✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ईश्वर , विज्ञान आणि श्रद्धा..

स
सस्नेह यांनी
Tue, 02/14/2012 - 17:16  ·  लेख
लेख
आजकाल ईश्वरावर श्रद्धा असणे हे मागासलेपणाचे लक्षण समजले जाते. बर्याच वेळा ती अ॑धश्रद्धाच ठरवली जाते. ईश्वराच्या अस्तित्वाचा कि॑वा नस्तित्वाचा स्वतः अनुभव घेतल्याशिवाय असे विधान करणे चुकीचे ठरेल. एखाद्या वैज्ञानिकाने जाहीर केले की गॉड पार्टिकल्स आहेत, मग आम्ही लगेच विश्वास ठेवतो. पण युगायुगापासून वेदा॑नी सा॑गितलेल्या प्रक्रुतीच्या तीन मूलभूत तत्वा॑वर् (..सत्व, रज, तम..) विश्वास ठेवणे ही आम्ही अ॑धश्रद्धा मानतो. विश्वाचे कार्य विज्ञान सा॑गेल ते आम्ही खरे मानतो. पण कारणस्वरूपी परमात्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा लागतो..तोही इ॑द्रियानी गोचर होणाराच. इ॑द्रिया॑पलिकडल्या मितिचा अनुभवसुद्धा आम्ही नाकारतो.. विश्व सुरळीत चालले आहे , ग्रह तारे एकमेकावर न आपटता नीट जात आहेत हा ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा होऊ शकत नाही काय ? विज्ञानाने जाहीर केले की अमुक आकाशग॑गा इथे आहे. पाहतो का आपण ? तरी विश्वास ठेवतोच ना? हा नास्तिकपणा म्हणायचा की विज्ञाना वरील अ॑धश्रद्धा ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10872 वाचन

💬 प्रतिसाद (79)

प्रतिक्रिया

हम्म्म ......... बात मे दम है

पियुशा
Tue, 02/14/2012 - 17:22 नवीन
हम्म्म ......... बात मे दम है लीनाजी ;)
  • Log in or register to post comments

चालु द्या..

परिकथेतील राजकुमार
Tue, 02/14/2012 - 17:25 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

मी येईपर्यंत पिझ्झासुद्धा

अन्या दातार
Tue, 02/14/2012 - 18:14 नवीन
मी येईपर्यंत पिझ्झासुद्धा मागव रे. आपण एखादा कोरियन किंवा तेलुगु पिच्चर बघू ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

+२

रमताराम
Tue, 02/14/2012 - 18:16 नवीन
म्याबी आलूच. छानसं झाड शोधून ठेवा माझ्यासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

"ईश्वर , विज्ञान आणि श्रद्धा"

हंस
Tue, 02/14/2012 - 21:13 नवीन
"ईश्वर , विज्ञान आणि श्रद्धा" एवढे आयाम शिर्षकामध्ये वाचुन मला वाटले एखादा टिकापर मोठा लेख असेल पण हयॅ..... निराशा झाली. मी येईपर्यंत पिझ्झासुद्धा मागव रे. आपण एखादा कोरियन किंवा तेलुगु पिच्चर बघू कदाचित त्या चित्रपटांपेक्षा इथला चित्रपट जास्त मनोरंजक होण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

आयला छे छे, घोर निराशा झाली,

५० फक्त
Wed, 02/15/2012 - 07:51 नवीन
आयला छे छे, घोर निराशा झाली, मला वाट्ट्लंं, जागतिक (याची फोड - जन्मतः + अगतिक) प्रेमदिनानमित्त प्रेम त्रिकोणाची गोष्ट आहे का काय, कसं य हल्ली लोकं ठेवतात पोराची नाव, विज्ञान वगैरे, म्हणुन वाटलं का एक असते श्रद्धा , एक असतो इश्वर आणि एक असतो विज्ञान असलं काही तरी, असेल मग तो इश्वर का विज्ञान नक्की कोण तरी एक मागासलेलं असतं, ते आयटित असतात , त्यांना स्पयंपाक येतो , त्यांच्याकडे टँका वगैरे असतात , ते समुद्रकिनारी पँटीत उभे राहुन फोटो काढतात, मग हट्टानं भाज्या , गोडा धोडाचं करतात असलं काहीतरी असेल, लेणे बिणे बघायला जात असतील, अ‍ॅडजेस्ट करत असतील, आंतरजालावर कसलेही फोटो बघत नसतील, पण अरे अरे सगळा अपेक्षाभंग झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हंस

मला वाटले एखादा टिकापर मोठा लेख असेल पण

सस्नेह
Wed, 02/15/2012 - 10:57 नवीन
sorry ह॑सजी, खर॑ तर मोठा लेखच लिहायचा होता. पण नवीन मे॑बर असल्याने अजून मराठी ट्॑कणे फास्ट जमत नाही. शिवाय हापीस सुटायची वेळ झाली ना !.. पण चा॑गले प्रतिसाद मिळाले तर लेख जरूर पूर्ण करेन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हंस

पण चा॑गले प्रतिसाद मिळाले तर

गणपा
Wed, 02/15/2012 - 13:35 नवीन
पण चा॑गले प्रतिसाद मिळाले तर लेख जरूर पूर्ण करेन...
लीनातै अशी अट नका ठेऊ बॉ. अहो थोर मिपाकर सांगुन गेलेत की माणसानं नेहमी स्वांतसुखाय लिहित जाव. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

शिळ्या कढीला उत

सुहास..
Tue, 02/14/2012 - 17:26 नवीन
शिळ्या कढीला उत
  • Log in or register to post comments

-१

दादा कोंडके
Tue, 02/14/2012 - 17:29 नवीन
ही तर कढीसुद्धा नाही. नुसतच पाणि उकळतय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

शिळ्या कढीला उत

सस्नेह
Wed, 02/15/2012 - 10:59 नवीन
खर्॑य.. पण कढीप्रेमी अजुनी आहेतच ना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

>>खर्॑य.. पण कढीप्रेमी अजुनी

रम्या
Wed, 02/15/2012 - 11:57 नवीन
>>खर्॑य.. पण कढीप्रेमी अजुनी आहेतच ना...>> अहं ! अजुनही "शिळी" कढी प्रेमी आहेत याचं आश्चर्य वाटतयं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

बरं....

पिलीयन रायडर
Tue, 02/14/2012 - 17:51 नवीन
"आम्ही म्हणतो म्हणुन" किंवा "का ते विचारायच नाही... आम्ही विचारलं का कधी?" असं कधी वैज्ञानिकाने म्हण्ल्याचे आठवतय का?? मग जर एखादी गोष्ट कुणी ग्रुहितकांसकट सांगत असेल... आणि एखादी "शक्यता" मांडत असेल तर ती स्वीकारण्यामध्ये "विज्ञाना वरील अ॑धश्रद्धा" कशी?
विश्वास ठेवणे ही आम्ही अ॑धश्रद्धा मानतो
डोळे झाकुन विश्वास ठेवणे ही अ॑धश्रद्धा.... मुळात विज्ञान हा एक मार्ग आहे सत्य शोधण्याचा... आणि पुराव्या शिवाय विश्वास न ठेवणे हाच ह्याचा पाया आहे.. मग विज्ञाना वरील अ॑धश्रद्धा असं काही असुच कसं शकतं?
एखाद्या वैज्ञानिकाने जाहीर केले की गॉड पार्टिकल्स आहेत, मग आम्ही लगेच विश्वास ठेवतो
कोण? कधी? अहो त्यांना आपलं म्हणणं पटवण्यासाठी प्रयोग करावे लागतात... गणितं माण्डावी लागतात... तरी इतर वैज्ञानिक प्रश्न उपस्थित करु शकतात... त्यांचे खंडन करावे लागते... काय खाऊ वाटला का "गॉड पार्टिकल्स आहे" जाहिर करायला??
ग्रह तारे एकमेकावर न आपटता नीट जात आहेत हा ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा होऊ शकत नाही काय ?
कमाल आहे... म्हण्जे आपटले असते तर देव नाही का?? आणि सगळ्या चांगल्या -वाईटाला देवाला जवाब्दार धरणार की काय?
  • Log in or register to post comments

उल्कापात..

अस्वस्थामा
Tue, 02/14/2012 - 19:23 नवीन
>>कमाल आहे... म्हण्जे आपटले असते तर देव नाही का?? आणि सगळ्या चांगल्या -वाईटाला देवाला जवाब्दार धरणार की काय? तेच तर.. विश्वात सगळे व्यवस्थित चालले आहे म्हणे.. मग उल्कापात होतो.. तारे, ग्रह नष्ट होतात हा देव नसल्याचा पुरावा म्हणायचं का ? आम्हालाच बरोबर म्हणा.. पण पुरावे मागू नका.. प्रश्न विचारू नका.. 'असे का ?' सुद्धा नाही चालणार.. डोके तर चालवूच नका.. प्रसाद उजव्या हातातच घ्या आणि गणपती डाव्या सोंडेचा घ्या.. विज्ञान राहू द्या बाजूला... पण ही जबरदस्ती का या गोष्टीना मान्य करण्याची..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

काही काय?

Nile
Tue, 02/14/2012 - 20:46 नवीन
विश्वात सगळे व्यवस्थित चालले आहे म्हणे.. मग उल्कापात होतो.. तारे, ग्रह नष्ट होतात हा देव नसल्याचा पुरावा म्हणायचं का ?
हा तुम्हा लोकांच्या मागच्या जन्मी केलेल्या पापाचा पुरावा आहे. देव दयाळु आहे आणि तो शिक्षा देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा

विज्ञाना वरील अ॑धश्रद्धा

सस्नेह
Wed, 02/15/2012 - 11:14 नवीन
मुळात विज्ञान खोटे कि॑वा चुकीचे आहे असे लेखात कुठेही म्हटले नाही. विश्वास ठेवणेही चुकीचे नाही. मुद्दा हा आहे की प्रयोग आणि गणिते स्वतः केलेली नसतानाही आपण विश्वास ठेवतो तसे ईश्वरी अस्तित्वावर का ठेवत नाही ? त्याचेही प्रयोग करणारे सा॑गतात ते अनुभवण्याचा प्रयत्न न करताच अ॑धश्रद्धा म्हणून रिकामे होतो. ग्रह, तारे या॑ची गती निय॑त्रित करण्यार्या शक्तीचा शोध अजूनही विज्ञानाला लावता आला नाही, हे सत्य आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

असं कोणी सांगितलं ?

sagarpdy
Wed, 02/15/2012 - 11:29 नवीन
ग्रह, तारे या॑ची गती निय॑त्रित करण्यार्या शक्तीचा शोध अजूनही विज्ञानाला लावता आला नाही, हे सत्य आहे..
असं कोणी सांगितलं ? देवाने ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

तार्किक दृष्ट्या ईश्वर सिद्ध होत नाही.

शशिकांत ओक
गुरुवार, 02/16/2012 - 02:22 नवीन
....तार्किक दृष्ट्या ईश्वर सिद्ध होत नाही. हे दाखवून देण्यासाठी बुद्धिवादी पुढील युक्तिवाद करतात. ईश्वर सर्व शक्तिमान आहे, कारण त्यानेच हे विश्व निर्माण केले आहे. असे तुमचे म्हणणे असेल तर आम्ही विचारतो की विश्व राहू द्या. तो असला साधा दगड निर्माण करू शकेल का, कि जो त्याला स्वतःला उचलता येणार नाही? निर्माण करू शकतो म्हणत असाल, तर तो दगड स्वतःलाच उचलता येणार नाही? निर्माण करू शकतो म्हणत असाल तर तो दगड स्वतःच उचलू शकत नसल्यामुळे तो सर्वशक्तिमान नाही हे सिद्ध होते. आणि निर्माण करू शकत नाही असे म्हणत असाल तर त्याच्या निर्माणक्षमतेला मर्यादा पडत असल्यामुळे तो सर्वशक्तिमान नाही हे सिद्ध होते. तात्पर्य, सर्वशक्तिमान ईश्वर असू शकत नाही. तर्काने ईश्वर सिद्ध होत नाही. (त्याचा पडताळा पाहता येत नाही) ईश्वर अनुभवाचा विषय आहे. ही भूमिकाच ईश्वरवाद्यांची असल्यामुळे बुद्धिवादी या युक्तिवादाने ( हा युक्तिवाद बरोबर असेल तर ) ईश्वरवाद्यांचेच म्हणणे सिद्ध करीत आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही! तथापि, हा युक्तिवाद तर्क दुष्ट आहे. यातील दोष असा की येथे भिन्न तार्किक पातळीवरील(Universe of discourse) विधाने एकत्र केली आहेत. जो ईश्वर शून्यातून वस्तू निर्माण करू शकतो, तो ती परत शून्यात नेऊ शकतो. मग ती उचलण्याची मातब्बरी काय, असे त्यास त्याच पद्धतीने उत्तर देता येते.... इति. प्रा गळतगे प्रकरण ७ मधील संदर्भात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

आठवी फांदी माझी.... चालु

अत्रुप्त आत्मा
Tue, 02/14/2012 - 19:46 नवीन
ही फांदी माझी.... Image removed. चालु द्या
  • Log in or register to post comments

किती चा शो आहे?

अन्नू
Tue, 02/14/2012 - 19:50 नवीन
किती चा शो आहे? Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

ग्रह तारे एकमेकावर न आपटता

JAGOMOHANPYARE
Tue, 02/14/2012 - 20:06 नवीन
ग्रह तारे एकमेकावर न आपटता नीट जात आहेत कुणी सांगितलं? पृथ्वीवर दरवर्षी शेकडो उल्का पडतात.. पण वातावरणाच्या कक्षेत आले की त्या जळून जातात म्हणून दिसत नाहीत... तारे म्हातारे झाले की आजुबाजुचे ग्रहच काय इतर तारेही ओढून गिळून टाकतात.. त्याना कृष्णविवर म्हणतात.. देव कुठे थांबवतो हे सगळे? ( आता युक्तीवाद कराल की नाश करणे हेही देवाचेच काम, म्हणून त्याने केले.. ) आणखी हजारो वर्षानी आपला सूर्यही कृष्णविवर होणार आणि आपल्या पृथ्वीला गिळून टाकणार..
  • Log in or register to post comments

बाकी चालू द्या

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 02/14/2012 - 21:20 नवीन
पृथ्वीवर दरवर्षी शेकडो उल्का पडतात.. पण वातावरणाच्या कक्षेत आले की त्या जळून जातात म्हणून दिसत नाहीत
आणखी हजारो वर्षानी आपला सूर्यही कृष्णविवर होणार
तुम्ही शाळामास्तर आहात का हो?* बाकी चालू द्या. *श्रेयअव्हेर - 'म्हैस', पुलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

शाळामास्तर

सस्नेह
Wed, 02/15/2012 - 11:16 नवीन
खूप इच्छा होती शाळामास्तर होण्याची .जमले नाही. हौस भागवून घेतेय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

रांग लंबर

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 02/15/2012 - 11:37 नवीन
ग्रह, तारे या॑ची गती निय॑त्रित करण्यार्या शक्तीचा शोध अजूनही विज्ञानाला लावता आला नाही, हे सत्य आहे..
या विधानातून तुमचं विज्ञानावर असणारं खरं प्रेम दिसत आहेच. शाळकरी मुलं आणि विज्ञानाभ्यासक, विज्ञानप्रेमींच्या वतीने मी तुमचे आणि सर्वशक्तीमान आणि परमदयाळू भगवंताचे आभार मानते. माझं शाळामास्तराचं विधान खरंतर जागोमोहनप्यारे यांनी दिलेल्या धडधडीत चुकीच्या माहितीबद्दल होतं. असो. लीना मॅडम, तुमचा वर्ग चालू द्या. मला वर्गात झोपायची सवय आहे. विज्ञानाचा तास सुरू झाला की मी उठेनच. बा न्यूटना, केप्लरा, आईनस्टाईना, आणि माँड सिद्धांताचे अभ्यासकहो, माफ करा पामरांना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

माझी माहिती चुकीची असेल तर

JAGOMOHANPYARE
Wed, 02/15/2012 - 13:47 नवीन
माझी माहिती चुकीची असेल तर तुम्ही सत्य माहिती द्या की.. कोण अडवले आहे? उगाच फालतू पाल्हाळ लावण्यापेक्षा योग्य माहिती दिली असती तर जास्त बरे नस्ते का झाले? वैयक्तिक रोख असलेला मजकुर संपादित. कृपया वाद विवाद करताना वैयक्तिक मर्यादा ओलांडल्या जाणार नाहीत याचे सादस्यांनी भान ठेवावे. - संपादक मंडळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

१. Most meteors are smaller

JAGOMOHANPYARE
Wed, 02/15/2012 - 13:36 नवीन
१. Most meteors are smaller than a grain of sand, so almost all of them disintegrate and never hit the Earth's surfac http://en.wikipedia.org/wiki/Meteor_shower २. The primary formation process for black holes is expected to be the gravitational collapse of heavy objects such as stars, http://en.wikipedia.org/wiki/Black_hole मी हेच मराठीत लिहिले आहे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

सूर्य हा कृष्ण विवर होणार आहे

विजुभाऊ
Wed, 02/15/2012 - 15:16 नवीन
सूर्य हा कृष्ण विवर होणार आहे हा सर्वस्वी नवा शोध आहे. तो रेड जायंट होईल असे वाचून होतो. नवा शोध लावल्याबद्दल जामोप्या यांचे अभिनन्दन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

सूर्य कृष्णविवर होणार नाही.

sagarpdy
Wed, 02/15/2012 - 15:45 नवीन
सध्याच्या वैज्ञानिंक माहितीनुसार सूर्य कृष्णविवर होणार नाही. एखादा तारा कृष्णविवर होण्यासाठी त्याची त्रिज्या त्याच्या श्वारझचाईल्ड त्रिज्येपेक्षा कमी असावी लागते. (जे सूर्याच्या बाबत सत्य नाही) त्यामुळे सूर्य प्रथम रक्तवर्णी महाराक्षस तारा होऊन नंतर planetary nebula होऊन मग अखेरीस श्वेतबटू ताऱ्यात रुपांतरीत होईल. गोष्ट संपली, झोपा आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

असे का? बरे बरे..... त्याचा

JAGOMOHANPYARE
Wed, 02/15/2012 - 16:18 नवीन
असे का? बरे बरे..... त्याचा बटू होईल नाहीतर विवर होईल.. आपण नसणार ते बघायला किंवा हे दोन्ही सोडून तेंव्हाच्या संशोधनाने आणखी काय तरी होईल.. पण काहेही झाले तरी पहिले २-३ ग्रह सूर्य खाणार हे नक्की... बरे झाले तुम्ही सांगितलेत.. मला कळत नव्हते.. नेमके कोणते वाक्य चुकीचे लिहिले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

ता.क. देवाच्या मनात आलं तर

sagarpdy
Wed, 02/15/2012 - 16:16 नवीन
ता.क. देवाच्या मनात आलं तर मात्र सूर्य कृष्णविवर होऊ शकतो आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

बरे झाले ....शाळामास्तर झाला

अप्रतिम
Wed, 02/15/2012 - 11:51 नवीन
बरे झाले ....शाळामास्तर झाला नाहीत...पोरांना काय काय शिकवलं असतं देव जाणे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

हे ही दिवस जातील. . हि देखील

पक पक पक
Wed, 02/15/2012 - 14:15 नवीन
हे ही दिवस जातील. . हि देखील एक इश्वरैच्छाच. ;) म्हण्तात ना ते काय ते 'देवाची कर्णी अन् नारळात पाणी'.....:bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्रतिम

=)) =))

परिकथेतील राजकुमार
Wed, 02/15/2012 - 12:06 नवीन
तुम्ही शाळामास्तर आहात का हो?
जबर्‍याच !! Image removed. बाकी ही ईश्वरद्वेष्टी अदिती* इथे काय करते आहे ? *अदिती म्हणजे देवांची माता म्हणे. आता बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अदिती म्हणजे देवांची माता

गणपा
Wed, 02/15/2012 - 13:42 नवीन
अदिती म्हणजे देवांची माता म्हणे. आता बोला.
काय कप्पाळ बोलायच? बा पर्‍या तिनं तिच स्वतःच नाव निवडल नाहिये. असेल तिच्या पालकांची श्रद्धा देवावर. :) तुमच्या सारख्या झंटलमन लोकांना इतकबी समजु ने?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

पण मी काय म्हणतो..

परिकथेतील राजकुमार
Wed, 02/15/2012 - 14:45 नवीन
नावाचा अर्थ कळल्यावरती तरी तिने नाव बदलून घ्यायला काय हरकत होती ? तसेही हलकट, पाशवी, विक्षिप्त, दुर्बिटणीबै, माजोरी, गॉसिप डबल्स पार्टनर.. इ. इ. नावे तिला मिळालेली आहेतच. त्यातलेच एखादे ठेवायचे. ;) असो.... तुर्तास इथेच थांबतो. नाहितर मला फ्रेंडलिस्ट मधून डिलीट करायची. बाकी ह्या निळ्याचे खाते अजून चालू आहे, हा देखील एक ईश्वरी चमत्कारच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

हलकट, पाशवी, विक्षिप्त,

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 02/15/2012 - 21:42 नवीन
हलकट, पाशवी, विक्षिप्त, दुर्बिटणीबै, माजोरी, गॉसिप डबल्स पार्टनर.. इ. इ. नावे तिला मिळालेली आहेतच.
नावंच नव्हे, ही वर्णनं मला फिट्ट लागू आहेत. 'सिंड्रेलाची सावत्र बहिण' हे ही विसरू नकोस.
तुर्तास इथेच थांबतो. नाहितर मला फ्रेंडलिस्ट मधून डिलीट करायची.
नाही रे नाही. माझ्याबद्दल खरं बोलणार्‍या लोकांशी मी मय तर्री करते. असो. Sagarpdy कृष्णविवरांसंदर्भात तुम्ही दिलेली माहितीही अयोग्य आहे. एकूणच सूर्य या संदर्भात लेखमाला लिहीते आहे त्यात या गोष्टींची माहिती पुढे येईलच. त्यानंतर इतर तार्‍यांसंदर्भातही लिहीण्याचा विचार आहे. सूर्य या लेखमालिकेचा पहिला भाग इथे आहे. पुढच्या भागांच्या लिंका तिथेच मिळतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हि सूर्य ,आकाशगंगा , तारे,

चेतनकुलकर्णी_85
Wed, 02/15/2012 - 21:59 नवीन
हि सूर्य ,आकाशगंगा , तारे, ग्रह इत्यादी इत्यादी गोष्टीवर पूर्ण माहिती(चित्र व चलचित्रण सकट ) विकिपीडिया वर उपलब्ध असताना मराठीतून अनुवाद करून छापण्याचे प्रयोजन काय?? किंबहुना ज्या माणसाना अश्या गोषित रस असतो त्यांना अश्या गोष्टी विग्रजीतूनच जाणून घेणे सोपे पडते... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

असहमत

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 02/15/2012 - 22:37 नवीन
१. मी अनुवादक नाही. (वाचकांचं नशीब!) २. अनुवादित कथासंग्रहाला भारतीय साहित्य अकादमी पुरस्कार देते. या वर्षी तो कविता महाजन यांना मिळाला. (दुवा) अनुवाद हे येरागबाळ्याचं काम नाही. ३. अ. ज्यांना इंग्लिश समजत नाही पण मराठी समजतं त्यांच्यासाठी माहिती मराठीतून असण्याला तुमचा विरोध असेल तर एकेकाळचे, संस्कृत सामान्यांपर्यंत पोहोचू न देणारे ब्राह्मण आणि तुम्ही यांच्यात मला फरक दिसत नाही. आ. सर्वांनाच इंग्लिश येतं, समजतं असं तुम्हाला वाटत असेल तर "केल्याने देशाटन..." वगैरे एकदा डोळे आणि मेंदू उघडे ठेवून आचरणात आणून पहा. इंग्लिशमधे वाचलेल्या गोष्टी सगळ्यांना समजतातच असं नाही. पुरावा याच धाग्यावर आहे, हा पहा. ४. माहिती उपलब्ध असूनही, संगणक उपलब्ध असणार्‍या अनेकांपर्यंत ती पोहोचलेली नाही याचाही पुरावा याच धाग्यावर आहे, हा पहा. अगदी विकीपीडीयाची लिंक देऊनही माहिती योग्य पद्धतीने वाचणार्‍यापर्यंत पोहोचलेली नाही हे इथे मला दिसत आहे. ५. लेखकाला प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेण्याची सोय विकीपीडीयावर नाही. यामधे लेखक आणि वाचक दोन्ही घटकांचा फायदाच होतो. सध्याची मराठीतली, अपवाद वगळता, चांगली लेखकमंडळी अशा प्रकारच्या इंटरॅक्टीव्ह (मराठी?) संस्थळांवर फारशी दिसत नाहीत, या माध्यमाचा पुरेसा फायदा करून घेत नाहीत अशा प्रकारची ओरड तुमच्या कानावर आली नसल्यास हे वाचा. तेव्हा मराठीतून, इंटरॅक्टीव्ह माध्यमाचं महत्त्व मी वेगळं सांगत नाही. ६. वाचनाची सक्ती नाही. पोरं हाकण्याची माझी इच्छा नाही. अवांतरः मुद्दामच (कारण इथला शेवटचा परिच्छेद) तुमची इतर वाटचाल पाहिली. मिपावर तुम्हांस उज्ज्वल भविष्य आहे. तेव्हा चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतनकुलकर्णी_85

तुम्हाला अनेक शुभेच्छा

चेतनकुलकर्णी_85
Wed, 02/15/2012 - 22:42 नवीन
तुम्हाला अनेक शुभेच्छा ....अशीच चांगली कामे करत राहा...:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

१.योग्य सन्दर्भ द्या २. नाव

sagarpdy
Wed, 02/15/2012 - 22:46 नवीन
१.योग्य सन्दर्भ द्या २. नाव अगदि योग्य आहे आपले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

संदर्भ

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 02/15/2012 - 23:00 नवीन
मी या पुस्तकातून शिकले आहे. पण Stellar physics च्या कोणत्याही चांगल्या पुस्तकात हे मिळेल. मोहन आपटे यांच्या 'सहस्त्ररश्मी' या पुस्तकातही बहुदा याबद्दल माहिती होती. कदाचित "कृष्णविवर अद्भुत खगोलीय चमत्कार" यातही याबद्दल रंजक शब्दांत माहिती असेल. मी हे पुस्तक वाचलेलं नाही, पण आपटे सरांच्या लेखनाबद्दल तेवढी खात्री निश्चित देता येईल. त्यांच्या पुस्तकांची यादी इथे मिळाली. अवांतरः दुवा योग्य पद्धतीने दिल्यासही भलतीकडे घेऊन जात आहे. मागच्या बाजूने दुरूस्ती आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

"कृष्णविवर अद्भुत खगोलीय

sagarpdy
Wed, 02/15/2012 - 23:19 नवीन
"कृष्णविवर अद्भुत खगोलीय चमत्कार" वाचल होत पण ५-६ वर्ष झाली त्याला, नीटसे आठवत नाहीये. असे करा , योग्य ती माहिती तुम्हिच द्या. (तुमचे लेख वाचतोच आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

छे छे,

Nile
गुरुवार, 02/16/2012 - 00:09 नवीन
बाकी ह्या निळ्याचे खाते अजून चालू आहे, हा देखील एक ईश्वरी चमत्कारच आहे.
तुमच्या सारख्या हलकट लोकांच्या मानगुटीवर बसण्याकरता भुताखेतांनापण ईश्वरानंच निर्माण केलंय हे विसरू नका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

तुम्ही शाळामास्तर आहात का

गवि
Wed, 02/15/2012 - 15:57 नवीन
तुम्ही शाळामास्तर आहात का हो?* बाकी चालू द्या. *श्रेयअव्हेर - 'म्हैस', पुलं.
खिक्क करुन हसताना कॉफीतले ट्यानिन सांडले कीबोर्डावर.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

विज्ञानाने जाहीर केले की अमुक

JAGOMOHANPYARE
Tue, 02/14/2012 - 20:08 नवीन
विज्ञानाने जाहीर केले की अमुक आकाशग॑गा इथे आहे. पाहतो का आपण ? तरी विश्वास ठेवतोच ना? हा नास्तिकपणा म्हणायचा की विज्ञाना वरील अ॑धश्रद्धा ? दुर्बिण लावा आणि बघा.. विज्ञान कुठे अडवते तुम्हाल?
  • Log in or register to post comments

नै तर काय?

गणपा
Tue, 02/14/2012 - 20:11 नवीन
हे विज्ञानवादी बरेच माजले आहेत लेकाचे. मुद्दे नसले की लागले लगेच झाडावर चढायला नी पॉपकॉर्न खायला. -देवभोळा(भिता) गण्या.
  • Log in or register to post comments

सहमत

आदिजोशी
Tue, 02/14/2012 - 20:25 नवीन
+१००००००००००००००००००००००००००००००००००००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

सहमत आहे.

Nile
Tue, 02/14/2012 - 20:47 नवीन
मुद्दे नसले की लागले लगेच झाडावर चढायला नी पॉपकॉर्न खायला.
मी तर म्हणतो हे गल्लेलठ्ठ विज्ञानवादी झाडांवर बसुनही फांद्या तुटत नाहीत म्हणजे देव आहेच. प्रश्नच मिटला!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

+१

हंस
Tue, 02/14/2012 - 21:15 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

विज्ञान

तिमा
Tue, 02/14/2012 - 20:31 नवीन
'विज्ञानावरील अंधश्रद्धा' हा नवीन वाक-प्रचार आवडला. या अंधश्रद्धेमुळेच आम्ही विज्ञानशाखेला गेलो आणि दु:खी झालो. त्यापेक्षा देवावर श्रद्धा ठेवली असती तर आज किती सुखात असतो. पण आता परतीचे दोर कापलेले आहेत. कदाचित, २१ डिसेंबरला जर आपल्या सूर्यमालेला कृष्णविवराने गिळले तर आपल्याला सगळ्यांनाच एकदमच 'देवदर्शन' होईल.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा