माझा देश
माझा देश (१)
मी लहान असतांना वाचलय
या देशात सोन्याचा धुर निघायचा
निर्मळ पाण्याचे झरे
दुथडी भरुन वाहनार्या नद्या
सुरम्य निसर्ग, हिरवेकंच किनारे
शेतात भात पिकलेला
शेतकरि आनंदाने मधुर गीत गातो
एक वितराग मुनि साधनेत मग्न संतुष्ट
दोघांच्या हि मनात
लवलेष नाही द्वेष भावाचा
माझा देश (२)
कुठे गेला माझा तो देश
मि शोधतोय त्याला
आटलेले झरे
आटलेल्या नद्यांचे भकास किनारे
शेतात भात पिकलेला
शेतकरि मनातुन धास्तावलेला
एक वितराग मुनि साधनेत मग्न अशांत
राग, द्वेष, क्रोध,मत्सर....
कुठे गेला माझा तो देश
मि शोधतोय त्याला.
जाउ द्या हो नका वाईट वाटुन
अजय, छान लिहिले
माझा देश ....
हम्म्म. खरंय
इथे कशाला?