Skip to main content

संबंधित मिपाकरांना विनम्र आवाहन - महापालिका निवडणुकीत अवश्य मतदान करा..

लेखक कॉमन मॅन यांनी सोमवार, 13/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
संबंधित मिपाकरांना विनम्र आवाहन - येत्या गुरुवारी - १६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे, नाशिक, आदी एकूण १० महानगरपालिकांमध्ये आपापल्या प्रभागासाठीच्या 'नगरसेवक' पदाकरता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. तरी सर्व संबंधित मिपाकरांना आम्ही विनम्र आवाहन करतो की सर्वांनी या निवडणुकांमध्ये आपला मतदानाचा हक्क अगदी अवश्य व आग्रहाने बजावला पाहिजे. प्रत्येकाने आपले हे एक कर्तव्य आहे, असे समजून कोणतीही सबब न सांगता मतदान केले पाहिजे. सार्वभौम संसदिय लोकशाहीतत्त्वानुसार तसेच भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२६ अंतर्गत केलेल्या मतदात्याच्या व्याख्येनुसार प्रत्येकने आपली मतदात्याची भूमिका पार पाडली पाहिजे असे वाटते. असो, मतदानाकरता सर्वांना पुन्हा एकदा विनम्र आवाहन.. -- कॉमॅ.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2660
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

In reply to by पक पक पक

हल्ली काव्य लेखनात खंड का पड्तो आहे..?
नाही. तश्या चारोळ्या सुरूच असतात, काळोखातल्या आरोळ्या सुरूच असतात, फणसामध्ये आठळ्या सापडतच असतात, इकडच्या तिकडच्या सुरनळ्या सुरूच असतात..! :) बाकी हल्लीच्या जमान्यात, अधसुळणारे कुरकुरणारे धर्म्रभ्रष्टित फडफडणारे अर्ध्यावरती नांगरणारे चंद्रमौलवी अडखळणारे नगारे नगारे नगारे..! हे असायचेच..! असो, खाजगी चर्चेकरता आपल्याला खरडवही तसेच संदेशाचा पर्याय उपलब्ध आहे असे आम्ही सुचवतो..

* प्रस्थापित पक्षाच्या कार्यकर्त्याची, स्वतःचे कोणतेही कर्तुत्व नसलेली, बायको. * आयत्या वेळी जातीचे प्रमाणपत्र मिळवून स्वतःला यशस्वीरित्या मागास सिध्द करू शकलेला जुना नेता. * राजकारण किंवा सामाजिक कार्याचा कोणताही अनुभव नसताना आरक्षणामुळे लॉटरी लागलेल्या धनाढ्य उद्योजिका. असे तीन पर्याय आमच्या प्रभागात आहेत. हे तिन्ही पर्याय डावलून, ज्याचे चिन्ह आवडेल अशा कोणत्याही उमेदवाराला मत द्यावे काय, असा देखील विचार आमचा चालू आहे.

In reply to by श्रीरंग

चेपुवर सध्या ४९-O चा प्रचारही सुरु आहे. त्याचा वापर करण्यास बहुदा कुणाची आडकाठी नाही. दूरस्थ वा शिक्षण-नोकरीसाठी बाहेरगावी असलेल्या लोकांना टपाली मतदान करता येते काय?? कुणाला माहिती असल्यास मौलिक भर टाकावी.

In reply to by अन्या दातार

याचा अर्थ, तशी सही करणे व मतदान न करणे हे सारखेच आहे. मी तशी सही केल्याने निवडणूक निकालात काहीच फरक पडणार नसेल तर तशी सही (ऑप्टिंग नॉट टू व्होट) करण्यात काय हशील? अवांतरः मी मतदान करणार आहेच!! अतिअवांतरः नियम असतात. काही मोडता येतात, इतर वाकवता येतात. इति. मॉर्फियस (राहिलेले फाट्यावर मारता येतात! इति पैलवान )

In reply to by तुषार काळभोर

याचा अर्थ, तशी सही करणे व मतदान न करणे हे सारखेच आहे. मी तशी सही केल्याने निवडणूक निकालात काहीच फरक पडणार नसेल तर तशी सही (ऑप्टिंग नॉट टू व्होट) करण्यात काय हशील?
बहूदा त्यामुळे बोगस मतदानाला आळा घालणे शक्य होत असेल. अधिक प्रकाश जाणकार टाकतीलच.

In reply to by अन्या दातार

४९-० असा कोणताही नियम नसून, त्याबाबत खोटा प्रचार करण्यात येत आहे, असे मागे एकदा व्रुत्तपत्रात वाचल्याचे स्मरते. नक्की काय तो उलगडा आजच करून घेतो आणी इथे कळवतो.

ऑनलाईन मतदान असले पाहिजे असे अनेक मिपाकरांनी गेल्यावर्षीच एका धाग्यात सुचवले होते. निवडणूक आयोगाने त्याचा विचार केलेला दिसत नाही.

In reply to by चिरोटा

मिपावरच लिहीले होते ना? निवडणुक आयोगाला नव्हते ना लिहीले. मग आयोग या मुद्द्यावर कसा विचार करणार. Smiley

In reply to by चिंतामणी

मिपावरील धागे वाचून बुश प्रशासनाने काही पावले उचलण्याचे निश्चित केले होते, साध्या निवडणूक आयोगाचे काय घेऊन बसलाय? ;)

In reply to by चिंतामणी

मिपावरच लिहीले होते ना? निवडणुक आयोगाला नव्हते ना लिहीले. मग आयोग या मुद्द्यावर कसा विचार करणार.
श्री. चिंतामणी ह्यांची ही प्रतिक्रिया म्हणजे मिपा आणि मिपाचा अनादर आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्व पक्षांचे अध्यक्ष, अर्थमंत्री, रेल्वेमंत्री, उद्योजक, बराक ओबामा इ.इ. आणि येवढेच नाही तर चित्रपट निर्माते, कथाकार, चेतन भगत, अनिस हे सर्व फक्त आणि फक्त मिपा वाचून आपले धोरण ठरवतात हे श्री. चिंतामणी ह्यांना काय माहिती नाही का काय? त्यांचा खोडसाळ प्रतिसाद त्वरेने उडवून, प्रतिसादकर्त्यास योग्य ती समज देण्यात यावी. श्री. चिंतामणी ह्यांनी माफी देखील मागायला हवीच.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आणि असेच म्हणतो... आणि या अपमानाचा एक कार्यक्षम, नवोदित, ज्वलंत, उत्साही मिपाकर म्हणून निशेद नोंदवतो!

श्री. चिंतामणी ह्यांची ही प्रतिक्रिया म्हणजे मिपा आणि मिपाचा अनादर आहे. पराजी महाराजांशी सहमत आहे....