एका बाजुला स्वराज्य हा आपला जन्म सिद्ध अधिकार मिळविण्यासाठी घनघोर प्रयत्न चालू असताना या देशातल्या काही महान द्रष्ट्या असामींनी शेकडो वर्षांच्या आक्रमणांनी उध्वस्त झालेल्या या राष्ट्राच्या पुनर्निमाणाची तयारी स्वयंस्फुर्तीने आणि असामान्य देशभक्तीच्या जोरावर सुरु केली होती. पन्नाससाठ वर्षानंतरचा भारत या महान देशभक्तांनी जर त्या त्या वेळी कल्पना करून त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात आजन्म स्वत:ला गाडून घेतले नसते तर आपला देश आज कदाचित या जगभरातल्या कौतुकाने दखल घ्याव्या अश्या पहिल्या पाच सात देशांच्या यादी मध्ये येऊ शकला नसता आणि त्याची फळे भारतीयांना मिळाली नसती. होय, आज भारतीय नागरिकांना त्यांना मिळालेल्या राजकीयस्वातंत्र्या बरोबरच त्यांचे अनेकविध पैलू जे जगभर चमकत आहेत ते तेज प्राप्त करून देण्यामागे कित्येक द्रष्ट्या देशभक्तांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली आहे हे अमान्य करण्याचा अपराध करता येणार नाही. या निष्काम कर्मयोग आचारणाऱ्या समाजसेवकांमध्ये महात्मा फुले, होमी भाभा, जे आर डी टाटा, अश्या अगणित महाजनांची यादी करता येईल. सामाजिक समरसता, विज्ञान, उद्योग इत्यादी अश्या महत्वाच्या क्षेत्रात काम करून राष्ट्र उभारणीच्या कामा मध्ये अतिशय वंदनीय कामगिरी केली आहे. या यादीमध्ये शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या डॉ बाळकृष्ण शिवराम मुंजे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. डॉ मुंजे हे नाशिक मध्ये वसलेल्या आणि या देशाचे वैभव असणाऱ्या भोसला सैनिकी शाळेचे संस्थापक म्हणून जरी सर्व परिचित असले तरी त्यांचे योगदान एका सैनिकी शाळेची निर्मिती इतकेच मर्यादित नक्कीच नव्हते. केंद्रीय हिंदु सैनिकी शिक्षण संस्था संचलीत भोसला सैनिकी शाळा या वर्षी हिरक महोत्सव साजरे करत आहे. त्या निमित्ताने डॉ मुंजे यांचा समग्र शिक्षण व्यवस्थे विषयीचा विचार आणि त्यांनी या क्षेत्रात शेवटच्या घटके पर्यंत केलेले असामान्य प्रयत्न या विषयी परिचित असणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे असे मनोमन वाटते. स्वतंत्र भारता साठी अनेक विध क्षेत्रामध्ये आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाची त्यांनी त्या काळी केलेली कल्पना आणि माणूस घडविण्यासाठी आवश्यक व्यवस्था निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न आज दिपुन जावे इतके, नतमस्तक व्हावे असे आहेत.
१८३४ साली मकॅउलाय हे ब्रिटीश सांसद भारतात आले. ते नामवंत कवी आणि इतिहास तज्ञ होते. त्यांना भारतातील संस्कृत आणि पारशी भाषेतील इतिहास लेखन हे त्यांच्या इंग्रजी प्राथमिक शाळेतील पुस्तकांमधील लेखनापेक्षाही क्षुल्लक वाटे. तसे १८३५ साली त्यांनी त्यांच्या प्रसिद्ध पावलेल्या लिखाणामध्ये उधृत केले आहे. इंग्रजीशी तुलना करता संस्कृत आणि प्रचलित पारशी अत्यंत दळभद्री आणि उद्धट भाषा आहेत आणि इंग्रजी विद्वत्तेच्या पासंगाला पुरणाऱ्या नाहीत अशी त्यांची ठाम धारणा होती. त्यामुळे इथली स्थानिक अभ्यासाची भाषा त्यांना कुचकामी वाटे. त्यांनी पहिला प्रहर केला तो शिकण्याच्या माध्यमावर. शिकण्याचे माध्यम इंग्रजी असावे असा त्यांनी पायंडा पाडला आणि मातृभाषेतून शिक्षण घेणे निम्न दर्जाचे ठरवले. त्या पुढे जाऊन त्यांनी आणखी एक भीषण शिक्षणाचे धोरण ठरवले ते असे की सुरुवाती पासुनच शिक्षण असे द्यायचे की रंगाने आणि रक्ताने इथला नागरिक भारतीय असेल पण वृत्तीने आणि वागण्याने पाश्चात्य असेल, इंग्रजी असेल. इतिहासात अशा प्रकारे उत्पन्न समाजाला " मकॅउलायची संतती" असे संबोधले जाते. हे संबोधन 'आपल्या देशाविषयी अनास्था असणारा वा ममत्व न बाळगणारा आणि तिथल्या परंपरेविषयी प्रेम नसणाऱ्या जनतेसाठी आजही काही वेळा जगभर वापरले जाते. मकॅउलाय साहेबांनी अधिकारातून त्यांनी अश्या प्रकारची शिक्षण पद्धती रूढ केली.
१८९८ साली वैद्यकीय अभ्यासक्रम संपवून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले डॉ. बा. शी. मुंजे मुंबई नगरपालिकेत दरमहा रु पाचशे मिळणाऱ्या घसघशीत पगारावर वैद्यकीय विभागात काम करत होते. एके संध्याकाळी डॉ मुन्जेंना ब्रिटीश लष्कराची एक जाहिरात वाचायला मिळाली. दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या युद्धभूमीवर जखमी सैनिकांसाठी वैद्यकीय सेवा देऊ शकणारे डॉक्टर्स त्यांना हवे होते. युद्धभुमीचा थरार अनुभवण्याच्या उद्देशाने डॉ मुंजे त्यांचे मित्र, सहकारी गाडगीळ, जतकर, पारधी हे सगळे दक्षिण आफ्रिकेला निघाले. दक्षिण आफ्रिकेत या तरुणांचे यजमान होते बँ. मोहनदास करमचंद गांधी ज्यांनी या मित्रांना डर्बन दाखवले. या सामुर्ण प्रवासात मुंजेच्या मनावर प्रमख काही बाबींचा अतिशय खोलवर परिणाम झाला. एकतर गोरे नसणाऱ्याना मिळणारी अमानवी वागणूक, विषम वागणुक. दुसरे ब्रिटीश लष्करी अधिकाऱ्यांची प्रचंड धाडसी लढाऊ वृत्ती आणि जीवाची पर्वा न कर्तव्य बजावण्याची वृत्ती. आणखी एक महत्वाचे निरीक्षण त्यांनी केले ते म्हणजे त्या भूमीवर इंग्रजांबरोबर लढणारे भारतीय सैनिक होते, पण सैन्य अधिकारी नव्हते. अधिकारी इंग्रजच होते. या संदर्भातील घटनांनी डॉ मुंजेच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांनी, विचारांनी धुमाकूळ घातला असेल. युद्ध भूमीवर त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना सन्मानाने परदेशी स्थाईक होण्याची मुभा होती. काही गेले. डॉ मुंजे मायदेशी परतले. इकडे भारतात घणाघाती आणि स्पष्ट विचारांमुळे लोकमान्य टिळकांकडे आकर्षित झालेल्या या तरुणालासभोवतालचा समाजमात्र आता एका वेगळ्या दृष्टीने बघावयास मिळत होता. चेहरा हरवलेला समाज. दिवस ढकलणारा समाज. लढाऊ वृत्तीचा संपुर्ण अभाव असलेला समाज. कर्तव्यांची परवा नसलेला समाज. स्वाभिमान शून्य समाज. सहज स्वामित्व हरवू शकेल आणि बहाल करू शकेल असा समाज. पण याच समाजातल्या तेरा लाख सैनिकांनी इंग्रज अधिकाऱ्यांच्या नेतृत्वखाली चिवटपणे झुंजून अन्य गोऱ्यां विरुद्ध लढून पहिल्या महायुद्धात इंग्रजांना विजय मिळवुन दिला. डॉ मुंजेंच्या हे ही ध्यानात आले की एव्हढा पराक्रम करून आलेल्या सैन्याला जाणून बुजून शाबासकीची साधी थाप ही न मिळाल्याची खंत ही या समाजाला नाही!
दरम्यान डॉक्टरांनी नागपुरात वैद्यकीय सेवा देणं सुरु ठेवलं होतं. पण संवेदशील मन व्याकुळ होतं ते सभोवतालच्या रंगहीन चित्राने. एक विचार सतत छळत होता. एक दिवस हा देश स्वतंत्र होईल. कदाचित तो दिवस दुरही नाही. पण स्वतंत्र भारतात काय हा समाज असाच असेल ? लढाऊ वृत्ती नसलेला? स्वाभिमान शून्य ? कर्तव्यांची बूज न राखणारा ? आणि अश्या समाजावर उभा असलेला माझा देश असेल कसा ? या व्याकुळ मनाने एका निश्चयाला जन्म दिला तो या समाजाला बदलण्याचा. यातुनच १९२७ साली हिंदु महासभे तर्फे डॉ मुंजेंनी मध्यवर्ती संसदेची निवडणुक लढवली आणि जिंकली. इथुन पुढला प्रवास प्रामुख्याने डॉ मुंजेनी शिक्षणातून स्वाभिमानी आणि शिस्तबद्ध, कर्तव्य समाज घडविण्यासाठीच केला, आयुष्याच्या अंतापर्यंत. डॉ मुंजेनी संसदेमध्ये संरक्षण विषयक अंदाज पत्रकावरील चर्चेमध्ये प्रमुख पणे भाग घेतला. त्यांच्या घणाघाती भाषणा मध्ये त्यांनी प्रत्येक भारतीय शाळेमध्ये आणि महाविद्यालयात सैनिकी शिक्षण देण्याची मागणी केली. एक तृतीयांश खर्च लष्करावर एका बाजुला खर्च होत असताना भारतीय चेहऱ्याचे सैनिकी अधिकारी का नाही या देशात तयार होत ? असा खडा सवाल त्यांचा त्या काळच्या इंग्रज राज्यकर्त्यांना होता. लष्करी शिक्षण, लष्करी अंदाज पत्रक इत्यादी लष्कर विषयांचे अभ्यासू वक्ते म्हणून डॉ मुंजे यांची ख्याती होती. " एखाद्या राष्ट्राच्या संरक्षण सिद्धतेत तिथल्या लष्कराची कार्यक्षमता महत्त्वाचीच असते आणि कार्यक्षम लष्कर उभे करण्यासाठी शाळापातळीवर लढाऊ वृत्तीचे, देश प्रेमाचे धडे देणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे, हे डॉ मुंजे यांचे म्हणणे अगदी बरोबर असुन माझ्या सारख्या इंग्रजी अधिकाऱ्याला अमान्य असण्याचे काहीच कारण नाही" असे स्पष्ट मत जी. एम. यंग यांच्या सारख्या उच्च इंग्रजी अधिकाऱ्याचे असायचे. "लष्कराचे भारतीयकरण" हा ही डॉ मुंजे यांच्या ध्यासाचा होता. आणि सक्षम भारतीय अधिकारी तयार करण्यासाठी इंग्रज सरकारला राजी होण्यास भाग पाडलं होता. त्यांच्या प्रयत्नांचे फळ असे मिळाले की इंग्रज सरकारने भारतीय शाळांमध्ये आणि महाविद्यालयात १६ ते २० वयोगटातल्या मुलामुलींसाठी शारीरिक शिक्षण, कवायती आणि बंदूक चालविण्याचे शिक्षण सक्तीचे केले. एका अर्थाने डॉ मुंजे यांनी घेतलेल्या समाज परिवर्तांच्या ध्यासाचा महान विजयी टप्पा होता. सैनिकी शिक्षणातून उत्तम सैनिक आणि सैन्य अधिकारी तर तयार होतीलच पण त्याच्या पलीकडे जाऊन ही या समाजाला या शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे, वेग वेगळ्या क्षेत्रात काम करू शकणाऱ्या भक्कम भारतीयांची. खेळाच्या मैदानावरच मानसिक विकास होईल, त्यातून शिस्त बद्ध स्वतंत्र वृत्तीचा भारतीय नागरिक तयार होईल या तत्वावर डॉ मुंजेंचा ठाम विश्वास होता. नागपुरात त्यांनी एक राष्ट्रीय क्लब ची स्थापना केली होती. मुला मुलीना, महिला पुरुषांना शिरीरिक शिक्षण देण्याची प्रथा त्यांनी सुरु केली. भालाफेक, दंड बैठका, कब्बड्डी, या सारखे प्रकार या एकत्रीकरणात त्यांनी प्रयत्नपूर्वक रुजवले. १९३० साली व्होईसरोय चे गोलमेज परिषदेचे निमंत्रण त्यांनी स्वीकारले. गोलमेज परिषदेला जोडून इंग्लंड मधल्या आणि आजूबाजूच्या सैनिकी शाळांमध्ये त्यांचा अभ्यास करण्यासाठी ते गेले. जर्मनीत एका शाळेत त्यांना विचारले की हा सर्वे डॉ मुंजे का करत आहेत. १९३० साली त्यांनी सांगितले की आमच्या भारतीय समाजाला संपुर्ण सैनिकी शिक्षण देणाऱ्या शाळांची गरज आहे. आजतरी भारतीय मुलांसाठी अशी शाळा नाही. सरकारने त्या चालू कराव्यात असा माझा त्यांना आग्रह आहे पण त्यांनी ते नाही केलं तर मला करायचं आहे, म्हणून मी युरोपातल्या सैनिकी शाळा अभ्यासतो आहे.
पुढे १९३२ साली डॉ मुंजे आणि अन्य सहकारी यांच्या प्रयत्नातून देहरादून ला Indian Millitary Acadamy ची सुरुवात झाली. हे आणखी एक मिळालेलं फळ होतं. यातुन लष्कराचे भारतीय करण करण्याची प्रक्रिया आता सोपी जाणार होती. त्या आधी लष्करी अधिकाऱ्यांना प्रशिक्षणा साठी इंग्लंड मध्ये जावे लागे. डॉ मुंजेंचा ध्यास त्यांना थांबवत नव्हता. त्यांनी या देहरादून च्या अकादमीला प्रशिक्षणार्थी अधिकारी उपलब्ध व्हावेत म्हणून लहान पणा पासूनच म्हणजे शालेय जीवनापासूनच सैनिकी शिक्षण देण्यासाठी सैनिकी शाळा सुरु केल्या पाहिजेत हा लढा चालू ठेवला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. इंग्रज सरकारने त्यांना शाळा चालू करायची परवानगी दिली आणि सुरुवातीला लष्करातले अधिकारी ही शाळेत पाठविण्याचे कबुल केले. आठ वर्षांच्या अथक प्रयत्नांनी १५ जून १९३७ रोजी नाशिक मध्ये ४० विद्यार्थ्याची पहिली तुकडी सुरु करण्यात डॉ मुंजे यांना यश आले. पहिल्या तुकडी मध्ये देशभरातल्या वेग वेगळ्या ठिकाणाहून विद्यार्थी रुजू झाले होते. हा महान शिक्षण ऋषी पालकांना " मला एकतर भरघोस देणगी द्या किंवा तुमचा मुलगा शाळेत पाठवा" अशी विनंती करायचा. या शाळेने आजवर भारतीय संरक्षण विभागात तीन ही दलात कार्य करणारे महान सैनिक, नेते दिलेच पण लष्कराव्यातिरिक्त अन्य क्षेत्रातही नेतृत्व करू शकतील अशी खंबीर माणसे निर्माण केली आहेत.
याद्या
4737
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
अत्यंत रोचक माहिती
धन्यवाद
अरे वा! हा लेख मी आधी मिपावर
खरंच चांगली ओळख करुन दिलीत.
सुंदर लेख / शाळेला का धरता?
+१
In reply to सुंदर लेख / शाळेला का धरता? by कौन्तेय
उत्तम लेख. भारतातल्या सर्व
डॉ. मुंजे यांचं नाव संघात
In reply to उत्तम लेख. भारतातल्या सर्व by llपुण्याचे पेशवेll
+१
In reply to उत्तम लेख. भारतातल्या सर्व by llपुण्याचे पेशवेll
:)
In reply to +१ by मन१
+१
In reply to :) by वपाडाव
सुधीर साहेब , यादितील कुणीच
उशीरा आलो च्यायला
माझे म्हणणे कृपया समजून घ्यावे अशी विनंती आहे.
In reply to उशीरा आलो च्यायला by आदिजोशी
दहशतवादाला उत्तर
In reply to उशीरा आलो च्यायला by आदिजोशी
माझा प्रतिसाद हा बिनबुडाचा नव्हता.
हो.
उत्तम ओळख