा विदा मिळत नाही कुठे. तुम्हाला स्त्री भ्रूणहत्या असं अपेक्षित असेल तर तो अर्थ इथं येत नाही. बाकी असंतोषित जनतेचं मनोगत मांडण्याचा छान प्रयत्न आहे, पण खरंच मला सांगा तुम्हाला असंच वाटतं का मनापासुन, काय आहे, माझं तरी मन वगैरे जे असतं ना ते सुन्न झालंय किंवा नाहीसं झालंय. सध्या वाट पाहतोय ती वार्षिक पगारवाढीची अन घरांच्या किमती कमी होण्याची, बाकी जोपर्यंत माझ्या गळ्याला नख लागत नाही तोवर सुखानं किंवा सुखात जगायचं ठरवलंय मी. तुम्ही पण करा प्रयत्न जमेल हळु हळु.
  • Log in or register to post comments

माझं तरी मन वगैरे जे असतं ना

धन्या
Wed, 02/29/2012 - 17:02 नवीन
माझं तरी मन वगैरे जे असतं ना ते सुन्न झालंय किंवा नाहीसं झालंय. सध्या वाट पाहतोय ती वार्षिक पगारवाढीची अन घरांच्या किमती कमी होण्याची, बाकी जोपर्यंत माझ्या गळ्याला नख लागत नाही तोवर सुखानं किंवा सुखात जगायचं ठरवलंय मी. तुम्ही पण करा प्रयत्न जमेल हळु हळु.
अगदी अगदी. जौद्या हो पन्नासराव. त्यांना हल्ली हल्लीच कविता आणि लेख होऊ लागलेले दिसत आहेत. ज्यांना खरंच कळकळ असते ते अश्या कविता पाडत बसत नाहीत. कळी का तुम्हाला? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

ज्यांना खरंच कळकळ असते ते

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 02/29/2012 - 17:15 नवीन
ज्यांना खरंच कळकळ असते ते अश्या कविता पाडत बसत नाहीत.
हा साक्षात्कार कुठे झाला म्हणायचा तुम्हाला ? कविता करणाऱ्याची कळकळ खरी नसते असे तुमच्या विधानातून प्रतीत होते आहे. आणि वरून हे अत्यंत सरसकट विधान आहे म्हणून विचारतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

आम्ही कविता

धन्या
Wed, 02/29/2012 - 17:33 नवीन
आम्ही कविता "पाडणार्‍यांबद्दल" म्हटलं आहे, कविता करणार्‍यांबद्दल नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

प्रकाटाआ

धन्या
Wed, 02/29/2012 - 17:35 नवीन
दुहेरी प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

तुम्ही लिहा हो.. हटू नका

गवि
Wed, 02/29/2012 - 14:05 नवीन
तुम्ही लिहा हो.. हटू नका प्रतिक्रियांमुळे. मिपाकर हलकट आहेत.. तुम्ही लिहीत रहा.. तुम्हीही व्हाल. मीही सुरुवातीला रतीब लावला होता. नंतर हळूहळू लक्षात आल्यावर कमी केली वारंवारिता. नंतर मजा येईल खूप, इथे सगळेच मित्र होतील तेव्हा. चांगलं लिहिताय.. "चला लिखाणाची वेळ झाली.. हातपाय धुवून लिहायला बसूया.. ", किंवा "दिसामांजी काही तरी ते लिहावें" असं तत्व न ठेवता, "आयला हे लिहिलं तर काय धमाल येईल" अशी जोरदार इच्छा उसळली तरच आणि तेव्हाच लिहा.. मग सगळं लाईनीवर येईल. मग दोन लेखांत एक वर्षाचं अंतर असो, किंवा एक तासाचं.. बहुतेकांना ते आवडेलच.
  • Log in or register to post comments

+१ टू गवि

मी-सौरभ
Wed, 02/29/2012 - 15:30 नवीन
काका, हाच प्रतिसाद आता अजून २-३ धाग्यांवर चोप्य पस्ते करुन टाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गवि काका

सूड
Wed, 02/29/2012 - 16:33 नवीन
"चला लिखाणाची वेळ झाली.. हातपाय धुवून लिहायला बसूया.. ", किंवा "दिसामांजी काही तरी ते लिहावें" तुमचं हे मत पुर्णपणे मान्य. पण ज्यांना कविता होते(पक्षी: येते) त्यांनी ती कशी बरं थांबवावी ?? अशावेळी मिळेल त्या कागदावर ती करुन (पक्षी: उतरवून) मोकळं होणं सोयीचं नाही का. कवीच्या प्रतिभेच्या मटकीला आलेला कवितेचा मोड त्याच्या मनाच्या मातीतून वर येणं हे एका सृजनाचं प्रतीक आहे हे या सामान्य माणसांना कसं बरं कळावं. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

@कवीच्या प्रतिभेच्या मटकीला

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/29/2012 - 16:53 नवीन
@कवीच्या प्रतिभेच्या मटकीला आलेला कवितेचा मोड त्याच्या मनाच्या मातीतून वर येणं Image removed. हे एका सृजनाचं प्रतीक आहे हे या सामान्य माणसांना कसं बरं कळावं. असो.> Image removed. मेलो मेलो सुडुक,काय मारलीये कचकून धडुक..!देवा मला उचल Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

ढापलेले वाक्य वाटते आहे..

मोदक
Wed, 02/29/2012 - 18:31 नवीन
>>> कवीच्या प्रतिभेच्या मटकीला आलेला कवितेचा मोड त्याच्या मनाच्या मातीतून वर येणं हे एका सृजनाचं प्रतीक आहे जोरदार आक्षेप..!!! एकतर हे वाक्य दवणेंच्या कोणत्यातरी पुस्तकातून ढापले आहे असे वाटते आहे. (विदा मागू नये - मिळणार नाही) आणि कवीच्या मनात माती आहे .. कवीचे मन म्हणजे माती वगैरे प्रकार वाचून एक मिपाकर असल्याची शरम वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

एक मिपाकर असल्याची शरम वाटली.

वपाडाव
Wed, 02/29/2012 - 18:54 नवीन
खाल्ली ना माती मग बुडुन मरा आता ह्यात...Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

युवा पिढी ही किती अनाडी... करीते पाण्याची नासाडी |

मोदक
Wed, 02/29/2012 - 20:25 नवीन
युवा पिढी ही किती अनाडी... करीते पाण्याची नासाडी | घरबसल्या येते पाणी ... किंमत नाही कळणार कधीकाळी | बिचारा कवी गोंधळलेला... प्रतिसादांनी त्रासलेला | हे सर्वच मजला कळी ....पण नाही अळी मिळी गुपचिळी |
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

+1

सोत्रि
गुरुवार, 03/01/2012 - 00:25 नवीन
मिपाकर हलकट आहेत..
मनापासून सहमती - (हलकट) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

व्यक्त व्हायला सगळ्यांनाचा

सुहास..
Wed, 02/29/2012 - 14:13 नवीन
व्यक्त व्हायला सगळ्यांनाचा आवडत ओ गविकाका !! अर्थात, ज्याने-त्याने आप-आपली सीमा ओळखुन व्यक्त व्हावे असे वाटते, उगा मनी वाटेल ते काही ही ( काहीच्या काही नव्हे !) टकांवे आणि वर ते रेटुन न्यायचे हे चांगले नव्हे. वरील चर्चेने आम्हाला " मी " ची रेटुन जाहीरात करणार्‍या एका 'नातलगा' ची आठवण झाली ;)
  • Log in or register to post comments

म्हणून तर "चला लिखाणाची वेळ

गवि
Wed, 02/29/2012 - 14:20 नवीन
म्हणून तर
"चला लिखाणाची वेळ झाली.. हातपाय धुवून लिहायला बसूया.. ", किंवा "दिसामांजी काही तरी ते लिहावें" असं तत्व न ठेवता, "आयला हे लिहिलं तर काय धमाल येईल" अशी जोरदार इच्छा उसळली तरच आणि तेव्हाच लिहा.. मग सगळं लाईनीवर येईल. मग दोन लेखांत एक वर्षाचं अंतर असो, किंवा एक तासाचं.. बहुतेकांना ते आवडेलच.
हे सांगितलं... गविकाकांचा सल्ला सदर सुरु करता येत नसल्याने असे जागोजागी सल्ले देत बसावं लागतंय. काय करणार. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

वरील चर्चेने आम्हाला " मी "

धन्या
गुरुवार, 03/01/2012 - 02:08 नवीन
वरील चर्चेने आम्हाला " मी " ची रेटुन जाहीरात करणार्‍या एका 'नातलगा' ची आठवण झाली
तू गणनायक नातलग बद्दल काही बोलत आहेस का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

मित्रांनो , मी आपल्या

ajay wankhede
Wed, 02/29/2012 - 22:59 नवीन
मित्रांनो , मी आपल्या सार्र्यांचे कपडे सांभाळू का? सध्या माझ्याकडे भरपुर वेळ आहे.Image removed. ............................................................................................................................
  • Log in or register to post comments

@मित्रांनो , मी आपल्या

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/29/2012 - 23:51 नवीन
@मित्रांनो , मी आपल्या सार्र्यांचे कपडे सांभाळू का?>>> नको,आपलेही काढा,आणी आमच्यात या...! :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ajay wankhede

नको,आपलेही काढा,आणी आमच्यात

धन्या
गुरुवार, 03/01/2012 - 02:12 नवीन
नको,आपलेही काढा,आणी आमच्यात या...!
भटजीबूवा, "बघताय काय? सामिल व्हा. " असं म्हणायचंय काय तुम्हाला? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@"बघताय काय? सामिल व्हा. "

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/01/2012 - 09:03 नवीन
@"बघताय काय? सामिल व्हा. " असं म्हणायचंय काय तुम्हाला?>>> मग काय पारावर बसुन मजा पाहू द्यावी म्हणताय की काय...? इथे काल पासुन केवढं गंभीर चिंतन चाललंय ;-) ,आंम्ही गंभीर विषयात टवाळी अजाबात खपवुन घेणार नाय... :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

नको,आपलेही काढा,आणी आमच्यात

ajay wankhede
Fri, 03/02/2012 - 05:43 नवीन
नको,आपलेही काढा,आणी आमच्यात या...! Image removed."> आलोच कि , पण मी माझे ...नाही मि पा वर भलतच नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

@!पण मी माझे ...नाही>>>

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/02/2012 - 08:16 नवीन
@!पण मी माझे ...नाही>>> चालेल...तुंम्ही नुसते या...आंम्ही तुमचे काढू :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ajay wankhede

अबबाबो.. हा धागा कसा काय

अन्नू
गुरुवार, 03/01/2012 - 10:06 नवीन
अबबाबो.. हा धागा कसा काय सुटला वाचायचा?
नको,आपलेही काढा,आणी आमच्यात या...!
Image removed. मेलो.. रे मेलोsss
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बाकी सारं जाऊद्या...

धन्या
Wed, 02/29/2012 - 23:17 नवीन
हे सर्वच मजला कळी
या शब्दसमुहाचा अर्थ काय आहे हे कवी किंवा इतर कुणी समजावून सांगेल काय?
  • Log in or register to post comments

मला वाटतं की कवीला 'सर्वच

सूड
गुरुवार, 03/01/2012 - 00:18 नवीन
मला वाटतं की कवीला 'सर्वच मजला कळे' असं म्हणायचं आहे. पण यमकासाठी थोडं स्वातंत्र्य घेतलंय. (कळीचा नारद) सूड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा