✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

राजा शिवछत्रपती - भवानी तलवार आणि जीवनपट !

म
मालोजीराव यांनी
Sun, 02/19/2012 - 15:42  ·  लेख
लेख
आज शिवजयंती...छत्रपतींच्या जीवनातल्या अनेक गूढ अद्याप संशोधन चालत असलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे भवानी तलवार, शिवजयंतीच्या निमित्ताने आज हा लेख लिहावासा वाटला.खाली दिलेल्या माहितीमध्ये मिपाकर नक्कीच अभ्यासपूर्ण भर टाकतील ! पुरेसा वेळ न मिळाल्याने लेख थोडा घाईगडबडीत झाला कृपया सांभाळून घ्या ! भवानी तलवार (जगदंबा तलवार) उगम - इ.स.१५१० साली आल्फोन्सो आल्बुकर्क याने गोवा जिंकला .त्याचा सेनापती डियागो फर्नांडीस याने लगेचच सावंतवाडीवर हल्ला केला,पण हल्ला सपशेल फसला आणि पोर्तुगिजांचा दारूण पराभव खेमसावंत भोसल्यांनी केला.त्यावेळी हि पोर्तुगीज राजघराण्यातील (Imperial) तलवार खेमसावंत यांच्याकडे आली. (तलवारीच्या पात्यावर I.H.S. हि अक्षरे कोरली आहेत) छत्रपतींना हि तलवार १६५९ साली भेट म्हणून देण्यात आली. तलवारी संबंधीची करवीर संस्थानातील नोंद - पंतप्रधान सरकार कदीम करवीर, शस्त्रागार तर्फे रावबहाद्दूर दादासो सुर्वे नोंदणी जीनस - जगदंबा तलवार जिनसाचे नाव | डाग आकार सहित | तपशील दास्तान | चालूकडे तलवार सडक | १९७-११ | १९७-११ | हल्ली नाही जगदंबा मेणावर तपशील - नाकीत्यास हिरे ६,माणके ४४ ,पाचा १० एकूण पराज हिरे १३,पाचा १८ , माणके ४६७ मिळून सबंध तलवार. चौथे शिवाजी - प्रतापसिंहराजे भोसले यांनी हि तलवार प्रिन्स ऑफ वेल्स याला भेट दिल्याचे सांगण्यात येते. हि तलवार सध्या रॉयल कलेक्शन लंडन येथे असल्याचे सांगण्यात येते.परंतु तेथे संपर्क साधला असता त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही रॉयल कलेक्शन कडून आलेला प्रतिसाद ----------------------------------------------------------------- शिवछत्रपतींची जन्मपत्रिका ! जोधपुर च्या राज घराण्याचे ज्योतिषी शिवराम पुरोहित यांनी बनवलेली हि छत्रपती शिवरायांची जन्मपत्रिका .हि पत्रिका प्रथम रावबहादूर गौरीशंकर यांनी प्रसिद्ध केली. पत्रिका ज्योतिषाने मिर्झाराजा सोबत तो पुण्याला आल्यावेळी बनवली असावी. (सदर पत्रिकेच्या उगमाबद्दल आणि विश्वासार्ह्यते बद्दल शंका आहे) ------------------------------------------------------------------ औरंगजेब साहेबांच्या तारुण्यातले हे चित्र कोलंबिया विद्यापीठाच्या सौजन्याने ----------------------------------------------------------------- मुघल तख्त आणि मयूर सिंहासन मयूर सिंहासन - सध्या हे तेहरान मध्ये आहे मुघल तख्त ------------------------------------------------------------------- अफझलखान रॉयल एशियाटिक सोसायटी च्या सौजन्याने अफझलखानाची शिवाजी महाराजांवर स्वारी म्हणजे एक राजनैतिक मोहीम होती. बादशहाच्या एका सेनापतीने जहागीरदारपुत्राचा पुंडावा मोडून काढण्यासाठी केलेली मोहीम.मुळात अफझलखान स्वत: वाई चा सुभेदार असल्याने हे बंड मोडणे हि त्याचीच नैतिक जबाबदारी होती.खानाबरोबर अनेक हिंदू सरदार होते ते दुखावू नयेत म्हणून खानाने कुठेही हिंदू देव देवतांची विटंबना केल्याचे पुरावे नाहीत.नंतर च्या काळात अनेकांनी यात खानाने विडा उचलला,मंदिरे उध्वस्त केली या गोष्टींची नको ती भर घातली. या युद्धात मराठा सरदारांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी शिवराय आणि खान दोघांनी प्रयत्न केले... अनेक मराठा सरदारांना तर शिवरायांकडून आणि खानकडून दोघांकडून पत्रे आलेली होती.ज्याला जी बाजू योग्य वाटली तो त्या बाजूने लढला. याचे उत्कृष्ठ उदाहरण म्हणजे शिळीमकर बंधूंमध्ये वाद होते त्यात मध्यस्थी करून महाराजांनी मोठ्या भावाच्या बाजूने कौल दिला,त्यामुळे युद्धात दोन्ही बाजूने आमंत्रणे आल्यावर मोठा भाऊ शिवाजी गटात तर लहान भाऊ जो या निवाड्याने दुखावला गेला होता तो खानच्या गटात सामील झाला. खंडोजी खोपड्याने महाराजांच्या बाजूने लढताना फाजाल्खानाला पैसे घेऊन जिवंत सोडून दिले, जर आताच योग्य शासन केले नाही तर भविष्यात हि चूक सरदारांकडून पुन्हा पुन्हा होईल म्हणून जरब बसेल या दृष्टीने साहेबांनी खंडोजी खोपड्याचा चौरंग केला. (प्रतापगड युद्धावर तपशीलवार लेख पुन्हा केव्हातरी) कवी भूषण अफझलखान वधाचे वर्णन शिवराज भूषण मध्ये करतात- दानव दगा करी जावली दिह भयारो महामद भारयो | भूषण बाहुबली सर्जा तेहि भेटिबे को निरसंक पधारयो || बिछु के घाय गिरे अफज्ल्ह्ही उपरही सिवराज निहारयो | दबी यों बैठ्यो नरिंद अरिन्दही मानो मयंद गयंद पछारयो || कवी भूषण अनेक जन या युद्धात भाग घेतल्याने काहीतरी मिळेल या उद्देशाने सामील झाले होते, अफझल खानाचे डोके कापून आणणारा कावजी कोन्ढालकर शिरवळ ची देशमुखी मागत होता ती न मिळाल्याने नाराज होऊन तो नंतर शास्ता खानाला सामील झाला ------------------------------------------------------------------------------- सुरत लुट सुरतेची लुट म्हणजे एक नियोजनबद्ध हल्ला होता, आणि मोगल प्रशासनावर बसलेली जोरदार चपराक होती, पुरंदर च्या तहामुळे जी अपरिमित हानी झाली होती ती भरून काढण्याचा छत्रपतीन्समोर हा एकमेव जवळचा मार्ग होता. हेर्खात्यातील कित्येक जण सुरतेला जाऊन रेकी करून आले होते...शेकडो पानांचा अहवाल सुरत शहराच्या ब्लू प्रिंट सह महाराजांना सादर केला होता. त्यामुळेच हि लुट यशस्वी होऊ शकली,या अहवालामुळे सुरतेच्या मोठ्या व्यापाऱ्यांची,सरंजाम लोकांची नावे,पत्ते कळले आणि त्यामुळे सामान्य जनतेला याचा त्रास न होता खंडणी लवकर गोळा व्हायला मदत झाली.त्याच प्रमाणे इंग्रज,डच,फ्रेंच,पोर्तुगीज या वखारवाल्यांकडून मोठी खंडणी घेण्यात आली.पुरंदर तहात जेवढी खंडणी द्यायला लागली त्याच्या ४-५ पट रक्कम सुरत लुटेतून मिळाली. जागतिक इतिहासात हि घटना अत्यंत महत्वाची मानली जाते,कारण या लुटेची दखल युरोपातील अनेक वर्तमानपत्रांनी घेतली. लंडन गाझेट या वर्तमानपत्रात आलेली बातमी (इ.स.१६७२) ----------------------------------------------------------- मिर्झाराजा जयसिंह महाराजा रामसिंह -------------------------------------------------------------- शिवराय डच चित्रकाराने काढलेले चित्र सरसेनापती आणि महाराणी सोयराबाई यांचे बंधू हंबीरराव मोहिते शिवकालीन पत्र निकोलाय मनुची - मोगल तोफखान्याचा प्रमुख, पुरंदर युद्धाच्या वेळी मिर्झा राजाबरोबर होता.याला शिवरायांना जवळून पाहण्याचा बोलण्याचा योग आला असे त्याने त्याच्या पुस्तकात 'Storia de Mogor' मध्ये लिहिले आहे . कॉसमो दि गार्डा या पोर्तुगीज इतिहासकाराने शिवरायांवर प्रभावित होऊन पुस्तक लिहिले --------------------------------------------------------------- संभाजीराजे राजा कसा असावा याबद्दल नृपशंभू (संभाजी महाराज) लिहितात - शास्त्राय गुणसंयोग: शास्त्रं विनयवृत्तये । विद्याविनीतो नृपति: सतां भवति संमतः ।।१।। शास्त्रासाठी गुणांचा समन्वय नम्रवृतीने शास्त्राभ्यास, असा विधेने नम्र झालेला (विजयी) राजा सर्व संज्जनांना आवडत असतो. मेधावी मतिमानदिनवदनो दक्ष: क्षमावानृ ऋजु- ध्रम्रात्माप्यनसूयको लघुकर: षाड्गुन्यविच्क्षक्तीमान । ऊत्साहि पररंध्रवित्क्रूतधृतिवृद्विक्षयस्थानवित्त शुरो न व्यसनी स्मरत्युपकृतं वृद्धोपसेवि च यः ।।२।। शब्दार्थ : दिनवदन - गरिबांच्या दु:खांना बोलके करणारा । ऋजु - सरळ । अनसूयक - द्वेष न करणारा । लघुकर - अल्पकर घेणारा । षाड्गुण्यार्वद - राजनीतीचे ६ गुण जाणणारा , कृतधृतिवृद्विक्षयस्थार्नावत्त - धर्याने कुठे जोराने तर माघार घ्यायची जाण असलेला । इतका प्रचंड दूरदृष्टी असलेला,रयतेला जपणारा जाणता राजा महाराष्ट्राला लाभला ! या शिवजन्मदिनी माझ्या लाडक्या राजाला मनाचा मुजरा ! ----------------------------------------------------------------------- वरील माहिती व चित्रे साभार - कोलंबिया विद्यापीठ , कॅलीफोर्निया पिक्चर लायब्ररी, रॉयल एशियाटिक सोसायटी , ब्रिटीश लायब्ररी , भारत इतिहास संशोधक मंडळ , बुधभूषण
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
इतिहास
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
लेख

प्रतिक्रिया द्या
39200 वाचन

💬 प्रतिसाद (71)

प्रतिक्रिया

अत्युत्तम लेख...

मन१
Sun, 02/19/2012 - 23:51 नवीन
वाचनखूण साठवलाय. भवानी तलवार म्हणून दावा केल्या जाणार्‍या दोन्-तीन तलवारी आहेत म्हणतात. त्या सर्वच शिवाजींनी वापरल्यात, त्यातली "भवानी" तलवार कुठली हे मात्र अजून निश्चित झालेले नाही. लेख खूपच वस्तुनिष्ठ वाटला. त्यातील मते पटोत नाही तर न पटोत; पण कुठलाच आवेश न आणता सरळ सरळ जे लिहिले आहे, ते हल्लीच्या ढोल ताशांच्या दणदणाटात क्षीण होत चालले आहे. एक दुरुस्ती:- शिवाजी महाराजांनी सुरत लुटित बाकी सगळ्यांना लुटले, पण जॉर्ज ऑक्झिंडेन ह्याच्या नेतृत्वाखालील धाडसी/शूर्/भाग्यवान अशा ब्रिटिशांना मात्र सोडले. कारण एकच्,सुरत हे पश्चिम भारतातील प्रचंड मोठे व्यापारी केंद्र होते. आख्ख्या मुघलशासित भारताचे भरभ्राटीचे शहर, त्याकाळची मुंबईच म्हणाना. त्याच्या सुरक्षेला प्रचंड सैन्याची तजवीज करायच्या नावाखाली तिथला मुघल सुभेदार बादशाहाकडून नुसतेच पैसे लाटायचा. लाचखोरी करून प्रत्यक्ष सैन्य उपस्थिती वर दाखवल्या जाणार्‍या आकद्यापेक्षा खूपच कमी होती. मात्र मुळातच आख्ख्या भरतात गेल्या कित्येक शतकात एकसंध दिल्ल्ली शासन असताना थेट त्या साम्राज्याच्या मर्मावर आजवर असा कुणी हल्लाच करायची हिम्मत केली नव्हती, दिल्लीचे त्याटप्प्यातील सर्वच विरोधक चेचून टाकले गेले होते. त्यामुळे हा कच्चा दुवा कधीच समोर आला नाही. जबरदस्त कार्यक्षम(efficient) हेरखाते असणार्‍या शिवरायांच्या चाणाक्ष नजरेने बरोब्बर हा दुवा शोधला. लोखंडी कपाटाच्या ऐवजी लाकडी डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने सोपे पडावेत तसे झाले, योग्य नियोजन करून शिवराय सुरतेत गेले. ते आल्याचे कळताच (वखारीवरील भारतीय मजूर धरून) फक्त २०० माणसाम्चे माणूसबळ असणार्‍या जॉर्ज ऑक्झिंडेनने शहरात एक कवायत/millitary march केली. खुद्द मुघल सुभेदार शहर उघड्यावर टाकून तटबंदीच्या आत लपला. स्वतःची फारशी हानी करून न घेता मराठ्यांनी आरामात,चतुराईने सुरत लुटली. इंग्रजांच्या वखारीकडे जाताच जोरदार गोळिबार व प्रतिकार सुरु झाला. आता त्या तेवढ्या उरलेल्या रकमेसाठी परमुलखात उगीच स्वतःची मनुष्यहानी करून उपयोगाचे नाही हे ओळखून शिवरायांनी माघार घेत नाशिकजवळून पुण्यास कूच केले. थोडक्यात, ब्रिटिशांना त्यांनी लुटले नाही. हा किस्सा कळताच औरंगजेबाने मुघल सुभेदाराचे करायचे ते केलेच, पण ऑक्झिंडेनला बहादुरी बद्द्ल खुश होउन काही मागू शकतोस असे फर्मावले. त्याने तत्काळ स्वतःसाठी काहीही न मागता स्वतःच्या कंपनीला अधिक सोयी मिळाव्यात अशी नम्रपण मागणी पुढे ठेवली. तशा काही सवलती मिळाल्याही. असो.
  • Log in or register to post comments

नंतर तो माणूस परत मराठा शामियानाकडे फिरकलाच नाही !

मालोजीराव
Mon, 02/20/2012 - 13:09 नवीन
वाचनखूण साठवलाय
आभार मनोबा :)
भवानी तलवार म्हणून दावा केल्या जाणार्‍या दोन्-तीन तलवारी आहेत म्हणतात. त्या सर्वच शिवाजींनी वापरल्यात, त्यातली "भवानी" तलवार कुठली हे मात्र अजून निश्चित झालेले नाही.
महाराजांनी अनेक तलवारी वापरल्या त्यातली एक म्हणजे भवानी तलवार...पण नेमका उल्लेख सापडत नाही ! वरील तलवारीचा उल्लेख हा कागदोपत्री 'जगदंबा' असाच आहे.
थोडक्यात, ब्रिटिशांना त्यांनी लुटले नाही.
अगदी बरोबर...हा उल्लेख टाकला असता तर लेख अजून बराच वाढला असता, तुम्ही इथे माहिती टंकली त्याबद्दल आभार ! इंग्रजांनी केलेल्या प्रतिकारानंतर मराठ्यांनी ऑक्झिंडेन च्या स्मिथ नावाच्या माणसाला पकडून त्याच्याकडून ३००००० ची खंडणी मागितली,पण त्याने आपण सामान्य नागरिक आहोत माझा आणि इंग्रज वाखार्वाल्यांचा काही संबंध नाही असे सांगितले...तरीही मराठ्यांनी त्याच्याकडून ३०० रु एवढी खंडणी उकळून त्याला सोडून दिले आणि खंडणीसाठी त्याला मध्यस्थ करून वखारीवर पाठवले... Image removed. नंतर तो माणूस परत मराठा शामियानाकडे फिरकलाच नाही ! यामुळे हि खंडणी महाराजांनी वेंगुर्ला आणि राजापूरकरांकडून तर वसुललीच पण रास्त भावाने उडवायच्या दारूच्या खरेदीचा आणि तोफांचा करारही केला. -मालोजीराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

खुपच छान लेख ..

समाधान
Mon, 02/20/2012 - 10:15 नवीन
खुपच छान लेख ..
  • Log in or register to post comments

धन्यवाद मालोजीराव

परिकथेतील राजकुमार
Mon, 02/20/2012 - 12:04 नवीन
रंजक माहिती आणि छायाचित्रे. लेखन खूपच आवडले. प्रतिसादांमधून देखील नव-नवीन माहिती समजली.
प्रतापगड युद्धावर तपशीलवार लेख पुन्हा केव्हातरी
वाट बघतो आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद पराशेठ,

मालोजीराव
Mon, 02/20/2012 - 16:23 नवीन
धन्यवाद पराशेठ, प्रतापगड युद्धावर राजकीय लेख लवकरच टाकू... -मालोजीराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

रोचक

चैतन्य दीक्षित
Mon, 02/20/2012 - 13:23 नवीन
लेख रोचक आहे. खूप काही नवीन माहिती मिळाली. संभाजीराजांनी लिहिलेला श्लोक पूर्ण आणि शुद्ध स्वरूपात कुठे मिळेल? (लेखातला काही ठिकाणी अशुद्ध आहे) माझ्या अल्प ज्ञानानुसार तो शुद्ध लिहिला तर असा होईल- मेधावीमतिमानदीनवदनो दक्ष: क्षमावानृजु- र्धर्मात्माप्यनसूयको लघुकर: षाड्गुण्यविच्छक्तिमान् । ऊत्साही पररंध्रवित्कृतधृतिवृद्विक्षयस्थानवित् शूरो न व्यसनी स्मरत्युपकृतं वृद्धोपसेवी च यः ।।२।। दिनवदन- असा शब्द नसून अदीनवदन असा आहे. अदीनवदन म्हणजे ज्याचा चेहरा कधीही पडलेला/दीनवाणा नसतो असा. पररंध्रवित्कृतधृतिवृद्विक्षयस्थानवित्= हा शब्द नीट उमगला नाही- षड्गुण-हे ६ गुण राजनीतीचे असतील. पण अजून एक ६ गुणांचा संदर्भ येतो तो असा- षड्गुणा: पुरुषेणेह ध्यातव्या भूतिमिच्छता, सत्यं दानमनालस्यं अनसूया क्षमा धृति: | (वैभवाची इच्छा करणार्‍या पुरुषाने हे षड्गुण अंगी बाणावेत- सत्य बोलणे, दान करणे, आळस न करणे, कुणाचाही द्वेष न करणे, क्षमाशील वृत्ती, धैर्य) असो, अवांतराबद्दल क्षमस्व
  • Log in or register to post comments

होय महाराजा....श्लोक अशुद्ध

मालोजीराव
Mon, 02/20/2012 - 13:43 नवीन
होय महाराजा....श्लोक अशुद्ध स्वरुपात आहे थोडा... काय करणार...गुगल मध्ये संस्कृत लिहिणे जिकीरीचे काम आहे ! ...म्हणून वर नमूद केलंय 'लेख थोडा घाईगडबडीत झाला कृपया सांभाळून घ्या !' :) रॉयल एशियाटिक सोसायटी मुंबई इथे हे श्लोक मिळू शकतील ! -मालोजीराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य दीक्षित

गैरसमज नसावा..

चैतन्य दीक्षित
Mon, 02/20/2012 - 17:47 नवीन
बाकीचा लेख इतका सुंदर उतरलाय तर त्यात ही श्लोकाची चूक नसावी म्हणूनच वरचा प्रतिसाद दिलाय. गैरसमज नसावा. असेच अजून लिहा आणि आमच्या ज्ञानात भर घाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

मस्त !!!

मनराव
Mon, 02/20/2012 - 14:53 नवीन
माहिती आणि चर्चा..... दोनिही मस्त......!!!
  • Log in or register to post comments

उचित लेख

प्रचेतस
Tue, 02/21/2012 - 09:48 नवीन
शिवजयंतीनिमित्त उचित माहितीपूर्ण लेख. प्रतिसादांतूनही बरीच माहिती समजली.
सुरतेची लुट म्हणजे एक नियोजनबद्ध हल्ला होता, आणि मोगल प्रशासनावर बसलेली जोरदार चपराक होती,
तुम्ही उल्लेख केलेली ही सुरतेची दुसरी लूट आहे. पहिल्यांदा सुरत लुटली ते १६६३-६४ च्या सुमारास. किंबहुना ह्याच लुटीमुळे चिडून औरंगजेबाने प्रचंड फौजेसह मिर्झाराजांना पाठवले. सुरतेच्या ह्या पहिल्या स्वारीतून आणलेल्या धनातूनच सिंधुदुर्गाचे बांधकाम सुरु झाले. पुरंदराच्या तहानंतर स्वराज्य राजकीय आणि आर्थिकदृष्ट्याही बरेच क्षीण झाले होते. आग्र्याहून सुटल्यानंतर मग महाराजांनी झपाट्याने एकेक किल्ले घ्यायला सुरुवात केली. १६७० च्या सुमारास जुन्नर लूटून बरीच लूट गोळा केली. व १६७०-७१ सुरतेवर दुसर्‍यांदा स्वारी करून तिथूनही स्वराज्य उभारणीसाठी बरेच धन लूटून आणले गेले.
  • Log in or register to post comments

yups....

मन१
Tue, 02/21/2012 - 10:16 नवीन
दुसरी लूट... बादवे, जुन्नर लुटले की आख्खे ताब्यात घेतले???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

जुन्नर फक्त लुटले. त्याकाळी

प्रचेतस
Tue, 02/21/2012 - 10:19 नवीन
जुन्नर फक्त लुटले. त्याकाळी ते मोंगलांचे प्रमुख ठाणे होते. जुन्नर आणि शिवनेरीही नंतर पेशवेकाळात स्वराज्यात आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

लेख

sneharani
Tue, 02/21/2012 - 10:53 नवीन
लेख मस्त!नविन माहिती समजली चर्चेतून! प्रतापगड युध्दाचा तपशील येऊ दे लवकर!!
  • Log in or register to post comments

माहितीपुर्ण लेखन

किसन शिंदे
Tue, 02/21/2012 - 16:15 नवीन
माहितीपुर्ण लेखन मालोजीराव! पुढील लेखाची वाट पाहतो आहे.
  • Log in or register to post comments

अफझलखानाचा वध

मालोजीराव
Tue, 02/21/2012 - 17:30 नवीन
पुढील लेखाची वाट पाहतो आहे.
काम चालू आहे किसनदेवा, प्रतिक्रियेबद्दल आभार ! -मालोजीराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

भवानी तलवार

चित्रगुप्त
Mon, 11/11/2013 - 11:25 नवीन
'संस्थानिकांच्या गढ्या' या विषयावरील एका नवीन धाग्यात भवानी तलवारीचा उल्लेख आलेला असल्याने हा धागा वर काढत आहे.
  • Log in or register to post comments

लेख अपडेट करता येत नसल्याने

मालोजीराव
Mon, 11/11/2013 - 11:32 नवीन
लेख अपडेट करता येत नसल्याने शिवरायांची शस्त्रे या लेखात जगदंबा तलवार आणि भवानी तलवार दोन्ही वेगळ्या असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

भवानी आणि जगदम्बा या दोन

विजुभाऊ
Mon, 11/11/2013 - 15:17 नवीन
भवानी आणि जगदम्बा या दोन वेगळ्या तलवारी असाव्यात. भवानी तलवार स्पॅनिश बनावटीची असल्या उल्लेख ब मो पुरम्दर्‍यानी केला आहे. मयूर सिंहासन : मुहमद्शाह ( रम्गीले) याच्या कडून १७३८ मध्ये नादीरशहाने ते सिंहासन लूटीचा हिस्सा म्हणून नेले ते त्याने १७३९ मध्ये इराण ( पर्शिया) ला नेले.१७४७ मध्ये नादीरशहाच्या सैन्यात बेदीली माजल्या नंतर त्या सिंहासनाचे तुकडे झाले. व सैनिकानी ते आपापसात वाटून घेतले. त्या नंतर महंदशाह कजर फते अली शाह कजर यांनीही स्वतःच्या सिंहासनाला मयूर सिंहासन असेच नाव दिले. शाहजहान चे (नंतर औरंगझेबाचे) मयूर सिंहासन हे १७४७ नंतर संपले.त्याचा मागमूसही कोणाला मिळाला नाही.
  • Log in or register to post comments

एक आग्रहाची विनंती.

शिद
Mon, 11/11/2013 - 17:31 नवीन
जय भवानी... जय शिवाजी. जबरदस्त लेख फक्त ह्यावर एक फक्कड लेख येउदे अशी आग्रहाची विनंती.
मोगल सरदारांचे आणि मराठ्यांचे स्नेहबंध इतके चांगले होते कि प्रतापगड युद्धाच्या आधीची राजकीय पार्श्वभूमी कळाली तुम्हाला तर तुम्हीही चक्रावून जाल...झाकली मुठ सव्वा लाखाची Wink
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो !

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 11/13/2013 - 14:30 नवीन
हेच म्हणतो ! (खराखुरा इतिहास जाणून त्यापासून काही शिकण्यास सदैव उत्सुक) इए
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

।आण्ञावाड्द

मंदार कात्रे
Wed, 11/13/2013 - 12:55 नवीन
धन्यवाद जय भवानी ,जय शिवाजी
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा