Skip to main content

ईश्वर , विज्ञान आणि श्रद्धा..

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 14/02/2012 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल ईश्वरावर श्रद्धा असणे हे मागासलेपणाचे लक्षण समजले जाते. बर्याच वेळा ती अ॑धश्रद्धाच ठरवली जाते. ईश्वराच्या अस्तित्वाचा कि॑वा नस्तित्वाचा स्वतः अनुभव घेतल्याशिवाय असे विधान करणे चुकीचे ठरेल. एखाद्या वैज्ञानिकाने जाहीर केले की गॉड पार्टिकल्स आहेत, मग आम्ही लगेच विश्वास ठेवतो. पण युगायुगापासून वेदा॑नी सा॑गितलेल्या प्रक्रुतीच्या तीन मूलभूत तत्वा॑वर् (..सत्व, रज, तम..) विश्वास ठेवणे ही आम्ही अ॑धश्रद्धा मानतो. विश्वाचे कार्य विज्ञान सा॑गेल ते आम्ही खरे मानतो. पण कारणस्वरूपी परमात्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा लागतो..तोही इ॑द्रियानी गोचर होणाराच. इ॑द्रिया॑पलिकडल्या मितिचा अनुभवसुद्धा आम्ही नाकारतो.. विश्व सुरळीत चालले आहे , ग्रह तारे एकमेकावर न आपटता नीट जात आहेत हा ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा होऊ शकत नाही काय ? विज्ञानाने जाहीर केले की अमुक आकाशग॑गा इथे आहे. पाहतो का आपण ? तरी विश्वास ठेवतोच ना? हा नास्तिकपणा म्हणायचा की विज्ञाना वरील अ॑धश्रद्धा ?

वाचने 10985
प्रतिक्रिया 79

प्रतिक्रिया

@ मराठे , या निमित्ताने मला तुम्ही १९८७ च्या काळात नेलेत.मी जी डब्लू बेसिकवर गणपतीची आरास करण्याचा प्रोग्राम केला होता. रनिंग लाईट सकट. साहेब कटला की हा उद्योग चालायचा. लूप पुन्हा दहाला नेला यात सगळे आले. काही निर्रथक गोष्टीपैकी अशी चर्चा आहे तरीही ती पुन्हा पुन्हा होणारच आहे हे सूचित करण्याचा " बेसिक "स्मार्ट प्रयत्न !

@ लीना बाई ,वा वा , आपले एकमतच आहे की ! मला नस्तिक असूनही गणपतीची षोडशोपचार पूजा सांगता येते. फक्त सव्वा रुपया ( नाही नाही दीड रू, कारण ४ आणे आता मिळतच नाहीत ) दक्षणा. मग येत्या गणेश चतुर्थीला गुरूजींचा प्रॉब्लेम सुटला !

In reply to by चौकटराजा

आम्हाला एजंट नेमा. सव्वा रुपयाच्या (काळजी नको चार पूजांचे मिळून पाच रुपये होतील, चार आणे सुटे द्यायचा प्रश्न मिटला) हजारो पूजांची कंत्राटे देतो तुम्हाला. आमची 'पूजा कन्सल्टन्सी' फक्त १२५ रु. मधे साग्रसंगीत पूजेचे प्याकेज विकेल. सव्वा रुपया तुमचा उरलेला आमचा सर्विस चार्ज. झकास बिजनेस चालेल बघा.

आमची 'पूजा कन्सल्टन्सी' फक्त १२५ रु. मधे साग्रसंगीत पूजेचे प्याकेज विकेल. सव्वा रुपया तुमचा उरलेला आमचा सर्विस चार्ज. झकास बिजनेस चालेल बघा. मिरर वर्तमान पत्रातल्या काही जाहीराती आठवल्या ... ;) बाकी देवाचा पण बिजनेस केलात ना !! देवबाप्पा लागवेल अचे केले तल ;)

रमतारामजी , आम्हा गुरुजींच्या कौम मधे निम्मे एजंटच असतात. पण लोकाना फायदा व्हावा म्हणून एजंट क्षमस्व ब्वा !

In reply to by चौकटराजा

गुरुजींच्या 'कौम' मधे???? तरी सांगत होतो मटा वाचत जाऊ नका म्हणून. आणि एजंट कुणाला म्हणताय आं? कन्सल्टंट म्हणा, म्यानेजर म्हणा, सर्विस प्रोवायडर म्हणा. काय हे, अगदीच डाउनमार्केट हो तुम्ही.

http://www.hinduism.co.za/god.htm (अवान्तरः डीएनए चाचणीचा आग्रह न धरता आपल्या जन्मदाखल्यावरील सगळा तपशील बरोबर आहे असे मान्य करतो तो सश्रद्ध. असो.)