Skip to main content

सैनिकी शिक्षणातून राष्ट्रनिर्माण.

Published on सोमवार, 20/02/2012
एका बाजुला स्वराज्य हा आपला जन्म सिद्ध अधिकार मिळविण्यासाठी घनघोर प्रयत्न चालू असताना या देशातल्या काही महान द्रष्ट्या असामींनी शेकडो वर्षांच्या आक्रमणांनी उध्वस्त झालेल्या या राष्ट्राच्या पुनर्निमाणाची तयारी स्वयंस्फुर्तीने आणि असामान्य देशभक्तीच्या जोरावर सुरु केली होती. पन्नाससाठ वर्षानंतरचा भारत या महान देशभक्तांनी जर त्या त्या वेळी कल्पना करून त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात आजन्म स्वत:ला गाडून घेतले नसते तर आपला देश आज कदाचित या जगभरातल्या कौतुकाने दखल घ्याव्या अश्या पहिल्या पाच सात देशांच्या यादी मध्ये येऊ शकला नसता आणि त्याची फळे भारतीयांना मिळाली नसती. होय, आज भारतीय नागरिकांना त्यांना मिळालेल्या राजकीयस्वातंत्र्या बरोबरच त्यांचे अनेकविध पैलू जे जगभर चमकत आहेत ते तेज प्राप्त करून देण्यामागे कित्येक द्रष्ट्या देशभक्तांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली आहे हे अमान्य करण्याचा अपराध करता येणार नाही. या निष्काम कर्मयोग आचारणाऱ्या समाजसेवकांमध्ये महात्मा फुले, होमी भाभा, जे आर डी टाटा, अश्या अगणित महाजनांची यादी करता येईल. सामाजिक समरसता, विज्ञान, उद्योग इत्यादी अश्या महत्वाच्या क्षेत्रात काम करून राष्ट्र उभारणीच्या कामा मध्ये अतिशय वंदनीय कामगिरी केली आहे. या यादीमध्ये शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या डॉ बाळकृष्ण शिवराम मुंजे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. डॉ मुंजे हे नाशिक मध्ये वसलेल्या आणि या देशाचे वैभव असणाऱ्या भोसला सैनिकी शाळेचे संस्थापक म्हणून जरी सर्व परिचित असले तरी त्यांचे योगदान एका सैनिकी शाळेची निर्मिती इतकेच मर्यादित नक्कीच नव्हते. केंद्रीय हिंदु सैनिकी शिक्षण संस्था संचलीत भोसला सैनिकी शाळा या वर्षी हिरक महोत्सव साजरे करत आहे. त्या निमित्ताने डॉ मुंजे यांचा समग्र शिक्षण व्यवस्थे विषयीचा विचार आणि त्यांनी या क्षेत्रात शेवटच्या घटके पर्यंत केलेले असामान्य प्रयत्न या विषयी परिचित असणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे असे मनोमन वाटते. स्वतंत्र भारता साठी अनेक विध क्षेत्रामध्ये आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाची त्यांनी त्या काळी केलेली कल्पना आणि माणूस घडविण्यासाठी आवश्यक व्यवस्था निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न आज दिपुन जावे इतके, नतमस्तक व्हावे असे आहेत. १८३४ साली मकॅउलाय हे ब्रिटीश सांसद भारतात आले. ते नामवंत कवी आणि इतिहास तज्ञ होते. त्यांना भारतातील संस्कृत आणि पारशी भाषेतील इतिहास लेखन हे त्यांच्या इंग्रजी प्राथमिक शाळेतील पुस्तकांमधील लेखनापेक्षाही क्षुल्लक वाटे. तसे १८३५ साली त्यांनी त्यांच्या प्रसिद्ध पावलेल्या लिखाणामध्ये उधृत केले आहे. इंग्रजीशी तुलना करता संस्कृत आणि प्रचलित पारशी अत्यंत दळभद्री आणि उद्धट भाषा आहेत आणि इंग्रजी विद्वत्तेच्या पासंगाला पुरणाऱ्या नाहीत अशी त्यांची ठाम धारणा होती. त्यामुळे इथली स्थानिक अभ्यासाची भाषा त्यांना कुचकामी वाटे. त्यांनी पहिला प्रहर केला तो शिकण्याच्या माध्यमावर. शिकण्याचे माध्यम इंग्रजी असावे असा त्यांनी पायंडा पाडला आणि मातृभाषेतून शिक्षण घेणे निम्न दर्जाचे ठरवले. त्या पुढे जाऊन त्यांनी आणखी एक भीषण शिक्षणाचे धोरण ठरवले ते असे की सुरुवाती पासुनच शिक्षण असे द्यायचे की रंगाने आणि रक्ताने इथला नागरिक भारतीय असेल पण वृत्तीने आणि वागण्याने पाश्चात्य असेल, इंग्रजी असेल. इतिहासात अशा प्रकारे उत्पन्न समाजाला " मकॅउलायची संतती" असे संबोधले जाते. हे संबोधन 'आपल्या देशाविषयी अनास्था असणारा वा ममत्व न बाळगणारा आणि तिथल्या परंपरेविषयी प्रेम नसणाऱ्या जनतेसाठी आजही काही वेळा जगभर वापरले जाते. मकॅउलाय साहेबांनी अधिकारातून त्यांनी अश्या प्रकारची शिक्षण पद्धती रूढ केली. १८९८ साली वैद्यकीय अभ्यासक्रम संपवून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले डॉ. बा. शी. मुंजे मुंबई नगरपालिकेत दरमहा रु पाचशे मिळणाऱ्या घसघशीत पगारावर वैद्यकीय विभागात काम करत होते. एके संध्याकाळी डॉ मुन्जेंना ब्रिटीश लष्कराची एक जाहिरात वाचायला मिळाली. दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या युद्धभूमीवर जखमी सैनिकांसाठी वैद्यकीय सेवा देऊ शकणारे डॉक्टर्स त्यांना हवे होते. युद्धभुमीचा थरार अनुभवण्याच्या उद्देशाने डॉ मुंजे त्यांचे मित्र, सहकारी गाडगीळ, जतकर, पारधी हे सगळे दक्षिण आफ्रिकेला निघाले. दक्षिण आफ्रिकेत या तरुणांचे यजमान होते बँ. मोहनदास करमचंद गांधी ज्यांनी या मित्रांना डर्बन दाखवले. या सामुर्ण प्रवासात मुंजेच्या मनावर प्रमख काही बाबींचा अतिशय खोलवर परिणाम झाला. एकतर गोरे नसणाऱ्याना मिळणारी अमानवी वागणूक, विषम वागणुक. दुसरे ब्रिटीश लष्करी अधिकाऱ्यांची प्रचंड धाडसी लढाऊ वृत्ती आणि जीवाची पर्वा न कर्तव्य बजावण्याची वृत्ती. आणखी एक महत्वाचे निरीक्षण त्यांनी केले ते म्हणजे त्या भूमीवर इंग्रजांबरोबर लढणारे भारतीय सैनिक होते, पण सैन्य अधिकारी नव्हते. अधिकारी इंग्रजच होते. या संदर्भातील घटनांनी डॉ मुंजेच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांनी, विचारांनी धुमाकूळ घातला असेल. युद्ध भूमीवर त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना सन्मानाने परदेशी स्थाईक होण्याची मुभा होती. काही गेले. डॉ मुंजे मायदेशी परतले. इकडे भारतात घणाघाती आणि स्पष्ट विचारांमुळे लोकमान्य टिळकांकडे आकर्षित झालेल्या या तरुणालासभोवतालचा समाजमात्र आता एका वेगळ्या दृष्टीने बघावयास मिळत होता. चेहरा हरवलेला समाज. दिवस ढकलणारा समाज. लढाऊ वृत्तीचा संपुर्ण अभाव असलेला समाज. कर्तव्यांची परवा नसलेला समाज. स्वाभिमान शून्य समाज. सहज स्वामित्व हरवू शकेल आणि बहाल करू शकेल असा समाज. पण याच समाजातल्या तेरा लाख सैनिकांनी इंग्रज अधिकाऱ्यांच्या नेतृत्वखाली चिवटपणे झुंजून अन्य गोऱ्यां विरुद्ध लढून पहिल्या महायुद्धात इंग्रजांना विजय मिळवुन दिला. डॉ मुंजेंच्या हे ही ध्यानात आले की एव्हढा पराक्रम करून आलेल्या सैन्याला जाणून बुजून शाबासकीची साधी थाप ही न मिळाल्याची खंत ही या समाजाला नाही! दरम्यान डॉक्टरांनी नागपुरात वैद्यकीय सेवा देणं सुरु ठेवलं होतं. पण संवेदशील मन व्याकुळ होतं ते सभोवतालच्या रंगहीन चित्राने. एक विचार सतत छळत होता. एक दिवस हा देश स्वतंत्र होईल. कदाचित तो दिवस दुरही नाही. पण स्वतंत्र भारतात काय हा समाज असाच असेल ? लढाऊ वृत्ती नसलेला? स्वाभिमान शून्य ? कर्तव्यांची बूज न राखणारा ? आणि अश्या समाजावर उभा असलेला माझा देश असेल कसा ? या व्याकुळ मनाने एका निश्चयाला जन्म दिला तो या समाजाला बदलण्याचा. यातुनच १९२७ साली हिंदु महासभे तर्फे डॉ मुंजेंनी मध्यवर्ती संसदेची निवडणुक लढवली आणि जिंकली. इथुन पुढला प्रवास प्रामुख्याने डॉ मुंजेनी शिक्षणातून स्वाभिमानी आणि शिस्तबद्ध, कर्तव्य समाज घडविण्यासाठीच केला, आयुष्याच्या अंतापर्यंत. डॉ मुंजेनी संसदेमध्ये संरक्षण विषयक अंदाज पत्रकावरील चर्चेमध्ये प्रमुख पणे भाग घेतला. त्यांच्या घणाघाती भाषणा मध्ये त्यांनी प्रत्येक भारतीय शाळेमध्ये आणि महाविद्यालयात सैनिकी शिक्षण देण्याची मागणी केली. एक तृतीयांश खर्च लष्करावर एका बाजुला खर्च होत असताना भारतीय चेहऱ्याचे सैनिकी अधिकारी का नाही या देशात तयार होत ? असा खडा सवाल त्यांचा त्या काळच्या इंग्रज राज्यकर्त्यांना होता. लष्करी शिक्षण, लष्करी अंदाज पत्रक इत्यादी लष्कर विषयांचे अभ्यासू वक्ते म्हणून डॉ मुंजे यांची ख्याती होती. " एखाद्या राष्ट्राच्या संरक्षण सिद्धतेत तिथल्या लष्कराची कार्यक्षमता महत्त्वाचीच असते आणि कार्यक्षम लष्कर उभे करण्यासाठी शाळापातळीवर लढाऊ वृत्तीचे, देश प्रेमाचे धडे देणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे, हे डॉ मुंजे यांचे म्हणणे अगदी बरोबर असुन माझ्या सारख्या इंग्रजी अधिकाऱ्याला अमान्य असण्याचे काहीच कारण नाही" असे स्पष्ट मत जी. एम. यंग यांच्या सारख्या उच्च इंग्रजी अधिकाऱ्याचे असायचे. "लष्कराचे भारतीयकरण" हा ही डॉ मुंजे यांच्या ध्यासाचा होता. आणि सक्षम भारतीय अधिकारी तयार करण्यासाठी इंग्रज सरकारला राजी होण्यास भाग पाडलं होता. त्यांच्या प्रयत्नांचे फळ असे मिळाले की इंग्रज सरकारने भारतीय शाळांमध्ये आणि महाविद्यालयात १६ ते २० वयोगटातल्या मुलामुलींसाठी शारीरिक शिक्षण, कवायती आणि बंदूक चालविण्याचे शिक्षण सक्तीचे केले. एका अर्थाने डॉ मुंजे यांनी घेतलेल्या समाज परिवर्तांच्या ध्यासाचा महान विजयी टप्पा होता. सैनिकी शिक्षणातून उत्तम सैनिक आणि सैन्य अधिकारी तर तयार होतीलच पण त्याच्या पलीकडे जाऊन ही या समाजाला या शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे, वेग वेगळ्या क्षेत्रात काम करू शकणाऱ्या भक्कम भारतीयांची. खेळाच्या मैदानावरच मानसिक विकास होईल, त्यातून शिस्त बद्ध स्वतंत्र वृत्तीचा भारतीय नागरिक तयार होईल या तत्वावर डॉ मुंजेंचा ठाम विश्वास होता. नागपुरात त्यांनी एक राष्ट्रीय क्लब ची स्थापना केली होती. मुला मुलीना, महिला पुरुषांना शिरीरिक शिक्षण देण्याची प्रथा त्यांनी सुरु केली. भालाफेक, दंड बैठका, कब्बड्डी, या सारखे प्रकार या एकत्रीकरणात त्यांनी प्रयत्नपूर्वक रुजवले. १९३० साली व्होईसरोय चे गोलमेज परिषदेचे निमंत्रण त्यांनी स्वीकारले. गोलमेज परिषदेला जोडून इंग्लंड मधल्या आणि आजूबाजूच्या सैनिकी शाळांमध्ये त्यांचा अभ्यास करण्यासाठी ते गेले. जर्मनीत एका शाळेत त्यांना विचारले की हा सर्वे डॉ मुंजे का करत आहेत. १९३० साली त्यांनी सांगितले की आमच्या भारतीय समाजाला संपुर्ण सैनिकी शिक्षण देणाऱ्या शाळांची गरज आहे. आजतरी भारतीय मुलांसाठी अशी शाळा नाही. सरकारने त्या चालू कराव्यात असा माझा त्यांना आग्रह आहे पण त्यांनी ते नाही केलं तर मला करायचं आहे, म्हणून मी युरोपातल्या सैनिकी शाळा अभ्यासतो आहे. पुढे १९३२ साली डॉ मुंजे आणि अन्य सहकारी यांच्या प्रयत्नातून देहरादून ला Indian Millitary Acadamy ची सुरुवात झाली. हे आणखी एक मिळालेलं फळ होतं. यातुन लष्कराचे भारतीय करण करण्याची प्रक्रिया आता सोपी जाणार होती. त्या आधी लष्करी अधिकाऱ्यांना प्रशिक्षणा साठी इंग्लंड मध्ये जावे लागे. डॉ मुंजेंचा ध्यास त्यांना थांबवत नव्हता. त्यांनी या देहरादून च्या अकादमीला प्रशिक्षणार्थी अधिकारी उपलब्ध व्हावेत म्हणून लहान पणा पासूनच म्हणजे शालेय जीवनापासूनच सैनिकी शिक्षण देण्यासाठी सैनिकी शाळा सुरु केल्या पाहिजेत हा लढा चालू ठेवला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. इंग्रज सरकारने त्यांना शाळा चालू करायची परवानगी दिली आणि सुरुवातीला लष्करातले अधिकारी ही शाळेत पाठविण्याचे कबुल केले. आठ वर्षांच्या अथक प्रयत्नांनी १५ जून १९३७ रोजी नाशिक मध्ये ४० विद्यार्थ्याची पहिली तुकडी सुरु करण्यात डॉ मुंजे यांना यश आले. पहिल्या तुकडी मध्ये देशभरातल्या वेग वेगळ्या ठिकाणाहून विद्यार्थी रुजू झाले होते. हा महान शिक्षण ऋषी पालकांना " मला एकतर भरघोस देणगी द्या किंवा तुमचा मुलगा शाळेत पाठवा" अशी विनंती करायचा. या शाळेने आजवर भारतीय संरक्षण विभागात तीन ही दलात कार्य करणारे महान सैनिक, नेते दिलेच पण लष्कराव्यातिरिक्त अन्य क्षेत्रातही नेतृत्व करू शकतील अशी खंबीर माणसे निर्माण केली आहेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4737
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

मुतालीक साहेब फार छान माहिती दिलीत आपण. मला डॉ मुंजे हे सावरकरांचे उजवे हात होते हे माहित होते. आपण दिलेली माहिती योग्य व कालसापेक्ष आहे. http://www.rashtravrat.blogspot.in/2010/08/syllabus-for-primary-school-children.html साहेब जमले तर माझ्या ह्या लेखावर नजर टाका लेख इंग्रजी मध्ये आहे. म्हणून नुसतीच लिंक देत आहे.

फार छान लेख आहे. डॉ. मुंजे यांची ओळख झाली ती एक हिंदूत्ववादी आणि त्यांच्या कार्यामधुन तसेच डॉ. हेडगेवारांचे स्नेही म्हणुन. पण त्यांच्याविषयी ईतकी संगतवार माहीती ह्या लेखातून मिळाली.

अरे वा! हा लेख मी आधी मिपावर आणि नंतर दिव्य मराठीमध्‍ये वाचला. http://epaperdivyamarathi.bhaskar.com/Details.aspx?id=21165&boxid=22014421734 डॉ. मुंजेंच्या कार्याची नव्याने ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. भोसला मिलीटरी स्कुलच्या अमृत महोत्सव पुरवणीतील हा एक लेख आहे असे डिस्क्लेमर टाका प्लीज. म्हणजे पब्लीक फालतू वाद घालणार नाही.

मुतालिक साहेब, आभारी आहे. डॉ. मुंजे यांनी भोंसला मिलिटरी स्कूल सुरू केली इतकं माहिती होतं, पण त्या कार्याची पूर्वपीठिका माहित नव्हती. समकालिन द्रष्ट्या पुरूषांची मालिकाच त्यावेळच्या भारतात पहायला मिळते हे एक आश्चर्यच म्हटलं पाहिजे. त्याकाळी डॉ. मुंज्यांनी लष्कराचे भारतीयीकरण हे स्वप्न ठेवले. आता मर्यादित अर्थाने व स्वरूपात तरी भारतीयांचे लष्करीकरण होणं आवश्यक आहे. हारून साहेब, पुरोहितादींवरचे आरोप सिद्ध होण्याची वाट बघावी. आणि ते झाले काय नि न झाले काय; आजवर जगभरात झालेल्या सर्व दहशतवादी कृत्यांतले नि नृशंसातल्या नृशंस हत्याकांडांतले अतिरेकी हे कुठल्या ना कुठल्या शाळेत गेलेलेच होते. यासाठी त्या शाळांवर दोष टाकता येत नाही.

In reply to by कौन्तेय

हो बरोबर. डॅनियल पर्लचा निर्घुण खून करणारा तर "लंडन स्कूल ऑफ बिझनेस ऍन्ड इकॉनॉमिक्स" चा होता असे वाचल्याचे आठवते. म्हणजे "लंडन स्कूल ऑफ बिझनेस ऍन्ड इकॉनॉमिक्स" ही दहशतवादी तयार करणारी शिक्षणसंस्था थोडीच बनते?

उत्तम लेख. भारतातल्या सर्व शाळांमधे सैनिकी शिक्षण सक्तीचे करता येईल. परंतु त्याही योजनेचा सर्वशिक्षा अभियानामुळे बोजवारा उडण्याचीच शक्यता जास्त. मूळात लोकांवर स्वाभिमान, प्रामाणिकता यांचे संस्कार कोण करणार हा प्रश्न महत्वाचा आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैर वागणार्‍या नेते, समाजसुधारक, सिनेमा-नाटक-वॄत्तपत्रे यांच्याने हे काम होईलसे वाटत नाही.

In reply to by मन१

मी तुमच्या प्रतिसादातील २ वाक्यांशी सहमत... वरील चर्चेवरुन एक वाक्य आठौले... *Don't hate in the plural.* बाकी, काय काशी घालायची आहे ती घाला... तेवढं स्वातंत्र्य बहाल केलंय...

In reply to by वपाडाव

Don't hate in the plural. हॅ हॅ हॅ ते समजण्यासाठी वुडहाउस व्हावे लागते डोक्याने. बाकी चालूद्यात

सुधीर साहेब , यादितील कुणीच भोसला मध्ये शिकायला कधीच नव्हते हे म्हणणे मान्य आहे. पण त्यातले दोघेजण शाळेच्या प्रशासनात तर होतेच ना. 'दहशतवादाला दहशतवादी कार्वायानीच उत्तर दिले पाहिजे' असा मुलतत्ववादी विचार करणारे लोक एका सैनिकी शिक्षण देणाऱ्या शाळेच्या प्रशासनात असणे हि गंभीर बाब नव्हती ? आधुनिक युध्द शास्त्र (modern warfare technique) असे मान्य करते की एका साध्या सैनिकापेक्षा धार्मिक किंवा कुठल्याही इतर मुलतत्ववादी विचारांनी प्रेरित झालेला सैनिक जास्त कडवा असतो. दहशतवादी हे अशा प्रकारातले सैनिकच होत. (उदा. जिहादी , नक्षलवादी ...). मुलांच्या मनावर असे विचार बिम्ब्वावेत असा प्रयत्न शाळेच्या प्रशासनाला सहज शक्य होता. मी देखील नाशिकचा आहे. भोसला मिलिटरी स्कूल हि दहशतवादी तयार करणारी शाळा आहे असे मी म्हणणार नाही. पण एका प्रकारच्या दहशतवादाला प्रोत्साहन देणारे , जमल्यास सक्रीय पाठींबा देणारे लोक या संस्थेत होते हि बाब चिंतेची वाटली होती. आहे. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सुधीर साहेब , यादितील कुणीच भोसला मध्ये शिकायला कधीच नव्हते हे म्हणणे मान्य आहे. पण त्यातले दोघेजण शाळेच्या प्रशासनात तर होतेच ना. ------- मग? 'दहशतवादाला दहशतवादी कार्वायानीच उत्तर दिले पाहिजे' असा मुलतत्ववादी विचार करणारे लोक एका सैनिकी शिक्षण देणाऱ्या शाळेच्या प्रशासनात असणे हि गंभीर बाब नव्हती ? ------- मग दहशतवादाला कशा प्रकारे उत्तर द्यावे हे पण सांगा. उगाच अमन की आशा ठेऊन अथवा बस पाठवून काहीही होत नाही हे शेकडो वेळा सिद्ध झाले आहे. ह्या लोकांवर असे प्रत्युत्तर द्यायची वेळ आणली कुणी? दहशतवादी हे अशा प्रकारातले सैनिकच होत. (उदा. जिहादी , नक्षलवादी ...). ------- दहशतवादी हे सैनीक नसतात. ते दहशतवादीच असतात. उगाच नको तिथे पुळका नकोय. मुलांच्या मनावर असे विचार बिम्ब्वावेत असा प्रयत्न शाळेच्या प्रशासनाला सहज शक्य होता. ------- होता. केला ह्याला पुरावा आहे का? मी देखील नाशिकचा आहे. भोसला मिलिटरी स्कूल हि दहशतवादी तयार करणारी शाळा आहे असे मी म्हणणार नाही. पण एका प्रकारच्या दहशतवादाला प्रोत्साहन देणारे , जमल्यास सक्रीय पाठींबा देणारे लोक या संस्थेत होते हि बाब चिंतेची वाटली होती. आहे. ------- बरं. असे लोक अनेक शाळांमधे नाहीत ही बाब आम्हाला चिंतनीय वाटते.

In reply to by आदिजोशी

सुधीर साहेब , यादितील कुणीच भोसला मध्ये शिकायला कधीच नव्हते हे म्हणणे मान्य आहे. पण त्यातले दोघेजण शाळेच्या प्रशासनात तर होतेच ना. ------- मग? ~~~ मग काय ते माझ्या प्रतिसादाच्या पुढच्या ओळीत लिहिले आहेच की. 'दहशतवादाला दहशतवादी कार्वायानीच उत्तर दिले पाहिजे' असा मुलतत्ववादी विचार करणारे लोक एका सैनिकी शिक्षण देणाऱ्या शाळेच्या प्रशासनात असणे हि गंभीर बाब नव्हती ? ------- मग दहशतवादाला कशा प्रकारे उत्तर द्यावे हे पण सांगा. उगाच अमन की आशा ठेऊन अथवा बस पाठवून काहीही होत नाही हे शेकडो वेळा सिद्ध झाले आहे. ह्या लोकांवर असे प्रत्युत्तर द्यायची वेळ आणली कुणी? ~पण म्हणून एका प्रकारच्या दहशतवादाला प्रोत्साहन द्यायचे का ? असे केल्यानेच आपल्या शेजारील देशाची अवस्था काय झालीय त्यापासून आपण धडा घेतला पाहिजे. दहशतवादी हे अशा प्रकारातले सैनिकच होत. (उदा. जिहादी , नक्षलवादी ...). ------- दहशतवादी हे सैनीक नसतात. ते दहशतवादीच असतात. उगाच नको तिथे पुळका नकोय. ~~~पुळका नाहीच. सैनिकासारखे प्रशिक्षण त्यांना मिळते असे म्हणायचे आहे. मुलांच्या मनावर असे विचार बिम्ब्वावेत असा प्रयत्न शाळेच्या प्रशासनाला सहज शक्य होता. ------- होता. केला ह्याला पुरावा आहे का? ~~~ह्याला काही पुरावा देता येणे शक्य नाही. या गोष्टी इतक्या subtle लेवल वर होऊ शकतात कि पुरावा देणे केवळ अशक्यप्राय आहे. आणि दिलाच तरी घटनेने दिलेल्या स्वातंत्र्याच्या दुरुपयोग करून कोणीही सुटून जाऊ शकते. मी देखील नाशिकचा आहे. भोसला मिलिटरी स्कूल हि दहशतवादी तयार करणारी शाळा आहे असे मी म्हणणार नाही. पण एका प्रकारच्या दहशतवादाला प्रोत्साहन देणारे , जमल्यास सक्रीय पाठींबा देणारे लोक या संस्थेत होते हि बाब चिंतेची वाटली होती. आहे. ------- बरं. असे लोक अनेक शाळांमधे नाहीत ही बाब आम्हाला चिंतनीय वाटते. ~~~आपण फक्त विरोधासाठी असे विधान न करता माझे म्हणणे कृपया समजून घ्यावे अशी विनंती आहे. --------------------------------------------------------------------------------------------------------------------

In reply to by आदिजोशी

मग दहशतवादाला कशा प्रकारे उत्तर द्यावे हे पण सांगा.
दहशतवादाला उत्तर म्हणजे दहशतवाद्यांचा किंवा त्यांच्या पाठिराख्यांचा समूळ उच्छेद करणे. निरपराधांना मारणे हे दहशतवादाला उत्तर नाही तर तो वेगळ्या स्वरूपातला दहशतवाद झाला. मालेगावातील जत्रेच्या वेळी झालेल्या स्फोटांमध्ये (२००६) किंवा नंतरच्या काळात (२००८) मध्ये झालेल्या स्फोटांमध्ये मारले गेलेले लोक दहशतवाद्यांचे पाठिराखे होते याविषयीचा कोणता पुरावा आहे तुमच्याकडे?
उगाच अमन की आशा ठेऊन अथवा बस पाठवून काहीही होत नाही हे शेकडो वेळा सिद्ध झाले आहे.
अमनची आशा किंवा बस पाठविणे हे प्रकार मालेगावात कोणी केल्याचे ऐकिवात नाही.
ह्या लोकांवर असे प्रत्युत्तर द्यायची वेळ आणली कुणी?
मालेगावातल्या लोकांनी मुळात काय केले होते की त्याला प्रत्युत्तर द्यायची वेळ आली?
असे लोक अनेक शाळांमधे नाहीत ही बाब आम्हाला चिंतनीय वाटते.
म्हणजे देशात अधिकाधिक निरपराध लोक मारले जावेत असे प्रतिसादकर्त्याला वाटते असे दिसते. संपादक मंडळी, याकडे लक्ष दिल्यास बरे होईल. (स्वगतः तुम्ही याला उत्तर देणार नाही याची खात्रीच आहे कारण स्वतः हिंदू म्हणून जन्माला आलो की आपोआप देशभक्त झालो आणि कोणी मुसलमान म्हणून जन्माला आला तर तो/ती आपोआप देशद्रोही अशा स्वरूपाची तुमच्यासारख्यांची विचारांची झेप असते. तुम्ही जोशी आहात असे दिसते. जर तुमच्या (म्हणजे व्यक्तिश: तुमच्या नव्हे तर तुमच्या "जाती"च्या) पूर्वजांनी दलितांनी जी वागणूक दिली त्याच्याशी तुमचा काही संबंध नाही हे मला माहित आहे पण त्याबद्दल तुम्हाला कोणी येऊन मारले तर कसे वाटेल याचा विचारही जरूर करा)

माझा प्रतिसाद हा बिनबुडाचा नव्हता. आपल्याला पडताळून पहावयाचे असल्यास या प्रकरणाशी संबंधित माहितीचा कृपया अभ्यास करावा हि कळकळीची विनंती !

अंधारात सगळी मांजरं काळी असतात !

आय एम ए ची सुरुवात कशी झाली यावर उत्तम लेख! डॉ मुंजे यांच्याबद्दल ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व असा उल्लेख बरेचदा वाचला आहे. एक छोटीशी शंका म्हणा, सूचना म्हणा, तुम्ही "मकॅउलाय"म्हटलंय, या नावाचा उच्चार बहुधा "लॉर्ड मेकॉले" असा वाचलेला आठवतोय.