Skip to main content

फरियाबाग ....

लेखक पियुशा
शुक्रवार, 10/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
"फरियाबाग " मागील भागात आपण भुइकोट किल्ल्याची माहीती घेतली आजच्या भागात जाणुन घेउया " फरियाबाग" या वास्तु/इमारती/महालाबद्द्ल :) या ईमारतीचा इतिहास थोड्क्यात :- हे आहे हेन्री कझेन्स या युरोपियन इसमाने, साधारण इ. स. १८८० च्या दशकात, काढलेलं फारिया बागेचं छायाचित्र. इतिहास : अहमदनगर हे शहर आताच्या आधुनिक भारतात, महाराष्ट्र राज्यात येतं. हे शहर निझामशाहीतलं सगळ्यात मोठं आणि महत्वाचं शहर होतं. निझामशाहीची स्थापना पंधराव्या शतकाच्या शेवटी शेवटी, इ. स. १४९४ मधे, निझाम शहाने केली. त्यावेळच्या बलदंड सागरी सत्ता असलेल्या पोर्तुगिजांच्या हल्ल्यांना पुरून उरलेल्या, भारताच्या पश्चिम किनार्‍यावरील अगदी मोजक्या सत्तांपैकी एक. मुस्लिम सत्तेत उगम असलेल्या अहमदनगरमधे एक किल्ला, भरपूर मशिदी आणि इस्लामी स्थापत्याने प्रभावित असलेल्या इमारती आहेत. वरील छायाचित्रात दाखवलेली इमारत त्यातीलच एक. प्रवेशद्वाराच्या कमानींच्या बांधणीवरून हा इस्लामी स्थापत्याचा प्रभाव अगदीच स्पष्ट दिसून येतो आहे. इ.स. १५०८ मधे, अहमद निझामशहाच्या निधनानंतर, त्याचा मुलगा बुर्‍हान शहा राज्यावर आला. त्यावेळी तो अवघा सात वर्षांचा होता. त्याने तर चक्क आपला दक्षिणेकडचा प्रबळ शत्रू, विजयनगर साम्राज्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून स्वतःचे राज्य मजबूत केले. साहजिकच, या तुलनेने शांततेच्या काळात कला आणि व्यापार भरभराटीला आले नसते तरच नवल. धार्मिक बाबतीतही अतिशय सामंजस्याचे धोरण अवलंबले जात होते. मात्र, मुघल, विजापूरची आदिलशाही आणि आसपासच्या इतर काही लहानमोठ्या सत्ता यांच्याशी कुरबुरी मधून मधून चालू होत्याच. बुर्‍हान शहा स्वतः पट्टीचा लढवय्या होता आणि या लहान मोठ्या संघर्षांसाठी त्याचे सैन्य सदैव तयार असे. अशा या निझामशाहीच्या दुसर्‍या सुलतानासाठी बांधलेला राजवाडा अहमदनगर शहराच्या वायव्येस साधारण दोनेक मैलांवर अजूनही भग्नावस्थेत बघावयास मिळतो. तोच हा फारिया बाग राजवाडा. एका तळ्याच्या मधोमध वसलेला. अष्टकोनी आकाराची ही वास्तू दुमजली आहे. एक घुमटही आहे. बांधकाम मुख्यत्वे दगड आणि चुन्याचं आहे. या विस्तिर्ण वास्तूत आणि आजूबाजूला असलेल्या मनोरम बागांमधून सुलतान आणि त्याच्या दरबारीजनांच्या मनोरंजनासाठी बुद्धीबळ आणि इतर क्रीडाप्रकार चालत असत. बुर्‍हान शहा, इ. स. १५५३ मधे निधन पावला. त्याला, करबला इथे दफन करण्यात आले आहे. चला तर मग "फरियाबाग" सफरीला : भुईकोट किल्ला पाहून आम्ही मोर्चा वळवला टँक म्युझींअमकडे गेटच्या आत प्रवेश केला , दोन्ही साईडला विस्तीर्ण अशा हिरव्या दाट झाड्या पसरलेल्या होत्या. चालत असताना दूरवर एक घुमटासदृश काहीतरी दिसत होते जसेजसे जवळ गेलो तसा त्या इमारतीचा काही भाग दिसू लागला " हेच आहे का टँक म्युझींअम" ? पण हे तर ४-५ मजली दिसतंय ? रणगाडे कसे ठेवले असतील यात ? असे अनेक निरागस प्रश्न ( अर्थात मला ) पडले होते . तिथे गेटवर एक फौजी दम्बुकधारी सिंगचाचा पहारा देत होते .त्यांनाच विचारलं " सर ये टँक म्युझींअम कब तक खुला रहेगा ? " क्या हम अंदर जा सकते है ? त्या फौजीने एकदा माझ्याकडे पाहिलं अन एकदा माझ्या भावाकडे ! कपाळावरच्या आठ्या स्पष्ट दिसत होत्या ,तरीही स्मित करत म्हणाला " बेटा ये फारीयाबाग है " तुमको नही मालूम ? नगर के नही हो ?बहारसे आये हो क्या ? कसबस उसन हसून तिथून आम्ही कलटी मारली . जाता जाता चाचाने एक पोझ दीली घेतला एक फोटु मग ;) अन प्रवेश केला फारीयाबागेत : हा आहे आतला दगडी जीना हा पहा आतला भव्य दिवाण खाणा हा एक सुन्दर कक्ष हा खिड्कीतुन घेतलेला हा अजुन एक कक्ष : ह्या युद्धाच्या खाणा-खुणा ( गोळ्याचे निशाण) : ह्या खांबाचे आम्ही छोटा " कुतुबमिनार" असे बारसे केले ;) काही ठि़काणी पड्झड झालेली आहे हा आहे टेरेस व्हिव : टेरेस वर एक गोल घुमट / बूरज आहे तिथपर्यन्त पोहचलो तर तो पुर्णपणे झाकलेला होता मनुष्यरुपी कबुतराच्या भरपुर जोडया ठाण मान्डुन बसलेल्या होता ,म्हनौन लगेच काढता पाय घेतला ;) साइडने घेतलेला अजुन एक फटु : थोड पुढॅ हे गार्डन आहे तिथे घेतलेले हे काही टाईमपास फटुज असो , वेळ कमी होता अन टँक म्युझींअमही पहायचे असल्याने आम्ही " फरियाबागेचा " निरोप घेतला :) उर्वरित क्रमश :
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5666
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

उत्तम ओळख. पुढचे भाग पटापट टाका. :) अवांतर: मयसभेसाठी फरियाबागेचे लोकेशन फिक्स करता येईल काय? ;-) भारदस्त आणि भुलभुलैया टाइप जागा आहे.

In reply to by गणेशा

स्वारी मालक, पण आपण आउट साइड ऑफ स्टंप देता ना मग ड्राइव्ह मारतो आम्ही... = फोटो दिसले नाही तरी चालतील, पण धागा उघडायचा तो हपिसातुनच=

In reply to by वपाडाव

फोटो आता दिसत नसल्याने ... धागा नंतर वाचला जाईन.
नंतर वाचला जाईन म्हणजे नंतर बाहेरुन फोटो साठी बघितला जाईन.. असे पामरा चे म्हणणे होते.. बाकी , तुम्ही फिल्डींग लावुन बसलेला हाय ना ? मग मध्येच काय ड्राइव्ह मारता ... येइल येइल ... तुमची लवकर बॅटींग येईन

बाकी, माहिती फटूंच्या खाली-वर लिहिली असती तर छान वाटले असते. ती एकाच जागी संकलित झाल्याने नंतरचा लेख पोरका वाटतो... असो हे आमचे मत... माहिती एकदम छान... ओळख आवडली... अवांतर :: नगरला सर्व काही फक्त २६ जानेवारी अन १५ ऑगस्टलाच सुरु असतं की काय?

सुरेख ओळख. ५व्या फटुतील दगडी जिन्यावरील नवविवाहीत जोडपे (मोस्त प्रोब्याबली) पन्जाबी दिसतेय. बैच्या हातातील बान्गड्यावरुन माझा अन्दाज.

In reply to by इरसाल

५व्या फटुतील दगडी जिन्यावरील नवविवाहीत जोडपे (मोस्त प्रोब्याबली) पन्जाबी दिसतेय. बैच्या हातातील बान्गड्यावरुन माझा अन्दाज.
"मस्त" प्रॉबैबली म्हणायचंय का? :)

छान ओळख. १६ व्या शतकातली इमारत म्हणजे बरीच जुनी आहे. १८८० च्या फोटोतही पुरेशी भग्नच दिसते आहे इमारत. त्यातल्या एका फोटोत (वरुन पाचवा.. १८८० चा फोटो धरल्यास सहावा) जमिनीत मधेच असलेला खोल खड्डा पाहून वाटलं की कोणी पडू नये यात म्हणजे झालं. तिथे काहीतरी वॉर्निंग लावायला हवी होती.

नगराच्या जवळच बुर्‍हानगर आहे, ते याच राज्यकर्त्यामुळे पडल असाव!! बाकी माहिती छान...नगरची असून या ठिकाणी अजुन जाणा नाही झाल...

In reply to by मनीमाउ

त्याचे खरे नाव बुर्‍हाणनगर असेच आहे. आणि या इमारतीला फराहबाग म्हणायचे आधी. आता फरियाबाग केले असेल नाव तर काही कल्पना नाही.

@ गवी तो खड्डा खोल नाहिये जास्ती . बहुतेक ते कुन्ड आहे का कारन्जा काही कळाले नाही मला पण त्यात पाणी आहे थोडेस :)

मस्त ओळख करुन देत आहात , सलाबत अली ची कबर , चांदबिबी चा महाल, माढी ची कबर की मस्जिद ( ? ) , केडगांव चे रेणुका मंदिर हे पण कव्हर करावे ही विनंती :)

चला कधी जाण्याचा योग आला नाही. पण प्रवासवर्णन वाचून एकदा तरी भेट द्यायची इच्छा होत आहे. - पिंगू

हा भाग छान झालाय, हिंसाविरहित उगा भिती नाय दाखवली तोफा अन टॅंकाची

छान फोटो आणि वर्णनही सुरेख. गोवळकोंड्यातल्या इमारतींशी इथले बांधकाम बरेच साध्यर्म्य साधतेय. विशेषतः कमानदार रचना, वरून ८ व्या फोटोत असलेल्या डायमंड शेप्ड डिझाईन इ. इतिहास थोडा कच्चा राहिलाय पण ;)
त्यावेळच्या बलदंड सागरी सत्ता असलेल्या पोर्तुगिजांच्या हल्ल्यांना पुरून उरलेल्या, भारताच्या पश्चिम किनार्‍यावरील अगदी मोजक्या सत्तांपैकी एक.
नगर हे पश्चिम किनार्‍यावर? पोर्तुगीज सागरी सत्ता बलदंड असली तरी तिचा अधिकार समुद्रावर आणि गोवा, चौल-रेवदंडा आणि वसई इतक्याच भूभागावर चालत असे. पोर्तुगीजांनी निझामावर आक्रमण केल्याचे कधीही ऐकलेले नाही. इस्लामिक सत्तांची जुळवून घेण्याचेच त्यांचे धोरण असे. शिवाय बुर्‍हान शहाच्या वेळी तर पोर्तुगीज नवजातच होते.

In reply to by प्रचेतस

इतिहास थोडा कच्चा राहिलाय पण Wink त्यावेळच्या बलदंड सागरी सत्ता असलेल्या पोर्तुगिजांच्या हल्ल्यांना पुरून उरलेल्या, भारताच्या पश्चिम किनार्‍यावरील अगदी मोजक्या सत्तांपैकी एक. नगर हे पश्चिम किनार्‍यावर? पोर्तुगीज सागरी सत्ता बलदंड असली तरी तिचा अधिकार समुद्रावर आणि गोवा, चौल-रेवदंडा आणि वसई इतक्याच भूभागावर चालत असे. पोर्तुगीजांनी निझामावर आक्रमण केल्याचे कधीही ऐकलेले नाही. इस्लामिक सत्तांची जुळवून घेण्याचेच त्यांचे धोरण असे. शिवाय बुर्‍हान शहाच्या वेळी तर पोर्तुगीज नवजातच होते.
या सगळ्यात काय चूक किंवा विश्वास बसू नये असं काय आहे? ०१. मूळात, तो उतारा नीट वाचला तर असे कळेल की त्यात निझामशाहीबद्दल लिहिले आहे, केवळ अहमदनगर शहराबद्दल नव्हे. ०२. अर्थातच, निझामशाही ही बरीच मोठी पसरलेली होती. आजच्या अहमदनगर, पुणे, ठाणे, नाशिक, खान्देश वगैरे भागात हे राज्य पसरलेले होते. ०३. भारताच्या पश्चिम किनारपट्टीचा एक मोठा भूभाग त्यांच्या ताब्यात होता. ०४. हा काळ होता पंधराव्या शतकाच्या शेवटच्या दशकाचा आणि सोळाव्या शतकाच्या सुरूवातीचा. ०५. वास्को द गामा भारतात उतरला इ.स. १४९८ मधे. कालिकतमधे. ०६. त्यावेळेपर्यंत पोर्तुगिज हे तत्कालिन जगातील सगळ्यात महत्वाच्या आणि बलशाली समुद्री सत्तांपैकी एक म्हणून प्रस्थापित झाले होतेच. ०७. हळू हळू त्यांचा वावर भारताच्या पश्चिम किनार्‍यावर सुरू झाला. बर्‍याच ठिकाणी त्यांनी सत्ताही स्थापन केली. ०८. स्थानिक सत्ता म्हणून निझामशाही आणि आदिलशाही यांचा पोर्तुगिजांशी संबंध येणे आणि तो काहीसा संघर्षात्मक असणे हे साहजिकच आहे. या सगळ्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर मूळ लेखातील संदर्भ वाचल्यास ते चूक किंवा असत्य वाटण्याचे कारणच नाही. वल्लींना तसे वाटले याचे आश्चर्य वाटले.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

या सगळ्यात काय चूक किंवा विश्वास बसू नये असं काय आहे?
निजामशाही ही पश्चिम किनार्‍यावरील सत्ता हेच होती हेच पटत नाही. पश्चिम किनारपट्टीचा मोठा भूभाग जरी त्यांच्या ताब्यात असला मुख्य सत्तास्थान तिथे नव्हते. जुन्नरला थोड्या काळासाठी राजधानी केल्याचे दाखले मिळतात पण ते अल्पकाळासाठीच. पोर्तुगीज आणि निजामशाहीमध्ये थोड्याफार चकमकी उडाल्याही असतील पण मोठी लढाई झाल्याचे मी तरी ऐकले नाही. अर्थात पोर्तुगीज ही बलदंड सागरी सत्ता असली तरी त्यांचा प्रभाव किनारपट्टीपुरताच असे. घाटापलीकडील भूभागाकडे त्यांची नजर कधीही गेली नाही. बाकी निजाम-पोर्तुगीज संबंधांबद्दल अधिक माहिती मिळाल्यास नक्कीच आवडेल.

गेल्या वर्षी लखनऊला असताना तिथल्या भुलभुलैया मध्ये गेलो होतो. त्याची आठवण आली. बाकी ती भव्य वास्तु पाहताना आणि भुलभुलैयानामक त्या दगडी अंधार्‍या बोळांतून फिरताना मनात धडकीच भरली होती. त्यात आंम्ही एकटेच होतो. Smiley

एका नवीन प्रदेशाची माहिती देते आहेस त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद, पण वल्ली म्हणतात तसं जरा इतिहास पक्का करून मग लिही, म्हणजे अजून छान वाटेल.

स्वतःची टिंगल टवाळी उडवून घेण्यापेक्षा पुढचे भाग टाकले नाहीत तरी चालतील. :) ब्लॉगवरती लिहा आणि इच्छुकांना लिंक देत चला.

छानच माहिती दिलीस गं पियुशा, आणि हो, तु लिहिलेलं आम्हाला फार फार आवडतं हो, अवांतर : मला वाटलं त्या चौथ्या फोटोत तु आणि तुझा भाउ आहे कि काय ;-)

In reply to by michmadhura

अवांतर : मला वाटलं त्या चौथ्या फोटोत तु आणि तुझा भाउ आहे कि काय मीचमधुराजी,:D तुस्सी मजाक कर रेहे हो ना ?