[फरहाद शहजाद यांची मेहदी हसन यांनी गायलेली 'तनहा तनहा मत सोचा कर' ही गझल ऐकताना सुचलेले मुक्तक]
निर्जन एकांती असे रे, भलते विचार करू नको
जीवावर बेतेल मित्रा, असा अविचार करू नको
खूप झाले क्षणभरासाठी, लाभली मुग्ध प्रीती तुला रे
खोटी खरी याची आता, शहानिशा तू करू नको
डसणे जिचा 'धर्म' आहे, डंख ती मारून गेली
साहणे हे तुझे प्राक्तन, भोगताना विव्हळू नको
एकाकी पाडते तुला ना, भरमध्यान्ही सावली
वर्म आकळले तुला रे, उगाच आता झुरू नको
हरलास जरी बाजी जराशी ,सर्वस्व पणाला लावूनी
कैफात धुन्द रहा जुगार्या, रूक्ष हिशेबी गुंतू नको
जळो वांझ पश्चातबुद्धी, ऐक माझे जरा 'मुक्या' तू
डाव नव्याने मांड आता, उगाच ते तू टाळू नको
वाचने
6000
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
हरलास जरी बाजी जराशी ,सर्वस्व
हरलास जरी बाजी जराशी ,सर्वस्व पणाला लावूनी
कैफात धुन्द रहा जुगार्या, रूक्ष हिशेबी गुंतू नको
भन्नाट ........................
लय भारी !! ______/\______ घ्या आमचा.
क्षमस्व ...
हा अनुवाद नजरचुकीने 'काव्य' ऐवजी 'साहित्य' सदराखाली पोस्ट झालेला आहे. :-(
"एकाकी पाडते तुला ना,
"एकाकी पाडते तुला ना, भरमध्यान्ही सावली"
क्या बात है....क्या बात है....!!!!!
मस्तच......
"एकाकी पाडते तुला ना,
In reply to "एकाकी पाडते तुला ना, by DTPS२००८
"एकाकी पाडते तुला ना, भरमध्यान्ही सावली"-------> +१
सुंदर आहे. घरी गेल्यावर मूळ गझल ऐकता येईल.
मस्त रे मूकवाचका. आवडले.
मस्त रे मूकवाचका.
आवडले.
मस्तच रे. मूळ गझलेचा तुनळी
मस्तच रे. मूळ गझलेचा तुनळी दुवा देता आला तर बघा प्लिज.
इथे आहे ही गझल
In reply to मस्तच रे. मूळ गझलेचा तुनळी by अन्या दातार
अन्या भाऊ - इथे आहे ही गझल:
मुक्त वाचकः मुक्त रुपांतर आवडलं, चांगल्या गाण्याची निवड केलीत.
छानच
छानच :)
मस्त
आवडली!
एकाकी पाडते तुला ना,
जबरदस्त ..
+१
In reply to एकाकी पाडते तुला ना, by गणेशा
+१
मस्त !
मस्त ! :)
कविता फार आवडली
फार छान!
ऑस्सम!!
ऑस्सम!!
मस्तच !
फारच छान!.... मनाला भावली.... :)
आपकी गजल ,दिल को छु गयी
आपकी गजल ,दिल को छु गयी :)
छान
भावानुवाद म्हणून फार सुंदर.
वर बहुगुणी यांनी मुळ गझल
वर बहुगुणी यांनी मुळ गझल दिलीच आहे,ती ऐकुन नंतर सावकाश प्रतिक्रीया देणारे.अत्ता घाईत असल्यामुळे फक्त छान जमलिये एवढेच म्हणतो. :-)
वर बहुगुणी यांनी मुळ गझल
वर बहुगुणी यांनी मुळ गझल दिलीच आहे,ती ऐकुन नंतर सावकाश प्रतिक्रीया देणारे.अत्ता घाईत असल्यामुळे फक्त छान जमलिये एवढेच म्हणतो. :-)
छान. आवडली.
छान. आवडली.
क्या बात है !
एकाकी पाडते तुला ना, भरमध्यान्ही सावली
वर्म आकळले तुला रे, उगाच आता झुरू नको ......
वाह क्या बात है !
(No subject)
:)
सौम्य फटका!
छान! अनंत फंदींचा 'बिकट वाट वहिवाट नसावी' हा फटका आठवला!