जगी सर्वसुखी असा कोण आहे ....? .......विचारी मना तूच शोधोनी पाहे.
समर्थ रामदासांनी शेकडो वर्षांपूर्वी हे वाक्य लिहून ठेवले आहे. या वाक्यातून प्रक़्श्न निर्माण केला नसून मनुष्य स्वभावाचे वर्णन केले आहे . मोठ्या सुखांच्या मागे लागलेल्या माणसाची अवस्था नेहमी भांबावलेली असते कारण सुख मिळत नाही आणि त्याची चातकासारखी वाट बघणे असते आणि ते जेंव्हा समोर येते तेंव्हा उशिरा मिळाल्याचा खेद होत असतो . पुन्हा हे सुख कधी मिळणार या विचारात सुख खर्या अर्थाने उपभोगतच येत नाही . दररोज च्या जगण्यातील त्याच त्याचपणामुळे येणारा ताण .....या जगण्याचा येणारा प्रचंड उबग......सुखाच्या मोठ्या क्षणांची वाट पाहता पाहता होणारी आपली प्रचंड दमछाक ...या सर्वावर उपाय म्हणजे या रोज च्या जगण्यात सुद्धा जे अतिशय छोटे छोटे सुखाचे क्षण लपलेले आहेत ते डोळसपणे हेरण्याची ते शोधण्याची आणि ते उपभोगण्याची वृत्ती . कोणी म्हणेल रोजच्या जगण्यात कसलं आलंय सुख ?
विचार करा .....घरी येतांना कधी आपल्या बायकोचा विचार मनात आणून एखादा गजरा ...एखादेच चाफ्याचे फुल वेगळाच आनंद देवून जाते का ? घरी येताना आपल्या मुलाला आवडणारा एखादा पदार्थ अगदी एकच पीस आणला तरी त्याच्या चेहेऱ्यावर काही वेगळे भाव येतात का ? कधी तरी सुट्टीच्या दिवशी आपण स्वयंपाकाची जबाबदारी घेवून आपल्या परतणार ला सरप्राईज देता येतं का ? आपण दोघांनी एकत्रपणे बनवलेला पदार्थ चवीला जास्त चांगला लागतो का ? नेहमीच्या हॉटेल संस्कृतीला चाट देवून कधीतरी गरम गरम मक्याचे कणीस घेतल्यावर त्याची वेगळीच चव लागते का ? चिंब पावसात रिक्षा पकडून घरी जाण्यापेक्षा कुटुंबा बरोबर भिजत भिजत चालत जायला जास्त मजा येते का ? नेहमीचा पोळी भाजी डाळ भात चौकडीचा बेत बदलून सुखी भेल झिंग आणते का ? कधीतरी " mall " मध्ये न जाता घावूक बाजारात मोठ्या पिशव्या घेवून महिन्याची खरेदी करण्यात काही मजा येते ? नेहमीच्या फिरायच्या जागा सोडून अनोळखी वाटांवरुन फिरण्यात काही वेगळी गम्मत येते का ? आठवड्याच्या बाजारात मिळणाऱ्या चित्र विचित्र वस्तू आकर्षित करतात का ? कधीतरी घरच्या जेवणाचा डबा घेवून जवळच्या बागेत किंवा तळ्याकाठी केलेल्या अंगत पंगत जेवणाची चव वेगळी लागेल का ? आपल्या मुलांच्या बरोबरीने माचीस ची कव्हरे , पोस्टाची तिकिटे , पोकीमॉन ची चित्रे जमवण्यात वेडेपणा वाटेल का ? कधी वेळात वेळ काढून आपल्या मुलांच्या मित्रांबरोबर क्रिकेट ,फुटबॉल खेळण्यात आणि खोटे खोटे हरण्यात खरच कमीपणा असेल का ? कधी वेळेच्या आधी मुलाला शाळेत स्कूलबसने न पाठवता स्वतः पोहोचवायला आवडेल का ? बायको चहा घेवून यायच्या आत अंथरुणे आवरून बेडरूम नीटनेटकी केल्यावर बायको रागावेल का ? कधी तिला न कळवता तिच्या ऑफीसच्या दारात ऑफीस सुटण्याच्या वेळेला तुम्हाला पाहून तीला गोड धक्का बसेल का ? आणि दोघे मिळून घरी परत येताना तीला आवडणारी कचोरी आवर्जून खायला घातल्यावर ती तृप्त होईल का ? तिच्या आवडत्या झाडाला एके दिवशी सकाळी तुम्ही जर पाणी घातले तर काय होईल ?
सांग सांग भोलानाथ या सर्वामधून सुख मिळेल का ...... हो नक्की मिळेल , सुख काही कोठल्या " पपलू " चिडिया का नाम नाही हैं. सुख उपभोगणे हा विषय नसून ती वृत्ती आहे . मग काय आज पासून या संदर्भातील गोष्टींची " थिंग्स टू डू " ची लिस्ट बनवणार की नाही ?
वाचने
12311
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रवीण दवणे तुमचे आवडते लेखक आहेत काय..?
सुख ..सुख म्हणजे नक्की काय
सुख..
In reply to सुख ..सुख म्हणजे नक्की काय by जेनी...
रोज रोज तुमचे लेख वाचणे हेही
विरामचिन्ह राहिलं का रे?
In reply to रोज रोज तुमचे लेख वाचणे हेही by प्रचेतस
छे छे. चातक जशी पर्जन्याची
In reply to विरामचिन्ह राहिलं का रे? by अन्या दातार
जयास वाटे सुखचि असावें| तेणें रघुनाथभजनीं लागावें |
प्रश्नातच उत्तर आहे !
:)
In reply to प्रश्नातच उत्तर आहे ! by चौकटराजा
जे आसपास होतंय घडतंय ते
सुपर लाइक
In reply to जे आसपास होतंय घडतंय ते by गवि
http://www.misalpav.com/node/
.
In reply to http://www.misalpav.com/node/ by सुहास..
याच धर्तीवर म्हणतो.
In reply to http://www.misalpav.com/node/ by सुहास..
???
@रेवती आज्जी
In reply to ??? by वपाडाव
अग्गो बाई,मला तर वाटल होत कि
In reply to ??? by वपाडाव
बायको स्वतःची होती असे कुठे
In reply to अग्गो बाई,मला तर वाटल होत कि by किचेन
जाउ दे रे, विम्या...
In reply to बायको स्वतःची होती असे कुठे by विश्वनाथ मेहेंदळे
सुख म्हणजे सुख असतं, न
:-(
In reply to सुख म्हणजे सुख असतं, न by ५० फक्त
सुख उपभोगणे हा विषय नसून ती
सुख म्हनजे नक्कि काय असतं ,
सगळ्यांच्या प्रतिक्रिया
In reply to सुख म्हनजे नक्कि काय असतं , by जेनी...
ह्म्म बरोबर आहे तुमच
In reply to सगळ्यांच्या प्रतिक्रिया by विश्वनाथ मेहेंदळे
विमे,
In reply to सगळ्यांच्या प्रतिक्रिया by विश्वनाथ मेहेंदळे
मी तर तुम्हा सर्वांच्या
In reply to विमे, by वपाडाव
@मी तर तुम्हा सर्वांच्या
In reply to मी तर तुम्हा सर्वांच्या by किचेन
लिहा हो तुम्ही. लोकांची
In reply to मी तर तुम्हा सर्वांच्या by किचेन
सुख म्हनजे नक्कि काय असतं ,
सुख आणि आनंद म्हणजे सेम का?
सुख हे सहसा शरीराशी संबंधित
In reply to सुख आणि आनंद म्हणजे सेम का? by मराठे
सुख व आनंद !
सत्यनारायणाचा प्रसाद खाणं हे
In reply to सुख व आनंद ! by चौकटराजा
@ चौकटराजा, छे छे, माझ्या
In reply to सत्यनारायणाचा प्रसाद खाणं हे by प्रचेतस
मार्मिक.
In reply to @ चौकटराजा, छे छे, माझ्या by ५० फक्त
@श्री. सुड यांना बालुशाही,
In reply to @ चौकटराजा, छे छे, माझ्या by ५० फक्त