मिपा वरचे तथाकथित वकील सदस्य कॉमन मॅन यांनी आजच पुन्हा एकदा कथ्याकुट सदरात धागा काढून त्यांची मते मांडली आहेत दोन वाक्यात आपले मत व्यक्त करण्यासाठी नमनालाच घडाभर तेलाची उधळपट्टी केली आहे
कॉमन मॅनच्या हाताशी असलेला जिलेबीचा सोऱ्या, इतर सदस्यांच्या प्रतिक्रियांचा ओघ आणि आपणच इथले कायद्याचे जाणकार असून, प्रत्येक धाग्यात कलमांचा संदर्भ लावलाच पाहिजे हा त्यांचा आग्रह आता बळावलेला दिसतो असेच म्हणावे लागेल
कॉमन मॅन यांनी पाडलेल्या जिलेब्यांच्या विषयांवरून जयंत कुलकर्णी यांनी त्यांच्या पोशाखाला चालेंज करायचे ठरवलेले दिसते. त्यांना कॉमन मॅन चा नेहमीचा पोशाख नको असून काळा कोट व पांढरा बो असा पोशाख हवा आहे असा उघड अजेंडा दिसतो. टीम अण्णांच्या माकडछाप चाळ्यांमुळे कॉमन मॅनही धागा काढण्याचा चाळा करताना दिसत आहेत.
मिपा घटनेतील कलम क्र. १ नुसार कॉमन मॅन यांना धागा काढण्याचे व आपले विचार मांडण्याची मुभा आहेच, परंतु अघोषित वाचक कलम (र.टा.ळ.) काय म्हणते (...repeatedly publishing boring content having unanimous views for most members of misalpav) याकडे कॉमन मॅन चे लक्ष गेलेले दिसत नाही. म्हणूनच मिपावर धागा काढून मिपा सदस्यांना कंटाळा आणण्याचा गंभीर प्रयत्न त्यांनी केला आहे. यासाठी आम्ही या विडंबनाद्वारे त्यांचा हिरमोड करू इच्छित नाही, व मिपा वाचक दंड संविधान कलम ४२० (अ) च्या अंतर्गत Neglegence for next 3 threads, uncognizable--- triable by members या तरतुदीनुसार काही होऊ नये अशी इच्छा व्यक्त करतो.
त्यातून त्यांना जर मिपा हे कायद्याचा किस पाडणारे संस्थळ हवे असेल तर स्वतःचा ब्लॉग काढून त्यांच्या स्वप्नातले धागे टाकण्याची मुभा आहेच. परंतु त्यांनी खुद्द मिपाच्या खेळीमेळीच्या स्वरूपावर कदापी हल्ला करू नये, तो कुणीच सहन करणार नाही असे या विडंबनाद्वारे आम्हाला सांगावेसे वाटते.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
4144
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
(...repeatedly publishing
-०००१
छप्पर फाड
आपण
होतीच गरज अश्या विडंबनाची...
डु आय डी ?
अन्या
य्यो ..अन्या रॉक्स
मस्त
दातारजी, विडंबन छानच झाले
अण्णा एकवेळ माकडचाळे करण्याचे
In reply to दातारजी, विडंबन छानच झाले by कॉमन मॅन
मरेश, मरेश, मरेश !!!
In reply to अण्णा एकवेळ माकडचाळे करण्याचे by प्रचेतस
+१
In reply to अण्णा एकवेळ माकडचाळे करण्याचे by प्रचेतस
मलिंगाची गोलंदाजी.
In reply to दातारजी, विडंबन छानच झाले by कॉमन मॅन
/*म्हणूनच मिपावर धागा काढून
"कलम
In reply to /*म्हणूनच मिपावर धागा काढून by उदय के'सागर
!@नाहि तर तुमचा कॉमन मॅन हा
In reply to /*म्हणूनच मिपावर धागा काढून by उदय के'सागर
" कलम मॅन " लै भारी
काय हे? आँ? त्यांनी असे धागे
+१ विनोदी अंगाने जाणारे
In reply to काय हे? आँ? त्यांनी असे धागे by रेवती