Skip to main content

निसर्गकविता २ : प्रिय प्राजक्त

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 14/02/2012 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्गकविता १ : झाडांच्या पानात (गीत) - http://www.misalpav.com/node/20633
प्रिय प्राजक्त: आठवतेय तुला ? नाजुक फुलांसवे प्रथम घेतलेला ओंजळीतला तो गंधीत स्पर्ष वार्‍याच्या एका झोतामध्ये झोकुन दिलेले ते सर्वस्व गंधाळलेल्या शुभ्र आयुष्यामध्ये अनुभवलेल ललाटी लाल वर्चस्व आठवतच असेन ना तुला ? सुगंधाची बरसात होताना ह्रद्यावर कोरले गेलेले प्रितीचे ओथंबलेले क्षण ... आयुष्यभरासाठी .. दंगलेल्या अतिव रजनीशी एक गोंदलेली आठवण एक मुर्तीमंत जाणीव... जगण्याची ... म्हनुन म्हणते मी तु असाच फुलत रहा अगदी माझा नसतानाही असाच अंगणी बहरत रहा.. फक्त माझ्यासाठी...
काव्यरस

वाचने 3740
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

गंधाळलेल्या शुभ्र आयुष्यामध्ये ए काय ग्रेट माणूस आहेस तु..? कसल भारी काय काय ..... कमाल आहे तुझी.

कवि गणेशा: आठवतेय तुला, इकडे तिकडे यायला केलेली अ‍ॅडजस्ट्मेंट येताना खालेल्या शंकरपाळ्या पाण्याच्या एका लोटामध्ये पायर्‍यांवर लोळलास तू ऐनवेळा पुण्याच्या दुर्वांकुरामधल्या अनुभवलेल्या त्या आम्रवेळा आठवतच असेन ना तुला ? पुणे गेटची भव्य सुरमई हातभर लांबीची फ्रुटपंच लेयरवाला.... पिण्यासाठी दिसत नसलेल्या फोटोंची कायमची असलेली आठवण सतत अनिवार इच्छा..बघण्याची म्हणून म्हणतो मी अशाच कविता टाकत राहा. फोटो दिसत नसता ही, सतत तेच सांगत राहा. ..सगळ्या मिपाकरांसाठी

In reply to by प्रचेतस

"पुणे गेटची भव्य सुरमई" अरे हा हे लिहायच राहुनच गेल .(ते दोघात एक मासा...५०/५० लक्शात आहे ना...) ;) धन्यवाद वल्ली आठ्वण करुन दिल्या बद्द्ल बाकी तुमच काव्य देखिल मस्त....(फ्रुटपंच लेयरवाला....दोघात एक चालेल का..?) ;)

In reply to by प्रचेतस

हसुन हसुन आता पोट दुखेल आता... भारी जमलय तुला.. 'आम्रवेळा' शब्द जबरदस्तच.. या शब्दामुळे तुला दुर्वांकुरची एक आम्रवेळ माझ्यातर्फे. @ पक पक पक सुरमई मिलेगी .. सबको मिलेगी .. विथ लेयरवाला फ्रुट पंच .. बाकी तुम्ही रिप्लाय मध्ये जी तारीफ करता ती मात्र पचायला लय जड जाते बघा

In reply to by गणेशा

बाकी तुम्ही रिप्लाय मध्ये जी तारीफ करता ती मात्र पचायला लय जड जाते बघा तुम्हाला आमच अस पण जड जात अन् तसं पण जड जात.. आता तुम्हीच सांगा कस कराव आम्ही.. ;)

वाह क्या बात है! ओंजळभर प्राजक्ताचा सुवास भरभरून घ्यावा आणि आणखीन आसुसावे तसे झाले.

दंगलेल्या अतिव रजनीशी एक गोंदलेली आठवण एक मुर्तीमंत जाणीव... जगण्याची ...
आपले चरण पाठवून द्यावेत.

नेहमीप्रमाणेच सुंदर! (वल्ली =))=)))