हद्दपार झालेली चिमणी
परवा माझ्या ३ वर्षाच्या भाचीला सियाला गोष्ट सांगत होते 'एक होती चिमणी अन एक होता कावळा..'
सिया म्हणाली 'आत्या मला चिमणी दाखव ना कशी असते ?'
पाहिलं तर खरच कि एकाही झाडावर चिमणी दिसेना. आमच्या लहानपणी चिमण्या अन कावळे भरपूर असत झाडांवरून. त्यांची भांडणे पाहणे हा मस्त टाइम पास असायचा. बागेत पाणी सोडले असताना त्या फवाऱ्यात चिवचिव करत अंघोळ करण्याऱ्या चिमण्या पहायला खूप मजा येई. त्यांचे थवे या झाडावरून त्या झाडावर भुर्रकन उडताना माना वळवून वळवून दुखेपर्यंत पाहत राहायचो. मुठभर तांदूळ टाकले कि सगळा थवा भुर्रकन खाली येताना पाहण्यासाठी आईआजीच्या पाठी लागून सारखे तांदूळ आणत असू. चिमण्यांची घरटी शोधून काढून त्यातली अंडी हळूच डोकावून पाहण्यातले थ्रील वेगळेच !
क़्वचित कधी घरट्यातून खाली पडलेले चिमणीचे पिलू कापसात गुंडाळून पुन्हा घरट्यात नेऊन ठेवण्यासाठी मारामारीसुद्धा व्हायची. त्याला कावळ्याने टोचू नये याची खबरदारी बाहुलीच्या बाळापेक्षा दक्षतेने घेतली जाई. संध्याकाळ झाली हे सूर्य बुडण्याआधी चिमण्यांच्या कर्कश चिवचिवाटाने समजत असे.
चिमणी हे मित्रराष्ट्र आणि कावळा शत्रूराष्ट्र . कावळा नेहमी दुष्टच असे. आणि चिमणी गरीब बिचारी. कावळ्याच्या पिलाला कोणी पडले तरी हात लावत नसे. एकदा तर मी चिमण्यांच्या एका गटाला, एका कावळ्याला टोचून टोचून, आपल्या घरट्यापासून हाकलताना पाहिले होते. तेव्हापासून तर चिमणी गरीब बिचारी आणि कावळा दुष्ट हि कल्पना डोक्यात एकदम घट्ट बसली.
गोष्टीमधून तर कावळे अन चिमण्याच असत . ‘हा घास चिऊचा..’ पासून बालपणाची, तर ‘चिऊताई दार उघड’ या गोष्टीने कथांची सुरुवात होई. चिमणीची गोष्ट म्हणजे कुणातरी जीवाभावाच्या मैत्रिणीची गोष्ट वाटे. चिमणी हे टोपण नाव गल्लीतील एक तरी मुलीचे असे. एकुणात आमचे बालपण मजेत पार पडण्यात चिमणीचा महत्वाचा वाटा आहे.
पण अलीकडे बालकांना चिमणी दाखवण्यापुरती सुद्धा शिल्लक असू नये ? काय हे दुर्दैव ! चिमणीच्या गोष्टीतली मजा या मुलांना अनुभवताच येत नाही. कावळा-चिमणीची गोष्ट म्हणजे त्याना दूरवरच्या अनोळखी प्राण्यांची गोष्ट वाटते.. जिवंत चिमण्यांचे भांडण आणि त्यातले नाट्य यातली मजा त्यांना कुठून समजणार?
अलीकडे आमच्या झाडावर काळे तुरा अन दाढीवाले बुलबुल पक्षि येतात. मुठीएवढे रंगीत पक्षि येतात. क़्वचित पोपटांचा थवा दिसतो. थंडीच्या दिवसात मोरपंखी पिसाचा खंड्यासुद्धा दिसतो. पण चिमण्या दिसतच नाहीत.
कुठे बरे गेल्या या 'गरीब बिचाऱ्या' चिमण्या ?
कुणीतरी आमच्या बालपणीची आठवण म्हणून त्यांना जतन करा हो....
याद्या
6093
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
लिना छान लिहिल आहे. खरच हल्ली
कुणीतरी आमच्या बालपणीची आठवण
+1 क्लास काम
In reply to कुणीतरी आमच्या बालपणीची आठवण by गवि
छान लिहिले आहे
चिमण्यांची संख्या कमी झाली
किती दशकांत होतील?
In reply to चिमण्यांची संख्या कमी झाली by गणेशा
मस्त लालित्यपूर्णे !
लेख आवडला.
चिमण्या
मस्तच आलाय फोटो !
In reply to चिमण्या by जयंत कुलकर्णी
मलापण
आमच्या घरी आहेत अजुनही
+१
In reply to आमच्या घरी आहेत अजुनही by सर्वसाक्षी
आमच्या घरी या, रोज सकाळी
५० जी आणि सर्वसाक्षी, वाचुन
In reply to आमच्या घरी या, रोज सकाळी by ५० फक्त
Anyway, सा॑भाळा त्या॑ना.
In reply to ५० जी आणि सर्वसाक्षी, वाचुन by सस्नेह
दोघा॑च्या......
In reply to Anyway, सा॑भाळा त्या॑ना. by ५० फक्त
"शहरीकरणामुळे खाणे मिळत नसावे
In reply to ५० जी आणि सर्वसाक्षी, वाचुन by सस्नेह
चिमण्या....
अगदी अगदी
In reply to चिमण्या.... by प्रभाकर पेठकर
कै च्या कै !!
In reply to चिमण्या.... by प्रभाकर पेठकर
कोल्हे?
In reply to कै च्या कै !! by सुहास..
आमच्या हॉलच्या खिडकीत होतं
चिमण्या कमी दिसतात
खास वर्गातले?
In reply to चिमण्या कमी दिसतात by पैसा