तीन चार वर्षापूर्वी शिक्षणानिमित्य पुण्याला जावून राहण्याचा योग आला, नवीन बरेच मित्र मिळाले. आत्ता मी पुण्यात नसतानाही हे मित्र कायम फोनवरून, ईमेलवरून संपर्कात असतात, त्यापैकी एका मित्राच्या बाबतीत अतर्क्य घडले, त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. वास्तविक मी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला चांगला ओळखतो. उच्चशिक्षित कुटुंब त्याचे. लगेच मी पुण्याला गेलो आणि तिथे कळले की ह्या मित्राला लग्नाचा घरी आग्रह झाला तेंव्हा त्याने असे केले. त्याला काय वाटते त्याची त्याने आई वडिलांना अगोदरच कल्पना दिली होती पण ते ऐकून वडिलांना धक्का आणि आई संतापली होती. हाच प्रकार दिवसेंदिवस वाढून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. रोजच्या रोज जिमला जाणारा हसतमुख, उत्साही मित्राचे असे कसे व्हावे आणि घरचे नेमके असे कसे वागले?
इतर मित्र मंडळीना भेटलो त्यांना या प्रकाराची कुणकुण लागली होती पण काही विषय अगदी वैयक्तिक असतात, आपण त्यात पडायचे नसते. त्याच्या ‘त्या’ मित्रालाही भेटलो, त्याची अवस्था तर अधिकच वाईट, मित्राला हॉस्पिटलमध्ये जावून भेटता येत नाही, त्याच्याशी बोलता येत नाही, त्याच्या जीवाची घालमेल तर अधिक वाईट. डोळ्यात सतत पाणी, इतरांना सांगायची चोरी अशी त्याची अवस्था. पण त्याही अवस्थेत मला तो इतर मुलांपेक्षा वेगळा (वाईट अर्थाने) वाटला नाही तर जास्ती प्रेमळ आणि चांगली शैक्षणिक अर्हता असलेला. दोघेही मराठी. आम्हा सर्व मित्रांना ह्या बाबतीत हे काही वाईट आहे असे वाटत नव्हते.
कितीतरी लोक असतील की ज्यांना असे प्रश्न असतील आणि मी तसा नाही म्हणून आपण त्याकडे डोळेझाक करतो आणि असे नाहीच असे मानतो.
इतरापेक्षा वेगळे वाटणे आणि ते ही अगदी वैयक्तिक पातळीवर, हा काही गुन्हा असतो का असा मित्राच्या मित्राचा प्रश्न होता! मी काय उत्तर देणार? त्याने दिलेला आणि बघच म्हणून सांगितलेला एक हटके चित्रपट आवर्जून पाहिला. खरोखरच चांगला आहे, विचार करायला लावणारा, त्याचा संक्षिप्त गोषवारा –
----------------------------------------------------------------------------------------------------
प्रेयर्स फॉर बॉबी
बॉबी नावाचा २०-२१ वर्षाचा तरुण. कर्मठ घरातला (Presbyterian Church शी निगडीत), याला दोन बहिणी आणि एक मोठा भाऊ असतो. बॉबी इतर चार मुलांसारखाच! पण जास्ती प्रेमळ, नात्यांचा विचार करणारा. इतर सर्व वागणेही “नॉर्मल”.
वयात आल्यापासून त्याला जाणवत असते की इतर मुलांप्रमाणे आपल्याला मुलींची फारशी आवड नाही म्हणजे डेटिंग, सेक्स वगैरे. मनात होणारी घुसमट वाढत असते आणि एका (बेसावध) क्षणी तो आपल्या मोठ्या भावाला आपल्याला काय वाटते ते सांगून टाकतो आणि भावाकडून असेही वचन घेतो की ही गोष्ट तो कोणालाही सांगणार नाही विशेषत: आईला. पण मोठा भाऊ बॉबीच्या खरोखर काळजीने आईला सांगतो (चित्रपटातील आईचे नाव मेरी, मुले मातृभक्त आहे), बॉबी भावावर संतापतो आणि आता आईचे उपाय सुरु होतात. (चित्रपटकथा काळ साधारणत: १९७८ ते १९८२ पर्यंतचा असल्याने त्याकाळात अमेरिकेत अशा लोकांना मानसिक रुग्ण समजले जाई आणि मानसोपचार तज्ञ अगदी शॉक ट्रीटमेंट देऊन “रोगी” बरा केल्याचा दावा करत, खरे तर १९७३ साली अमेरिकेत मानसोपचार तज्ञांनी होमोसेक्युअलिटी हा मानसिक रोग नसल्याचे मान्य केलेले आहे) होमोसेक्युअलिटी म्हणजे एड्सच अशीच तिची समजूत असते (आणि काही प्रमाणात ती खरी आहे), बायबलमधल्या ओळी काढून त्या एका कागदावर लिहून ती घरभर चिकटवते अगदी बॉबीच्या बाथरूमच्या काचेवरही, जेणेकरून देवाचे शब्द बॉबी वाचेल आणि त्याचा ‘रोग’ लवकर बरा होईल (होमोसेक्युअलिटी म्हणजे भयानक रोग अशी मेरीची समजूत). त्यामुळे जास्तीत जास्त देवाची प्रार्थना करून ह्या ‘आजारातून’ बॉबीने बाहेर पडावे असे आईला वाटत असते. बॉबीला मानसोपचार तज्ञाकडे आई घेऊन जाते. तेथे त्याचे सेशन सुरु होतात इकडे त्याची “असा” असण्याची बातमी जवळच्या मित्रात नातेवाईकात फुटते. बॉबी आईला अधेमध्ये सतत सांगयचाही प्रयत्न करतो की गे म्हणजे फक्त पॉर्न नाही, आणि गे असणे कोणी मागून घेत नाही पण आईचे समाधान होत नाही.
वास्तविक बॉबीच्या घरच्यांची, आई सोडून सगळ्यांची तो जसा आहे तसा स्वीकारण्याची तयारी झालेली असते. त्याचदरम्यान बॉबीची बहिण (कझिन) सहज भेटायला येते, जेवायला बसलेले असताना ह्याच विषयावरून आई आणि बॉबीत आलेला तणाव स्पष्ट दिसतो आणि बॉबीला होणारा मानसिक त्रास, आईचा त्रागा, तिचे बॉबीला अशा रोगातून वाचवण्याचे प्रयत्न हे पाहून तिला कसेसेच वाटते आणि ती बॉबीला सांगते की लहानपणापासून तिला हे कुटुंब आदर्श वाटत असते पण तसे नाही आहे.
बॉबी आईला अनेकदा समजावतो की प्रार्थना आणि मानासोपचारांचा काही उपयोग होत नाही आहे. वारंवार येणाऱ्या अपराधीपणातून आणि आईला जसं हवं तसा बदल न झाल्याने बॉबी आपल्या (कझिन) बहिणीकडे राहायला जातो तिथे त्याला बारमध्ये त्याला त्याचा बॉयफ्रेंड डेव्हिड (डेविड?) भेटतो, ह्या बॉयफ्रेंडच्या घरच्यांना त्यांच्या मुलाची मानसिकता माहित असते, त्यांनी त्याला आहे तसा स्वीकारलेलं असतं.
थोडे दिवसाने बॉबी परत आपल्या घरी एक दोन दिवसासाठी जाणार असतो त्यावेळी डेव्हिड त्याला सांगतो की आईला तू जसा आहेस तसाच स्वीकारण्याविषयी सांग. घरी परत आल्यावर बॉबी आई ला सांगण्याचा प्रयत्न करतो पण आईची मानसिक तयारीच नसते की आपल्या मुलाला गे म्हणून स्वीकारण्याची. तो परत आपल्या बहिणीकडे (ओरेगॉनला) परत जातो. पण आईच्या स्वभावात झालेला बदल त्याला प्रचंड अस्वस्थ करत असतो. त्यात एके दिवशी गे बार मध्ये डेव्हिडशी त्याचा एक जुना मित्र सलगी करण्याचा प्रयत्न करतो, डेव्हीड न्युट्रल असतो पण असे दृश्य पाहून बॉबी जास्तच अस्वस्थ होतो. शेवटी बॉबी आपण आईचा पहिल्याप्रमाणे लाडका मुलगा नाही किंवा तिला जसा मुलगा हवा आहे तसे आपण नाही आणि प्रयत्न करून होऊही शकत नाही असे वाटून फ्री वे च्या पुलावर उभा राहून, १८ चाकी ट्रक खाली उडी मारतो आणि आत्महत्या करतो (मला खरे तर वाटत होते की बॉबी कसातरी जगणार आणि आईच्या वागण्यात बदल होणार, पण चित्रपट ‘सत्य घटना’ पे आधारित असल्याने असे काही सुखद वळण नव्हते).
मेरीला वाईट वाटते पण त्यानंतर ती परत बायबल मध्ये आत्महत्या करणे हे पाप आहे असे सांगितल्यामुळे बॉबी नक्कीच नरकात गेला असेल अशा विचाराने चिंतीत होते (इथे एक गोष्ट महत्वाची - सत्य घटनेत तसेच चित्रपटात मेरी (पात्र) वाईट नाही आहे तर तत्कालीन धर्मविचाराने आणि समाजभयाने ती अशी वागते). डेव्हिड फ्युनरलला येतो जेंव्हा मेरीला कळते की हाच तो डेव्हिड तेंव्हा ती त्याची खाण्याची प्लेट सरळ डस्टबिन मध्ये टाकून देते (इतरांच्या प्लेट्स ती धुवून व्यवस्थित ठेवत असते).
त्यानंतर लगेचच एकदा कधीतरी ती बॉबी त्यांच्या घरात ज्या खोलीत राहत असतो तेथे जाते, तिथे तिला बॉबीने पाठविलेले काही पाकिटे मिळतात त्यात एकत् तिला एका चर्चचा पत्ता मिळतो, तो पत्ता शोधत मेरी जाते आणि तिथे तिला एक पाद्री होमोसेक्स्युअल लोकांसाठी मानसिक आधार केंद्र म्हणता येईल असा उपक्रम चालवत असतो, ते पाहून मेरी भडकते आणि धर्माविरुद्ध वागण्याविषयी त्याला काही ऐकवू लागते की बायबल मध्ये होमोसेक्युअलिटीवर मृत्युदंड अशी शिक्षा आहे तेंव्हा तो पाद्री तिला सांगतो की आत्ता काही बोलू नका माझ्याशी काही बोलायचे असेल तर मला ‘ह्या ह्या’ ठिकाणी भेटा. मेरी परत आपल्या घरी येते आणि बायबल मध्य होमोसेक्स्युअल लोकांना काय शिक्षा सांगितलेत (सोडोम आणि गोमोर्राची बायबल मधली गोष्ट) ह्याच्या नोंदी करून घेऊन परत त्या पाद्रीला नंतर भेटायला जाते त्यात पाद्री तिला थोडक्यात पुराणातली वांगी पुराणात असे एक लेक्चर ऐकवतो आणि उदाहरणेही देतो की लग्नानंतर जर नवऱ्याला असे कळले की नवीन नवरी कुमारिका (VIRGIN) नसेल तर तिला परत माहेर पाठवून दगडाने ठेचून मारावे असे सांगितले आहे (ह्याविषयी मला स्वत:ला काही ज्ञान नाही चित्रपटात जसे आहे तसे लिहिले चू.भू.द्या.घ्या.)तसेच लहान मुलांना करावयाच्या शिक्षा ही फार कठोर सांगितल्या आहेत आपण तसे आत्ता वागतो का? मग हा अन्याय फक्त होमोसेक्स्युअल लोकांवरच का? इतके होवूनही मेरी संभ्रमात असते. पण तिला लवकरच सत्य परीस्थितीची जाणीव होते आणि ती माझ्या मुलाचा मीच खून केला म्हणून मानसिक दृष्ट्या कोसळते, अशावेळी घरचे तसेच हा पाद्री तिला मानसिक आधार देतात.
शेवटच्या दृश्यात बॉबीचे संपूर्ण कुटुंबीय (मेरीसकट) गे परेड मध्ये सहभागी होते असे दाखवले आहे आणि सगळ्यात शेवटी खरा बॉबी आणि त्याच्या आईचा फोटोपण दाखवला आहे. पूर्ण चित्रपटात एकच बॉबी आणि त्याच्या मित्राचा किसिंग सीन आहे (पॉर्न वगैरे काही नाही).
--------------------------------------------------------------------------------------------------
माझा मित्र वाचला, उच्चाभ्यासाचे तणाव वगैरे सांगून त्याच्या आई वडिलांनी वेळ मारून नेली. पण प्रश्न खरेच सुटला का? आणि भारत सरकारचे असे धोरण - फक्त बाहेर कळत नाही म्हणून असे काही नाही किंवा मी तसा नाही म्हणजे असे काही असणे शक्य नाही हे बरोबर आहे का?
वाचने
4167
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगला मुद्दा, अन सध्याचा
उत्तम परिचय. मिपावर स्वागत.
आपला आभारी आहे.
In reply to उत्तम परिचय. मिपावर स्वागत. by प्रचेतस
छान. संस्थळाला प्रगल्भतेकडे नेणारा धागा.
>>आणि भारत सरकारचे असे धोरण
+१०० याला , यशवंता. मला वाटतं
In reply to >>आणि भारत सरकारचे असे धोरण by यकु
सरकारचे असे धोरण म्हणजे कधी
In reply to >>आणि भारत सरकारचे असे धोरण by यकु
फालतू ढोल ताशे वाजवत मिरवणूका
In reply to सरकारचे असे धोरण म्हणजे कधी by प्रसाद प्रसाद
प्रत्येक गोष्ट
In reply to फालतू ढोल ताशे वाजवत मिरवणूका by यकु
नो कमेंट्स !!
गे किंवा लेस्बियन ही "समस्या"
>>>गे किंवा लेस्बियन ही
In reply to गे किंवा लेस्बियन ही "समस्या" by गवि
मुद्द्यांशी अत्यंत सहमत रे
In reply to >>>गे किंवा लेस्बियन ही by यकु
फालतू ढोल ताशे वाजवत मिरवणूका
In reply to >>>गे किंवा लेस्बियन ही by यकु
एखादा कायदा हवा असेल तर
In reply to फालतू ढोल ताशे वाजवत मिरवणूका by प्रसाद प्रसाद
सध्या जो विषय गाजतो आहे तो
In reply to एखादा कायदा हवा असेल तर by यकु
ह्याबाबतीत कायद्याच्या
In reply to सध्या जो विषय गाजतो आहे तो by प्रसाद प्रसाद
दारुचे दुकान
मोठ्या अक्षरात लिहिलेले असते त्याच्या अगदी उलट म. प्र. मध्येशासकिय मदिरालय
लिहीलेले असते आणि ते लोकांनी दारु प्यावी असे शासनाला वाटत असून त्यासाठीच शासकिय दुकान उघडले आहे असे वाटते. अशीच काहीशी या मुद्याचीही मजा होईल.चांगला परिचय.
हे वाक्य माझे आहे,
In reply to चांगला परिचय. by इष्टुर फाकडा
चर्चा वाचत आहे...
समलिंगित्वाची जाहिरात : एक दृष्टिकोन
लोकं गे असणं नैसर्गिक नाही
लेख आवडला. एकूणच परिस्थिती